तुमच्या जगण्याची दिशा बदलतील ही रॉबिन शर्मा यांची १० पुस्तके  

The  Monk Who Sold His Ferrari

सगळ्या संपत्तीचा त्याग करून आत्मिक शांतीच्या शोधात हिमालयातील साधूंच्या सहवासात राहणाऱ्या एका प्रथितयश वकिलाची ही कथा. जीवनाच्या सर्वच आघाड्यांवर  यशस्वी होण्याचे मूलमंत्र या पुस्तकात आहेत.

The 5 AM Club

रोज सकाळी ५ वाजता उठून काही विशेष कृतींद्वारे आपण आपली प्रोडूक्टिव्हिटी कशी वाढवू शकतो आणि त्याद्वारे आपल्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल कसे घडवू शकतो याबद्दल मार्गदर्शन करणारे हे पुस्तक आहे.

Family Wisdom from the Monk Who Sold His Ferrari

हे पुस्तक कुटुंब, कौटुंबिक मूल्ये, नातेसंबंध इत्यादी घटकांवर लक्ष केंद्रित करते. व्यावसायिक आणि कौटुंबिक जीवनात समतोल साधण्यासाठी मदत करणारे हे पुस्तक आहे.

Leadership Wisdom

From The Monk  Who Sold His Ferrari

खरे नेतृत्व काय असते? नेतृत्वक्षमता कशी विकसित करावी? नेतृत्वक्षमतेच्या साहाय्याने वयक्तिक आणि व्यावसायिक यश कसे प्राप्त करावे याविषयी मार्गदर्शन या पुस्तकात मिळेल.

Megaliving!

वैयक्तिक जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी एक मार्गदर्शक म्हणून हे पुस्तक उपयुक्त  आहे.  यात उपयुक्त असे बरेच प्रात्यक्षिक, प्रयोग आणि सूत्रे सांगितली आहेत.

The Saint,  the Surfer,  and the CEO

ज्ञान आणि मनोरंजन यांचे योग्य मिश्रण असणारी ही कथा आहे. व्यावसायिक, आध्यात्मिक आणि सामाजिक जीवनात यश संपादन  करण्याचे मूलमंत्र या कथेत आहेत.

Discover  Your Destiny  

आपल्या जीवनाचे उद्दिष्ट काय आहे? आपले सुप्त गुण कुठले? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधायला हे पुस्तक उपयोगी पडेल.हे पुस्तक स्वचा शोध घेणाऱ्या लोकांसाठी फार महत्वाचे आहे.

The Greatness Guide

आपले सामर्थ्य ओळखून कुठल्याही क्षेत्रात आपण कश्या प्रकारे यश मिळवू शकतो ? त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल ? या साऱ्याच प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात मिळतील.

Who Will Cry When You Die

हे एक प्रेरणादायी पुस्तक आहे जे वाचकाला उद्देष्यपूर्ण जीवन जगायला प्रेरित करते. इतरांना मदत करण्यात खरा आनंद आहे हे आपल्याला या पुस्तकाद्वारे कळते.

The Leader Who Had No Title

नेतृत्वक्षमता विकासाच्या  क्षेत्रातील हे एक क्रांतिकारक पुस्तक आहे.नेतृत्व गुण विकसित करून आपल्या क्षेत्रात यश कसे संपादन करायचे ते या पुस्तकात सांगितले आहे.