दिसामाजी काहीतरी ते लिहावे । प्रसंगी अखंडित वाचत जावे ।
आपणासी जे जे ठावे । ते ते दुसऱ्यासी सांगावे ।
शहाणे करून सोडावे । सकळजन ।।
मित्रांनो, समर्थ रामदास स्वामींच्या उपदेशप्रमाणे वागण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे असे जर मी म्हणालो तर प्रश्न निर्माण होतो कि एवढे ज्ञान पाजळण्याइतपतचा शहाणपणा खरंच माझ्याकडे आहे का? नाही. खचितच नाही. मग हे लिखाण करण्याची उठाठेव मी का करतोय?
मित्रांनो जीवनात यशस्वी होणं फार महत्वाचं आहे.(यशाची व्याख्या मात्र प्रत्येकासाठी वेगवेगळी असते.) मात्र यशस्वी होण्यासाठी सदैव प्रेरित असणंसुद्धा आवश्यक आहे. बरेचदा असे घडते की आपण सुरुवातीला फारच उत्साही आणि प्रेरित असतो मात्र वेळेनुसार हा उत्साह, हि प्रेरणा कमी कमी होत जातांना दिसते. आणि हेच माझ्या सोबत घडत आलेलं आहे.
मग सदैव प्रेरित राहण्यासाठी उपाय शोधात असतांना डोक्यात हि कल्पना आली की जर आपण नित्यनेमाने फक्त प्रेरणादायी गोष्टीच वाचत राहिलो, लिहीत राहिलो, आणि इतरांशी त्याच गोष्टींवर जर संवाद करीत राहिलो तर आपल्या मेंदूला सकारात्मक गोष्टींशिवाय काही सुचणारच नाही. आणि आपण सदैव आपल्या ध्येयावर केंद्रित राहू शकू. म्हणून मुळात हा ज्ञान पाजळण्याचा नव्हे तर स्वतःला सावरण्याचा, स्वतःला मदत करण्याचा हा माझा निव्वळ स्वार्थी प्रयत्न आहे.माझा स्वार्थ साध्य होतानाच इतरांना थोडी बहुत तरी मदत व्हावी हीच इच्छा https://marathi-motivation.com या वेबसाइटच्या निर्मितीमागचे मूळ कारण आहे.
माझा परिचय म्हणाल तर”माणसाचा खरा परिचय हा त्याच्या जीवनाच्या ध्येय्याने कळत असतो.तुमचे नाव,गाव,शिक्षण, संपत्ती हे सारे तर दुय्यम आहेत.” म्हणून लक्षात ठेवायचेच असेल तर ‘सर्वांनी सदैव प्रेरित राहून आपल्या जीवनाचे उद्दिष्ट साध्य करावे अशी इच्छा बाळगणारा आणि त्यासाठी प्रयत्न करणारा एक ध्येयवेडा’ अशीच माझी ओळख लक्षात असू द्या.
धन्यवाद …
।। mjc ।।