कलेक्टर! म्हणजे जिल्ह्याचा बॉस. ऐट,रुबाब आणि जबाबदारीच प्रतीकात्मक स्वरूप म्हणजे कलेक्टर (आय.ए. एस.) कलेक्टर (आय.ए. एस.) होणे हे आज स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांचं एक स्वप्न आहे. स्पर्धा परीक्षेत भाग घेणाऱ्या निदान निम्म्या विद्यार्थ्यांनी कलेक्टर होण्याचं स्वप्न पाहिलेलं असतं.
हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करत असतांना आपल्याला कलेक्टर (आय.ए. एस.) होण्यासाठी काय करावे? कुठली परीक्षा असते? किती अभ्यास करावा लागतो? खर्च किती येतो? सॅलरी किती मिळते ? असे असंख्य प्रश्न पडत असतात.
त्यापैकी काही प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न आम्ही कलेक्टर (आय.ए. एस.) होण्यासाठी काय करावे? या पोस्ट च्या माध्यमातून करीत आहोत. चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कि कलेक्टर (आय.ए. एस.) होण्यासाठी काय करावे?
कलेक्टर (आय.ए. एस.) होण्यासाठी काय करावे?
IAS ऑफिसर बनण्याचे दोन प्राथमिक मार्ग
एक-, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (केंद्रीय लोकसेवा आयोग )(UPSC) द्वारे घेण्यात येणाऱ्या सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन (नागरी सेवा परीक्षा) (CES) च्या माध्यमातून डायरेक्ट रिक्रुटमेंट (भरती) केली जाते. अशा प्रकारे भरती केलेल्या IAS ऑफिसर्सना डायरेक्ट रिक्रूट्स असे म्हणतात.
दोन- तुम्ही प्रथम स्टेट सिव्हिल सर्व्हिसेस ऑफिसर (राज्य नागरी सेवा अधिकारी) होऊ शकता. किमान 9 वर्षांचा अनुभव घेतल्यानंतर (खरेतर, 16-20 वर्षे सर्व्हिस) आणि अपवादात्मक उत्तम कामगिरी केल्यास तुम्हाला IAS ऑफिसर म्हणून पदोन्नती मिळू शकते.
मित्रांनो कलेक्टर (आय.ए. एस.) होण्यासाठी काय करावे? या प्रश्नच उत्तर मुळात बघायला गेलं तर एका वाक्यात देता येईल की कलेक्टर (आय.ए. एस.) होण्यासाठी काय करावे? तर UPSC करावी. पण मग पुढे हेच उत्तर अनेक प्रश्नांना जन्म देत. म्हणून आपण परीक्षेच्या माहिती पासूनच सुरुवात करणार आहोत.
तत्पूर्वी आपण कलेक्टर (आय.ए. एस.) होण्यासाठी काय करावे?या पोस्ट मध्ये कलेक्टर होण्यासाठी ढोबळ मार्ग कुठले ? IAS पदाबद्दलची इतर माहिती जाणून घेऊ.
कलेक्टर (IAS) पदाबद्दल माहिती
कलेक्टर होण्यासाठी मार्ग
कलेक्टर हे इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस मधील एक महत्वाचे पद आहे. अय. ए. एस. (भारतीय प्रशासकीय सेवा) ही भारतातील प्रमुख नागरी सेवांपैकी एक आहे. विशिष्ट मंत्रालय किंवा विभागाचे प्रभारी मंत्री यांच्याशी सल्लामसलत करून पॉलिसी तयार करणे आणि इम्प्लिमेंट करण्यासह प्रशासनाची आणि सरकारच्या दैनंदिन कामकाजाची जबाबदारी सांभाळणारे इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस (IAS) ऑफिसर्स हे गव्हर्नमेंट ऑफिशिअल्स / ब्युरोक्रॅट्स(नोकरशहा) असतात.
हा थेट रिक्रूटमेंटचा मार्ग आहे. कोणत्याही विषयांसह इयत्ता 10वी आणि कोणत्याही शाखेतून इयत्ता 11वी- 12वी पूर्ण केल्यानंतर कोणत्याही विषयासह पदवी घेऊ शकता. पदवी नंतर तुम्ही, UPSC द्वारे घेतल्या जाणाऱ्या इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन( भारतीय नागरी सेवा परीक्षे)साठी अर्ज करू शकता.
तुम्हाला पुढील निवड प्रक्रियेत उत्तीर्ण व्हावे लागेल. तुमची निवड झाल्यास तुम्हाला लाल बहादूर शास्त्री नॅशनल अॅकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन (LBSNAA) मध्ये अनिवार्य प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण करावा लागेल.या प्रशिक्षनाचा कालावधी २ वर्षांचा असतो.
2 वर्षांच्या ट्रेनिंगमध्ये असिस्टंट कलेक्टर (सहाय्यक जिल्हाधिकारी) म्हणून किंवा राज्याच्या जिल्ह्यात तत्सम प्रकारच्या 1 वर्षाच्या फील्ड ट्रेनिंगचा समावेश असतो. 2-वर्षाचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला, असिस्टंट सेक्रेटरी (सहाय्यक सचिव) म्हणून 3 महिन्यांसाठी सेंट्रल गव्हर्नमेंट सेक्रेटरिएट (केंद्र सरकार सचिवालय) ला संलग्न व्हावे लागेल.
हे पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला, सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट (उप-विभागीय दंडाधिकारी) (SDM) किंवा स्टेट सब -कलेक्टर (राज्य उपजिल्हाधिकारी) (तुमच्या पसंतीनुसार आणि राज्य संवर्गातील रिक्त जागांनुसार) म्हणून एखाद्या जिल्ह्यात नियुक्त केले जाईल.
पगार किती असेल?
पैसा सगळं काही नाही आहे. पण पैश्यां सगळं काही आहे. हेच सत्य आहे. समाधान, देशसेवेची संधी, लोकांची सेवा करण्याचा मार्ग यांसोबतच मन मरातब आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पैसे अस सगळंच मिळवून देणार हे पद आहे. कलेक्टर (आय.ए. एस.) होण्यासाठी काय करावे? जणूं घेत असतांना या पदावर कार्यरत असतांना आपण किती कमाऊ शकतो याचाही अंदाज घेणं गरजेचं आहे.
7th व्या केंद्रीय वेतन आयोगानुसार,
सब-डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट म्हणून (0-4 वर्ष सर्व्हिस) तुम्ही दरमहा साधारणतः रू. 56,100- 1,32,000 कमवू शकता.
किमान 5-8 वर्षांच्या सर्व्हिससह राज्य सरकारचे ॲडिशनल डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट /डेप्युटी सेक्रेटरी म्हणून तुम्ही दरमहा साधारणतः रू. 67,700 – 1,60,000 कमवू शकता..
किमान 9-12 वर्षांच्या सर्व्हिससह आणि डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट / राज्य सरकारचे जॉईंट सेक्रेटरी / केंद्र सरकारचे डेप्युटी सेक्रेटरी म्हणून तुम्ही दरमहा साधारणतः रू. 78,800 -1,91,500 कमवू शकता.
कमीतकमी 13-16 वर्षांच्या सर्व्हिससह आणि सिलेक्शन ग्रेड मध्ये डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट / राज्य शासनाचे स्पेशल सेक्रेटरी किंवा राज्य सरकारच्या ऑर्गनायझेशनचे डायरेक्टर / केंद्र सरकारच्या डिपार्टमेंटचे डायरेक्टर किंवा डायरोक्टरेट म्हणून तुम्ही दरमहा साधारणतः रू. 1,18,500 -2,14,100 कमवू शकता.
किमान 16-24 वर्षांच्या सर्व्हिससह आणि सिलेक्शन ग्रेडमधील डिव्हिजनल कमिशनर / राज्य सरकारच्या डिपार्टमेंटचे कमिशनर / केंद्र सरकारचे जॉईंट सेक्रेटरी म्हणून तुम्ही दरमहा साधारणतः रू. 1,44,200 – 2,18,200 कमवू शकता.
किमान 25-30 वर्षांच्या सर्व्हिससह आणि राज्य सरकारचे प्रिंसिपल सेक्रेटरी म्हणून / केंद्र सरकारचे ॲडिशनल सेक्रेटरी म्हणून तुम्ही दरमहा साधारणतः रु 1,82,200 – 2,24,100 कमवू शकता.
सर्वोच्च स्केल मध्ये, किमान 30-36 वर्षांच्या सर्व्हिससह आणि राज्य सरकारचे चीफ सेक्रेटरी म्हणून / केंद्र सरकारच्या मंत्रालयाचे सेक्रेटरी म्हणून तुम्ही दरमहा साधारणतः रु 2,25,000 कमवाल.
किमान 37 वर्षांच्या सर्व्हिससह आणि केंद्र सरकारचे कॅबिनेट सचिव म्हणून तुम्ही दरमहा साधारणतः रु 2,25,000 कमवाल.
भविष्य काय आहे?
कलेक्टर (आय.ए. एस.) होण्यासाठी काय करावे?हे जाणून घेत असतांना या पदाचे भविष्य काय आहे. एक IAS अधिकारी म्हणून तुम्ही जेव्हा नागरी सेवेमध्ये प्रवेश करता त्यानंतर आपल्या पुढे प्रगतीच्या कोणत्या संधी असतात हे माहिती असणे आवश्यक ठरते.
सुरुवातीला तुम्हाला एखादे राज्य किंवा अनेक राज्यांचा ग्रुप कॅडर म्हणून वितरित केला जाईल. तुम्ही सब-डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट (SDM) किंवा सब-कलेक्टर म्हणून काम सुरू कराल.त्यानंतर, फील्ड पोस्टिंगमध्ये (जिल्हा व विभागीय प्रशासनात) तुम्ही पुढीलप्रमाणे प्रगती करालः
ॲडिशनल डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट / ॲडिशनल डिस्ट्रिक्ट कलेक्टर-> डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट / डिस्ट्रिक्ट कलेक्टर -> डिव्हिजनल कमिशनर
(ज्युनिअर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ग्रेडमध्ये किमान 9-12 वर्षांचा अनुभव असेल किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट / डिस्ट्रिक्ट कलेक्टर या पदापर्यंत तुम्हाला नोकरीच्या अनुभवाच्या वर्षांच्या संख्येच्या आधारे प्रमोशन दिले जाईल; त्यानंतर तुम्ही सिलेक्शन ग्रेड मध्ये असाल; तुमचे प्रमोशन तुमचे काम, जागा इत्यादींवर अवलंबून असेल.)
SDM/ सब कलेक्टर म्हणून तुमच्या पोस्टिंग नंतर तुम्हाला राज्य सरकारकडे डेप्युटी सेक्रेटरी म्हणून प्रतिनियुक्त (पर्यायी नियुक्त) केले जाऊ शकते. तुम्हाला अशी प्रतिनियुक्ती मिळाल्यास तुम्ही पुढीलप्रमाणे प्रगती कराल:
डेप्युटी सेक्रेटरी → जॉईंट सेक्रेटरी — >स्पेशल सेक्रेटरी/ डायरेक्टर → कमिशनर → प्रिंसिपल सेक्रेटरी → चीफ सेक्रेटरी
(ज्युनिअर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ग्रेडमध्ये किमान 9-12 वर्षांचा अनुभव असेल किंवा जॉईंट सेक्रेटरी या पदापर्यंत तुम्हाला नोकरीच्या अनुभवाच्या वर्षांच्या संख्येच्या आधारे प्रमोशन दिले जाईल; त्यानंतर तुम्ही सिलेक्शन ग्रेड मध्ये असाल; तुमचे प्रमोशन तुमचा परफॉर्मन्स, व्हेकन्सीज इत्यादींवर अवलंबून असेल.)
SDM/ सब कलेक्टर म्हणून तुमच्या पोस्टिंग ॲडिशनल डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट(ADM) / असिस्टंट डिस्ट्रिक्ट कलेक्टर किंवा राज्य आर्कराचे डेप्युटी सेक्रेटरी म्हणून, तुम्हाला केंद्र सरकारकडे डेप्युटी सेक्रेटरी म्हणून प्रतिनियुक्त (पर्यायी नियुक्त) केले जाऊ शकते. तुम्हाला अशी प्रतिनियुक्ती मिळाल्यास तुम्ही पुढीलप्रमाणे प्रगती कराल:
डेप्युटी सेक्रेटरी → डायरेक्टर →जॉईंट सेक्रेटरी → ॲडिशनल सेक्रेटरी → सेक्रेटरी → कॅबिनेट सेक्रेटरी
(ज्युनिअर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ग्रेडमध्ये किमान 9-12 वर्षांचा अनुभव असेल किंवा जॉईंट सेक्रेटरी या पदापर्यंत तुम्हाला नोकरीच्या अनुभवाच्या वर्षांच्या संख्येच्या आधारे प्रमोशन दिले जाईल; त्यानंतर तुम्ही सिलेक्शन ग्रेड मध्ये असाल; तुमचे प्रमोशन तुमचा परफॉर्मन्स, व्हेकन्सीज इत्यादींवर अवलंबून असेल.)
शैक्षणिक पात्रता
सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा देण्यासाठी तुमच्याकडे सरकारमान्य विद्यापीठातील कुठल्याही क्षेत्रातील पदवी असणे आवश्यक आहे. पदवीनंतर किंवा सोबतच तुम्ही UPSCची तयारी सुरू करू शकता. या परीक्षेची तयारी पूर्णपणे वेगळी असून आपल्या शैक्षणिक पात्रतेवर अवलंबून नसल्यामुळे पोस्ट ग्रॅज्युएशनची आवश्यक नसते.
UPSC परीक्षा
मित्रांनो कलेक्टर (आय.ए. एस.) होण्यासाठी काय करावे? या पोस्ट मध्ये आतापर्यंत आपण कलेक्टर (IAS) या पदाविषयी माहिती घेतली आता आपल्या मुख्य विषयाकडे वळूया. हे महत्वाचे पद मिळवून देणारी परीक्षा कशी असते ते आपण पाहू.
भारत सरकारच्या विविध सिव्हिल सर्व्हिसेसच्या भरतीसाठी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (UPSC) द्वारे सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा (CSE) घेतली जाते. साधारणतः, UPSC भारतीय प्रशासकीय सेवेच्या भरती प्रक्रियेमध्ये प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षाआणि मुलाखत या तीन पायऱ्यांचा समावेश असतो.
प्राथमिक परीक्षेत दोन वस्तुनिष्ठ प्रकारचे पेपर असतात. ते म्हणजे जनरल स्टडीज पेपर I आणि जनरल स्टडीज पेपर -2 ज्याला CSAT, सिव्हिल सर्व्हिस ॲप्टीट्यूड टेस्ट असेही म्हणतात. मेन परीक्षेत वर्णनात्मक प्रकाराचे नऊ पेपर असतात. त्यानंतर मुलाखत किंवा पर्सनालिटी टेस्ट घेतली जाते.
सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलिमिनरी एक्झाम
नागरी सेवा पूर्व परीक्षेत प्रत्येकी २०० गुणांचे दोन पेपर असतात. ते पुढीलप्रमाणे
१ जनरल स्टडीज (सर्वसाधारण ज्ञान) पेपर I
या पेपर मध्ये वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न असतात. पुढे दिलेल्या अभ्यासक्रमावर आधारित हे प्रश्न असतात. यात १०० प्रश्न २०० गुणांसाठी विचारले जातात. बहुपर्यायी प्रकारच्या या प्रश्नांमध्ये चार पैकी एक पर्याय आपल्याला निवडायचा असतो. तीन चुकीच्या उत्तरासाठी २ एकूण गुणातून २ गुण कमी केले जातात. पूर्व परीक्षेचा मेरिट ठरवतांना फक्त पेपर १ चेच गुण गृहीत धरले जातात.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्व असणार्या सद्य घटना.
भारत आणि भारतीय राष्ट्रीय चळवळीचा इतिहास.
भारतीय आणि जागतिक भूगोल
भारतीय जनता आणि शासन
आर्थिक आणि सामाजिक विकास
पर्यावरणीय पर्यावरणशास्त्र, जैवविविधता आणि हवामान बदलावरील सामान्य समस्या
सामान्य विज्ञान, कला आणि संस्कृती
२. जनरल स्टडीज (सर्वसाधारण ज्ञान) पेपर II- CSAT
या पेपर मध्ये २०० गुणांसाठी ८० प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला २.५ गुण दिलेले आहेत. हा पेपर फक्त ३३% मिळवून उत्तीर्ण करणे गरजेचं असतं . याचे गुण पूर्व परीक्षेच्या मेरिट मध्ये धरल्या जात नाहीत.
कॉम्प्रेहेन्शन (आकलन शक्ती)
वैयक्तिक कौशल्य
संभाषण कौशल्य
तार्किक तर्क आणि विश्लेषणात्मक क्षमता
निर्णय घेणे आणि समस्या सोडवणे
सामान्य मानसिक क्षमता
मूलभूत संख्यात्मक क्षमता आणि डेटा इंटरप्रेटेशन
मुख्य परीक्षा
सिव्हिल सर्व्हिसेस मुख्य परीक्षेत नऊ पेपरचा समावेश असतो – दोन पेपर फक्त पात्र होण्यासाठी असतात (याचा अर्थ असा की रँकिंगसाठी विचार करण्यापूर्वी तुम्हाला हे दोन पेपर्समध्ये पास व्हावे लागते) आणि बाकीचे सात पेपर अंतिम रँकिंगसाठी वापरले जातात.
दोन पात्रता पेपर पुढीलप्रमाणे आहेत :
या दोन्ही पात्रता पेपर्स मध्ये तुम्हाला प्रत्येकी २५% गुण मिळवावे लागतात.
पेपर A : तुमच्या आवडीची भारतीय भाषा (आसामी, बंगाली, इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्नड, कोंकणी, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, संस्कृत, तामिळ, तेलगू, उर्दू . आठव्या अनुसूचित असणारी कोणतीही एक भाषा )
पेपर B : इंग्रजी
मुख्य परीक्षेतील इतर सात पेपर
पेपर 1: निबंध -२५० गुणांसाठी दोन निबंध लिहावे लगतात. म्हणजे एका निबंधाला प्रत्येकी १२५ गुण असतात.
पेपर 2: जनरल स्टडीज I (भारतीय वारसा आणि संस्कृती, जगाचा इतिहास आणि भूगोल, आणि समाज )
पेपर 3: जनरल स्टडीज II (शासन, राज्यघटना, राजकारण, सामाजिक न्याय, आंतरराष्ट्रीय संबंध)
पेपर:: जनरल स्टडीज III (टेक्नॉलॉजी, आर्थिक विकास, जैवविविधता, पर्यावरण, सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन)
पेपर 5: जनरल स्टडीज (सर्वसाधारण ज्ञान) IV (नीतिशास्त्र, अखंडता, ॲप्टीट्यूड)
पेपर 6 व 7: दिलेल्या विषयांच्या लिस्टमधून तुमच्या पसंतीनुसार कोणतेही दोन विषय निवडून तुम्ही पेपर देऊ शकता (या लिस्ट मध्ये कृषी, पशुवैद्यकीय विज्ञान व पशुसंवर्धन, मानववंशशास्त्र, वनस्पतिशास्त्र, रसायनशास्त्र,स्थापत्य अभियांत्रिकी वाणिज्य व लेखाशास्त्र,अर्थशास्त्र विद्युत अभियांत्रिकी, भूगोल भूशास्त्र इतिहास,कायदा,साहित्य इ. विषयांचा समावेश असतो)
पर्सनल इंटरव्ह्यू
मुलाखत सिव्हिल सर्व्हिसेसच्या उमेदवाराच्या अनुरूपतेचे मूल्यांकन करण्याचा प्रयत्न करते. हे उमेदवारामधील खालील चारित्र्याचे मूल्यांकन करू शकते (हे केवळ सूचक आहेत आणि सर्व निकषांचा समावेश नसतो):
विश्लेषणात्मक आणि तार्किक क्षमता
तुलनात्मक निर्णय
करुणा आणि सहानुभूती
निर्णायक क्षमता
आनुमानिक आणि प्रेराणिक क्षमता
नैतिक विचार
सचोटी आणि नैतिकता
बौद्धिक क्षमता
लोकांशी संबंध आणि सवांद क्षमता
नेतृत्व क्षमता
अनेक बाबींची खोलवर आवड
अभिव्यक्तीची शक्ती
स्व-भान किंवा अंतर्र वैयक्तिक क्षमता
सामाजिक समस्या आणि आव्हाने समजून घेण्याची क्षमता
अंतिम यादी
मित्रांनो कलेक्टर (आय.ए. एस.) होण्यासाठी काय करावे?या पोस्ट मध्ये आता आपण या परीक्षेची अंतिम यादी कशी तयार होते? त्यात किती गुण मिळवणे आवश्यक असते ते पाहणार आहोत.
मुख्य परीक्षेतील नऊ पैकी सात पेपर्स चे गुण आणि मुलाखतीचे गुण मिळून अंतिम रिजल्ट तयार केला जातो.
सात पेपर्स चे प्रत्येकी २५० या प्रमाणे १७५० आणि मुलाखतीचे २७५ असा एकुणात २०२५ गुणांसाठी अंतिम रिजल्ट लावला जातो. २०२५ पैकी साधारणतः ९०० पेक्षा जास्त गुण असणाऱ्यांना IAS ची पोस्ट मिळते.
म्हणजे त्यांचं कलेक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण होत.
ट्रेनिंग
तीनही टप्प्यांत यशस्वीरित्या पार केल्यानंतर, लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन (LBSNAA), मसूरी येथे तुम्हाला 15 आठवड्यांचा फाउंडेशन कोर्स करावा लागेल. हा कोर्स इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस(IAS), इंडियन पोलीस सर्व्हिस (IPS), इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस (IFoS), इंडियन फॉरेन सर्व्हिस (IFS) आणि विविध सेंट्रल सर्व्हिसेस (ग्रुप -‘A’) या सर्व ऑल इंडिया सर्व्हिसेसच्या ऑफिसर ट्रेनीना करावा लागतो.
फाऊंडेशन कोर्स पूर्ण झाल्यावर, IAS ऑफिसर ट्रेनी म्हणून तुम्ही साधारणतः 22 आठवड्यांच्या फेज-1 च्या ट्रेनिंगमध्ये शिक्षित व्हाल. फेज -1 च्या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला सर्व्हिसच्या पहिल्या दहा वर्षांत तुम्हाला देण्यात येणाऱ्या विविध जबाबदाऱ्या हाताळण्यास सक्षम करण्यासाठी विविध विषयांचे परिपूर्ण ट्रेनिंग दिले जाईल.
ट्रेनिंगचे फेज -1 पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला देण्यात आलेल्या राज्य कॅडरमध्ये एक वर्षाचे डिस्ट्रिक्ट ट्रेनिंग घ्यावे लागेल. फेज -1 आणि डिस्ट्रिक्ट ट्रेनिंगनंतर ऑफिसर्स ट्रेनींना IAS प्रोफेशनल कोर्स, फेज -2 ट्रेनिंग घेणे आवश्यक असते हे ट्रेनिंग साधारण सहा आठवड्यांचे असते.
युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (UPSC) द्वारे भरती झाल्यानंतर LBSNAAमध्ये दोन वर्षांचा इंडक्शन ट्रेनिंग प्रोग्राम घेत असलेल्या इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसच्या (IAS) ऑफिसर ट्रेनींना ॲकॅडमी मास्टर्स डिग्री देखील देते.
LBSNAAमध्ये 2 वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही केंद्र सरकार सेक्रेटरिएटमध्ये (सचिवालयात) असिस्टंट सेक्रेटरी म्हणून पुढील 3-महिने ट्रेनिंग घ्याल.
समारोप
तर मित्रांनो कलेक्टर (आय.ए. एस.) होण्यासाठी काय करावे? या पोस्ट मध्ये आज आपण UPSC ची परीक्षा कशी असते? किती पेपर्स असतात? कलेक्टर बनल्यानंतर पुढे काय संधी आहे? इत्यादी बाबत माहिती घेतली
मित्रांनो तुम्हाला कलेक्टर (आय.ए. एस.) होण्यासाठी काय करावे? ही पोस्ट कशी वाटली? या पोस्ट मध्ये आणखी कुठली माहिती असावी असे तुम्हाला वाटते? ते आम्हाला कंमेंट मध्ये कळवा. आणि काही सुधारणा असतील तर त्या सुचवा. ही पोस्ट अधिक उपयुक्त बनवण्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे .
धन्यवाद.
खूप छान माहिती आहे.खूप मदत झाली.
खूप छान माहिती आहे.खूप मदत झाली.
Thanks sir
Thank u so much sir
Thank you so much sir
तुमचे खुप खुप धन्यवाद .😊
तुमचे खुप खुप धन्यवाद .😊