The post गुलाम भारतातील आझाद सिंह । चंद्रशेखर आझाद यांची माहिती appeared first on मराठी Motivation.
]]>
नमस्कार मित्रांनो ! मराठी मोटिवेशन या ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत आहे. या ब्लॉग च्या माध्यमातून आम्ही विविध विषयातील माहिती तुमच्यापर्यंत पोचवण्याचे कार्य करीत असतो.कधी थोर व्यक्तींचे विचार, कधी सुंदर कविता, कधी सुविचार तर कधी एखाद्या महामानवाचे चरित्र अश्या निरनिराळ्या मार्गांनी प्रेरणादायी विचार तुमच्यापर्यंत पोचवण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो.
मित्रांनो आजही आम्ही अशीच प्रेरणादायी कथा घेऊन आलो आहोत. गुलाम भारतातील आझाद सिंह । चंद्रशेखर आझाद यांची माहिती या पोस्ट च्या माध्यमातून आज आपण भारतीय क्रांतिकारी चळवळीतील एका बेडर वीरपुरुषाची, चंद्रशेखर आझाद यांची माहिती घेणार आहोत.
१९२१ चा काळ होता. सगळीकडे गांधीजींच्या नेतृत्वात असहकार आंदोलन पूर्ण देशभर सक्रिय झालेले होते.सर्व देश जणू आंदोलनाच्या रंगात रंगून गेला होता. सगळीकडे अवज्ञेचे वारे वाहत होते. मोर्चे,सभांना जणू ऊत आला होता.
या काळात असाच एक मोर्चा बनारस मध्ये निघाला.लोकं घोषणा देत होते. ‘‘इन्कलाब जिंदाबाद !’’ ‘‘भारत माता कि जय ! ” “वंदे मातरम !” घोषणांनी सारा आसमंत दुमदुमून उठला होता.
या मोर्चाला पाहून एक १५-१६ वर्षाचा मुलगा मोहित झाला . मंत्रमुग्ध होऊन भारावलेल्या अवस्थेत तो मोर्चात शिरला आणि “वंदे मातरम !” च्या घोषणा देऊ लागला. त्याची आरोळी लोकांचा उत्साह वाढवीत होती. काही क्षणातच तो मोर्चाच्या अग्रस्थानी जाऊन पोचला.
त्याचा आक्रमकपणा पोलिसांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. पोलिसांनी त्याला दटावले पण तो अधिकच आक्रमक होऊ लागला. अखेर पोलिसांनी त्याला जेरबंद केले आणि न्यायाधीशांसमोर हजर केले.
न्यायमूर्तींनी त्या मुलाला विचारले “तुझे नाव काय?” मुलाने उत्तर दिले “आझाद “. न्यायमूर्तींनी पुढचा प्रश्न केला “ तुझ्या वडिलांचे नाव काय?” त्या मुलाने निडरपणे उत्तर दिले “स्वतंत्रता”.न्यायमूर्तींना त्याची तिरकस उत्तरे कळली. त्यांनी त्या लहानश्या मुलाला १५ दिवसांचा कारावास सुनावला.
१५ दिवसांच्या कारावासाची शिक्षा होऊनही तो मुलगा त्या इंग्रज न्यायाधीशाची खिल्ली उडवत म्हणाला की “ मला अगोदरच माहीत होते की तुम्ही मला यापेक्षा जास्त शिक्षा करूच शकत नाही!” त्याच्या या विधानाने कचेरीत सर्वदूर हशा पिकला .
त्यामुळे संतापून न्यायाधीशाने त्या मुलाला चाबकाचे १५ फटके मारण्याची शिक्षा सुनावली. वयाच्या हिशेबात चाबकाचे १५ फटके म्हणजे खूप जबर शिक्षा होती. मात्र त्या मुलाने ती हसत हसत सहन केली. प्रत्येक फटक्यासोबत तो आरोळी ठोकायचा “भारत माता की जय!” “वंदे मातरम !”
त्यावेळी तिथल्या सगळ्याच इंग्रज अधिकाऱ्यांच्या लक्षात आले होते कि हा मुलगा पुढे आपल्याला खूप त्राही त्राही करून सोडणार आहे. आणि झालेही तसेच. इंग्रजांना पुढील काळात जंग जंग पछाडून टाकणाऱ्या त्या मुलाचे नाव होते चंद्रशेखर आझाद ! मित्रांनो आज आपण गुलाम भारतातील आझाद सिंह । चंद्रशेखर आझाद यांची माहिती या पोस्ट च्या माध्यमातूम भारत मातेच्या त्याच वीरपुत्राची, चन्द्रशेखर आझाद यांची माहिती पाहत आहोत.
चंद्रशेखर आझाद यांचा जन्म २३ जुलै १९०६ रोजी एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे पूर्ण नाव चंद्रशेखर सीताराम तिवारी होते. चंद्रशेखर आझाद यांचे वडील पंडित सीताराम तिवारी हे गरीब सरयूपारी ब्राह्मण होते.त्यांच्या आईचे नाव होते जागरानी देवी.
चंद्रशेखर आझाद यांचा जन्म त्या काळातील उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातील बदारका या लहानश्या गावी झाला. आता हे गाव मध्यप्रदेशातील झाबुआ जिल्ह्यात येते.
चंद्रशेखर आझाद यांचे वडील वनविभागात नोकरीवर होते. ते अतिशय शिस्तप्रिय व स्वाभिमानी ब्राह्मण होते. ते प्रामाणिक आणि काटकसरी होते. त्यांच्या या गुणांचा चंद्रशेखर आझाद यांच्यावर बराच प्रभाव पडला.
असं म्हटल्या जातं की मुलांचे पाय पाळण्यात दिसतात. म्हणजे मोठेपणी मुलगा काय करणार आहे त्याची प्रचिती त्याच्या लहानपणाच्या वागणुकीतूनच दिसून येते.चन्द्रशेखर आझाद काही याला अपवाद नव्हते. चंद्रशेखर आझाद यांच्या धाडसी वृत्तीचा परिचय त्यांच्या पालकांना लहानपणी बऱ्याच प्रसंगांतून आला.
चंद्रशेखर आझाद यांना धाडसी खेळ जास्त आवडत असत. खेळण्यातील तोफेला त्यांनी तर गावठी दारुगोळा लावून खरोखरची टॉयफाच बनवली होती. ते नेहमी जोखमीने भरलेले खेळ खेळात. त्यामुळे त्यांना बऱ्याच जखमा होत. त्या जखमांबद्दल आई रागावली कि ते म्हणत “ आई जखमांचे व्रण हे वीरांचे आभूषण असतात.”
चंद्रशेखर आझादांच्या धाडसीपनाने तर एकदा कहरच केला होता.गावाकडे घुमणाऱ्या फेरीवाल्याकडून त्यांनी मुंबई शहराविषयी फार ऐकले होते. त्या भव्य शहराचे वर्णन ऐकून चंद्रशेखर आझादांना मुंबई विषयी भलतीच ओढ निर्माण झाली.
एके दिवशी चंद्रशेखर आझादांनी फेरीवाल्यासोबत गावातून पळ काढला. आणि थेट मुंबई गाठली. मुंबई पाहिल्यावर त्यांना अगदी भारावल्यासारखे वाटू लागले.पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी तेथे काही काळ रंगाऱ्याचे काम केले मात्र लवकरच मुंबईच्या यांत्रिक जीवनाचा वीट येऊन ते परत बनारसला आले.
याच प्रकारचा त्यांच्या जीवनातील आणखी एक प्रसंग आहे. चंद्रशेखर आझाद यांचे मन शाळेत रमत नव्हते. म्हणून त्यांच्या वडीलानी त्याच्यासाठी वैयक्तिक शिक्षकाची नेमणूक केली होती. हे शिक्षक फारच शिस्तप्रिय होते. थोड्या थोड्या गोष्टीसाठी ते चंद्रशेखर यांना शिक्षा करीत. छड्या देत.
एक दिवस मात्र भलतेच घडले. शिकवता शिकवता गुरुजींनी काहीतरी चूक केली. ती लगेच चंद्रशेखर आझादांनी त्यांच्या लक्षात आणून दिलीच पण सोबतच त्यांनी गुरुजींनाहि शिक्षा व्हावी या हेतूने छडी चा शोधही चालू केला. चंद्रशेखर आझाद छडी का शोधताय ?याची जेव्हा त्या गुरुजींना भनक लागली, तेव्हा त्यांनी जी धूम ठोकली ती ते परत कधीच शिकवणीसाठी आले नाहीत. .
मुंबई वरून आल्यावर त्यांनी बनारसमध्ये उच्च शिक्षण घ्यावयास सुरुवात केली.या काळात श्रीमंत अध्यापक आणि इतर मंडळी गरीब मुलांना अन्न,वस्त्र, निवारा इत्यादी गोष्टीची सोय करून देत असत. चंद्रशेखर आझाद यांच्या राहण्या-खाण्याचा प्रश्न त्यामुळे आपोआप मार्गी लागला.
चंद्रशेखर आझाद एका धार्मिक संस्थेच्या आश्रयाने शिकू लागले. त्यांनी आपले एकाग्र मन संस्कृत वर केंद्रित केले. ‘लघुकौमुदिनी’ आणि ‘अमरकोश’ यांसारखे ग्रंथ त्यांनी कंठस्थ केले.त्या काळात भारताच्या स्वातंत्र्याचे वारे चहू दिशांना वाहत होते. अभ्यासासोबत स्वातंत्र्याचे विचारही आझादांच्या मनात घर करू लागले होते.
मित्रांनो गुलाम भारतातील आझाद सिंह । चंद्रशेखर आझाद यांची माहिती या पोस्ट मध्ये आपण चंद्रशेखर आझाद यांची माहिती पाहत आहोत. चंद्रशेखर आझाद स्वातंत्र्यलढ्यात कसे उतरले? आणि त्यांनी पुढची वाटचाल कशी केली याबाबत आता आपण पुढे पाहूया.
चंद्रशेखर आझाद मुळातच स्वतंत्र विचारांचे,स्वाभिमानी होते. त्यांना इंग्रज अधिकाऱ्यांची मुजोरी आणि भारतीयांनी त्यांची केलेली जी हुजुरी अगदी बालपणापासूनच खटकत होती. इंग्रज अधिकाऱ्यांना सॅल्यूट करावा लागतो म्हणून तर त्यांनी आर्थिक चणचण असतांनासुद्धा तहसील कचेरीत मिळालेली नोकरी सोडून दिली होती.
बनारस मधील वास्तव्यात अभ्यासासोबतच स्वातंत्र्याच्या विचारांनी त्यांच्या मनात घर केले होते. त्या काळात चंद्रशेखर आझाद अनेक वाचनालयांना भेटी देत. तेथे त्यांनी भरपूर वर्तमानपत्रे वाचून काढली.
असहकार आंदोलनाचे वादळ संपूर्ण भारतात घोंगावू लागले होते. बनारस मधेही हे वादळ पोहोचलंच होते. चंद्रशेखर आझादांनी महाविद्यालयाच्या परिसरात क्रांतिकारकांचा पहिला वाहिला ‘धरणा’ पाहिला. त्या दृश्यांची चंद्रशेखर आझाद यांच्या मनात अशी भुरळ घातली की त्यांची सारी स्वप्ने आता स्वातंत्र्यलढ्याच्या भोवती फेर घेऊ लागली.
अश्याच एका मोर्चाच्या वेळी सुरुवातीला वर्णन केलं आहे तो प्रसंग घडला.चाबकाचे १५ फटाके खाऊनही चंद्रशेखर आझादांच्या डोळ्यांत पाण्याचा टिपूसही नव्हता. अंगावरून रक्त ओघळत होते पण चेहऱ्यावर वेदनाही नव्हत्या.
शिक्षा पूर्ण झाल्यावर आजाद न्यायाधीशांना उद्देशून म्हणाले की “हि पहिली आणि शेवटचीच वेळ समाज की मला तुम्ही अटक करू शकले. यानंतर मी जिवंत असेपर्यंत तुम्ही मला स्पर्श सुद्धा करू शकणार नाहीत. आता मी आझाद आहे आणि आजन्म आझादच राहणार.”
आझाद यांच्या सुटकेनंतर बनारस मध्ये त्यांच्या सन्मानार्थ एका समारंभाचे आयोजन करण्यात आले. त्यांच्यावर लोकांनी पुष्प मालांचा एवढा वर्षाव केला की त्यांचा चेहरा जेमतेम दिसत होता. व्यासपीठावरून पंधरा वर्षांच्या चंद्रशेखर आझाद यांनी आपल्या ओजस्वी वाणीतून भाषण केले.
त्यांचे भाषण ऐकून श्रोते मंत्रमुग्ध राहिले. भाषणाअंती त्यांनी आपल्या वचनाचा पुनरुच्चार केला. “मी आझाद आहे आणि आजन्म आझाद रहाणार.” दुसऱ्या दिवशी वर्तमान पात्रांनी आझादांच्या कामांची दखल घेतली. त्यांच्या धाडसाची भरभरून स्तुती केली. ‘मर्यादा’ नावाच्या मासिकाने “बालवीर आझाद “ नावाने मोठा लेख छापून आणला.
पुढे चंद्रशेखर आझाद यांनी काशी विद्यापीठात प्रवेश घेतला. मात्र त्यांचा त्या मागचा प्रमुख हेतू त्यांच्या मतांशी सहमत असणाऱ्या लोकांना एकत्र करून स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणे हाच होता. याच गांधीजींनी चोरी चौरा प्रकरणामुळे असहकार आंदोलन स्थगित केले. त्यांचा हा निर्णय क्रांतीची धार बोथट करणारा होता. त्यामुळे मग आझादांनी क्रांतिकारी संघटनांचा शोध सुरु केला.
योगायोगाने याच काळात सचिंद्रनाथ सन्याल, सुरेशचंद्र भट्टाचार्य इत्यादींनी एक संघटना स्थापन केली होती. या संघटनेचे नाव होते ‘हिंदुस्थान रिपब्लिक असॊसिएशन’. या संघटनेची एक लिखित घटना आणि नियमावली सुद्धा तयार करण्यात आली होती.
चंद्रशेखर आझादांनी या संघटनेत एक साधारण सदस्य म्हणून नाव नोंदवले. त्यांच्या नेतृत्व गुणांनी त्यांनी बघता बघता संघटनेच्या पुढाऱ्याची धुरा सांभाळली. येथेच त्यांचा रामप्रसाद बिस्मिल, अशफाकउल्ला इत्यादी सोबत परिचय झाला.
आझादांच्या ओजस्वी वाणीने प्रभावित लोकांनी संघटनेत येण्यासाठी रीघ लावली. मात्र आझाद त्यांची योग्य परीक्षा घेऊनच त्यांना प्रवेश देत. चंद्रशेखर आझादांना देशद्रोही लोकांविरुद्ध प्रचंड चीड होती. अश्या लोकांना संघटनेत शिरू द्यायचे नाही याबद्दल त्यांचा कटाक्ष होता.
सुरुवातीला चंद्रशेखर आझाद गांधीवादी होते. मात्र हळू हळू त्यांच्या विचारांत परिवर्तन होत गेले. त्यांच्या हिंसावादी क्रांतिकार्याकडे वळण्याला बरीच कारणे होती. त्यापैकी एक प्रमुख कारण म्हणजे रामकृष्ण खत्री हे गृहस्थ होत.
चंद्रशेखर आझादांची भेट रामकृष्ण खत्रींशी झाली तेव्हा ते फार आजारी होते. उठून बसण्याचेही त्राण त्यांच्या त्यांच्या शरीरात नव्हते. तेव्हा आझादांनी त्यांची सेवा करण्याचे ठरवले. त्यांच्या सेवेच्या या काळातच चंद्रशेखर आझाद यांच्या विचारांत आमूलाग्र बदल घडून आला. रामकृष्ण खत्री हे सशस्त्र क्रांतीचे पुरस्कर्ते होते . आणि त्यांचे ते विचार बऱ्याच वाद विवादानंतर चंद्रशेखर आझादांना पटले.
रामकृष्ण खत्री यांच्या भेटीनंतर मात्र चंद्रशेखर आझाद यांच्या मनात आपण कुठल्या मार्गाने जावे याबद्दल कुठलाही किंतु परंतु राहिला नाही. क्रांतिमार्ग हाच त्यांचा जीवनमार्ग बनला.आणि संगिनी(बंदूक) त्यांची जीवनसंगिनी बनली.
१९२५ च्या दरम्यान चंद्रशेखर आझाद आणि त्यांच्या सवंगड्यांना माहिती मिळाली होती की जर्मनी वरून एक मालवाहू जहाज अनेक शस्त्रास्त्रे घेऊन भारतात दाखल होणार आहे. सशस्त्र क्रांतीसाठी लागणारी शस्त्रे या जहाजावरुन खरेदी करण्याच्या निर्णयावर त्यांच्या संघटनेचे शिक्कामोर्तब झाले. मात्र प्रश्न होता तो पैशाचा. शस्त्रे खरेदी करण्यासाठी निधी कुठून उभारायचा?
हे शस्त्र सशस्त्र क्रांतीसाठी उपयोगी पडणार होते. आणि जहाज कलकत्याला येण्याअगोदर पैसे जमवने गरजेचे होते. त्यासाठी मोठा दरोडा घालण्याशिवाय संघटनेकडे कुठलाही उपाय नव्हता. म्हणून मग सर्वांनी बहुमताने ठरवले की ट्रेन ने लखनौ ला पोचवल्या जात असलेला खजाना लुटायचा.
योजना बनवण्यात आली. ७ ऑगस्ट १९२५ ला शहाजहांपूर ते लखनऊ जाणाऱ्या डाऊन ट्रेन मध्ये क्रांतिकारक चढले. ट्रेन काकोरीला पोहोचण्याआधी त्यांनी साखळी ओढून ट्रेन थांबवली. गार्डच्या डब्यातील तिजोरीतील पैसे आपल्या ताब्यात घेतले. आणि अंधाराचा फायदा घेत गोळीबार करत ते जंगलात पसार झाले. महत्वाचे म्हणजे या दरम्यान कुठल्याही प्रवाशाला काहीही त्रास दिल्या गेला नाही. .
कुठल्याही प्रवाशाला धक्का सुद्धा लागला नाही यावरून हे कृत्य क्रांतिकारकांनीच केले याची इंग्रजांना खात्री झाली. वर्तमान पात्रांनी या घटनेला अमाप प्रसिद्धी दिली. इंग्रज साम्राज्याचे मात्र धाबे दणाणले. या प्रकरणात पुढे ४० संशयितांना अटक झाली.
या ४० जणांमध्ये रामप्रसाद बिस्मिल, अशफाकउल्ला खान, राजेंद्र लाहिरी,रोशन सिंग यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. हे सारे सापडले ते काही फितुरांमुळे. कटातील जवळ जवळ सगळे सापडले पण आझाद मात्र कुणाच्या हाती आले नाही. ते जंगलांत लपत, वेष बदलत पुन्हा एकदा तयारीला लागले होते.
आझाद वेषांतर करण्यात पटाईत होते. कधी ते साधू बनत तर कधी कामगार तर कधी त्यांचं रूप भलतच काही असायचं. अश्फाकउल्ला खान यांना ज्यावेळी फाशीची शिक्षा झाली आणि त्यांचे पार्थिव ज्यावेळी दफन करण्यात येत होते त्यावेळी चंद्रशेखर आझाद तेथे एका इंग्रजांच्या वेशात पोहोचले होते. आजू बाजू पोलिसांचा पूर्ण गराडा असतांनासुद्धा त्यांना कोणी ओळखू शकले नव्हते.
मित्रांनो गुलाम भारतातील आझाद सिंह । चंद्रशेखर आझाद यांची माहिती या पोस्ट मध्ये आपण चंद्रशेखर आझाद यांची माहिती पाहत आहोत. शहिद-ए-आजम भगत सिंग आणि चंद्रशेखर आझाद यांची भेट कशी झाली हे आता आपण पाहणार आहोत.
भारतीय क्रांतिकारी चळवळ ही चंद्रशेखर आझाद आणि भगत सिंग या दोन व्यक्तींशिवाय अर्धवट होऊन जाते. म्हणूनच य दोघान्ची वादळी भेट कशी झाली ते पाहणे येथे अगत्याचे ठरते.
काकोरी कटानंतर चंद्रशेखर आझादांनी लपत छपत पुन्हा एकदा तयारीला सुरुवात केली होती. पुन्हा एकदा माणसे जमवीत असतांना ते कानपुर मध्ये आले. कानपूरमध्ये काही विद्यार्थी ‘प्रताप’ नावाच्या भारतीय विचारसरणीच्या वर्तमान पत्राची छपाई करीत असत.
भगत सिंग ‘प्रताप’ मध्ये ‘बळवंत’ या टोपण नावाने लिखाण करीत असत. चंद्रशेखर आझादांची आणि भगत सिंग यांची पहिली भेट येथेच झाली. दोघांनीही एकमेकांबद्दल फार ऐकलेले होते मात्र भेट झाली नव्हती त्यानंतर दोघेही घनिष्ट मित्र झाले. क्रांतीला नवीन धार मिळाली.
दोघांच्या भेटीनंतर आझाद यांच्या अध्यक्षतेखाली हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी नावाचं संघटन उभं करण्यात आलं. या संघटनेत बरेच नामवंत क्रांतिकारक होते. या संघटनेने बॉम्ब व इतर हत्यार बनवण्याचे कारखाने सुरु केले. निकटचे साथीदार शाहिद होत होते तरी त्यांचा लढा सुरूच होता. आणि तेच क्रांतीचे तत्वज्ञान होते की ‘ श्वास थांबला तरी चालेल चळवळ थांबायला नको.’
१९२७ ला सायमन कमिशन भारतात आले. भारताच्या प्रशासकीय भवितव्याचा निर्णय या कमिशनकडे होणार होता. मात्र त्यात एकही भारतीय नसल्याने भारतात ठिकठिकाणी त्याचा विरोध केला जात होता. जागो जागी निषेध मोर्चे निघाले होते.
अश्याच एका निषेध मोर्चाचे नेतृत्व लाला लजपत राय करीत होते. “सायमन परत जा” “सायमन गो बॅक” च्या घोषणांनी आसमंत गर्जून उठला होता. त्यावेळी पोलिसांनी अचानक लाठीमार सुरु केला. त्यात लालजींना मार बसला. छातीवर झालेल्या प्रहारांनी लालाजींचा जीव गेला.
लालाजींच्या हत्येचा बदला घेण्याचे HSRA च्या कार्यकर्त्यांनी ठरवले. त्यांनी लालाजींच्या मृत्यूला जबाबदार इंग्रज अधिकारी स्कॉट ला यमसदनी घडण्याची योजना आखली.मात्र ऐनवेळेवर थोडी गल्लत झाली आणि स्कॉट ऐवजी सँडर्स हा अधिकारी मारला गेला. मुळात सँडर्स सुद्धा जबाबदार होताच.
सँडर्स च्या वधाची बातमी हा हा म्हणता भारतभर पोहचली. लालाजींच्या मृत्यूने दुखावलेली जनता सुखावली. क्रांतिकाऱ्यांच्या मनातील आग आता धुमसून पेटायला लागली. इंग्रज सत्ता तर मुळातून हादरली. सँडर्स वधानंतर सगळे क्रांतिकारी वेषांतर करून लाहोर सोडून निघून आले.
१९२९ मध्ये इंग्रजांनी लोक सुरक्षा विधेयक आणि व्यावसायिक विवाद विधेयक या नावाचे दोन विधेयक केंद्रीय कायदेमंडळात आणण्याचे ठरविले होते. या विधेयकांमुळे भारतीयांचे नुकसानच होणार होते. क्रांतिकारकांचा तर त्याला विरोध होताच. मग काय? निषेधासाठी योजना आखण्यात आली.
दिल्लीत तातडीने संघटनेची शाखा उघडण्यात आली. भगत सिंग आणि बटुकेश्वर दत्त यांच्यावर असेम्ब्ली मध्ये बॉम्ब स्फोट करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. आझाद यांनी स्वतः असेम्ब्लीची पाहणी केली. त्यांच्या लक्षात आले कि स्फोट करून पळणे सहज शक्य आहे.
आझादांनी स्फोट करून पळण्यासाठी एका कार ची सोय केली होती. पण पळून न जाता आपला संदेश लोकांपर्यंत पोचवण्यासाठी त्यांच्यावर जो खटला चालविला जाईल त्याचा प्रभावी वापर करावा अशी भगत सिंग यांची योजना होती. आणि त्यानुसार मग पुढे क्रिया करण्यात आली.
ठरल्याप्रमाणे, कोणालाही इजा न होऊ देता बटुकेश्वर दत्त आणि भगत सिंग यांनी असेम्ब्ली मध्ये बॉम्ब स्फोट घडवला.पळून न जाता विविध पत्रके फेकत “इन्कलाब जिंदाबाद” चे नारे लावत त्यांनी स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यांनी खटल्यांच्या माध्यमातून जे क्रांतीचे तत्वज्ञान लोकांपर्यंत पोचवले त्यालाच ‘फिलोसोफी ऑफ बॉम्ब’ म्हणतात.
मित्रांनो गुलाम भारतातील आझाद सिंह । चंद्रशेखर आझाद यांची माहिती या पोस्ट मध्ये आतापर्यंत आपण चंद्रशेखर आझाद यांची माहिती, त्यांचा जीवनप्रवास पाहत आहोत. आता वेळ आली आहे ती त्यांच्या जीवनातील शेवटच्या लढ्याबद्दल ऐकण्याची.
चंद्रशेखर आझाद इंग्रजांना बऱ्याच खटल्यात हवे होते. त्यासाठी त्यांनी आझादांना सहज ओळखू शकतील अश्या कितीतरी गुप्तहेरांची नेमणूक करून ठेवली होते. या गुप्त हेरांत आपलीच माणसे होती. ते म्हणतात ना धोक्याचे एक वैशिष्ट्य आहे की धोका देणारा नेहमी जवळचा व्यक्तीच असतो. आणि इथेही तेच झाले.
सगळे सोबती जरी सापडले असले तरी आझाद अजूनही आझादच होते. आणि जोपर्यंत आझाद बाहेर होते तोपर्यंत ते चळवळ थांबू देणार नव्हतेच. त्यामुळे तुरुंगातील भगतसिंग, सुखदेव यांसारखे क्रांतिकारी आत चळवळी बाबत निश्चिन्त होते.
चंद्रशेखर आझाद काही गुपचूप बसणाऱ्यांपैकी नव्हते. कार्याची पुढची योजना आखण्यासाठी आणि पुढील दिशा ठरवण्यासाठी आझादांनी आल्फ्रेड पार्क मध्ये आपल्या साथीदारांसोबत भेट ठरवली. दिनांक २७ फेब्रुवारी १९३१ चा दिवस उजाडला. आझाद, यशपाल आणि सुरेंद्र पांडे हे तिघे आल्फ्रेड पार्क मध्ये एकत्र जमले.
थोड्या वेळातच तिथे सुखदेवराज सायकलने येऊन पोहोचले. त्यांची तिथे पुढील वाटचालीबाबत मंत्रना झाली. त्यानंतर सुरेंद्र आणि यशपाल हे काही महत्वाच्या गोष्टींच्या खरेदीसाठी बाजारात निघून गेले.आझाद आणि सुखदेवराज एका झाडाखाली बसून चर्चा करीत बसले होते.
तेवढ्यात चंद्रशेखर आझाद यांना वीरभद्र तिवारी आल्फ्रेड पार्कच्या बाजूला घुटमळताना दिसला.वीरभद्र तिवारी हा फितूर झाला आहे हे आझादांना ठाऊक होते. आझाद सावध होण्याआधीच पोलिसांची एक गोळी त्यांची मांडी भेदून गेली होती.पूर्ण बगीचा पोलिसांनी वेढला होता.
आझाद आणि सुखदेवराज यांनी एका झाडाला आडोसा करून पोलिसांचा प्रतिकार सुरु केला. आझादांनी पहिल्याच गोळीत इंग्रज अधिकाऱ्याच्या गाडीचे टायर वेधले. पोलिसांकडून गोळ्यांचा सडा पडत होता. त्यातच एक गोळी आझाद यांच्या दंडाला तर दुसरी फुफ्फुसाला लागली. आझाद पार जखमी झाले.
एवढा आघात होऊनही आझाद स्थिर होते. त्याचा जराही तोल गेला नाही. त्यांनी सुखदेवराज यांना तेथून निघून जाण्यास सांगितले आणि एकाकी लढाई सुरु ठेवली. चंद्रशेखर आझाद यांच्या एका गोळीने इंग्रज अधिकारी नॉट बाबर च्या मनगटाचा हिशेब घेतला. एक गोळी दुसऱ्या इंग्रज अधिकाऱ्याचा जबडा फाडून गेली.
आझाद यांच्या नेमबाजीला इंग्रज एवढे घाबरले की त्यांनी माघार घेतली आणि भारतीय सैनिकांना पुढे केले. आझाद निवडून फक्त इंग्रजांवरच गोळ्या झाडात होते. एवढ्या घोर संकटात असतांना सुद्धा आझाद भारतीय पोलिसांना सांगत होते “भारतीय सैनिकांनो माझ्या मार्गातून तुम्ही दूर व्हा! माझ्या गोळ्या इंग्रजांची आहेत. मला तुम्हावर गोळ्या झाडायला भाग पाडू नका.”
बराच वेळ हि धुमश्चक्री चालू होती. शेवटी आझादांच्या जवळ एकच गोळी शिल्लक राहिली होती . आझाद तोंडातल्या तोंडात बडबडले “ मी आझाद आहे. आणि आझादच राहणार.” पिस्तुलाची नाळ त्यांनी कानशिलावर लावली आणि चाप ओढला. त्यांनी ‘आझाद’ राहण्याचा त्यांचा शब्द पाळला. एक वादळ मोठा तांडव करून शेवटी निद्रिस्त झालं.
आझादांचे निष्प्राण शरीर बगिच्यात स्थिरावले होते. आत्मा कधीच निघून गेला होता. पण “आझाद” नावाचं भय अजुनही जिवंत होतं . पोलिसांना त्यांच्या पार्थिवाला हात लावण्याची हिम्मत होईना. त्यांनी आझाद मृत झाल्याची खात्री करून घेण्यासाठी त्यांच्या निर्जीव शरीरावर वारंवार गोळ्या झाडल्या. एकदा खात्री पटल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या पार्थिवाची विल्हेवाट लावली.
आझादांचे बलिदान व्यर्थ गेले नाही. त्यांचा श्वास थांबला पण लाखो भारतीय स्वातंत्र्याचा विचार करू लागले. शहरांमध्ये हडताल पुकारला गेला. देशभर शोककळा पसरली. आल्फ्रेड पार्कमध्ये लोकांची झुंबड होऊ लागली. आझादांच्या रक्ताने माखलेली तिथली माती लोक कपाळी लावण्यासाठी वेडावून गेले होते.
झाडावर असलेल्या गोळीबाराच्या खुणांना स्पर्श करून लोक आझाद यांना श्रद्धांजली वाहत होते.आल्फ्रेड पार्कमध्ये लोकांची रीघ लागली होती. आल्फ्रेड पार्क तर जणू काय तीर्थक्षेत्रच बनले होते. इंग्रजांना आता तर ‘आझाद’ नावाची इतकी धास्ती भरली होती की अचानक जर कोणी ‘आझाद आले’ म्हटले तर ज्यांनी स्वतः त्यांचे पार्थिवाची विल्हेवाट लावली होती ते सुद्धा दचकून सावध पवित्र घेत.
इंग्रजांना चंद्रशेखर आझाद यांची किती भीती होती? तर ज्या झाडाखाली त्यांनी जीव सोडला त्या झाडाची लोक जेव्हा पूजा करतांना इंग्रजांना दिसले तर कदाचित या झाडाकडे पाहत कुणी दुसरा आझाद अवतरेल या भीतीने त्यांनी ते झाड मुळासकट कापून काढले होते.
आणि त्यांची ती भीती योग्यसुद्धा होती. कारण आझादांच्या नावानेच तर आझादीचे कित्येक वीर तयार झालेत. आजही स्वतंत्र विचार करणाऱ्या लोकांत आझाद जिवंत आहेत! अन्यायाविरुद्ध आवाज उठविणाऱ्यांच्या मनांत आझाद जिवंत आहेत ! देशासाठी प्रसंगी प्राण द्यायला तयार असणाऱ्यांत आझाद जिवंत आहेत! तुमच्या माझ्या मनात आझाद जिवंत आहेत!
मित्रांनो गुलाम भारतातील आझाद सिंह । चंद्रशेखर आझाद यांची माहिती या पोस्ट मध्ये आज आपण चंद्रशेखर आझाद यांची माहिती पाहिली. त्यांच्या जीवनातील महत्वाच्या घटनांचा अभ्यास केला. त्यांचे व इतर क्रांतिकारी मित्रांचे धोरण थोडक्यात जाणून घेतले.आता वेळ आली आहे समारोपाची.
मित्रांनो आजची गुलाम भारतातील आझाद सिंह । चंद्रशेखर आझाद यांची माहिती ही पोस्ट चंद्रशेखर आझाद यांच्याविषयी लिहिलेल्या विविध पुस्तकांतून तसेच इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या विश्वसनीय स्रोतांतून घेतलेल्या माहितीतून साकारलेली आहे.
गुलाम भारतातील आझाद सिंह । चंद्रशेखर आझाद यांची माहिती ही पोस्ट तुम्हाला कशी वाटली? या पोस्ट मध्ये तुम्हाला काही सुधारणा सुचवायच्या असतील तर त्या आम्हाला नक्की कळवा. सोबतच चंद्रशेखर आझाद यांची माहिती जर तुमच्याकडे असेल तर ही पोस्ट अधिक उपयुक्त बनवण्यासाठी आम्हाला सहकार्य करा ही विनंती.
धन्यवाद !
जय हिंद! जय महाराष्ट्र !
The post गुलाम भारतातील आझाद सिंह । चंद्रशेखर आझाद यांची माहिती appeared first on मराठी Motivation.
]]>The post बालकवींच्या निसर्ग कविता appeared first on मराठी Motivation.
]]>
नमस्कार मित्रांनो ! मराठी मोटिवेशन या ब्लॉग वर आपले स्वागत आहे. या ब्लॉगच्या माध्यमातून आम्ही निरनिराळ्या महत्वाच्या विषयांवरील माहिती तुमच्यासाठी उपलब्ध करून देत असतो. आजही अश्याच एका सुंदर विषयावर आपण चर्चा करणार आहोत.
मित्रांनो आज आपण बालकवींच्या निसर्ग कविता या पोस्टच्या माध्यमातून बालकवी त्रम्ब्यक बापूजी ठोंबरे यांच्या काही कवितांचा आस्वाद घेणार आहोत. बालकवींच्या निसर्ग कविता या पोस्ट मध्ये आपण त्यांच्या निसर्गाशी संबंधित काही महत्वाच्या कविता पाहू. पण त्या अगोदर बालकवी यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया.
मी स्वछंदी, पुरता छंदी,
धारी मी न कुणास
परी मोहिनी विविध रूपिणी
सृष्टीचा मी दास
‘मी’ या कवितेतील बालकवींच्या वर उल्लेखित ओळी आपल्याला त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी बरच काही सांगून जातात. बालकवी म्हणतात की ते या जगात कुठल्याच गोष्टीला बांधील नाहीत. मात्र विविध रूपांनी नटलेल्या सृष्टीचा, निसर्गाचा ते दास आहेत.
निसर्गसृष्टीविषयी त्यांची असणारी हि ओढ त्यांनी आजन्म जपली. त्यांच्या विविध कवितांमधून आपल्याला निसर्गाचे काव्यमय वर्णन ऐकायला मिळते.मी सृष्टीचा दास आहे असे फक्त बोलून ना दाखवता त्यांच्या कवितांच्या माध्यमातून त्यांनी जगून दाखवले.
अश्या या निसर्गवेड्या ‘निसर्गकवी’ चे जीवन आज आपण बालकवींच्या निसर्ग कविता या पोस्टच्या माध्यमातून थोडे उलगडून पाहणार आहोत.
बालकवी यांचे पूर्ण नाव त्रंबक बापूजी ठोमरे होते. मुळात त्यांचे आडनाव ‘ठोंबरे’ असे होते. मात्र त्यांनी ते उच्चरासाठी सोपे व्हावे म्हणून ‘ठोमरे’ असे करून घेतले. बालकवी यांचा जन्म महाराष्ट्राच्या खानदेश विभागातील धरणगाव येथे १३ ऑगस्ट १८९० या दिवशी झाला.म्हणजेच आजच्या जळगाव मध्ये झाला.
ठोमरे कुटुंब मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावचे. बालकवी हे पाच भावंडांमध्ये तिसऱ्या क्रमांकाचे. त्यांची मोठी बहीण मनुताई (जिजी) आणि भाऊ अमृत. त्यांच्याहून धाकटी बहीण कोकिला, धाकटा भाऊ भास्कर.
त्यांचे वडील पोलिस खात्यात नोकरीवर होते. त्यांच्या वडिलांची बदली वारंवार एका गावातून दुसरीकडे होत असे. त्यामुळे कुटुंबालाही सतत गावे बदलावी लागत असे.
बालकवी यांच्या आई गोदुताई यांना मराठी वाचता येत असे. घराची कामे उरकून त्या पोथ्या वाचत असत. बालकवींची आजी,गोदुताईंची आई दळताना भक्तीपर ओव्या स्वत: रचून म्हणत असे.बालकवी आजीच्या जवळच असायचे त्यामुळे त्यांच्यावर नकळत काव्यसंस्कार घडत होते.
बालकवी यांच्या मोठ्या बहिणीने-जिजीनेही ‘पांडवप्रताप’, ‘रामविजय’, ‘भक्तलीलामृत’ हौसेने वाचून काढले होते. जिजीचे शिक्षक पती प्रल्हादपंत भावे यांनी तिला ‘नवनीत’ वाचण्यास दिले. ते तिला इतके आवडले, की तिने त्याची पारायणे केली.
बालकवी यांनीही जिजीबरोबर नवनीत वाचले. मोरोपंतांचे ‘आर्याभारत’ वाचले. बालकवींनी जिजीबरोबर भेंड्या लावण्यासाठी कविता पाठ केल्या. त्यांना आद्य अक्षराच्या कविता न आठवल्यास ते स्वत: ऐनवेळी कविता रचून म्हणत.
बालकवींना लहानपणी विटीदांडू, आट्यापाट्या यासारख्या खेळांची आवड नव्हती.वडिलांची सतत होणारी बदलीमुळे त्यांचे जिवलग असे फारसे मित्र जुळले नाही. त्यामुळे आलेला एकटेपणा ते निसर्गाच्या सहवासात दूर करीत. कधी एकटे तर कधी काही मित्रांबरोबर दूर निसर्गाच्या सानिध्यात फिरण्यास जाणे त्यांना आवडे.
ते रात्री दिवे लागल्यावर बोटांच्या सावल्यांमधून कुत्रा, घोडा, उंट, मनुष्य असे आकार भिंतीवर उमटवत. त्यांचे शिक्षण एरंडोल, धुळे, बडोदा, अहमदनगर, पुणे येथे झाले. पण ते मॅट्रिक झाले नाहीत.
त्या काळात स्वतंत्रचळवळीने नुकताच जोर धरला होता. त्या काळात वंगभंग चळवळ, स्वदेशी, स्वातंत्र्य हे शब्द चोहीकडे उसळत होते. बालकवीही त्या देशभक्तीने भारलेले होते. त्यांनी ‘रावसाहेबी’ ही कविता पोकळ साहेबी करणाऱ्यांवर लिहिली होती. त्यांनी त्याच वयात ‘चहा’, ‘कपबशी’ अशाही, साहेबी संस्कृतीवर टिप्पणी करणाऱ्या काही कविता रचल्या होत्या.
जिजींनी त्यांच्या आठवणींत बालकवींनी राजमाता जिजाईवर आणि पन्हाळगडावर कविता रचल्याचेही सांगितले आहे. बालकवींचा भाऊ अमृतराव जहाल राजकारणात काही काळ उतरला होता. त्याच्या मागे पोलिसांचा ससेमिरा लागला होता; त्याचा बालकवींनाही त्रास झाला.
वनवासी कवी यांना त्र्यंबक (बालकवी) आवडला. ते कीर्तनकार होते. ते त्याला घेऊन उज्जैन-देवासकडे निघाले. पण त्यांचा अचानक मृत्यू झाला. त्र्यंबक अवघ्या दोन महिन्यांत वडिलांकडे परतला. पण त्र्यंबकमधील कवी त्या प्रतिकूल परिस्थितीतही जागा राहिला.
यानंतर एरंडोलमधून प्रकाशित होणाऱ्या ‘दशकाल वर्तमान’ या साप्ताहिकामध्ये ‘मुलांस उपदेश’ ही बालकवींची कविता पहिल्यांदा छापून आली. आणि इथूनच त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचा ‘बालकवी’कडे प्रवास सुरू झाला.
जळगाव येथे ‘काव्यरत्नावली’ या मासिकाचे संपादक नाना फडणीस उर्फ नारायण नरसिंह फडणीस यांच्या प्रेरणेने महाराष्ट्रातील पहिले कविसंमेलन १९०७ ला जळगाव येथे झाले. या कविसंमेलनात वी. मो. महाजनी, चन्द्रशेखर, माधवानुज, तर्खडकर, ना. वा. टिळक असे दिग्गज २३ कवी उपस्थित होते.
अध्यक्षपदी कवी कर्नल डॉ. कीर्तिकर होते. रेव्हरंड टिळक यांचे ‘चित्रकाव्य’ या विषयावरील भाषण संपता संपता त्रंबक बापूजी ठोमरे उभे राहिले व त्यांनी स्वत:च्या कविता म्हणण्यास सुरुवात केली.
‘अल्पमती मी बालक, नेणे काव्यशास्त्रव्युत्पत्ती। कविवर्यांनो मदिय बोबडे बोल धरा परि चित्तीं॥’
अशी आपल्या कवितेची सुरुवात करून पुढे त्यांनी त्यांची कविता सादर केली. त्यावेळी त्यांचे वय अवघे सातारा वर्षांचे होते. या सम्मेलनात केवळ सतराव्या वर्षी बालकवींनी स्वरचित कविता हजारो श्रोत्यांपुढे सादर केली. या कवितेने रसिकांचे लक्ष वेधून घेतले.
त्याच्या कविता ऐकताना सभा तल्लीन झाली. सभागृहात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. संमेलनाध्यक्ष कर्नल का. र. कीर्तीकर यांनाही बालकवींच्या प्रतिभेने स्तीमित केले. त्यांनी उत्स्फूर्तपणे ‘वा! बालकवी वा!…’ अशी दाद दिली.
नाना फडणवीस यांनी त्याच ठिकाणी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना ‘बालकवी’ ही पदवी जाहीर केली व कर्नल कीर्तीकर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान केला. तेव्हापासून त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे ‘बालकवी’ म्हणून परिचित झाले.
त्यांच्या वडिलांचे निधन नंतर वर्षभरातच झाले. घरची सर्व जबाबदारी बालकवींवर पडली. त्यांनी अहमदनगर, पुणे महाबळेश्वर येथे शिक्षकाची नोकरी केली, शिकवण्या केल्या. पण त्याबरोबर त्यांचे काव्यलेखन सतत बहरत गेले.
बालकवींच्या कविता आरंभी ‘आत्मज आपण भरतभूमिचे असुनि काय बा केले।’, ‘ठोकोनी दंडा पिटोनी मांड्या, जपान पुढती येई।’ अशा प्रकारच्या वृत्तबद्ध, काहीश्या कृत्रिम होत्या . पुढे मृदुशब्दी, प्रवाही होत गेली. त्यांना निसर्ग-कवितेत स्वत:चा सूर सापडला.
त्यांचा चाहता मित्र-परिवार खूप वाढत गेला. त्यांमध्ये गुरूतुल्य ना. वा. आणि लक्ष्मीबाई टिळक यांचे कुटुंब होते; गोविंदाग्रज यांच्यासारखे (रा ग. गडकरी) गाजत असलेले नाटककार-कवीही होते.
असे असले तरी बालकवींच्या कौटुंबिक जीवनात मात्र सतत कलह होता. त्यांचे बंधू अमृतराव आणि त्यांची पत्नी यांचे वागणे दिवसेंदिवस अधिक बेजबाबदार होत गेले. बालकवी यांची आई, अमृतराव व त्यांची पत्नी या सर्वानी मिळून बालकवींचे मन पत्नी पार्वतीबाईंबद्दल कलुषित केले.
त्यामुळे बालकवी घराबाहेर हसूनखेळून सगळ्यात मिसळत. मात्र त्यांनी पत्नीला घरात नीट वागवले नाही; वेळप्रसंगी मारहाण ही केली. अमृतरावांचे आणि बालकवींचे कौटुंबिक कारणावरून भांडण झाले. ते मन शांत होण्यासाठी कविमित्र सोनाळकर यांना भेटण्यास जावे, म्हणून भादली स्टेशनकडे चालत निघाले. ते गाडी पकडण्यासाठी रूळांमधून चालत-पळत जात असताना, मालगाडीखाली सापडून तीस वर्षांचेही नसतांना त्यांचा मृत्यू झाला.त्यांच्या अश्या अचानक झालेल्या दुर्दैवी मृत्यूने मराठी काव्यसृष्टीचे झालेले नुकसान कधीही भरून न येणारे आहे.
बालकवी यांच्या पद्यरचना लोकांपर्यंत पोचल्या, पण त्यांनी काही गद्य लेखनही केलेले होते. त्यांचा ‘आधुनिक मराठी कविता : तिचे स्वरूप’ हा लेख 23 जानेवारी 1912 च्या ‘केसरी’मध्ये प्रसिद्ध झाला होता. बालकवींनी मिस डब्ल्यू. एम. हेन यांनी संग्रहित केलेल्या इंग्रजी गोष्टींच्या आधारे सोळा गोष्टी लिहिल्या होत्या. त्या छोट्या बोधकथेच्या वळणाच्या गोष्टी होत्या. ‘बाँबे ट्रॅफर’ आणि ‘बुक सोसायटी’ने त्या ‘सृष्ट चमत्कार’ या नावाने प्रसिद्ध केल्या होत्या.
चला तर मित्रांनो आता बालकवींच्या निसर्ग कविता या पोस्ट मध्ये आपण बालकवींच्या निसर्ग कविता पाहुयात. स्वतःचे जीवन कितीही कष्टप्रद असले तरी आपल्या कवितांच्या माध्यमातून, निसर्गाच्या वर्णनातून बालकवींनी आपल्यासाठी उत्साही, आनंददायी काव्य निर्माण केले आहे.
बालकवींच्या निसर्ग कविता दुःखाने, निराशेने त्रस्त झालेल्या मनावर फुंकर घालायचे काम करतात. मनाला सुखावतात. जगण्याची एक नवी उर्मी प्रदान करतात. बालकवींच्या निसर्ग कविता पैकी काही प्रसिद्ध कविता पुढे देत आहोत. नक्कीच त्या तुम्हाला आवडतील.
निंब जांब जांभळ शेंदरी । तुळशी बहुतचि झांक मारी ।
जणुं काय ती येई धांवुनि । असेंच वाटे पहा साजणी ।
पुढें पाहिलीं खैरीं झाडें । तशीच मोठी मेंदी वाढे ।
जाइजुई ती फार वाढली । गुंफा मोठी बहुतचि झाली ।
अशा वनीं मीं ऐकिलि मुरली । तिला ऐकुनि वृत्ति निमाली ।
काय कथूं त्या सुस्वर नादा । पुढें पाहिलें रम्य मुकुंदा ।
गोपांनीं तो वेष्टित झाला । गळीं फुलांचा हार शोभला ।
कटिं पीतांबर सुंदर दिसला । गोप खेळती नाना लीला ।
कितिक खेळती आटयापाटया । कितिक खेळती दांडु विटया ।
अशा करिति ते नाना लीला । देवहि भक्ताआधिन झाला ।
वाटतें जावें, तत्कमलमुखा पाहावें ॥
आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहिकडे
वरती खाली मोद भरे, वायूसंगे मोद फिरे
नभांत भरला, दिशांत फिरला, जगांत उरला
मोद विहरतो चोहिकडे
सूर्यकिरण सोनेरी हे, कौमुदि ही हसते आहे
खुलली संध्या प्रेमाने, आनंदे गाते गाणे
मेघ रंगले, चित्त दंगले, गान स्फुरले
इकडे, तिकडे, चोहिकडे
नीलनभी नक्षत्र कसे, डोकावुनि हे पाहतसे
कुणास बघते ? मोदाला; मोद भेटला का त्याला ?
तयामधे तो, सदैव वसतो, सुखे विहरतो
इकडे, तिकडे, चोहिकडे
वाहति निर्झर मंदगती, डोलति लतिका वृक्षतती
पक्षी मनोहर कूजित रे, कोणाला गातात बरे ?
कमल विकसले, भ्रमर गुंगले, डोलत वदले
इकडे, तिकडे, चोहिकडे
स्वार्थाच्या बाजारात, किती पामरे रडतात
त्यांना मोद कसा मिळतो, सोडुनि स्वार्था तो जातो
द्वेष संपला, मत्सर गेला, आता उरला
इकडे, तिकडे, चोहिकडे
गीत – बालकवी
ऎल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन
निळासांवळा झरा वाहतो बेटाबेटातुन.
चार घरांचे गांव चिमुकले पैल टेकडीकडे
शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गरदी पुढे.
पायवाट पांढरी तयांतुनि अडवीतिडवी पडे
हिरव्या कुरणामधुनि चालली काळ्या डोहाकडे.
झांकळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर
पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर.
– बालकवी
श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी उन पडे
वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे
झालासा सूर्यास्त वाटतो सांज अहाहा तो उघडे
तरू शिखरांवर, उंच घरांवर पिवळे पिवळे उन पडे
उठती वरती जलदांवरती अनंत संध्या राग पहा
पूर्ण नभांवर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा
बलाक माला उडता भासे कल्प सुमनची मालाची ते
उतरुनि येती अवनीवरती ग्राहगोलाची कि एकमते
सुंदर परडी घेऊनि हाती पुरोपकंठी शुध्दमती
सुंदर बाला त्या फुल माला रम्य फुले पत्री खुडती
सुवर्ण चंपक फुलाला विपिनी रम्य केवडा दरवळला
पारिजातहि बघता भामारोष मनीचा मावळला
फडफड करून थकले अपुले पंख पाखरे सवरती
सुंदर हरणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती
खिल्लारे हि चरती राणी गोपही गाणी गात फिरे
मंजुळ पाव गात त्याचा श्रावण महिमा एक सुरे
देव दर्शन निघती ललना हर्ष माइ ना हृदयात
वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत
– बालकवी
हिरवे हिरवेगार गालिचे – हरित तृणाच्या मखमालीचे;
त्या सुंदर मखमालीवरती – फुलराणी ही खेळत होती.
गोड निळ्या वातावरणात – अव्याज-मने होती डोलत;
प्रणयचंचला त्या भ्रूलीला – अवगत नव्हत्या कुमारिकेला,
आईच्या मांडीवर बसुनी – झोके घ्यावे, गावी गाणी;
याहुनि ठावे काय तियेला – साध्या भोळ्या फुलराणीला ?
पुरा विनोदी संध्यावात – डोलडोलवी हिरवे शेत;
तोच एकदा हासत आला – चुंबून म्हणे फुलराणीला-
“छानी माझी सोनुकली ती – कुणाकडे ग पाहत होती ?
कोण बरे त्या संध्येतून – हळुच पाहते डोकावून ?
तो रविकर का गोजिरवाणा – आवडला अमुच्या राणींना ?”
लाजलाजली या वचनांनी – साधी भोळी ती फुलराणी !
आन्दोली संध्येच्या बसुनी – झोके झोके घेते रजनी;
त्या रजनीचे नेत्र विलोल – नभी चमकती ते ग्रहगोल !
जादूटोणा त्यांनी केला – चैन पडेना फुलराणीला;
निजली शेते, निजले रान, – निजले प्राणी थोर लहान.
अजून जागी फुलराणि ही – आज कशी ताळ्यावर नाही ?
लागेना डोळ्याशी डोळा – काय जाहले फुलराणीला ?
या कुंजातुन त्या कुंजातुन – इवल्याश्या या दिवट्या लावून,
मध्यरात्रिच्या निवान्त समयी – खेळ खेळते वनदेवी ही.
त्या देवीला ओव्या सुंदर – निर्झर गातो; त्या तालावर –
झुलुनि राहिले सगळे रान – स्वप्नसंगमी दंग होउन!
प्रणयचिंतनी विलीनवृत्ति – कुमारिका ही डोलत होती;
डुलता डुलता गुंग होउनी – स्वप्ने पाही मग फुलराणी –
“कुणी कुणाला आकाशात – प्रणयगायने होते गात;
हळुच मागुनी आले कोण – कुणी कुणा दे चुंबनदान !”
प्रणयखेळ हे पाहुनि चित्ति – विरहार्ता फुलराणी होती;
तो व्योमीच्या प्रेमदेवता – वाऱ्यावरती फिरता फिरता –
हळूच आल्या उतरुन खाली – फुलराणीसह करण्या केली.
परस्परांना खुणवुनि नयनी – त्या वदल्या ही अमुची राणी !
स्वर्गभूमीचा जुळ्वित हात – नाचनाचतो प्रभातवात;
खेळुनि दमल्या त्या ग्रहमाला – हळुहळु लागति लपावयाला
आकाशीची गंभीर शान्ती – मंदमंद ये अवनीवरती;
विरू लागले संशयजाल, – संपत ये विरहाचा काल.
शुभ्र धुक्याचे वस्त्र लेवुनि – हर्षनिर्भरा नटली अवनी;
स्वप्नसंगमी रंगत होती – तरीहि अजुनी फुलराणी ती!
तेजोमय नव मंडप केला, – लख्ख पांढरा दहा दिशाला,
जिकडे तिकडे उधळित मोती – दिव्य वर्हाडी गगनी येती;
लाल सुवर्णी झगे घालुनी – हासत हासत आले कोणी;
कुणी बांधिला गुलाबि फेटा – झकमणारा सुंदर मोठा!
आकाशी चंडोल चालला – हा वाङनिश्चय करावयाला;
हे थाटाचे लग्न कुणाचे – साध्या भोळ्या फुलराणीचे !
गाउ लागले मंगलपाठ – सृष्टीचे गाणारे भाट,
वाजवि सनई मारुतराणा – कोकिळ घे तानावर ताना!
नाचु लागले भारद्वाज, – वाजविती निर्झर पखवाज,
नवरदेव सोनेरी रविकर – नवरी ही फुलराणी सुंदर !
लग्न लागते! सावध सारे! सावध पक्षी ! सावध वारे !
दवमय हा अंतपट फिटला – भेटे रविकर फुलराणीला !
वधूवरांना दिव्य रवांनी, – कुणी गाइली मंगल गाणी;
त्यात कुणीसे गुंफित होते – परस्परांचे प्रेम ! अहा ते !
आणिक तेथिल वनदेवीही – दिव्य आपुल्या उच्छवासाही
लिहीत होत्या वातावरणी – फुलराणीची गोड कहाणी !
गुंतत गुंतत कवि त्या ठायी – स्फुर्तीसह विहराया जाई;
त्याने तर अभिषेकच केला – नवगीतांनी फुलराणीला !
गिरिशिखरे, वनमालाही
कड्यावरुनि घेऊन उड्या
घे लोळण खडकावरती,
जा हळुहळु वळसे घेत
पाचूंची हिरवी राने
वसंतमंडप-वनराई
श्रमलासी खेळुनि खेळ
ही पुढचि पिवळी शेते
झोप कोठुनी तुला तरी,
बालझरा तू बालगुणी
दरीदरी घुमवित येई!
खेळ लतावलयी फुगड्या
फिर गरगर अंगाभवती;
लपत-छपत हिरवाळीत;
झुलव गडे, झुळझुळ गाने!
आंब्याची पुढती येई.
नीज सुखे क्षणभर बाळ!
सळसळती गाती गीते;
हासं लाडक्या! नाच करी.
बाल्यचि रे! भारिसी भुवनी.
समय रात्रीचा कोण हा भयाण!
बळे गर्जे हे त्यांत घोर रान.
अशा समयी छबुकड्या पाखरा तू,
गात अससी; बा काय तुझा हेतू?
गिरी वरती उंच उंच हा गेला,
तमे केले विक्राळ किती याला.
दरी गर्जे, फूत्कार पहा येती,
किती झंझानिल घोर वाहताती.
दीर्घ करिती हे घूक शब्द काही;
क्रूर नादे त्या रान भरुनि जाई.
अशा समयी हे तुझे गोड गाणे
रम्य पक्ष्या, होईल दीनवाणे.
तुझ्या गानाचे मोल नसे येथे,
कुणी नाही संतुष्ट ऐकण्याते;
जगे अपुल्या कानास दिली टाळी,
वृथा मानवी हाव अशा वेळी.
तुझे गाणे हे शांत करी आता,
पहा, गर्जे वन घोर हे सभोंता.
किर्र करिती हे तीक्ष्ण शब्द कीट,
असे त्यांचा या समयि थाटमाट.
पुढे येईल उदयास अंशुमाली,
दिशा हसतील वन धरिल रम्य लाली.
हरिणबाळे फिरतील सभोवार,
तदा येवो गाण्यास तुझ्या पूर.
तुझे भ्राते दिसतील एक ठायी,
हरित कुंजी ज्या हास्य पूर्ण काही.
वदुनि त्यांच्या सह रम्य गीत बा रे,
मधुर नादे वन भरुनि टाक सारे.
मित्रांनो बालकवींच्या निसर्ग कविता या पोस्टाच्या मध्ये आपण बालकवी त्र्यंबक बापूजी ठोमरे(ठोंबरे) यांच्याविषयी माहिती घेतली. त्यांचे व्यक्तिमत्व, त्यांचा जीवनप्रवास यांचा ओझरता आढावा घेतला. आणि त्यांच्या काही प्रसिद्ध निसर्गकवितांचा आस्वाद घेतला.
मित्रांनो बालकवींच्या निसर्ग कविता हि पोस्ट तुम्हाला कशी वाटली? बालकवींच्या निसर्ग कविताया पोस्ट मधील कुठली कविता तुम्हाला जास्त आवडली? याबद्दल आम्हाला कंमेंट मध्ये नक्की कळवा.
सोबतच बालकवींच्या निसर्ग कविता या पोस्टमध्ये काही सुधारणा सुचवायच्या असतील, काही कविता तुमच्याकडे उपलब्ध असतील आणि इतरांपर्यंत त्या पोचवायची तुमची उच्च असेल तर contact us या पेज द्वारे तुम्ही त्या आम्हाला ई-मेल करू शकता.
बालकवींच्या निसर्ग कविता हि पोस्ट अधिक वाचनीय बनवण्यासाठी तुमचा सल्ला महत्वाचा आहे. तेव्हा आम्हाला काही मार्गदर्शन लाभेल अशी अपेक्षा ठेवतो.
धन्यवाद.
The post बालकवींच्या निसर्ग कविता appeared first on मराठी Motivation.
]]>The post शिवाजी सावंत यांची पुस्तके appeared first on मराठी Motivation.
]]>
नमस्कार मित्रांनो मराठी motivation या ब्लॉग वर आपले स्वागत आहे.या ब्लॉगच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत विविध विषयांतील प्रेरणादायी, ज्ञानवर्धन करणारी माहिती पोचवत असतो. आजही आम्ही अश्याच प्रकारची माहिती घेऊन आलो आहोत . खास तुमच्यासाठी!
मित्रांनो शिवाजी सावंत यांची पुस्तके या पोस्टच्या माध्यमातून आज आपण मराठी साहित्य विश्वातील अग्रगण्य साहित्यिकांपैकी एक असणारे श्री शिवाजी सावंत यांच्या साहित्यकृतींविषयी माहिती घेणार आहोत.
मित्रांनो शिवाजी सावंत यांची पुस्तके या पोस्ट मध्ये पुढे जाण्या अगोदर आपण थोडक्यात शिवाजी सावंत यांचा परिचय करून घेऊयात.
शिवाजी सावंत यांच्याविषयी माहिती नाही असा या महाराष्ट्रात एखादा निराळाच भेटेल. मुळात शिवाजी सावंत यांच्याविषयी जीवनात काही ऐकलं नाही असा महाराष्ट्रीय वाचक शोधूनही सापडणार नाही.
ज्या प्रकारे आपण एकदातरी हज यात्रा करावी असे मुस्लिम समाजात मानले जाते. त्याचप्रकारे वाचनाची आवड असो कि नसो एकदा सावंतांची पुस्तके वाचावीत हा तर सध्या महाराष्ट्रातील अलिखित नियमच झाला आहे.
गेली पाच सहा दशके शिवाजी सावंत यांनी मराठी मना-मनावर राज्य केलं आहे. आणि अजूनही हे मराठी मन त्यांच्या साहित्यकृतींचे दास आहे. अश्या या जादूगाराविषयी आज आपण शिवाजी सावंत यांची पुस्तके या पोस्टच्या माध्यमातून माहिती घेत आहोत.
शिवाजी सावंत यांचे पूर्ण नाव शिवाजी गोविंदराव सावंत. त्यांचा जन्म ३१ ऑगस्ट १९४० ला कोल्हापुरातील आजरा या गावी झाला. आजरा हे निसरहरामय वातावरणाने बहरलेलं छोटंसं गाव आहे. शिवाजी सावंत यांचे वडील गोविंदराव सावंत हे एक साधारण शेतकरी होते.
घराची परिस्थिती अगदी बेताची असल्याने शिवाजी सावंत यांचे प्राथमिक आणि माध्यमीक शिक्षण आजऱ्यातच झाले. त्यानंतर शिवाजी सावंत यांनी पुढील शिक्षणासाठी कोल्हापूर गाठले.
कोल्हापुरात बी.ए .चे प्रथम वर्षाचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले मात्र सर्वसामान्य कुटुंबांच्या अपेक्षेनुसार त्यांना लवकरात लवकर उत्पन्नाचे साधन मिळवून देणारे शिक्षण हवे होते. म्हणून त्यांनी बी.ए. चे शिक्षण तसेच ठेवून पुढे वाणिज्य शाखेतून पदविका घेतली.
पदविका घेतल्यानंतर शिवाजी सावंत यांनी आपल्या आपल्या कुटुंबाला आधार देण्यासाठी टायपिंग आणि शॉर्टहँड चा कोर्स करून कोर्टात कारकुनाची नोकरी केली.
नंतरच्या काळात शिवाजी सावंत यांनी कोल्हापूरच्या राजाराम प्रशाले मध्ये काही काळ अध्यापन केले. १९६२-१९७४ या काळात त्यांनी राजाराम प्रशाले ला अद्यापनात दिलेला वेळ आज एक प्रकारे या प्रशालेचे ओळख बनला आहे.
कोल्हापुराच्या राजाराम प्रशालेत अध्यापन करणे थांबवून पुढे ते पुण्याला स्थायिक झाले. पुण्यात स्थायिक झाल्यानंतर १९७४ते १९८० अशी सहा वर्षे त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत काम केले. या काळात शिवाजी सावंत हे महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाच्या ‘लोकशिक्षण’ या मासिकाचे सहसंपादक होते.
पुढील काळात ते याच मासिकाचे सांपादक म्हणून नियुक्त झाले. मासिकाचे संपादक म्ह्णून काम पाहत असतांना त्यांची लेखनाची ओढ त्यांना स्वस्थ बसू देईना. म्हणून त्यांनी १९८३ साली संपादक पदावरून स्वेच्छानिवृत्ती घेतली . आणि पुढील आयुष्यात फक्त लहानवरच पूर्ण लक्ष केंद्रित केले.
साहित्य क्षेत्रातील शिवाजी सावंत यांचे योगदान लक्षात घेऊन त्यांना १९८३ च्या मराठी साहित्य संमेलनाचे सम्मेलनाध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. १९८३ चे हे मराठी साहित्य संमेलन बडोदा येथे भरले होते. १९९५ पासून पुढे काही शिवाजी सावंत यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून पदभार सांभाळला.
२००२ मध्ये ७६ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कऱ्हाड येथे भरणार होते. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे ते उमेदवार होते. १८ सप्टेंबर रोजी आपल्या उमेदवारीच्या प्रचारासाठी गोव्याला गेले असतांना मडगाव येथे शिवाजी सावंत यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया यशस्वी झाली. मात्र पुढे त्यातच पुढे त्यांचे निधन झाले.
मित्रांनो शिवाजी सावंत यांची पुस्तके या पोस्ट मध्ये आपण शिवाजी सावंत यांचा थोडक्यात जीवनपरिचय करून घेतलाच आहे. आता वळूया त्यांच्या साहित्य परिचयाकडे. कलाकाराची खरी ओळख त्याच्या कलेने असते. शिवाजी सावंत त्यांचीसुद्धा खरी ओळख, खरा परिचय हा त्यांच्या साहित्याच्या स्वरूपातच होऊ शकतो.
शिवाजी सावंत यांनी त्यांच्या जबाबदाऱ्या पेलत अगदी थोड्याच साहित्याची निर्मिती केली आहे. संख्येने पाहता बोटावर मोजता येतील इतकीच त्यांची लेखांसंपदा;पण त्यांचे प्रत्येकाचं पुस्तकाने मराठी मनावर आजपर्यंत राज्य केलं आहे. चला तर शिवाजी सावंत यांची पुस्तके या पोस्टमध्ये आपण त्यांच्या या मराठी मनावर हुकूमत गाजवणाऱ्या साहित्य कृतींची माहिती घेऊयात.
१९६२ ते १९७४ या काळात शिवाजी सावंत कल्हापुराच्या राजाराम प्रशालेत शिक्षक म्हणून काम करीत होते. एकीकडे अध्यापन आणि दुसरीकडे लेखन अशी तारेवरची कसरत करीत शिवाजी सावंत यांनी मृत्युंजय ही कादंबरी लिहून पूर्ण केली. १९६७ ला मृत्युंजय प्रकाशित झाली.
मृत्युंजय हि एक पौराणिक कादंबरी आहे. या कादंबरीच्या प्रस्तावनेत शिवाजी सावंत यांनी हिंदीतील केदारनाथ मिश्र यांच्या कर्ण आणि रामधारी सिंह ‘दिनकर’ यांच्या रश्मिरथी ह्या दोन खंडकाव्यांचा कृतज्ञता पूर्वक उल्लेख केलेला आहे.
मृत्युंजय कादंबरीच्या लेखनासाठी शिवाजी सावंत यांनी थेट कुरुक्षेत्रावर मुक्काम ठोकला होता. प्रदीर्घ मनन, चिंतन, आणि संशोधन यांतून रससंपन्न अशी मृत्युंजय कादंबरी निर्माण झाली आणि शिवाजी सावंत हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत पोहोचले.
मृत्युंजय कादंबरीचा मुख्य विषय आहे कर्णाचा जीवनप्रवास. महाभारताच्या युद्धात एक दांडगा खलनायक म्हणून समोर आलेला कर्ण मुळात खलनायक आहे का? कि त्याच्या आयुष्याला आणखी पैलू आहेत? याचा घेतलेला शोध म्हणजे मृत्युंजय.
मृत्युंजय कादंबरी सुरु होते ती कर्णाच्या निवेदनाने. पुढे कर्णाच्या व्यक्तिमत्वाचा परिचय आपल्याला त्याच्या आजूबाजूच्या व्यक्तींच्या निवेदनात कळून येतो. एक भाऊ म्हणून, एक सेनापती म्हणून आपल्याला कर्णाची महती आपल्याला शोण सांगतो.
एक मित्र म्हणून कर्ण कसा आहे याचा परिचय आपल्याला दुर्योधन देतो. एक पती म्हणून कर्णाच्या व्यक्तिमत्वाची बाजू आपल्यासमोर वृषाली मांडते तर एक महान योद्धा म्हणून श्रीकृष्ण आपल्यासमोर कर्णाला उपस्थित करतो.
कर्णाच्या कथेच्या ओघाने आपल्याला महाभारताचे युद्धही या कादंबरीत पाहायला मिळते.कुरुक्षेत्रावर झालेल्या युद्धातील रोमांचकारी प्रसंग आपल्या डोळ्यांसमोर जिवंत होतात.
सर्व प्रकारची योग्यता असतांनाही,पराक्रमाच्या बाबतीत सगळ्यांचा बाप असतांनाही जीवनात फक्त अपमानाचे ताट वाढून ठेवले असल्यानंतर अगतिक होणाऱ्या प्रत्येक माणसासाठी अतिशय प्रेरणादायी ठरावी अशी हि कादंबरी आहे.
नशीब वेळावेळी घात करायला उठले असतांना त्याला हरवण्यासाठी आपले भगीरथ प्रयत्न सुरु ठेवणाऱ्या असंख्य धडपड्या तरुणांना योग्य दिशा देण्याचे कामही हि कादंबरी करते.
सर्वश्रेष्ठ धनुर्धर असूनही ज्यावेळी फक्त खालच्या जातीत जन्म घेतल्यामुळे पदोपदी होनाऱ्या अपमानाला आपल्या कार्यदवरे,पराक्रमाद्वारे उत्तर देणारा कर्ण पुढे आपल्या समाजातील दलित चळवळीचा एक प्रकारे नायकच बनला आहे.
मृत्युंजय या कादंबरीच्या माध्यमातून शिवाजी सावंत यांनी कित्येक काळापासून एक खलनायक म्हणून आपल्याला दाखवण्यात आलेल्या कर्णाला जनमानसाच्या मनात एका पुरुषश्रेष्ठ नायकाचे स्थान मिळवून देण्यात यश मिळवले आहे.
मित्रांनो शिवाजी सावंत यांची पुस्तके या पोस्ट मध्ये आता आपण शिवाजी सावंत यांच्या छावा या कादंबरी विषयी माहिती घेऊयात. स्वराज्याचे धाकले धनी, रयतेच्या राज्याचे दुसरे छत्रपती यांच्या जीवनावर आधारित छावा हि एक ऐतिहासिक कादंबरी आहे. हि कादंबरी १९८० ला प्रकाशीत झाली.
या कादंबरीकडे बघता एक विचार नक्कीच मनात डोकावून जातो कि समाजाने, इतिहासाने ज्यांना ज्यांना बदनाम केले, ज्यांच्या पराक्रमाचा अनुल्लेखाने खून केला अश्या महान व्यक्तींना न्याय देण्याच्या हिशेबानेच कि काय शिवाजी सावंत यांनी आपली लेखणी उचलली आहे.
जन्मताच काही दिवसन्त होणारे आईचे निधन. त्यातच छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य निर्मितीचा कार्यात व्यग्र असल्याने वडिलांच्या प्रेमाला मुकलेल्या झालेले संभाजी महाराज्यांच्या बालमनावर काय परिणाम झाला असावा याचा अचूक ठाव शिवाजी सावंतांनी घेतला आहे.
आग्राच्या भेटीत औरंगजेबाने शिवाजी महाराजांना नजरकैद केलेले असतांना कुठलीही भीती न बाळगता त्या प्रसंगाला समोर जाणारे आणि स्वतःच्या प्रसंगावधानाने आणि संभाषण कौशल्याने महाराजांच्या सुटकेच्या योजनेचे मुख्य सूत्रधार असलेले संभाजी महाराज त्यावेळी जेमतेम नऊ वर्षाचे होते!
केवळ पराक्रम नव्हे तर विद्येच्याही क्षेत्रात आपली हुकूमत गाजवणारे, नखशिखा ,नायिकाभेद, बुधभुषणम यांसारख्या ग्रंथांची रचना अगदी लहान वयातच करणारे संभाजी महाराज खरेच शिवाजी महाराजांचा छावा शोभतात.
छत्रपती शिवाजी महाराज हे निर्विवाद सिंहपुरुष होते . परंतु शिवपुत्र संभाजी हाही एक छावाच होता. महाराष्ट्राला हे नव्यानं पण पुरेपूर उमजलं आहे. छावा च्या जोरदार स्वागतानं ते सिद्ध झालं आहे.एक दोनच नव्हे तर एकाचवेळी पाच आघ्याड्यांवर निकराची पंजेफाड करणारा हा सेना-धुरंधर ! मराठ्यांच्या इतिहासात असा सेनापती एकमेव संभाजीच होऊन गेला
जंजिरेकर सिद्दी, गोव्याचे फिरंगी, मुंबईचे टोपीकर आणि तीस लाखांची फौज व चौदा कोटींचा खजिना घेऊन मराठ्यांचे पारिपत्य करण्यासाठी दक्षिणेत उतरलेला अवाढव्य औरंगजेब या त्या चार आघाड्या.पाचवी आघाडी होती स्वार्थांध स्वजनांची, अगदी घरचीच ! विखारी विश्वास घातक्यांची !
रणांगणाचा वाघ सतत नऊ वर्षे पाठीशी घेत मुलुखभर दौडणारा हा झुंजार राजा जन्माला येताना कविमनाचे संचित बरोबर घेऊन यावा आणि ‘बुध्दभूषणम् काव्याची रचना करुन तो कविराज म्हणून मान्यता पावावा हे पाहिले की प्रतिभा देवदत्त असली तरी एक अजब आणि विस्मयकारी देणगी आहे असे म्हणावे लागते.
तसाच अटीतटीचा प्रसंग आला तर मराठी कविमन एकदा का निर्धाराने राजवस्त्र ल्यालें की मृत्यूलाही कसे धडक सामोरे जाऊ शकते. हे या छाव्याने तुळापुरी सिद्ध केले. ही शोकांतिका खरीच पण उत्कट आणि भव्य समर्पणाचा वेध घेणारी!
मित्रांनो शिवाजी सावंत यांची पुस्तके या पोस्ट मध्ये आता आपण शिवाजी सावंत यांच्या युगंधर या कादंबरीविषयी थोडक्यात माहिती घेऊयात. मृत्युंजय प्रमाणेच युगंधर सुद्धा एक पौराणिक कादंबरी आहे. युगंधरचा नायक आहे महाभारतासारखं युद्ध घडवून आणणारा मुरलीधर श्री कृष्ण.
श्रीकृष्णाच्या जीवनाने सामान्यांच्या जीवनाला एक प्रकारे वेड लावले आहे. बालकांचे संगोपन करणारे आईवडील असो, तारुण्याच्या भरातील प्रेम करणारे असोत, कुटील राजकारणी असोत, की तत्वज्ञानाची चर्चा करणारे तत्वज्ञानी असोत सगळ्यांच्या आदर्शस्थानी योग्यरीत्या नांदतो तो हरिणी श्रीकृष्ण.
श्रीकृष्ण म्हणजे गेली पाच हजार वर्षे भारतीय स्त्री-पुरुषांच्या व्यक्त-अव्यक्त मनांचा तळठाव व्यापून दशांगुळे शेष उरलेली एक सशक्त विभूतिरेखा – एक युगपुरुष होय. श्रीकृष्णचरित्राचे अधिकृत संदर्भ सापडतात ते मुख्यतः श्रीमद्भागवत, महाभारत, हरिवंश व काही पुराणांत,या प्रत्येकात गेल्या हजारो वर्षात सापेक्ष विचारांची, मनगढंत पुटंच पुटं चढली. त्याचं तांबूस -नीलवर्णी, सावळं,गर्भातच दुर्लभ रंगसूत्रांचे संस्कार घेतलेलं, श्रीयुक्त म्हणजे सुंदर रुपडं घनदाट झालंय.
श्रीकृष्णाच्या जीवनात चमत्कारांचे स्रोतच स्रोत – नकळत्या भाबडेपणी टाकल्या गेले आहेत. त्यामुळे आज तर श्रीकृष्ण क्रमश वास्तवापासून शेकडो योजनं दूर दूर जाऊन बसलाय. आजच्या भारतीय म्हणून
असलेल्या जीवनप्रणालीचा श्रीकृष्ण हा पहिला उद्गार आहे! जसा आभाळातील सूर्य कधी शिळा व बासा होत नाही तसाच हा महाभारताचा कथाकणा असलेला तत्त्वज्ञ वीर, आज तर नाहीच उद्याही शिळा होणार नाही.
जन्मतच दुर्मिळ रंगसूत्रं लाभल्यामुळं त्याच्या चक्रवर्ती जीवनचरित्रात भारताला नित्यनूतन व उन्मेषशाली बनविण्याचा ऐवज ठासून भरला आहे.श्रीकृष्णाच्या मूळ जीवनसंदर्भाची मोडतोड न करता त्याचं युगंधरी रुप बघता येईल का? त्याच्या स्वच्छ नीलवर्णी जीवनसरोवराचं दर्शन घेता येईल का ?गीतेत त्यानं विविध जीवनयोग नुसतेच सांगितले का कीहातच्या दिव्य, गतिमान सुदर्शनासारखे प्रत्येक्ष जगूनही दाखविले.
त्याच्या जीवनसरोवरातील हजारो वर्षदाटलेलें शेवाळ तर्कशुद्ध सावधपणे अलगद दूर सारलं तर त्याचं युगंधरी दर्शन शक्य आहे.मृत्युंजय च्या यशशील रचनाकाराची प्रदीर्घ चिंतन, सावध संदर्भशोधन, डोळस पर्यटन व जाणत्यांशी संभाषण, यातून साकारलेली साहित्यकृती – युगंधर !!
मित्रांनो शिवाजी सावंत यांची पुस्तके या पोस्ट मध्ये आता लढत या पुस्तकाच्या माध्यमातून आपण शिवाजी सावंत यांच्या थोड्या वेगळ्या लेखनशैलीचा परिचय करून घेणार आहोत. १९८६ च्या दरम्यान प्रकाशित झालेली लढत हि एक द्विखंडात्मक चरित्रात्मक कथा आहे.
लढत हि चरितकहाणी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जीवनावर आधारित आहे. महाराष्ट्रात सहकारी तत्वाची पायाभरणी करून कृषी उद्योग क्षेत्रात भरभराट घडवून आणण्याचं मोलाचं काम करणारे श्री विठ्ठलराव विखे पाटील त्यांच्या संघर्षमय जीवांची कथा म्हणजे लढत होय.
ज्याला कुणाला महराष्ट्राच्या सहकार चळवळीविषयी अगदी खोलात शिरून माहिती घ्यायची असेल त्यांच्यासाठी हि चरितकहाणी नक्कीच एखाद्या खजान्याच काम करेल.
भारतीय स्वतंत्र चळवळीतील धडाडीचे नेते असणारे भाई मनोहर कोतवाल त्यांच्या संघर्षमय जीवनावर आधरीत संघर्ष हि एक चरित्रात्मक कथा आहे. भाई मनोहर कोतवाल हे कामगार चळवळीतील एक मनाचे स्थान मानल्या जातात.
माथाडी व गोडी कामगार यांच्यासाठी कार्य करणारे भाई मनोहर कोतवाल यांनी त्यांच्या वयक्तिक आयुष्यात कामगार चळवळ आणि कामगारांसाठी कश्या तडजोडी केल्या? सत्तेच्या राजकारणात न रमता कामगारांच्या प्रश्नांना निकाली लावण्यासाठी त्यांनी केलेल्यातागाची हि एक लक्षवेधक कथा आहे.
वरील पुस्तकांसोबतच पुढे काही शिवाजी सावंत यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. यात कवडसे, कांचनकन, शेलका साज हे ललित निबंध आहेत. कादंबऱ्यांसोबतच छावा आणि मृत्युंजय हि दोन नाटके आहेत. या दोन्ही नाटकांचे बरेच प्रयोग झालेत आणि आजही महाराष्ट्रभर या दोन्ही नाटकांचे प्रयोग सुरूच असतात. छावा वर आधारित तर स्वराज्य रक्षक संभाजी महाराज हि मालिका महाराष्ट्रभर गाजली आहे.
युगंधर या कादंबरी बरोबरच या कादंबरीच्या प्रस्तावनेचे विस्तारित स्वरूप म्ह्णून एक छोटेखानी पुस्तक शिवाजी सावंतांनी लिहिले आहे. त्याचे नाव आहे युगंधर श्रीकृष्ण:एक चिंतन. कथा कादंबऱ्यांबरोबरच व्यक्तिचित्रण या प्रकारालाही शिवाजी सावंतांनी हात घातलेला आहे. त्यांनी मोरावळा हि व्यक्तिचित्रे १९९८ ला प्रकाशित केली आहेत.
शिवाजी सावंत यांना मिळालेले वेगवेगळे सन्मान पुढीलप्रमाणे.
मृत्युंजयसाठी –
महाराष्ट्र राज्य पुरस्कार (१९६७), न.ची.केळकर पुरस्कार (१९७२), ललित मासिकाचा पुरस्कार (१९७३), भारतीय ज्ञानपीठाचा मुर्तीदेवी पुरस्कार (१९९४), फाय फाउंडेशन पुरस्कार(१९९६), आचार्य अत्रे विनोद विद्यापीठ पुरस्कार (१९९८), मृत्युंजय च्या गुजराती अनुवादाला गुआजरात सरकारचा साहित्य अकादमी(१९९०), गुजराती भाषेतीलच अनुवादाला केंद्रीय साहित्य अकादमी(१९९३)
छावासाठी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार (१९८०)
पुणे विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार (२०००)
कोल्हापूरभूषण पुरस्कार(२०००)
महाराष्ट्र सरकारचा जीवनगौरव हा साहित्यिक सन्मान (२०००)
ज्ञानपीठाचा मुर्तीदेवी पुरास्कार (१९९६)
मित्रांनो शिवाजी सावंत यांची पुस्तके या पोस्ट मध्ये आज अगोदर शिवाजी सावंत यांच्याबद्दल माहिती घेतली.त्यानंतर आपण शिवाजी सावंत यांच्या काही पुस्तकांबद्दल थोडी चर्चा केली. आपण शिवाजी सावंत यांची जवळ जवळ सगळी साहित्यसंपदा पाहिली .
तर मग मित्रांनो तुम्हाला आजची शिवाजी सावंत यांची पुस्तके ही पोस्ट कसुरी वाटली? या पोस्टमधून तुम्हाला काही नवी माहिती मिळाली का? मिळाल्यास तुमच्यासाठी कुठली माहिती नवी होती? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आम्हाला कळवा.
मित्रांनो जर शिवाजी सावंत यांची पुस्तके या पोस्टमध्ये काही त्रुटी राहिल्या असतील, तुम्हाला काही सुधारणा सुचवायच्या असतील तर तुम्ही contact us हे पेज वापरून आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. शिवाजी सावंत यांची पुस्तके या पोस्ट ला अधिकाधिक वाचनीय बनवण्यासाठी आपल्या सूचनांचे नेहमी स्वागत असेल. तर मित्रांनो शिवाजी सावंत यांची पुस्तके या पोस्ट विषयी तुमचा अभिप्राय नक्कीच कळवा आणि पोस्ट आवडल्यास तुमच्या वाचक मित्रांना शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद. !
The post शिवाजी सावंत यांची पुस्तके appeared first on मराठी Motivation.
]]>The post ययाती कादंबरी वाचायची आहे ?। Yayati Novel Pdf download appeared first on मराठी Motivation.
]]>
मित्रांनो काय तुम्हाला ययाती कादंबरी वाचायची आहे? जर तुमचं उत्तर होकारार्थी असेल तर आजची हि पोस्ट खास तुमच्यासाठीच आहे. आज ययाती कादंबरी डाउनलोड करण्यासाठीची लिंक आम्ही ययाती कादंबरी वाचायची आहे या पोस्टच्या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत. पण त्यापूर्वी आपण ययाती कादंबरी विषयी थोडे जाणून घेऊयात.
ययाती कादंबरी ही मराठी साहित्याला लाभलेले एक अनमोल रत्न आहे. मराठी साहित्य जगतातले महारथी वि.स.खांडेकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून ययाती कादंबरी अवतरली आहे. १९५९ साली या कादंबरीची पहिली आवृत्ती निघाली. तेव्हापासून आजपर्यंत कित्येक आवृत्त्या निघाल्या आहेत. सोबतच कन्नड,मलयाळम यासारख्या भारतीय भाषांबरोबरच विविध परदेशी भाषांमध्येही ययाती कादंबरी चे भाषांतर झालेले आहे.
ययाती कादंबरी ही बरीच गौरवान्वित झालेली कादंबरी आहे. या कादंबरीला १९६० चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. १९७४ चा ज्ञानपीठ पुरस्कार ययाती कादंबरीनेच मिळवला होता. शिवाय १९६०चा राज्यशासनाच्या पुरस्कारही ययाती कादंबरी साठी वि.स.खांडेकर यांना देण्यात आला होता.
ययाती कादंबरी ही पौराणिक कादंबरी आहे. याचा अर्थ असा नव्हे कि पुराणकाळाप्रमाणे या कादंबरीचा आपल्या जीवनाशी काही एक संबंध नाही. संदर्भ जरी पुराणकाळाचा असला तरी ययाती कादंबरी आजच्या भौतिकवादाने भारावलेल्या मानवी जीवनाला योग्य दिशा देण्याचे कार्य करते.
ययाती कादंबरी वाचायची आहे या पोस्ट मध्ये आता आपण ययाती कादंबरी वि. स.खांडेकर यांना ज्या मूळ पुराण कथेवरून सुचली ती कथा पाहणार आहोत.
महाभारतातील आदिपर्वात ययातोपाख्यान म्हणून एक उपाख्यान आहे. या उपाख्यानातील ययाती राजाच्या जीवनकथेवर ययाती कादंबरी आधारलेली आहे. मूळ कथानकाला उपलब्ध इतर साहित्यांच्या निष्कर्षांची जोड देऊन वि.स.खांडेकर यांनी ययातीची नवनिर्मिती साधली आहे.
मूळ उपाख्यानामध्ये महाराज ययाती हे हस्तिनापूरचे युवराज आहेत. त्यांचे वडील महाराज नहूश यांना ऋषींनी श्राप दिला आहे. नहूश महाराज कित्येक वर्षे साप बनून जगतात. त्यांची पुन्हा भेट आपल्याला महाभारताच्या काळात होते जेव्हा ते युधिष्ठिराला भेटतात तेव्हा.
नहूश महाराजांनंतर ययाती हस्तिनापूरचा राजा बनतो. त्याचा विवाह दैत्यांचे गुरु, पुरोहित शुक्राचार्य यांची कन्या देवयानी हिच्याशी होतो. आणि येथेच देवयानी सोबत शर्मिष्ठेचे आगमन होते. शर्मिष्ठा हि दैत्यराज वृषपर्वा यांची कन्या असते.
राजाची कन्या जरी असली तरी वडिलांच्या शब्दासाठी शर्मिष्ठा देवयानी ची दासी म्हणून जाते. आणि तेथे गेल्यानंतर ती ययाती महाराजांकडे पुत्रप्राप्तीसाठी याचना करते. महाराजही तिच्या सौंदर्याला बघून वाहावत जातात.
बरीच वर्षे निघून जातात पण देवयानीला या दरम्यान ययाती आणि शर्मिष्ठा यांच्या नात्याविषयी काहीही भनक नसते. याच काळात देवयानीला दोन तर शर्मिष्ठाला तीन मुले होतात.
आता जेव्हा देवयानीला कळते कि शर्मिष्ठेला तीन पुत्रांची प्राप्ती हि महाराज ययातीपासूनच झालेली आहे. तेव्हा ती ययातीची तक्रार तिच्या वडिलांकडे करते कि ‘शर्मिष्ठेला तीन आणि मला दोनच मुले झालीत. याचा अर्थ महाराजांचे माझ्यापेक्षा जास्त शर्मिष्ठेवर प्रेम आहे.’
मुलीचे दुःख पाहून शुक्राचार्य चिडतात व ययातीला वृद्धत्वाचा शाप देतात.पण नंतर ययाती त्यांची क्षमा मागतो तर ते त्या शापावर उ:शाप देतात कि ययाती त्याचे वार्धक्य त्याच्या कोणत्याही मुलाच्या तारुण्यासोबत अदलाबदली करू शकेल.
तेव्हा ययाती महाराज आपल्या पाचही पुत्रांना बोलावतात आणि या अदलाबदली विषयी विचारतात. तर पाचपैकी सर्वात लहान असणारा पुरुच फक्त या अदलाबदालीला तयार होतो. ययाती महाराज वयाची हि अदलाबदली करून संपूर्ण साम्राज्याचा धनी म्हणून पुरुची निवड करतात.
मूळ पुराणानुसार ययाती हजारो वर्ष यौवन उपभोगतो. मात्र नंतर त्याला या सुखोपभोगाचा वीट येतो. शेवटी पुरुला त्याचे यौवन परत करून ययाती वानप्रस्थ आश्रमात प्रवेश करतो.
तर मित्रांनो अशी होती पुराणातील ययातिची मूळ कथा. आता आपण ययाती कादंबरी वाचायची आहे या पोस्टमध्ये ययाती कादंबरी मधील विविध पात्रांचा परिचय करून घेऊयात.
वि.स. खांडेकरांनी आपली लेखणीच्या जादूने ययातीच्या कथेचा पार चेहरा- मोहराच बदलून टाकला आहे. ययाती कादंबरी मध्ये आपल्याला वेगवेगळे पात्र पाहायला मिळतात. त्यापैकी काही मूळ कथेतून घेतले आहेत. तर काही पात्रांची निर्मिती ही वि.स. खांडेकरांच्या सर्जनशीलतेची उत्तम उदाहरण आहे. ययाती कादंबरीतील पात्रांचा परिचय आपण अगोदर करून घेऊयात.
नहुष महाराज – हस्तिनापुराचे सम्राट. ययातीचे वडील. त्यांनी इंद्राचाही पराभव केला होता.
अशोकसुंदरी – ययातीची आई.
यती – ययातीचा मोठा भाऊ. पळून जाऊन एक संन्याशाचं जीवन जगतो.
ययाती – कादंबरीचा नायक. हस्तिनापूरचा युवराज आणि नंतर सम्राट.
देवयानी – असुर पुरोहित शुक्राचार्य यांची कन्या. ययातिची पत्नी.
शुक्राचार्य – असुरांचे पुरोहित. विविध विद्यांनी युक्त असे ऋषी.
वृषपर्वा – असुरांचा राजा.
शर्मिष्ठा – असुर राजा वृषपर्वा याची कन्या. देवयानीच्या बालपणाची मैत्रीण. नंतरच्या काळात
देवयानीची दासी.
अंगिरस – एक महान ऋषी. त्यांच्या आशीर्वादानेच यती आणि ययाती दोघेही झाले.
कच – अंगिरस ऋषींचा शिष्य. सोबतच शुक्राचार्यांचाही शिष्य. देवयानीच पाहिलं प्रेम. ययातिचा मित्र.
माधव – ययातीचा सारथी आणि मित्र.
कलिका – ययातीच्या बालपणी स्वतःचे दूध पाजणारी. अशोकसुंदरीच्या मर्जीतली दासी.
अलका – कलिकेची मुलगी. ययातिची बालपणीची मैत्रीण. तसेच काही काळ दासी.
मुकुलिका – एक दासी.
यदु – ययाती आणि देवयानी यांचा पुत्र.
पुरु – शर्मिष्ठा आणि ययाती यांचा पुत्र. ययातीसोबत वयाची अदलाबद्ल करायला तयार होणारा.
मंदार – एक साधू म्हणून वावरणारा धूर्त माणूस.
ययाती कादंबरी ही चार भागांत विभाजित केली गेली आहे. ययातीच्या जीवनातील चार वेगवेगळ्या अवस्थांशी आपण त्यांची सांगड घालू शकतो. या चार भांगांमध्ये ययाती, देवयानी आणि शर्मिष्ठा यांची निवेदने येतात, प्रत्येक भागात ही पात्रे आपल्याशी बोलतात. त्यांची बाजू मांडतात. त्यांचं दुःख किती मोठं आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात.
प्रत्येक भागात ययातीच्या जीवनाचा विशिष्ठ काल वर्णन केला गेला आहे. या प्रत्येक भागाची आपण थोडक्यात माहिती पाहुयात.
या संपूर्ण भागात एकटा ययातिच आपल्याशी बोलतो. या भागात ययातीचे बालपण आहे. त्याचा तारुण्यातील प्रवेश आहे.ययातीने केलेल्या अश्वमेघ यज्ञाचे वर्णन याच भागात आहे. याच भागात ययाती आणि यती यांची रानात भेट होते. अंगिरस ऋषींच्या आश्रमात येथेच त्याला एक जिवाभावाचा मित्र म्हणून कच लाभतो.याच भागात केसांत सोनेरी रंगाची छटा असणारी अलका ययातीच्या आयुष्यात येते आणि निघूनही जाते. याच भगत नहुष महाराजांचा मृत्यू आणि मुकुलिका प्रकरणही आहे.
दुसरा भाग आपल्याला अगोदर थेट घेऊन जातो ते असुर राजा वृषपर्वा याच्या राज्यात. या भागात आपल्याला देवयानी आणि कच यांचं नातं बघायला मिळतं.देवयानी आणि शर्मिष्ठा यांच्यातील स्पर्धा पहायला मिळते. ययाती आणि देवयानीची भेट आणि त्यांचा विवाह पाहायला मिळतो. ययाती आणि शर्मिष्ठा यांचं नातं तयार होण्यापासून ते देवयानीला सगळं कळण्यापर्यंत याच भागात आहे. याच भागात शर्मिष्ठा देवयानीच्या तावडीतून सुटून पुरुला घेऊन हस्तिनापुरापासून दूर जान्यात यशस्वी होते.
या भागात हस्तिनापुरातून निघाल्यावर शर्मिष्ठा आणि पुरुचे जीवन कसे चालते? त्यांना यती कसा मदत करतो? याचे वर्णन आहे. जवळ जवळ अठरा वर्षांचा काळ या भागात थोडक्यात सांगितला आहे.
या भागात दस्युन्चा उठाव आहे. हा उठाव शमवण्यासाठी यदु जातो. मात्र तिथे त्याला हार खावी लागते. त्याला बंदी बनवल्या जातं . त्याचवेळी पुरु आपल्या काही निवडक मित्रांसोबत येऊन यदु ची सुटका करून घेऊन येतो. या भागात गत अठरा वर्षात ययातीने केलेल्या सर्व पापांचा लेखाजोखा आहे. यातच शेवटी उपभोगी वृत्तीचा वीट येऊन ययाती आपल्या दोन्ही पत्नींसोबत वानप्रस्थ होताना बघायला मिळतो.
मित्रांनो ययाती कादंबरी वाचायची आहे या पोस्ट मध्ये आताच आपण ययाती कादंबरी कशी रचलेली आहे ते पाहिले. या कादंबरीच्या प्रत्येक भागात काय आहे याचीसुद्धा अगदी थोडक्यात चर्चा केली. आता आपल्या ययाती कादंबरी वाचायची आहे या पोस्ट मध्ये आपण वि. स. खांडेकर यांच्या ययाती कादंबरीचा मूळ कथापट कसा आहे ते पुढे पाहू.
पुराणातील कथेप्रमाणेच हि कथा हस्तिनापूरच्या राज्याच्या आजू बाजू फिरते. कथा सुरु होते ती ययातीच्या राजपुत्र असण्याच्या अवस्थेपासून. लहानपणापासूनच. या कथेत नहूश महाराजांना श्राप आहे कि त्यांच्या कुळातील कोणताही पुरुष कधीच सुखी राहू शकणार नाही.
नहुष महाराज आणि देवी अशोकसुंदरी याना कोणतेही अपत्य नव्हते म्हणून ते अंगिरस ऋषींकडे जातात. अंगिरस ऋषींच्या आशीर्वादाने त्यांना दोन पुत्र प्राप्त होतात. त्यातला मोठा म्हणजे यती.यतीला बालपणापासूनच ऋषीमुनी आणि वैराग्याची ओढ असते. आणि या ओढीसाठीच तो एक दिवस घरातून पळून जातो आणि सन्यस्त जीवन सुरु करतो.
यती निघून गेल्यानंतर बऱ्याच वर्षांनी ययातिचा जन्म होतो. मात्र ययातीसुद्धा आपल्या भावाच्या मार्गाने जाऊ नये यासाठी त्याला उपभोगांत रमण्याजोगे वातावरण तयार केले जाते. ययाती आपल्या पूर्वजांप्रमाणे पराक्रमी आहे. तो राज्यातील एका उत्सवात भाग घेतो. या उत्सवात तो घोड्यावरून पडतो. काही दिवस बेशुद्ध राहतो.
बेशुद्धावस्थेत त्याची सेवा करायला येते ती अलका. अलका हि कलिकेची मुलगी आहे. कलिका ती दासी आहे जिने ययातीला स्वतःचे दूध पाजले आहे. पाहायला जाता ती त्याची दूधभगिनी. पण त्याच्या पुरुषसुलभ मनाला तिच्या सौन्दर्याची भुरळ पडते.
आपण जात आहोत तो मार्ग चुकीचा आहे असे त्याची सद्विवेकबुद्धी त्याला समजावून सांगते. मात्र विवेकावर भावनेचा विजय होतो आणि एका प्रसंगी नकळत ययाती अलकेचे चुंबन घेतो.मात्र त्यानंतर त्यापुढे गोष्ट जात नाही. प्रकृती बरी झाल्यानंतर ययाती अश्वमेघ यज्ञासाठी बाहेर पडतो.
अश्वमेघ यज्ञासाठी बाहेर असतांनाच एक अरण्यात त्याची भेट त्याच्या मोठ्या भावाशी म्हणजेच यतीशी होते. तो तेथे त्याला परत चलण्यासाठी विनवतो पण यती ऐकत नाही.त्यानंतर ययाती अंगिरस ऋषींच्या आश्रमात जातो. तेथे त्याची भेट होते कच या पात्रासोबत.
कच हा ध्येय्याने भरलेला, मानवतावादी दृष्टिकोनाचा, खरी सौन्दर्यदृष्टी लाभलेला एक ऋषिकुमार आहे. त्या आश्रमात ययाती आणि कच यांची छान मैत्री जमते.कच ययातीला नेहमी उपभोगापेक्षा आपले जीवन इतरांना उपयुक्त होईल असे वागण्यातच कशी भलाई आणि खरे सुख आहे हे सांगत असतो.
इकडे मध्येच नहुष महाराजांची तब्येत बिघडल्याने ययाती अंगिरस ऋषींच्या आश्रमातून परत येतो. वडिलांची स्थिती आणि मृत्यूचे भय यांनी घाबरलेला ययाती या वेळी मुकुलिका नामक दासीचा दास होतो. मात्र तो येथे लगेच स्वतःला सावरतो. पुन्हा तो मुकुलिकेच्या वाटेने जात नाही.
अश्वमेघ यज्ञावरून परत आल्यावर ययाती पुन्हा आपल्या भावाला परत आणायच्या हेतूने प्रवासावर निघतो. मात्र यावेळी त्याची भेट होत नाही. तो गुहा सोडून केव्हाच निघून गेलेला असतो. मात्र परतत असतांना वाटेत त्याला अलका मिळते.
ययाती अश्वमेघ यज्ञात व्यस्त असतांना अलकाचे लग्न एका शेतकऱ्यांसोबत झालेले असते. त्याला जुगाराचा मोठा नाद असतो. तो जुगारात अलकाला हरतो. तेव्हा अलका तेथून आपला जीव वाचवून कशीतरी बाहेर पडते आणि लपत छपत पळत असतांना तिची भेट ययाती सोबत होते. यावेळी ययाती तिला बहिणीचा दर्जा देऊन सोबत राज्यात घेऊन येतो.
मात्र मंदार नावाचा अमात्यांचा प्रतिनिधी महाराणीच्या कान भरतो आणि महाराणी अलकाला कैद करून विष देऊन मारून टाकण्याचा आदेश देते. आणि त्यांच्या आदेशाची अम्मलबजावणीसुद्धा तंतोतंत केली जाते.
दरम्यानच्या काळात देव आणि असुरांच्या युद्धात असुर वरचढ ठरत असतात कारण शुक्राचार्यांनी मिळालेली संजीवनी विद्या असते. मग देवांसाठी हि विद्या मिळवायची जबाबदारी कच स्वीकारतो. तो शुक्राचार्या कडे गेला असता तेथे देवयानीला त्याच्यावर प्रेम होते. कचही तिच्या प्रेमात पडतो. मात्र त्याचे प्रेम हे वासनेचा कुठलाही लवलेश नसणारे निरपेक्ष प्रेम असते.
आपला उद्देश्य काहीही असला तरी शुक्राचार्य आपले गुरु आहेत आणि आता देवयानी आपली गुरुभगिनी.याची जाणीव कच पुरेपूर बागळून असतो. त्यामुळे तो आपली पायरी कधीच सोडत नाही. त्याचे सत्य सगळ्यांना कळल्यावर त्याला ठारही केलं जातं . मात्र देवयानीच्या विनवनीखातर शुक्राचार्य त्याला पुन्हा जीवित करतात.
इकडे देवयानीचा प्रेम प्रस्ताव कच नाकारतो. त्यामुळे ती क्रुद्ध झालेली असते.अशातच वनात विहाराला गेले असतांना तिचे आणि आणि शर्मिष्ठेचे भांडण होते.त्या भांडणात देवयानी चुकून विहरीत पडते.शर्मिष्ठा आपल्या मैत्रीणीं बरोबर तेथून निघून जाते. त्याचवेळी शिकारीसाठी दूरपर्यंत आलेला आणि पाण्यासाठी तहानलेला ययाती तेथे येतो. देवयानीला विहिरीतून बाहेर काढतो.
ययाती आपल्या सौन्दर्यावर मुग्ध झाला आहे हे देवयानी ओळखते आणि लग्नाची गळ घालते. ययातीला तर मान्य असतेच. मग त्यांचं लग्न मोठ्या थाटात उरकलं जात. ययाती सोबत येतांना देवयानी शर्मिष्ठेला दासी म्हणून घेऊन येते. (विहरीत ढकलल्याचं प्रायश्चित्त म्हणून दासी.) शर्मिष्ठा त्यांच्या सोबत येते खरी पण शर्मिष्ठेपासून दूर राहायला शुक्राचार्यांनी ययातीला आधीच ठणकावून सांगितलेले असते.
देवयानीच्या स्वभावामुळे आणि एकटं पडल्याच्या भावनेने ययाती पुन्हा एकदा सगळी वचणे तोडतो.इकडे देवयानीला पुत्र होतो तेव्हाच दुसरीकडे शर्मिष्ठेच्या पोटातही मूल असत.भरपूर वेळेपर्यंत देवयानीला यांचं प्रकरण कळत नाही. जेव्हा तिला कळतं तेव्हा ती शर्मिष्ठेच्या मुलासकट तिचा काटा काढावा या उद्देदेश्याने शर्मिष्ठेला तिच्या बाळासकट बंदी बनवते.
ययातीला हे जेव्हा कळते. तेव्हा तो त्याचा मित्र माधव याच्या साहाय्याने शर्मिष्ठेची सुटका करून तिला सुखरूप राज्यातून दूर पोचवून येतो. तिकडे शर्मिष्ठेला यती भेटतो. तो त्यांची राहण्याची, खाण्याची योग्य व्यवस्था लावून देतो.
मध्यंतरी मग अठरा वर्षांचा काळ निघून जातो. या अठरा वर्षात महाराज ययाती निव्वळ उपभोगात मग्न आहेत. राज्यात दस्युची बंडाळी होते तर तेव्हा त्यांचा मोठा मुलगा यदु ती मोडायला जातो मात्र त्याला दस्यु बंदी बनवतात. इकडे शर्मिष्ठेचा पुरु पण मोठा झाला आहे. तो पण पराक्रमी आहे. त्याला आपण कोण आहोत याची जाणीव आहे. आपल्या वडिलांच्या राज्यावर संकट असतांना, आपला भाऊ बंदी असतांना आपण गप्प बसून न राहता शत्रूंना भिडणे हेच आपलं कर्तव्य आहे हे तो पुरते जाणतो.
पुरु दस्युच्या राज्यातून यदु ला सोडवूनआणतो. सोबतच बंडाळी पूर्ण नमवून येतो. हस्तिनापुरात यदु आणि पुरु येत असतांनाच इकडे शुक्राचार्यांची तपश्चर्या पूर्ण झाल्याने तेसुद्धा आपल्या मुलीचा संसार पाहायला येतात. मात्र ययाती त्यांना पूर्ण आसक्तीत डुंबलेला आढळतो तेव्हा ते त्याला अकालवृध्दत्वाचा शाप देतात.
लगेच ययाती जक्ख म्हातारा होतो. तेव्हा तो शुक्राचार्याना विनवणी करतो. त्यांची क्षमा याचना करतो. त्यावेळी शुक्राचार्य त्याला उ:शाप देतात. तो हे म्हातारपण त्याच्या मुलाच्या यौवनासोबत बदलून घेऊ शकेल. मात्र जर मुलाचे यौवन पुन्हा परत करायचे झले तर त्यावेळी ययातीचा मृत्यू होईल.
ययाती अगोदर यदुकडे यौवनाची मागणी करतो. पण यदु तयार होत नाही. त्याचवेळी सोबत असलेला पुरु तो या गोष्टीसाठी तयार असल्याचे सांगतो. ययातीला ठाऊक नसते कि हा आपलाच मुलगा आहे. तर पुरु तेही सांगतो कि तो शर्मिष्ठेचा मुलगा आहे. मात्र ययातीला त्या क्षणी फक्त सुख उपभोगाचे असते. त्याला शर्मिष्ठा कळत नाही न आपल्या मुलाचे काय होईल ते कळत. तो पुरु सोबत त्यांची अवस्था बदलतो.
मात्र काही काळाने तेथे शर्मिष्ठा येऊन पोचते. पुरुला जक्ख म्हातारा पाहून ती फार दुःखी होते. तिला तसे पाहून ययातीचे मन द्रवते. त्याला पश्चाताप होतो. तो पुरुचे यौवन परत करण्याचा मंत्र म्हणत असतानाच त्याला घेरी येते आणि बेशुद्ध होतो.
नंतर जेव्हा त्याला जाग येते तेव्हा तो त्याच्या मूळरूपात असतो. पुरुही त्याच्या योग्य वयात असतो. त्याच्या समोर कच उभा राहतो. शुक्राचार्यांच्या शापापासून कचाने दोन्ही पिता पुत्रांना मुक्त केलेले असते. नंतर ययाती पुरु कडे राज्य सोपऊन उपभोगीवृत्तीचा त्याग करून आपल्या दोन्ही पत्नीसमवेत वानप्रस्थ आश्रमात प्रवेश करतो.
ययाती कादंबरी मध्ये प्रत्येक पात्राचा स्वतःचा असा वेगळा एक स्वभाव वैशिष्ट्यांचा संच आहे. एकदा का जर है पात्रांचे मूळ स्वभाव आपण योग्य रित्या जाणून घेऊ शकलो तर ययाती कादंबरी आपल्याला सहजगत्या कळेल. येथे आपण प्रमुख अश्या काही पात्रांच्या स्वभावाबद्दल जाणून घेउ.
ययातीची आई, नहुष महाराजांची पत्नी, महाराणी आणि एक स्त्री या सगळ्या नात्यांना योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न करतांना कुठलाही त्याग करायला तयारी असणारी ही स्त्री आहे. एका पत्नीला हवा असणारा मानाचा दर्जा न देणारा, इंद्राणीच्या नादी लागलेला पती सांभाळणं, महाराणीच्या पदालाही सांभाळणं आणि आई म्हणून असणारी जबाबदारी सांभाळणं हि खर तर तिच्यासाठी तारेवरची कसरत आहे.
मोठ्या मुलाच्या आठवणीने व्याकुळ होणारी जशी ती मृदू हृदयाची आहे तशीच राज्याची, घराण्याची अब्रू राखण्यासाठी ती अलकाचा जीव घ्यायलाही मागे-पुढे न पाहणारी कठोर हृदयाची आहे. नहुष महाराज जिवंत असे पर्यंत दबून राहणारी ती ययाती गादीवर बसल्यावर त्याच्यावर तिचा अधिकार सांगायला कमी करीत नाही. आजच्या घर-घरातील आईचे ती प्रतिनिधित्व करते.
वर वर पाहता ययाती आपल्याला एक भान नसलेला सुखासाठी वेडा झालेला व्यक्ती वाटतो. पण वि.स.खांडेकरांचा ययाती अगदी मुळापासून तसा आहे का? नाही. तो देखणा आहे. युवराज आहे. पण तरीही जर तो मुळात लंपट असता तर त्याच्यामागे भरपूर प्रकरने जुडली असती. पण तसे काही ययाती कादंबरी आपल्याला सांगत नाही.
अलकाला ‘मला तुझेच रूप बघायचे आहे ‘ हे सांगतांना कचरणारा, एका दृष्टीने ती त्याची दुधबहीन लागते याचा विचार करणारा ययाती एका ठिकाणी वाहवत जातो खरा:पण तीच अलका जेव्हा त्याला पुन्हा भेटते आणि त्याला माहित असते कि हि विवाहित आहे त्यावेळी तिला बहीण मानून अतिशय मानाने, मायेने,वासनेचा लवलेशही न ठेवता तिला सोबत ठेवणारा ययाती हा नक्कीच निव्वळ उपभोगासाठी हपापलेला नसावा.
मुकुलिकेला नकार देऊन पुन्हा राज्यात न दिसण्यासाठी सांगणारा ययाती एका हिशेबाने संयमाने भरलेला वाटतो. बरे यौवन काळात एक पराक्रमी युवराज असूनही अलका आणि मुकुलिका यांना सोडलं तर त्याच्या वर दुसरा कोणताही डाग नाही. मात्र हाच ययाती जेव्हा मंदार आणि मुकुलिकेच्या फासात अडकतो, जेव्हा त्याला दारूचं व्यसन जडत त्यावेळी मात्र तो अनिर्बंध वागू लागतो.
या कथेतला ययाती हा त्या संपूर्ण वर्गाचं प्रतिनिधित्व करतो जो फक्त आणि फक्त उपभोगाच्या मागे लागला आहे.
ययाती कादंबरी आपली भेट दोन प्रकारच्या यती सोबत करून देते.पहिला प्रकार आहे संन्यास घेऊन अगदी स्त्रीद्वेष्टा झालेला यती. आणि दुसरा प्रकार म्हणजे नंतरच्या काळात शर्मिष्ठेला मदत करणारा संन्यासाचा खरा अर्थ सापडलेला यती.
पहिल्या यतीने समाजापासून, लोभापासून बाह्य बंधने तर तोडलेली असतात मात्र त्याचा त्याच्या मनावर ताबा नसतो आणि म्हणूनच तो वैतागून सगळा स्त्री वर्ग कसा चुकीचा आहे आणि त्याला कसा नष्ट करावा याच भानगडीत व्यस्त होतो. गोष्ट इथपर्यंत जाऊन पोचते कि त्याच्या भीतीने आजूबाजूच्या गावातील स्त्रिया घरांचे दारे लावून बसतात की याला दिसलो तर हा आपलं एखाद्या जनावरात रूपांतर करेल.
पित्याप्रमाणे शीघ्रकोपी. पित्याच्या विद्येचा आणि स्वतःच्या सौन्दर्याचा अपार गर्व असणारी. स्वतःची गोष्ट खरी करण्याचा नेहमी अट्टाहास करणारी स्त्री म्हणून जरी देवयानी आपल्या समोर असली तरी ती आणखी एका वैशिष्ट्याने युक्त आहे.
देवयानी प्रेमभंग झालेल्या वर्गाचे प्रतिनिधित्व करते. प्रेमात भंग झालेला माणूस कसा वागेल आणि संसारात काय चुका करतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे देवयानी होय. कच तीचे प्रेम स्वीकारत नाही म्हणून त्याच्या पेक्षा श्रेष्ठ नवरा मिळावा आणि आपण किती आनंदी आहोत हे कचाला दाखवता यावे म्हणून ययातिशी लग्न करणारी देवयानी आपल्या समाजातही पदोपदी पाहायला मिळते. कधी स्त्री रूपाने तर कधी पुरुषरूपानं.
ययाती आणि कच यांची सतत तुलना करणारी देवयानी ज्यावेळी मूल्यांच्या बाबत कचाला श्रेष्ठ पाहते. तेव्हा आपण हारल्याचा तिला येणारा अनुभव तिच्या गर्वाला आव्हान करतो. आणि त्यामुळे ती वैतागून स्वतःच्या संसाराचा खेळ खंडोबा करते.
याचा अर्थ देवयानी पूर्णतः चुकीची आहे असा नाही. मद्य न पिण्याची साधी मागणी ययाती पूर्ण करू शकत नाही आणि तेच पुढे त्यांच्यातील वादाच मुख्य कारण बनतं. मुळात स्वतः मर्यादेत राहून आपल्या पतीकडून काही अपेक्षा ठेवणं हा काही दोष होत नाही. उलट स्वतःत सुधार करून ययातीने तिची समज घालायची तर तो तिलाच पर्याय शोधू लागतो हा त्याचा गुन्हा म्हणावा लागेल. पण ययाती कादंबरी मात्र देवयानीला एक खलनायक म्हणूनच सिद्ध करायचा प्रयत्न करते.
साध्या अंशुकासाठी होणारं भांडण आणि त्या भांडणांमुळं संपूर्ण जीवन भर भोगावा लागणारा वनवास या साऱ्यांचा विचार केला तर शर्मिष्ठेचं जीवन खूपच कष्टप्रद आहे. राजमहालात राहणारी शर्मिष्ठा, अशोकवनात कुटीत राहणारी शर्मिष्ठा, तर लहान तान्ह बाळ घेऊन मंदिरांचा आडोसा घेत, लोकांच्या नजरा चुकवत दर दर फिरणारी शर्मिष्ठा. असं शर्मिष्ठेचं कुठलही रूप घेतलं तरी ती उत्तमच भरते.
ती मैत्रीण म्हणून साथ देण्याचाही प्रयत्न करते पण देवयानीचा स्वभाव त्या लायकीचा नसतो. ती एक प्रेयसी म्हणूनही उत्तम आहे. म्हणूनच तर ययातीला ती प्रिय आहे. तिच्या निरपेक्ष प्रेमाला मर्यादा नाहीत. प्रेमाखातर येणाऱ्या प्रत्येक संकटाचा सामना करत पुरुच योग्य पालन-पोषण करते.
ती पुरुला तो ययातिचा पुत्र असल्याचे सांगते पण देवयानी आपला काटा काढायच्या मार्गावर होती आणि ती तिथून पळून येऊन जीव वाचवत इकडे अरण्यात राहत असल्याचे सांगत नाही. त्याच्या मनात देवयानी विषयी कपात न पेरता ती त्याला त्या दोघींचा स्वभाव न पटल्याने ती दूर आल्याचे सांगते.
हि शर्मिष्ठा त्या वर्गाचे नेतृत्व करते जो प्रेमासाठी सगळ सहन करायला तयार आहे. जो कुठल्याही परिस्थितीत चांगुलपणा सोडत नाही. आणि कमालीचा सोशिक आहे.
ययाती कादंबरीचा नायक जरी ययाती वाटत असला तरी मुळात खरा नायक तर कच आहे. तो सर्व गुणांनी संपन्न आहे. त्याच्याकडे विद्या आहे, प्रेम आहे, करुणा आहे, धाडस आहे, ध्येय्याकरिता जीव द्यायलाही मागे न पाहणारी विजिगिषु वृत्ती आहे. मुळात कच या पात्राच्या माध्यमातून वि.स.खांडेकर यांनी आपल्यासमोर एक आदर्श व्यक्ती उभा केला आहे.
एक मित्र म्हणून. एक प्रियकर म्हणून. एक शिष्य म्हणून. एक मानव म्हणून. कुठल्याही साच्यात बसवला तरी कच परिपूर्णच आहे. हा आदर्शवादी वर्गाचं प्रतिनिधित्व करतो जो खरंच त्यांच्या आदर्शांवर चालतो. नुसतं बोलत बसत नाही तर हा करून दाखवणारा व्यक्ती आहे.
युद्ध कुठलाही असुदे ते वाईटच. असं समजणारा आणि ते रोखण्यासाठी प्रसंगी जीवाची बाजी लावणारा कचययाती कादंबरी वाचणाऱ्या कुणाच्याही मनात जागा पक्की करूनच जातो.
मित्रांनो ययाती कादंबरी वाचायची आहे या पोस्ट मध्ये आपण नुकतीच काही प्रमुख पात्रांची वैशिष्ट्ये पाहिलीत. ययाती कादंबरी मध्ये प्रत्येकच पात्र वैशिष्ट्याने पूर्ण आहे मात्र आपण येथे प्रमुख पात्रांबद्दलच बोलत आहोत. ययाती कादंबरी वाचायची आहे या पोस्ट मध्ये आता पुढे ययाती कादंबरी मधून आपण काय शिकावे याविषयी चर्चा करूया.
मानवी जीवन हे उपभोग आणि त्याग या दोघांच्याही समतोलावर आधारलेले आहे. उपभोगाचा हव्यास आपल्याला ययातीप्रमाणे पतनाकडे घेऊन जाईल.तर त्यागाचा अतिरेक आपल्याला यतीप्रमाणे वेडगळ बनवून सोडेल. म्हणून आपण मध्यम मार्ग स्वीकारायला हवा.
आपल्या जीवनात सगळ्या भावनांना विशिष्ट महत्व आहे. त्यांना ते मिळायलाही हवं. मग ती भावना प्रेमाची असो कि द्वेषाची. मात्र त्यात कुठल्याही भावनेचा अतिरेक नको व्हायला.
हे सगळे विकार, वासना,भावना हे जीवनरूपी भोजन रुचकर बनवणाऱ्या मसाल्यांप्रमाणे आहे.जीवनात ते सगळेच हवेत. एकाचीही कमतरता जेवणात उणीव निर्माण करू शकते,आणि एखादाही जास्त झाला तर जेवणाची चवही बिघडू शकते. तेव्हा सगळं कस प्रमाणात असायला हवं.
मित्रांनो आजच्या ययाती कादंबरी वाचायची आहे या पोस्ट मध्ये आपण ययाती कादंबरीवर थोडी चर्चा केली. या पोस्टमध्ये आपण ययाती कादंबरीमधील विविध पात्रे, कथानक, पार्श्वभूमी इत्यादी गोष्टी पाहिल्यात. या कादंबरीमधील विविध पात्रांचे स्वभावही आपण थोडक्यात पाहिलेत.
तर मित्रांनो तुम्हाला आजची ययाती कादंबरी वाचायची आहे ही पोस्ट कशी वाटली? या पोस्ट च्या माध्यमातून मी व्यक्त केलेल्या मतांना तुम्ही सहमत आहात का? तुमचे उत्तर नक्की कळवा. सोबतच ययाती कादंबरी वाचायची आहे या पोस्ट मध्ये जर काही सुधारणा तुमच्या लक्षात येत असतील तर त्याबद्दलही आम्हाला कळवा. आम्ही लवकरात लवकर तुमच्या सूचनांचा अंमल होईल याची दक्षता घेऊ.
आणि हो पोस्ट आवडल्यास शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद.
The post ययाती कादंबरी वाचायची आहे ?। Yayati Novel Pdf download appeared first on मराठी Motivation.
]]>The post बहिणाबाई चौधरी यांच्या कविता (2022) appeared first on मराठी Motivation.
]]>
मित्रांनो, आज आपण बहिणाबाई चौधरी यांच्या कविता या पोस्ट च्या माध्यमातून कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या काही प्रसिद्ध कवितांचा आस्वाद घेणार आहोत. मंडळी, बहिणाबाई चौधरी यांच्या कविता बघण्याअगोदर आपण त्यांच्याविषयी थोडे जाणून घेऊयात.
बहिणाबाई चौधरी यांचा जन्म २४ ऑगस्ट १८८० रोजी खानदेशातील असोदे या गावामध्ये झाला. असोदे हे गाव जळगाव पासून ५-६ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. त्यांच्या वडिलांचे नाव उखाजी महाजन होते.आणि आईचे नाव भिमाई होते.
बहिणाबाईंना एकूण सहा भावंडे होती. त्यात तीन बहिणी-तुळसा , अहिल्या आणि सीता. आणि तीन भाऊ – घना, घमा आणि गणा.
१८८० काळ म्हणजेच भारतातील ब्रिटिश राजवटीचा कालखंड होय. या काळात भारतीय सुधारकांची दुहेरी लढाई नुकतीच सुरु झालेली. एकीकडे सामाजिक सुधारणेसाठी समाजातील अनिष्ट रूढींविरुद्ध लढा सुरु होता. तर दुसरीकडे भारताच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांशी टकराव उडत होते.
अश्या या संघर्षाच्या काळात बहिणाबाईंचा जन्म झळ. तोही एका शेतकरी कुटुंबामध्ये. तत्कालीन रीतीप्रमाणे बहिणाबाईंचे वडील उखाजी महाजन त्यांनी आपल्या मुलीचा -बहिणाबाईंचा विवाह जळगावच्या नथुजी चौधरी यांच्याशी करून दिला. विवाहाच्या वेळी बहिणाबाईंचे वय फक्त १३ वर्षे होते.
बहिणाबाईंचा संसार हा आधी एकत्र कुटुंब पद्धतीतीलच होता. मात्र काही घरगुती कलहामुळे त्यांचे कुटुंब विभक्त झाले. नव्या ठिकाणी नव्याने संसार उभा करण्याला यश येत असतांनाच नथुजी यांचे १९१० च्या काळात निधन झाले. त्यावेळी बहिणाबाईंच्या पदरी तीन लेकरे आणि थोडी जमीन या व्यतिरिक्त दुसरे काहीच नव्हते.
कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठी बहिणाबाईंनी शेतीचा आसरा घेतला. विविध परंपरांनी बुरसटलेल्या तत्कालीन समाजात एक विधवा म्ह्णून जगतांना बहिणाबाईंना कुठल्या कुठल्या समस्यांचा सामना करावा लागला असेल याचा तर आपण विचार न केलेलाच बरा.
शेतातील आणि दैनंदिनची कामे करत असतांना मन रमवण्यासाठी प्रत्येकच काळात गीतांनी स्त्रियांना मोठा आधार दिला आहे. जात्यावरच्या ओव्या या त्याच प्रकारातील.बहीणाबाईंनीसुद्धा या गीतांचाच आधार घेतला. त्यांच्या बहुतेक रचना ह्या अश्याच कुठले न कुठले काम करतांना त्यांच्या मुखावर अवतीर्ण झालेल्या आहेत.
स्त्री जीवनाशी हिंदोळे घेणारे वेगवेगळे विषय हेच बहिणाबाई चौधरी यांच्या कविता यामध्ये पुन्हा पुन्हा आढळतांना आपल्याला दिसतील. सासर, माहेर, संसार, शेती, व्यक्तिचित्रे अश्याच विषयांना बहिणाबाईंनी हात घातलेला आहे.
कुठे कुठे त्यांची कविता उपरोधाने भारलेली जाणवते तर कुठे उपदेशाच्या कडू काढ्याने भारलेली. मुळात बहिणाबाई पूर्णतः निरक्षर.पण त्यांच्या कवितांची उंची हि मोठं मोठ्या पंडितांना चाट पाडणारी आहे. त्यांच्या रचना ह्या त्यांचे पुत्र सोपानदेव आणि पुतण्या यांनी लिहून ठेवल्यामुळे आज आपल्यापर्यंत पोचत आहेत.
खरे पाहता बहिणाबाई चौधरी यांच्या कविता आज आपल्याला वाचायला मिळाल्या नसत्या जर त्यांचे पुत्र आणि पुतण्या यांनी त्या लिहून ठेवल्या नसत्या. त्यांच्या कवितांच्या प्रकाशनाची कथाही फार मजेशीर आहे.
महाराष्ट्राला एक कवी म्हणून माहिती असलेले सोपानदेव चौधरी हे बहिणाबाई यांचे पुत्र. बहिणाबाईंनी ३ डिसेंबर १९५१ ला जगाचा निरोप घेतला. त्यानंतर घराची आवरासावर करत असतांना सोपानदेव यांना एक वही सापडली. याच वहीमध्ये लहानपणी त्यांनी त्यांच्या आईने गुणगुणलेली गाणी लिहून ठेवलेली होती.
ती वही मिळाल्यानंतर आईची आठवण म्हणून त्या कविता प्रकाशित करण्याच्या हेतूने सोपानदेव यांनीं आचार्य अत्रे यांची भेट घेतली. या कविता प्रकाशित करू कि करू नये असे विचारतांनाच त्यातील एक दोन कविता त्यांनी आचार्य अत्रेंना वाचायला दिल्या.
कविता वाचून झाल्यावर अत्रेंच्या तोंडातून आपसूकच शब्द बाहेर पडले “हे तर शुद्ध बावनकशी सोने आहे.हे महाराष्ट्रापासून लपवण्याचा आपल्याला काही हक्क नाही.” शेवटी १९५२ ला सुचित्रा प्रकाशनाने बहिणाबाई चौधरी यांच्या कविता बहिणाबाईंची गाणी या नावाने प्रकाशित केल्या.
सिंधुताई सपकाळ यांचं एक विधान आहे. मनाला फार चटका लावून जाणारं -” हा महाराष्ट्र आहे बाळांनो. येथे मोठं होण्यासाठी मरावं लागतं.” नेमकं तंतोतंत बहीणबाई चादरी यांच्या प्रकरणाला लागू पडतं हे विधान.जीवनभर दारिद्राशी दोन हात करीत झुंजणाऱ्या बहिणाबाईंच्या कविता आज मराठी पाठ्यक्रमाचा भाग आहेत.
मराठी चित्रपटांत गाणी प्रसिद्ध होण्यापासून ते आज महाराष्ट्रात एका विद्यापीठाला त्यांचे नाव दिले गेले.यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने तर बहिणाबाईंची गाणी हा त्यांच्या पाह्यक्रमाचा भागच बनवला आहे. माधुरी शानभाग यांनी ‘फ्रॅग्रन्स ऑफ द अर्थ’ या नावाने बहिणाबाई चौधरी यांच्या कविता इंग्रजीमध्ये भाषांतरित केल्या आहेत. हे भाषांतरही बरेच प्रसिद्ध आहे.
अरे संसार संसार
जसा तावा चुल्यावर
आधी हाताले चटके
तवा मियते भाकर
करा संसार संसार
खोटा कधीं म्हणूं नहीं
राउळाच्या कयसाले
लोटा कधीं म्हणूं नहीं
अरे संसार संसार
नही रडनं कुढनं
येडया, गयांतला हार
म्हणूं नको रे लोढणं
अरे संसार संसार
खीरा येलावरचा तोड
एक तोंडा मधी कडू
बाकी अवघा लागे गोड
अरे संसार संसार
म्हणू नको रे भीलावा
त्याले गोड भीमफूल
मढी गोंडंब्याचा ठेवा
देशा संसार संसार
शेंग वरतण कांटे
अरे, वरतून कांटे
मधीं चिक्ने सागरगोटे
ऐका संसार संसार
दोन्ही जीवाचा इचार
देतो दुःखाले होकार
अन सुखाले नकार
देखा संसार संसार
दोन्ही जीवाचा सुधार
कधी नगद उधार
सुखादुखाचा बेपार
अरे संसार संसार
असा मोठा जादूगार
माझ्या जीवाचा मंतर
त्याच्या वरती मदार
असा संसार संसार
आधी देवाचा ईसार
माझ्या दैवाचा जोजार
मंग जीवाचा आधार !
मन वढाय वढाय
उभ्या पिकांतलं ढोर
किती हांकला हांकला
फिरी येतं पिकांवर
मन मोकाट मोकाट
त्याले ठायीं ठायीं वाटा
जश्या वाऱ्यानं चालल्या
पान्या वरल्यारे लाटा
मन लहरी लहरी
त्याले हातीं धरे कोण?
उंडारलं उंडारलं
जसं वारा वाहादन
मन जह्यरी जह्यरी
याचं न्यारं ते तंतर
आरे इचू, साप बरा
त्याले उतारे मंतर !
मन पांखरूं पांखरूं
त्याची काय सांगूं मात
आता होतं भुईवर
गेलं गेलं आभायान्त
मन चप्पय चप्पय
त्याले नहीं जरा धीर
तठे व्हयीसनी ईज
आलं आलं धर्तीवर
मन एवढं एवढं
जसा खाकसचा दाना
मन केवढं केवढं
त्यांत आभाया मायेना
देवा, कास देलं मन
आसं नहीं दुनियांत !
आसा कसा रे यवगी
काय तुझी करामत !
देवा, आसं कसं रे मन
आसं कसं रे घडलं?
कुठे जागेपणी तुले
आसं सपन पडलं !
लपे कारमाची रेखा
माझ्या कुकवाच्या खाली
पुशीसनी गेलं कुकू
रेखा उघडी पडली
देवा तुझ्याबी घरचा
झरा धनाचा आटला
घन रेखाच्या चऱ्यानं
तयहात रे फाटला
बापा, नको मारूं थापा
असो खऱ्या असो खोट्या
नहीं नशीब नशीब
तयहाताच्या रेघोट्या
अरे, नशीब नशीब
लागे चक्कर पायाले
नशिबाचे नऊ गिऱ्हे
ते बी फिरत राह्यले
राहो दोन लाल सुखी
हेच देवाले मांगन
त्यांत आलं रे नशीब
काय सांगे पंचांगन
नको नको रे जोतिषा
नको हात माझा पाहू
माझं दैव मले कये
माझ्या दारी नको येऊं !
बिना कपाशीनं उले
त्याले बोन्ड म्हणूं नहीं
हरी नामाईना बोले
त्याले तोंड म्हणूं नहीं
नही वाऱ्यानं हाललं
त्याले पान म्हणूं नहीं
नाही ऐके हरिनाम
त्याले कान म्हणूं नहीं
पाटा येहेरींवाचून
त्याले मया म्हणूं नहीं
नहीं देवाचं दर्सन
त्याले डोया म्हणूं नहीं
निजवते भुक्या पोटीं
तिले रात म्हणूं नहीं
आंखडला दानासाठी
त्याले हात म्हणूं नहीं
ज्याच्या मधीं नहीं पानी
त्याले हाय म्हणूं नहीं
धांवा ऐकून अडला
त्याले पाय म्हणूं नहीं
येहेरींतून ये रीती
तिले मोट म्हणूं नहीं
केली सोताची भरती
त्याले पोट म्हणूं नहीं
नहीं वळखला कान्हा
तिले गाय म्हणूं नहीं
जीले नहीं फुटे पान्हा
तिले माय म्हणूं नहीं
अरे, वाटच्या दोरीले
कधी साप म्हणूं नहीं
इके पोटच्या पोरीले
त्याले बाप म्हणूं नहीं
दुधावर आली बुरी
तिले साय म्हणूं नहीं
जिची माया गेली सरी
तिले माय म्हणूं नहीं
इमानाले इसरला
त्याले नेक म्हणूं नहीं
जल्मदात्याले भोवला
त्याले लेक म्हणूं नहीं
ज्याच्यामधीं नहीं भाव
त्याले भक्ती म्हणूं नहीं
त्याच्यामधी नहीं चेव
त्याले शक्ती म्हणूं नहीं
मित्रांनो बहिणाबाई चौधरी यांच्या कविता या पोस्टच्या माध्यमातून आपण बहिणाबाईंच्या काही उत्कृष्ट रचना बघत आहोत.या पोस्ट मध्ये आपण पुढे पाहुयात माणसाला निस्वार्थीपणे जगण्याचा संदेश देणारी कविता. या कवितेत बहिणाबाईंनी दिलेले दाखले अतिशय साधे आहेत मात्र त्यांचा इतका डोळस वापर आजपर्यंत कोणी केला असेल असं वाटत नाही.
नको लागूं जीवा, सदा मतलबापाठी
हिरिताचं देणं घेणं नही पोटासाठी
उभे शेतामधीं पिकं
ऊन वारा खात खात
तरसती ‘कव्हां जाऊं
देवा, भुकेल्या पोटांत’
पेटवा रे चुल्हा आता, मांडा थाटवाटी
नको लागूं जीवा, सदा मतलबापाठी
पाहिसनी रे लोकाचे
यवहार खोटे नाटे
तव्हां बोरी बाभईच्या
आले आंगावर कांटे
राखोईच्यासाठी झाल्या शेताले कुपाटी
नको लागूं जीवा, आतां मतलबापाठी
किती भरला कणगा
भरल्यानं होतो रिता
हिरिताच देणं घेणं
नाही डाडोराकरिता
गेली देही निंघीसनी नांव रे शेवटी
नको लागूं जीवा, सदा मतलबापाठी
मित्रांनो बहिणाबाई चौधरी यांच्या कविता या पोस्ट मध्ये आता आपण पाहणार आहोत बहिणाबाई चौधरी यांची ‘देव अजब गारोडी’ हि कविता. य कवितेत बहिणाबाई यांनी पिकाची संपूर्ण प्रक्रिया कशी असते ते मांडलेले आहे. त्यांच्या शेतातील कापणी, मळणी या क्रियांविषयीही वेगळ्या कविता आहेतच. मात्र आपण येथे त्यांच्या ‘देव अजब गारोडी’ हि कविता बघणार आहोत.
धरत्रीच्या कुशीमधीं
बियबियानं निजलीं
वऱ्हे पसरली माटी
जशी शाल पांघरली
बीय टरारे भुईत
सर्वे कोंब आले वऱ्हे
गह्यरलं शेत जसं
अंगावरती शहरे
ऊन वाऱ्याशी खेयतां
एका एका कोंबांतून
पर्गटले दोन पानं
जसे हात जोडीसन
टाया वजावती पानं
दंग देवाच्या भजनीं
जसे करती कारोन्या
होऊ दे रे आबादानी
दिसामासा व्हये वाढ
रोप झाली आतां मोठी
आला पिकले बहार
झाली शेतामधीं दाटी
कसे वाऱ्यानं डोलती
दाणे आले गाडी गाडी
दैव गेलं रे उघडी
देव अजब गारोडी !
वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी!
नशिबीं दगड गोटे
काट्याकुट्याचा धनी
पायाले लागे ठेचां
आलं डोयाले पानी
वरून तपे ऊन
अंग झालं रे लाही
चालला आढवानी
फोड आले रे पायीं
जानच पडीन रे
तुले लोकांच्या साठीं
वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी
दिवस ढयला रे
पाय उचल झट
असो नसो रे तठी
तुझ्या लाभाची गोट
उतार चढनीच्या
दोन्ही सुखदुःखांत
रमव तुझा जीव
धीर धर मनांत
उघडूं नको आता
तुझ्या झांकल्या मुठीं
वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी
‘माझेच भाऊबंद
धायीसनी येतीन !’
नको धरूं रे आशा
धर एवढं ध्यान
तुझ्या पायाने जाणं
तुझा तूलेच जीव
लावनी पार आता
तुझी तूलेच नाव
मतलबाचे धनी
सर्वी माया रे खोटी
वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी!
वाऱ्याचं वाहादन
आलं आलं रे मोठं
त्यांच्यात झुकिसनी
चुकुं नको रे वाट
दोन्ही बाजूनं दऱ्या
धर झुडूप हाती
सोडू नको रे धीर
येवो संकट किती
येऊदे परिचिती
काय तुझ्या ललाटीं
वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी!
मित्रांनो बहिणाबाई चौधरी यांच्या कविता या पोस्टमधील ‘वाटच्या वाटसरा’ हि बहिणाबाईंची माणसाला उपदेश करणारी कविता आहे. या कवितेत बहिणाबाई सांगतात कि जीवनाची हि जी वाट आहे ती फार अवघड आहे. तरीसुद्धा इतरांसाठी आपल्याला चालतच राहावे लागणार आहे.
नशिबाने जरी तुझ्या पुढ्यात दगड धोंडेच टाकले असतील. जरी संसारातील दुःखाच्या उन्हाने तुझे अंग लाही लाही झाले असले तरीही. स्वतःला एकटंच जीवनयुद्ध लढावे लागणार हे सतत ध्यानात ठेऊन तुला सतत योग्य मार्गाने पुढेच आणि पुढेच मार्गक्रमण करीत राहायचे आहे.
मानूस मानूस
मतलबी रे मानसा
तुले फार हाव
तुझी हाकाकेल आशा
मानसा मानसा
तुझी नियत बेकार
तुझ्याहून बरें
गोठ्यांतलं जनावर
भरला डाडोर
भूलीसनी जातो सूद
खाईसनी चारा
गायम्हैस देते दूध
मतलबासाठी
मान मानूस डोलये
इमानाच्यासाठी
कुत्रं शेंपूट हालये
मानसा मानसा
कधी व्हशीन माणूस
लोभासाठी झाला
मानसाचा रे कानूस
अरे खोप्यामंधी खोपा
सुगडीणीचा चांगला
पाहा पिलासाठी तिनं
झोका झाडाले टांगला
पिल्लं निजती खोप्यात
जसा झुलता बंगला
तिचा पिल्लांमधीं जीव
जीव झाडाला टांगला
खोपा इनला इनला
जसा गिलट्याचा कोसा
पाखराची कारागिरी
जरा बघ रे मानसा
तिची उलीशीच चोच
तेच दात तेच ओठ
तुले दिले रे देवानं
दोन हात दहा बोटं
काया काया शेतामंधी
घाम जिरव जिरव
तव्हां उगलं उगलं
कायामधून हिरवं !
येता पिकाले बहार
शेताशेतांत हिर्वय
कसं पिकलं रे सोनं
हिर्व्यामधून पिवयं
अशी धरत्रीची माया
अरे, तिले नाही सीमा
दुनियाचे सर्वे पोटं
तिच्यामंधी झाले जमा
शेतामंधी भाऊराया
आला पीक गोंजारत
हात जोडीसन केला
धरत्रीले दंडवत
शेतामंधी भाऊराया
खाले वाकला वाकला
त्यानं आपल्या कपायी
टिया माटीचा लावला
अशी भाग्यवंत माय
भाऊरायाची जमीन
वाडवडिलांचं देवा
राखी ठेव रे वतन !
माझी मुक्ताई मुक्ताई
दहा वर्साच लेकरू
चान्गदेव योगियान
तिले मानला रे गुरू
देख ग्यानियाच्या राजा,
आदिमाया पान्हावली
सर्व्याआधी रे मुक्ताई
पान्हा पियीसनी गेली..
अरे सन्याशाची पोर
कोन बोलती हिनई
टाकीदेयेल पोरान्च
कधी तोन्ड पाहू नही..
अरे अस माझ तोन्ड
कस दावू मी लोकाले?
ताटी लावी ग्यानदेव
घरामधी रे दडले !
उबगले ग्यानदेव
घडे असन्गाशी सन्ग,
कयवयली मुक्ताई
बोले ताटीचे अभन्ग..
घेता हिरीदाचा ठाव
ऐका ताटीचे अभन्ग
एका एका अभन्गात
उभा केला पान्डुरन्ग..
गह्यरले ग्यानदेव
डोये गेले भरीसन
असा भाग्यवन्त भाऊ,
त्याची मुक्ताई बहीन…
देवा, घरोट घरोट
तुझ्या मनांतली गोट
सर्व्या दुनियेचं पोट
घरीं कर्माचा मरोट
अरे, घरोट घरोट
वानी बाम्हनाचं जातं,
कसा घरघर वाजे
त्याले म्हनवा घरोट
अरे, जोडतां तोडलं
त्याले नातं म्हनू नहीं
ज्याच्यांतून येतं पीठ
त्याले जातं म्हनूं नहीं
कसा घरोट घरोट
माझा वाजे घरघर
घरघरींतून माले
माले ऐकूं येतो सूर
त्यांत आहे घरघर येड्या,
आपल्या घराची
अरे, आहे घरघर
त्यांत भर्ल्या आभायाची
आतां घरोटा घरोटा
दयन मांडलं नीट
अरे, घंट्या भरामधीं
कर त्याचं आतां पीठ
चाल घरोटा घरोटा
तुझी चाले घरघर
तुझ्या घरघरींतून
पीठ गये भरभर
जशी तुझी रे घरोटा
पाऊ फिरे गरगर
तसं दुधावानी पीठ
पडतं रे भूईवर
अरे, घरोटा घरोटा
तुझ्या माकनीची आस
माझ्या एका हातीं खुटा
दुज्या हातीं देते घांस
अरे, घरोटा घरोटा
घांस माझा जवारीचा
तुले सनासुदी गहूं
कधीं देते बाजरीचा
माझा घरोट घरोट
दोन दाढा दोन व्होट
दाने खाये मूठ मूठ
त्याच्यातून गये पीठ
अरे, घरोटा घरोटा
माझे दुखतां रे हात
तसं संसाराचं गानं
माझं बसते मी गात
अरे, घरोटा घरोटा
तुझ्यातून पडे पीठी
तसं तसं माझं गानं
पोटातून येतं व्होटीं
दाने दयतां दयतां
जशी घामानं मी भिजे
तुझी घरोटा घरोटा
तशी पाऊ तुझी झिजे
झिजिसनी झिजीसनी
झाला संगमरवरी
बापा, तुले टाकलाये
टकारीन आली दारीं !
बापाजीच्या हायलींत
येती शेट शेतकरी
दारी खेटराची रास
घरीं भरली कचेरी
गांवामधी दबदबा
बाप महाजन माझा
त्याचा कांटेतोल न्याव
जसा गांवमधीं राजा
माय भीमाई माऊली
जशी आंब्याची साऊली
आम्हाईले केलं गार
सोता उन्हांत तावली
तुझे भाऊ देवा घरीं
नहीं मायबाप तुले
तुले कशाचं माहेर
लागे कुलूप दाराले
भाऊ ‘घमा’ गाये घाम
‘गना’ भगत गनांत
‘धना’ माझा लिखनार
गेला शिक्याले धुयांत
आम्ही बहीनी ‘आह्यला’
‘सीता, तुयसा, बहीना’
देल्या आशीलाचे घरीं
सगेसाई मोतीदाना
लागे पायाले चटके
रस्ता तापीसनी लाल
माझ्या माहेरची वाट
माले वाटे मखमल
जीव व्हती लाही लाही
चैत्र वैसागाचं ऊन
पाय पडतां ‘लौकींत’
शीन जातो निंघीसन
तापीवानी नही थडी
जरी वाहे थोडी थोडी
पानी ‘लौकी’चं नित्तय
त्याले अम्रीताची गोडी
माहेरून ये निरोप
सांगे कानामंधि वारा
माझ्या माहेराच्या खेपा
‘लौकी’ नदीले विचारा !
अरे रडता रडता
डोळे भरले भरले
आसू सरले सरले
आता हुंदके उरले
आसू सरले सरले
माझा मलेच इसावा
असा आसवा बिगर
रडू नको माझ्या जीवा
सांग सांग धरती माता
अशी कशी जादू झाली
झाड़ गेलं निंधीसनी
माघं सावली उराली
देव गेले देवा घरी
आठी ठेयीसनी ठेवा
डोळ्या पुढे दोन लाल
रडू नको माझ्या जीवा
रडू नको माझ्या जीवा
तुले रड्याचीरे सवं
आसू हसावं रे जरा
त्यात संसाराची चव
कुकू पुसलं पुसलं
आता उरलं गोंधन
तेच देइल देइल
नशिबले आवतन
जरी फुटल्या बांगड्या
मनगटी करतूत
तुटे मंगयसुतर
उरे गयाची शपत
नका नका आया बाया
नका करू माझी कीव
झालं माझं समाधान
आता माझा मले जिव!
उगवले नारायण, उगवले गगनांत
प्रभा सोनीयाची फांके उन्हें आली अंगणात ll १ll
उन्हें आली अंगणात, उन्हें आली ओटीवर
सोनपावलांनी देवा, उजळले माझे घर ll २ll
उजळले माझे घर, झळाळले ग, कळस
डुलुं लागे आनंदाने वृंदावनींची तुळस ll ३ll
वृंदावनींची तुळस, दिसे हिरवी अंजिरी
वारियाच्या झुळुकिने हंसे मंजिरी मंजिरी ll ४ll
हंसे मंजिरी मंजिरी, प्राजक्ताच्या पावलाशीं
सडा फुलांचा घालतो, मोती-पोवळ्याच्या राशी ll ५ll
मोती-पोवळ्याच्या राशी, वैभवाला नाही अंत
सुख वेचितें संसारी, माउली मी भाग्यवंत ll ६ll
मित्रांनो आज आपण बहिणाबाई चौधरी यांच्या कविता या पोस्ट मध्ये बहिणाबाईंच्या काही प्रसिद्ध कवितांचा आस्वाद घेतलात. जीवनाची दशा कशीही असली तरी त्याला एक सकारात्मक दिशा देण्याचं सामर्थ्य बहिणाबाईंच्या कवितेत आहे. माझ्या या मताशी आपणही सहमत असाल अशी आशा बाळगतो.
मित्रांनो आजच्या बहिणाबाई चौधरी यांच्या कविता या पोस्ट मध्ये तुम्हाला कुठली कविता सर्वत जास्त आवडली? जर जवळच्या एखाद्या व्यक्तीला यांमधील एखादी कविता सुचवायची असेल तर तुम्ही कोणती कविता सुचवाल?
सोबतच तुम्हाला आणखी कोणाचे विचार जाणून घ्यायला आवडेल तेही सांगा.
मंडळी बहिणाबाई चौधरी यांच्या कविता या पोस्ट मध्ये काही त्रुटी आढळ्यास आम्हाला तात्काळ कंमेंट मध्ये कळवा. शिवाय जर काही सुधारणा सुचवायच्या असतील तर contact us मेनू वापरून आम्हाला मेलद्वारे कळवा. तुमचा मोलाचा सल्ला बहिणाबाई चौधरी यांच्या कविता या पोस्ट ला अधिकाधिक वाचनीय बनवण्यासाठी आवश्यक आहे.
धन्यवाद!
The post बहिणाबाई चौधरी यांच्या कविता (2022) appeared first on मराठी Motivation.
]]>