डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार 2024 । Dr.B.R. Ambedkar Quotes In Marathi

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार

 

मित्रांनो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार जाणून घेण्यासाठी तुम्ही हि पोस्ट वाचत आहात यावरूनच तुमच्या विकसित व्यक्तिमत्वाची ओळख होते . डॉ. बाबासाहेरंब आंबेडकर यांच्याविषयी माहिती नसेल असा व्यक्ती क्वचितच सापडेल.

पण फक्त माहिती असणे म्हणजे आपण बाबासाहेबांना ओळखले का ? डॉ . बाबासाहेब आंबेडकर या वर-वरच्या माहितीपुरतेच मर्यादित आहेत का? नाही अजिबात नाही.

.कुठल्याही व्यक्तीला खऱ्या अर्थाने जाणून घ्यायचे झाल्यास त्या व्यक्तीचे विचार कसे आहेत हे पाहणे अगत्याचे ठरते. आणि म्हणूनच बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने ओळखण्यासाठी, त्यांच्या विचारांच्या जगात फेरफटका मारावा लागेल.

चला तर मित्रांनो वेळेचा अपव्यय न करता जाणून घेऊयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विविध विषयांवरील सुविचार.

 

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माहिती 

 

भारत रत्न , भारतभूषण, दलितांचे कैवारी, दलितोद्धारक , राजकारण धुरंधर,कायदे तज्ञ, इतिहास संशोधक, मानववंशशास्त्रज्ञ , अर्थतज्ञ , व्यासंगी पंडित, जगप्रसिद्ध ग्रंथप्रेमी, घटनाकार,निस्सीम राष्ट्रभक्त , विश्ववंद्य अश्या कितीही उपाध्या लावल्या तरी या महामानवासाठी त्या कमीच पडतील. बाबासाहेबांविषयी थोडक्यात लिहिणे शक्यच नाही. संत कबीरांच्या भाषेत म्हणायचं झाल्यास –

 

सब धरती कागज करू,

लेखणी करू वनराय

सात समुद्र कि मसी करू

भीम गुण लिखे न जाय..

 

म्हणजे संपूर्ण पृथ्वी ला जरी कागद मानले, सर्व वनक्षेत्रांची जरी लेखणी केली आणि सातही समुद्राची जरी शाई केली तरी भीमाचे गुण लिहिने शक्य नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन म्हणजे अगणित पैलूंनी लकाकणारा हिराच आहे . त्यांच्या जीवनक्रमाविषयी पुढे लिहिणारच आहोत तरी सध्या आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार बघूया …

 

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचारशिक्षण विषयक

 

शिक्षणाने मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन हे स्वतःच या बदलांचे मूर्तिमंत उदाहरण आहे.बाबासाहेबांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग स्वतःपुरता मर्यादित न ठेवता हजारो वर्षे गुलामीच्या साखळ्यांनी बांधल्या गेलेल्या समाजघटकाला त्या साखळ्या केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण विषयक विचार ते स्वतः जगले. हे विचार त्यांच्या अनुभवातून आलेले आहेत.

 

Dr-Babasaheb-Ambedakar-yanche-suvichar
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार

१) शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते प्राशन करणारा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.

२) विद्या हि दुधारी तलवारी प्रमाणे आहे. शीलवान व्यक्ती तिचा उपयोग दुसऱ्याच्या रक्षणासाठी करेल तर शील नसणारा व्यक्ती दुसऱ्याचा घातही करू शकतो. म्ह्णून शिक्षणात नैतिकतेला प्राधान्य असावे.

३) शील, करुणा, विद्या, मैत्री, प्रज्ञा या पंचतत्वांवर प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चरित्र बनवले पाहिजे.

४) मी समाजकारणात , राजकारणात पडलो तरी आजन्म विद्यार्थीच आहे.

५) या जगात गरीब तोच जो शिक्षित नाही. म्हणून वेळप्रसंगी अर्धीच भाकरी खा; पण आपल्या लेकरांना चांगले शिक्षण द्या.

६) ज्याला आपल्या दुःखांपासून मुक्ती हवी त्याला संघर्ष करावाच लागेल.

   ज्याला संघर्ष करायचा आहे, त्याला आधी शिकावे लागेल .

७) शिलाशिवाय शिक्षणाची किंमत शून्य आहे.

८) स्वतःची लायकी विद्यार्थी दशेतच वाढवा .

९) करुणेशिवाय विद्या बाळगणाऱ्याला मी कसाई समजतो.

१०) पावलागणिक स्वतःच्या ज्ञानात भर टाकीत जाणे यापेक्षा अधिक सूख दुसरे काय असू शकते.

११) माणसाने जन्मभर जरी शिकायचे मनात आणले तरी विद्यासागराच्या कड्याला गुडघाभर ज्ञानात जाता येईल.

१२) शाळा हे सभ्य नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे.

१३) लक्षात ठेवा तलवारीच्या धारेपेक्षा लेखणीची धार कायम टिकणार आहे .

   लेखणीच सर्वांत खतरनाक शस्त्र आहे. म्हणून तलवार हातात न घेता लेखणी हातात घेऊन अन्यायावर मात करा.

१४) दुसऱ्याच्या सुख-दुःखात भागीदार व्हायला शिकणे हेच खरे शिक्षण.

१५ ) शिका, संघटित व्हा, संघर्ष करा.

 

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचारधर्मविषयक सुविचार 

 

बाबासाहेब संपूर्ण हयातभर त्यांच्या धर्मविषयक परखड विचारांपायी चर्चेत राहिले. हिंदूंमधील विविध प्रथा असोत कि मग मुस्लिमांमधील संकुचित बंधुभाव-त्यांनी सर्व धर्मांबाबत आपली मते अतिशय स्पष्टपणे व्यक्त केली.

धर्माबाबत बाबासाहेबांचे स्वतःचे वेगळे असे मानवतावादी तत्वज्ञान आहे.त्यांचे सगळे विचार हे कुठल्याही ऐकीव गोष्टींतून तयार झाले नाहीत. त्यांच्या व्यासंगी संशोधनात ते निर्माण झाले आहेत.

Dr-Babasaheb-Ambedkar-yanche-suvichar
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार

१) मी त्या धर्माला मानतो जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुता शिकवतो.

२) धर्म आणि गुलामी यांत तुलना होणे शक्य नाही.

३) लोकं आणि त्यांच्या धर्माचे मूल्यांकन हे सामाजिक नीतिमूल्यांवर आधारित प्रमाणकांनी व्हायला हवे.

४) मानवाच्या प्रगतीसाठी धर्म अतिशय महत्वाचा आहे.

   धर्मविषयक मार्क्सवादी विचारसरणीशी मी सहमत नाही.

५) धर्म मुख्यत्वे तत्वांशी निगडित असावा .नियमांशी नव्हे. ज्या क्षणाला धर्मातील तत्वांपेक्षा नियमांना महत्व येतं ,

     त्यावेळी धर्मातील जबाबदारीची भावना नष्ट होते.

Dr-Babasaheb-Ambedkar-yanche-suvichar
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार

 

६) जात ही फक्त कामाचं विभाजन नसून कामकऱ्यांचेही विभाजन आहे.

७) जात हि मानसिक स्थिती आहे जी हिंदूंना एकत्र येऊ देत नाही.

८) जर तथाकथित हिंदू राज भारतात सत्यपरिस्थितीत निर्माण झाला तर निःसंशयपणे तोच या देशासाठी

    सर्वात मोठी आपत्ती ठरेल.

९) जोपर्यंत बहुसंख्य आणि अल्पसंख्य समुदाय एकमेकांसमोर विरोधी म्हणून उभे राहतील तोपर्यंत

    संप्रदायवादाचा प्रश्न अस्तित्वात राहणारच.

१०) जर आपल्याला आधुनिक विकसित भारत हवा असेल तर आपल्या सर्व धर्मांना एकत्र यावे लागेल.

११) जो धर्म जन्माने एकाला श्रेष्ठ व दुसऱ्याला कनिष्ठ मानतो तो धर्म नसून

     गुलाम बनवण्याचे षडयंत्र आहे.

१२) धर्म मानवासाठी आहे. माणूस धर्मासाठी नाही.

१३) धर्म हा विज्ञानाशी विसंगत असून चालत नाही. तो बुद्धिवाद्यांच्या कसोटीवर टिकला पाहिजे.

१४) व्यक्तीच्या आत्मिक उन्नतीसाठी वातावरण निर्मिती करणे हेच धर्माचे मूळ तत्त्व असावयास हवे.

१५) धर्माची आवश्यकता गरिबांना आहे. पीडीत लोकांना धर्माची आवश्यकता आहे.गरीब मनुष्य जगतो तो आशेवर!               जीवनाचेमूळ आशेत आहे.

      ही आशाच जर नष्ट झाली तर कसे होईल? धर्म आशादायी बनवतो व पीडितांना , गरिबांना संदेश देतोकि काही              घाबरू नकोस, होईल, जीवन आशादायी होईल.म्हणून गरीब व पीडित मनुष्य मात्र धर्माला चिकटून राहतो.

 

 

डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचारजीवनविषयक प्रेरणादायी सुविचार 

 

मित्रांनो , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांत आपल्याला यशाची बरीच सूत्रे सापडतात. त्यांचे विचार आपल्याला दैनंदिन जीवनातील विविध प्रश्नांना सामोरे जातांना उपयोगी पडतात .

या विचारांचे अनुसरण केल्यास कुठल्याही क्षेत्रात यश मिळणे शक्य आहे.तसे पाहता बाबासाहेबांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान अतिशय खोल आणि गंभीर आहे. त्यांच्या विचारांपैकी मोजकेच विचार आम्ही येथे देत आहोत जे आमच्या दृष्टीने महत्वाचे आहेत.

 

१) मानसिक उन्नती हाच मानवी अस्तित्त्वाचा मुख्य हेतू असायला हवा.

२) सन्मानानं जगायचं असेल तर स्वतःचीच मदत करणे शिका. तीच आपली सर्वोत्तम मदत असते.

३) शक्ती आणि प्रतिष्ठा संघर्षाशिवाय मिळत नाहीत.

४) आयुष्य लांब नको महान असायला हवं.

५) जो वाकू शकतो, तो वाकवूही शकतो.

६) चांगलं दिसण्यासाठी नव्हे तर चांगलं असण्यासाठी जगा .

७) जो सदैव आपल्या मृत्यूला डोळ्यासमोर ठेऊन जगतो तो सदैव चांगल्या कार्यातच रमतो.

८) ज्यांना स्वतःचा इतिहास माहित नाही, ते कधीच इतिहास रचू शकत नाहीत.

९) चांगल्या कर्मांव्यतिरिक्त या जगात काहीही मौल्यवान नाही.

१०) तुम्ही वाघासारखे बना . म्हणजे तुमच्या वाटेला कोणी जाणार नाही.कारण बाली हा बोकडाचाच दिला जातो.

      वाघाचा नव्हे.

११) आपल्याला कमीपणा येईल असा पोशाख करू नका.

१२) देवावर अवलंबून राहू नका. जे करायचे आहे ते मनगटाच्या जोरावर करा.

१३) तुम्ही किती अंतर चालत गेलात यापेक्षा कोणत्या दिशेने जात आहात ते अधिक महत्वाचे आहे.

Dr-Babasaheb-Ambedkar-yanche-suvichar
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार

१४) आकाशातील ग्रहतारे जर माझं भविष्य ठरवत असतील तर माझं मनगट आणि मेंदूचा काय उपयोग ?

१५) बोलतांना विचार करा.बोलून विचारात पडू नका.

 

 

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचारराजकीय सुविचार 

 

(लोकशाही, स्वातंत्र्य, राजकारण,संविधान)

 

मित्रांनो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे मानवतावादी तत्त्वांनी ओतप्रोत भरलेले आहेत. सत्तेच्या हव्यासापोटी तत्त्वांना तिलांजली देणाऱ्या आजच्या जगात बाबासाहेबांचे विचार युगप्रवर्तक ठरतात.

आज सत्ता हा राजकारणाचा केंद्रबिंदू झाला आहे. सत्तेसाठी रातोरात पक्ष बदलले जातात.अश्या परिस्थितीत बाबासाहेबांचे मानवहीत केंद्रस्थानी असणारे राजकीय तत्त्वज्ञान जाणून घेणे अगत्याचे ठरते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महत्वाचे राजकीय सुविचार पुढीलप्रमाणे ..

Dr-Babasaheb-Ambedkar-yanche-suvichar
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार

१) मला जर संविधानाचा गैरवापर होतांना आढळला तर ते जाळणारा पहिला मीच असेल.

२) सामाजिक स्वातंत्र्याशिवाय कायद्याने मिळालेले स्वातंत्र्य काही उपयोगाचे नाही.

३) लोकशाही हा राज्यपद्धतीचा नव्हे तर सामाजिक संघटनेचा प्रकार आहे.

४) एखादे चांगले संविधानही अतिशय वाईट सिद्ध होऊ शकते जर त्याचे अनुकरण करणारे वाईट असतील.

    तसेच अतिशय वाईट संविधान देखील चांगले सिद्ध होऊ शकते जर त्याचे अनुकरण करणारे चांगले असतील.

५) संविधान केवळ वकिली दस्तावेज नव्हे तर जीवन जगण्याचे माध्यम आहे.

६) जर तुम्ही मनाने स्वतंत्र असाल तरच तुम्ही खऱ्या अर्थाने स्वतंत्र आहात.

७) समता, स्वातंत्र्य आणि विश्वबंधुत्व या तीन तत्त्वांवर आधारित जीवनमार्ग म्हणजे लोकशाही.

८) समता हि एक कल्पना जरी असली तरी राज्याचे मूळ तत्त्व म्हणून तिचा स्वीकार व्हायला हवा.

९) राजकारणात सहभाग न घेण्याची सर्वात मोठी शिक्षा म्हणजे अयोग्य व्यक्ती तुमच्यावर शासन करू लागतात .

१०) मी राजकीय सुख उपभोगण्यासाठी नव्हे तर दबलेल्या माझ्या बांधवांना त्यांचा अधिकार मिळवून देण्यासाठी आलो         आहे.

११) लोकांत तेज व जागृती निर्माण होईल असे राजकारण हवे.

१२) एक सुरक्षित सेना सुरक्षित सीमेपेक्षा कधीही बरी .

१३) ज्याच्या अंगी ध्येर्य नाही तो पुढारी होऊ शकत नाही.

१४) कायदा व सुव्यवस्था हे राजकीय शरीराचे औषध आहेत. जेव्हा राजकीय शरीर आजारी पडते तेव्हा औषध दिलेच            पाहिजे.

१५) महामानव असला तरी त्याच्या चरणी व्यक्तिस्वातंत्र्याची फुले वाहू नका.

 

 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचारस्त्रियांबद्दल सुविचार 

 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर महात्मा गौतम बुद्ध यांच्या मानवतावादी विचारांचा भरपूर प्रभाव होता.त्यांनी सामाजिक सुधारणांचा हट्ट केवळ दलित वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी न करता समाजात रंजले व गांजले म्हणून जे जे कोणी असतील त्या साऱ्यांच्या उत्थानासाठी आजीवन प्रयत्न केले.

पितृसत्ताक भारतीय जीवन पद्धतीमध्ये स्त्रीवर्ग हा सर्वात मोठा शोषित घटक होता. म्हणून बाबासाहेबांनी जेव्हा त्यांच्या हाती संधी आली तेव्हा या स्त्रीवर्गाला संपूर्ण जाचातून मुक्त करण्यासाठी मोठा लढा दिला. मात्र हा लढा दलित चळवळीप्रमाणे कुठल्या तळ्यावर अथवा मंदिरात नव्हता. हा लढा होता खुद्द कायदा देवीच्या अंगणात! हा लढा होता संसदेत!

आज भारतीय स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून विविध क्षेत्रांत नेत्रदीपक यश संपादन करतांना दिसते. त्याच रहस्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या संविधानात स्त्रियांसाठी ज्या समानतेच्या तरतुदी करून ठेवल्या आहेत त्यांमध्ये दडलेलं आहे.

ज्या हक्कांसाठी बाहेरील देशांत स्त्रियांना लढा द्यावा लागला ते हक्क बाबासाहेबांनी अलगद स्त्रीवर्गाच्या ओंजळीत आणून ठेवले. आज स्त्रियांना मिळणारी गरोदरपणातील रजा असो, की समान कामासाठी मिळणारे समान वेतन असो,

की मतदानाचा अधिकार असो, की वारसामधील समान हक्क असो या सगळ्यांचीच पाळेमुळे बाबासाहेबांच्या विचारांत सापडतील. चला तर ग जाणून घेऊयात स्त्रियांबद्दल डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार..

 

१) शिक्षण पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनाही आवश्यक आहे.

२) मी समाजाची प्रगती समाजातील स्त्रियांच्या प्रगतीच्या कसोटीवर मोजतो.

३) पती-पत्नीमधील नाते हे मित्राप्रमाणे असायला हवे.

४) स्त्री जात समाजाचा अलंकार आहे.

५) स्त्रियांच्या सामिलीकरणाशिवाय सगळी एकात्मता शून्य आहे.

    शिक्षित स्त्रियांशिवाय शिक्षण निष्फळ आहे.

६) स्त्रियांच्या सहभागाशिवाय कुठलेही आंदोलन अर्धवट आहे.

७) स्त्रियांद्वारे चालवल्या जाणाऱ्या चळवळीवर माझा ठाम विश्वास आहे.

८) पुरुषांच्या शिक्षणाइतकाच स्त्रीशिक्षणावरही भर दिल्यास लवकरच समाजाला चांगले दिवस येतील.

    आपल्या भारतीय समाजाची वेगाने प्रगती होईल.

 

 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचारग्रंथविषयक सुविचार

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रंथप्रेम आणि वाचनाची आवड तर विश्वविख्यात आहे. पदव्युत्तर शिक्षणासाठी परदेशात असतांना बाबासाहेबांनी अगदी तुटपुंज्या शिष्यवृत्तीवर शिक्षण तर पूर्ण केलेच मात्र परत येतांना त्यांनी विलायतेहुन जवळ जवळ २००० पेक्षा जास्त ग्रंथ आणले होते.

हे ग्रंथ खरेदी करता यावेत म्हणून तेथील वास्तव्यात बरेचदा बाबासाहेब अर्धपोटी राहिले. ज्ञानाची भूक जोपासण्यासाठी त्यांनी पोटाच्या भुकेला बरेचदा दुर्लक्षित केले. बाबासाहेबांची वाचनात भलतीच समाधी लागत असे.

हातातील पुस्तकासोबत ते कुठेही एकाग्र होऊ शकत. कितीही गर्दी असो, कितीही गोंधळ असो, हवे असलेले पुस्तक हाती पडले कि ते लगेच त्याच्या वाचनात रंगून जात.मग आजूबाजूच्या जगाचे त्यांना मुळीच भान राहत नसे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथप्रेमाची साक्ष देणारी वस्तू म्हणजे राजगृह. स्त्रीप्रेमात महाल बांधणारे भरपूर झालेत पण पुस्तकांसाठी विशेष घर बांधणारा ग्रंथप्रेमी निराळाच.

राजगृह येथील ग्रंथसंग्रहामध्ये जवळ जवळ ५०००० ग्रंथ होते. ग्रंथांसाठी घर बांधणारे, भुकेच्या ज्वाळेने पोट जाळणारे, आणि प्रसंगी मनुस्मृतीसारखा ग्रंथ जाळणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एकमेवाद्वितीयच. ग्रंथांविषयी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार पुढीलप्रमाणे –

 

Dr-Babasaheb-Ambedkar-yanche-suvichar
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार

१) मंदिरांत जाणाऱ्यांच्या रांगा जेव्हा वाचनालयांकडे जातील तेव्हा माझ्या देशाला

    महाशक्ती बनण्यापासून कोणीच थांबवू शकणार नाही.

२) ज्ञानी लोक पुस्तकांची पूजा करतात तर अज्ञानी दगडांची.

३) ग्रंथ हेच गुरु.

४) वाचाल तर वाचाल.

५) मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास जास्त आवडतो.

६) एखादा प्रियकर ज्याप्रमाणे प्रेयसीवर प्रेम करतो त्याचप्रमाणे माझे माझ्या पुस्तकांवर प्रेम आहे.

७) तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचं पुस्तक घ्या. कारण भाकरी तुम्हाला      जगण्यात मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला कसं जगायचं हे शिकवेल.

 

 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार – संकीर्ण

 

१) आदर दुरून, सेवा जवळून आणि ज्ञान आतून असावे.

२) माणसाने खावे जगण्यासाठी; पण जगावे समाजासाठी.

३) कोणतेही काम लवकर करायचे असेल तर मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका.

४) जो मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही. आणि जो मरायला भितो तो आधीच मेलेला असतो.

Dr-Babasaheb-Ambedkar-yanche-suvichar
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार

५) उगवत्या सूर्याला नमस्कार करतांना मावळत्या चंद्राला विसरू नका.

६) मोठ्या गोष्टींचे बेत करण्यापेक्षा छोट्या गोष्टींना आरंभ करणे कधीही श्रेयस्कर ठरते.

७) बर्फाच्या राशी उन्हाने वितळतात अन अहंकाराच्या राशी प्रेमाने.

८) अत्याचार करणाऱ्यापेक्षा ते सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो.

९) माणूस कितीही मोठा विद्वान झाला आणि जर तो इतरांचा द्वेष करण्याइतका स्वतःला मोठा समजू लागला तर तो              उजेडात हातात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्यासारखा असतो.

१०) शब्दाला कृतीचे तोरण नसेल तर शब्द वांझ ठरतील.

११ ) चारित्र्य शोभते संयमाने , सौंदर्य शोभते शीलाने.

१२) जेथे एकटा तेथेच सुरक्षितता .

१३) एक महान माणूस हा एका प्रतिष्ठित माणसापेक्षा अशाप्रकारे वेगळा असतो की तो समाजाचा सेवक होण्यासाठी सदैव

      तत्पर असतो.

१४) तुम्ही सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा.पृथ्वीप्रमाणे परप्रकाशित राहू नका.

१५) वाणीचा व भाषेचा योग्य उपयोग करता येणे ही एक तपश्चर्या आहे. तिला मन संयमाची आणि नियंत्रणाची सवय               करावी  लागते.

 

 

समारोप 

 

मंडळी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं लिखाण विपुल आहे. आणि त्यांचा प्रत्येकच विचार मनाला उभारी देणारा,अन्यायाविरुद्ध लढायला प्रेरित करणारा आहे.

बाबासाहेबांच्या विचारसागरातील काही थेम्ब आम्ही तुमच्यापर्यंत पोचवण्याचा हा एक प्रयत्न केला आहे. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार’ या पोस्ट मधून तुम्हाला काय शिकायला मिळालं? तसेच कुठली माहिती तुमच्यासाठी नवी होती? आणि कुठला सुविचार तुम्हाला सर्वात आवडला हे आम्हाला कंमेंट करून नक्कीच कळवा.

शिवाय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार या पोस्ट मध्ये जर आपल्याला काही सुधारणा व्हाव्या असे वाटत असेल, काही मार्गदर्शन असेल तर ते सुद्धा कळवा. सोबतच आपल्याला आणखी कोणत्या महापुरुषाचे विचार वाचायला आवडतील तेहि कळवा. धन्यवाद!

4 thoughts on “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार 2024 । Dr.B.R. Ambedkar Quotes In Marathi”

    • लोकरे सर तुमचे कौतुक करावे तेवढं कमीच आहे
      आजच्या नविन पिढीला चिकित्सक दृष्टिने विचार करण्याची गरज आहे.
      हे विचार फक्त परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच देऊ शकतात.
      कारण त्यांनी प्रत्येक विसयावर गहन अभ्यास करून त्यांचे विचार मांडले आहेत आणि तुम्ही सध्याच्या कॉम्प्युटर युगामध्ये ते आत्ता तुमच्यामुळे हे विचार सर्वसामान्य पर्यंत पोहोचले आहेत त्याबद्दल तुमचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे धन्यवाद जय भिम

      Reply

Leave a Comment