प्रत्येकाने वाचावी अशी रॉबिन शर्मा यांची पुस्तके । Robin Sharma Books In Marathi

जय महाराष्ट्र मंडळी! नेहमीप्रमाणेच आजही आम्ही तुमच्यासाठी महत्वपूर्ण माहितीने भरलेली आणि दैनंदिन जीवनात तुम्हाला उपयुक्त ठरेल अशी पोस्ट घेऊन आलो आहोत. मंडळी आज आपण जीवनाला दिशा देणाऱ्या काही पुस्तकांबद्दल चर्चा करणार आहोत. 

पुस्तके माणसाला घडवतात. डॉ. बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे ” पुस्तकांनी सुधारलेल मस्तक कधीच कुणापुढे नतमस्तक होत नाही.” पुस्तके आपल्याला जगण्याची नवी दिशा देतात. जगाच्या रहदारीत वावरतांना आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी पुस्तकेच आपल्याला प्रेरणादायी विचारांची नशा देतात. 

मंडळी आज आपण अशीच प्रेरणादायी नशेने आणि जीवनाबद्दलच्या आशेने भरलेली रॉबिन शर्मा यांची पुस्तके । Robin Sharma Books In Marathi पाहणार आहोत. तर मंडळी आजची रॉबिन शर्मा यांची पुस्तके । Robin Sharma Books In Marathi ही पोस्ट तुम्हा सर्वांना आवडेल अशी अपेक्षा करतो.

रॉबिन शर्मा यांची पुस्तके । Robin Sharma Books In Marathi या पोस्ट मध्ये रॉबिन शर्मा यांच्या पुस्तकांबद्दल जाणून घेण्याअगोदर आपण अगदी थोडक्यात रॉबिन शर्मा यांच्या बद्दल माहिती पाहूया. आज आपल्या लेखणीच्या जोरावर कोटी लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या जादूगाराच्या आयुष्यात थोडे डोकवुन येवूयात. 

 

 

 

रॉबिन शर्मा यांच्याबद्दल थोडे । Short Biography of Robin Sharma  in Marathi 

 

रॉबिन शर्मा हे भारतीय वंशाचे कॅनडियन नागरिक आहेत. त्यांचा जन्म कॅनडातील नोव्हा स्कॉटीया मध्ये १८ मार्च १९६५ रोजी झाला. त्यांचे वडील शिव शर्मा आणि आईचे नाव शशी शर्मा आहे. 

बालपणापासूनच रॉबिन शर्मा अभ्यासामध्ये अगदी हुशार होते. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण स्कॉटीयामध्येच झाले. त्यांनी आपले विद्यापीठीय शिक्षण “कायदा” या विषयामध्ये केले. ‘मास्टर्स इन ला’ ची पदवी मिळवून त्यांनी एक वकील म्हणून आपल्या व्यवसायाचा श्रीगणेशासुद्धा केला होता. 

मात्र अगदी सुरुवातीपासूनच त्यांचा कल लिखाणाकडे होता. रॉबिन शर्मा २५ वर्षांचे असतांना वकिलीचे कठीण काम सांभाळत त्यांनी आपले पहिले पुस्तक ‘मेगॅलिव्हिन्ग’ लिहून प्रकाशितही केले होते. या पुस्तकाचे संपादन त्यांच्या आईने केले होते.त्यांच्या पहिल्या पुस्तकाला वाचकांचा खूप जबरदस्त प्रतिसाद मिळाला.

त्यानंतर त्यांनी ‘ द मंक हू सोल्ड हिज फरारी’ हे त्यांचे दुसरे पुस्तक प्रकाशित केले. यावेळीसुद्धा वाचकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. हा प्रतिसाद पाहून त्यांनी आपला वकिलीचा व्यवसाय सोडून पूर्णवेळ लेखनाला देण्याचा निर्धार केला.आणि तेव्हापासून रॉबिन शर्मा सेल्फ-हेल्प क्षेत्रात अविरत कार्य करीत आहेत. 

पुढील काळात त्यांना विविध ठिकाणांवरून व्याख्याने देण्यासाठीही निमंत्रणे येऊ लागली. आणि मग लिखाणासोबतच व्याख्यानांचाही त्यांच्या जीवनात समावेश झाला. आज रॉबिन शर्मा मोटिवेशनल स्पीकर म्हणून जगप्रसिद्ध आहेत. आपल्या कर्मचाऱ्यांना जीवनातील संकटांवर मात करण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून विविध संस्थांकडून रॉबिन शर्मा यांना व्याख्यानांसाठी निमंत्रित केले जाते. 

त्यांची पुस्तके जगभरात जवळ जवळ ६० भाषांमध्ये भाषांतरित झाली आहेत. जगत सगल्यात जास्त वाचल्या जाणाऱ्या पुस्तकांमध्ये त्यांचा समावेश होतो. त्यांच्या व्यक्तिमत्व विकास कार्यक्रमाचे नासा, फेड एक्स सारख्या प्रथितयश संस्था आयोजन करतात.

 

 

 

रॉबिन शर्मा यांची पुस्तके । Robin Sharma Books In Marathi

 

मंडळी आताच आपण रॉबिन शर्मा यांच्याविषयी थोडक्यात माहिती पाहिलीत. खर तर त्यांच्याविषयी लिहिण्यासारखं खूप काही आहे पण सध्या आजच्या रॉबिन शर्मा यांची पुस्तके । Robin Sharma Books In Marathi या पोस्ट मध्ये आपण त्यांच्या व्यक्तिगत जीवनावर न बोलता त्यांच्या पुस्तकांबद्दल चर्चा करणार आहोत. 

त्यामुळे त्यांच्या वयक्तिक जीवनावर प्रकाश टाकणारी एक वेगळी पोस्ट घेऊन आम्ही लवकरच तुम्हाला भेटू हे आश्वासन आहे. चला तर पाहुयात रॉबिन शर्मा यांची पुस्तके । Robin Sharma Books In Marathi ज्यांनी जगातल्या बहुतांश लोकांच्या मनात आपली जागा पक्की केली आहे. 

 

Also Read

 

 

मेगालिविंग । Megaliving 

 

मेगालिविंग : परिपूर्ण जीवनासाठी ३० दिवस  हे रॉबिन शर्मा यांचे पहिले पुस्तक आहे. या पुस्तकात त्यांनी आपल्या सुप्त सामर्थ्याला कसे ओळखायचे आणि त्याला जागृत कसे करायचे याबद्दल मार्गदर्शन केले आहे.

सर्वांमध्ये खूप सामर्थ्य आहे. मात्र आपण आपल्या शक्तीला, सामर्थ्याला अडवून ठेवतो. हि अडवणूक आपल्या हातून कधी जाणतेपणे होते तर कधी आप्ल्यालाला कळातही नाही की अप्रत्यक्षरीत्या आपण स्वतःच्या शक्तीवर मर्यादा आणल्या आहेत.

मेगालिविंग या पुस्तकात रॉबिन शर्मा आपल्याला या आपल्या सामर्थ्यावर मर्यादा आणणाऱ्या कृती ओळखायला शिकवतात. या कृतींवर मात कशी करायची यासाठी कार्यपद्धत आपल्याला उपलब्ध करून देतात.

सदर पुस्तक हे प्रोयोगिक पुस्तकांच्या प्रकारामध्ये येतं. म्हणजेच पुस्तक केवळ वाचायचे नाही तर त्यासोबत आपल्याला एक कृती कार्यक्रमसुद्धा देण्यात आला आहे. हे पुस्तक चार भागांमध्ये विभाजित करता येते.

पहिल्या भागात मेगालिविंग चे तत्वज्ञान आहे. यामध्ये एक यशस्वी जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारे तत्वज्ञान समजावून सांगण्यात आले आहे. दुसऱ्या भागात परिपूर्ण जीवन जगण्यासाठी उपयुक्त पडणारे २०० नियम देण्यात आले आहेत. तिसऱ्या भागात ३० दिवसीय कृतिकार्यक्रमाचा आराखडा आहे. तर चौथ्या भागामध्ये आपल्या सुधारणांचा पडताळा घेण्याबद्दल कृतिकार्यक्रम आहे.

 

 

द मन्क हू सोल्ड हिज फरारी  । The Monk Who Sold His Ferrari 

 

रॉबिन शर्मा यांच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या या पुस्तकाबद्दल बोलावे तेवढे कमीच आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील उंच्चपदस्थ लोकांनी या पुस्तकावर स्तुतीसुमने उधळली आहेत. रॉबिन शर्मा यांची पुस्तके । Robin Sharma Books In Marathi या पोस्ट मध्ये आपण या पुस्तकाबद्दल अगदी थोडक्यात माहिती घेऊ. 

ही कथा सुरु होते एका  जॉन या वकिलासोबत. प्रसिद्धी आणि पैश्याच्या मागे धावतांना आपल्याला हा दिसतो. त्याच्या त्या धावपळीत त्याने स्वतःचे खरे जीवन गमावले आहे. त्याच्याकडे काम आणि पैसे भरपूर आहेत मात्र तो जीवनात खऱ्या अर्थाने आनंदी नाही.

अश्या परिस्थितीत त्याची भेट होते त्याच्या एका दूरच्या नातेवाईकांशी. जुलिअनशी.जुलिअन मुळात एक प्रसिद्ध वकील राहिलेला आहे. ज्या यशाची आपण फक्त स्वप्न पाहतो ती त्याने सारीच उपभोगली आहेत. त्याच्याकडे, बंगला, गाडी, प्रसिद्धी सगळंच होतं. मात्र तो खऱ्या अर्थाने सुखी नव्हता. 

जुलिअन त्याच्या वयाच्या मानाने जास्त म्हातारा दिसतो. त्याचे आरोग्य व्यवस्थित नाही. त्याचे कौटुंबिक संबंध पार बिघडलेले आहेत. आणि अश्या स्थितीत एक दिवस कोर्टामध्ये  आपली बाजू मांडत असतांना त्याला हृदय विकाराचा झटका येतो. त्याला दवाखान्यात नेले जाते.

त्यानंतर मात्र त्याच्या विचारांत काही परिवर्तन होते आणि तो खऱ्या सुखाच्या शोधात आपली सगळी संपत्ती विकून हिमालयाच्या दिशेने प्रवास सुरु करतो. बरीच वर्षे तो कुणालाच भेटत नाही. कुणाशीच त्याचा संपर्क नसतो. आणि मग अचानक तो एक दिवस जॉनला भेटायला येतो.

आता मात्र जुलिअन खूप बदलून गेलेला असतो. जॉन त्याच्यातील परिवर्तन पाहून अवाक होतो. प्रारंभी तर जॉन त्याला ओळखतच नाही. कारण जुलिअन आता पूर्वीपेक्षा खूप तरुण दिसतो आणि त्याच्या चेहऱ्यावर शांतीसुद्धा नांदत असते. आता तो एखाद्या विशीतील मुलाप्रमाने तरुण दिसायला लागला आहे.

जॉन जुलिअनला त्याच्या या परिवर्तनाचे रहस्य विचारतो. त्यावर जुलिअन त्याचा हिमालयाचा प्रवास, तिथे त्याची प्राचीन गुरूंशी झालेली भेट. त्या वास्तव्यात त्याने शिकलेल्या महत्वाच्या क्रियांविषयी माहिती देतो. जुलिअनच्या परिवर्तनाची हि कथा जॉनप्रमाणेच आपल्या सर्वांना खऱ्या आनंदी आणि समाधानी आयुष्याची रहस्ये सांगून जाते.

 

 

रहस्यमयी पत्रे । the  Secret Letters from The Monk Who Sold His Ferrari 

 

मंडळी रॉबिन शर्मा यांची पुस्तके । Robin Sharma Books In Marathi या यादीमध्ये आपण तिसऱ्या क्रमांकाला ठेवले आहे रॉबिन शर्मा यांचे रहस्यमयी पत्रे हे पुस्तक. मुळात हे मंक हू सोल्ड हिज फरारी च्या श्रुंखलेतील एक पुस्तक आहे. 

सत्याच्या आणि चिरंतन आनंदाच्या सुखात जुलिअन हिमालयात प्राचीन गुरूंकडे जातो. तेथे तो जीवन जगण्याची खरी कला शिकतो. आणि तेथे त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो प्राचीन ऋषींच्या मार्गदर्शनानुसार लोकांना मदत करण्यासाठी परत येतो. आणि लोकांना त्यांचे आयुष्य खऱ्या अर्थाने सुखकर बनवण्यासाठी मदत करतो.

या पुस्तकातही आपल्याला एक अतिशय चिंताक्रांत प्राणी पाहायला मिळतो. त्याने त्याच्या भूतकाळात केलेल्या चुका त्याला आतमधून पोखरून टाकत आहेत. त्याच्या यशाच्या पाठलागात तो इतका समोर आला आहे की त्याचे जवळचे नाते- आई,पत्नी,मुलगा, मित्र सगळे मागे राहिलेत.

त्याची अशी स्थिती असतांना त्याची भेट जुलिअन सोबत होते. खार तर जुलिअन त्याच्याकडे एका कामानिमित्त आलेला आहे. जुलिअन त्याचा नातेवाईकच आहे. जुलिअन त्याच्याकडे मदत मागतो. जुलिअनला एका व्यक्तीचा जीव वाचवण्याची जबाबदारी सोपवली असते.

मात्र त्यासाठी त्याला प्राचीन गुरूंनी दिलेले तालिस्मन हवे असतात. हे तालिस्मन जगाच्या वेगवेगळ्या भागात काही लोकांकडे ठेवलेले असतात. मात्र ते घेण्यासाठी जुलिअन काही कारणास्तव जाऊ शकत नाही. आणि त्यांना सन्मानाने एकत्र आणण्यासाठी एखाद्या भरवशाच्या माणसाची आवश्यकता असते.

जोनाथन अगोदर फार आढेवेढे घेतो. मात्र शेवटी मग आईच्या सांगण्यावरून या कार्यासाठी तयार होतो. आणि सुरु होते एक रहस्यमयी यात्रा. एक एक तालिस्मन गोळा करतांना जोनाथन समोर कोणती संकटे उभी राहतात? त्यांना तो कसा समोर जातो? या सगळ्या प्रवासात त्याच्यामध्ये काय बदल होतो?

जुलिअन शेवटी त्या व्यक्तीला कस वाचवतो? हे सगळं अगदी खिळवून ठेवणार आहे. पुस्तक एकदा हाती घेतल्यानंतर पूर्ण वाचून झाल्याशिवाय परत ठेवायची इच्छा होत नाही. जोनाथनचा हा प्रवास त्याच्या सोबतच आपल्याही जीवनात मूलभूत परिवर्तन घडवून आणण्यास मदत करतो.

 

 

 5 A.M. क्लब । The 5 A.M. Club 

 

मंडळी रॉबिन शर्मा यांच्या पुस्तकांमध्ये the monk who sold his ferrari नंतर जर कुठले पुस्तक सर्वाधिक लोकप्रिय ठरले असेल तर ते म्हणजे The 5 A.M. Club होय. या पुस्तकाने रॉबिन शर्मा यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

The 5 A.M. Club ही कथा आहे एक महिला उद्योजक, एक कलाकार आणि एका कोट्यधीशाची. महिला उद्योजक तिच्या जीवांच्या त्या टप्प्यावर असते जिथे तिला सगळं काही संपलं आहे असे वाटायला लागते. ती स्वतःला संपवण्यासाठी वेगवेगळे उपाय शोधत असते. 

कथेतील कलाकाराचराचे जीवनही काही सोपे नाही. तोसुद्धा त्याच्या कामात प्राविण्य मिळवण्यासाठी धडपड करीत आहे.अश्या स्थितीत दोघांचीही भेट कोट्यधीशाशी होते. तो मग आपल्या अगदी निराळ्या शैलीतून त्या दोघांनाही आपल्या क्षेत्रात प्राविण्य कसे मिळवायचे ते सांगतो.

कथा संपूर्णतः तीन पात्रांभोवती फिरत असली तरी त्या कोट्याधीश माणसाचा गुरु म्हणून जे पात्र आहे ते फार महत्वाचं ठरते. कथेचा मूळ गाभा आपण लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींच्या नदी लागून कसे आपले नुकसान करीत आहोत आणि ते टाळण्यासाठी काय करायला हवे हा आहे.

पुस्तकात तुम्हाला आपण करीत असलेल्या कृती आणि त्या मागचे मेंदूच्या सूक्ष्म पातळीवरील विज्ञानही अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितलेले आहे. सोबतच रॉबिन शर्मा यांनी आपले अंतर्गत सामर्थ्य जागृत करण्यासाठी अंगी शिस्त बांधण्यासाठी विविध उपायही सांगितले आहेत.

 

 

नेता ज्याला कुठलही नाव नाही । The  leader who had no Title 

 

रॉबिन शर्मा यांची ही कथा शीर्षकात सांगितल्याप्रमाणे नेतृत्व क्षमता विकसित करण्याशी संबंधित आहे. या पुस्तकातही रॉबिन शर्मा आपल्या इतर पुस्तकांप्रमाणे नेतृत्वाची रहस्ये एका कथेच्या स्वरूपात आपल्या समोर प्रस्तुत करतात. 

या कथेचा नायक सुद्धा त्याच्या व्यक्तिगत जीवनात खूप हताश झालेला आहे. अपयशांनी खचून गेलेला आहे. त्याला समोर जाण्यासाठी वाट सापडत नाही. अश्यावेळी त्याचा एक मित्र त्याला काही साधूंच्या सोबत एक संपूर्ण दिवस घालवण्याचा सल्ला देतो.

आपला नायक मित्राचा सल्ला ऐकतो. साधूंशी त्याची भेट होते. आणि त्यानंतर मात्र त्याच्या जीवनात परिवर्तन व्हायला प्रारंभ होतो. ते साधू त्याला चार-पाच महत्वाच्या लोकांशी जाऊन भेटायला सांगतात. जेव्हा तो या लोकांना भेटतो तेव्हा त्यांच्याकडून त्याला नेतृत्वाची खरी रहस्ये कळतात. 

या नेत्यांना भेटल्यानंतर त्याला कळून चुकते आपण चुकीच्या संकल्पना मनात ठेऊन यशस्वी होण्यासाठी धडपड करीत होतो. मात्र त्यांच्याशी भेट झाल्यानंतर त्याला त्याच्या चुका कळतात. आपण कुठे चुकलो हे कळणे हीच सुधारणेची खरी सुरुवात असते. परिणामी त्याच्या जीवनात पुढे आमूलाग्र परिवर्तन घडून येते. 

 

 

आणखी वाचा

 

 

 

समारोप  

 

मंडळी आपण आज रॉबिन शर्मा यांची पुस्तके । Robin Sharma Books In Marathi या पोस्ट मध्ये रॉबिन शर्मा यांची पुस्तके पाहिलीत. मुळात त्यांच्या आम्हाला आवडलेल्या काही पुस्तकांबद्दलच येथे आपण माहिती घेतलीत. खरं तर त्यांच्या प्रत्येक पुस्तकाचा सारांश देता आला असता.आम्ही सारांशयुक्त पोस्ट लवकरच घेऊन येऊ.

मंडळी आजच्या रॉबिन शर्मा यांची पुस्तके । Robin Sharma Books In Marathi या पोस्ट मध्ये कुठले पुस्तक तुम्हाला आवडले? पोस्ट वाचून कुठले पुस्तक तुम्हाला वाचावेसे वाटले? आणि कोणत्या पुस्तकाबद्दल तुम्ही पहिल्यांदाच वाचलंत ? हे सारं आम्हाला कमेंट करून कळवा. 

मंडळी रॉबिन शर्मा यांची पुस्तके । Robin Sharma Books In Marathi या पोस्ट मध्ये काही चुका असतील, काही सुधारणा असतील तर त्यासुद्धा आम्हाला कळवा. चुका होणं हे जस मानव असण्याचं लक्षण आहे त्याचप्रमाणे त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करणे हे सुद्धा मानवाचं लक्षण आहे. आम्हालापण चुका सुधारण्याची संधी नक्की द्या.

रॉबिन शर्मा यांची पुस्तके । Robin Sharma Books In Marathi या पोस्ट ला अधिक उत्तम बनवण्यासाठी तुमचे सहकार्यही आवश्यक आहे. तेव्हा तुमचे महत्वाचे मार्गदर्शन आमच्यापर्यंत नक्की पोहचू द्या. 

धन्यवाद !

1 thought on “प्रत्येकाने वाचावी अशी रॉबिन शर्मा यांची पुस्तके । Robin Sharma Books In Marathi”

  1. सर्वच पोस्ट छान आहेत. पुस्तकाबद्दल सविस्तर माहिती आहे. धन्यवाद

    Reply

Leave a Comment