स्वामी विवेकानंद यांचे १०१ प्रेरक विचार । 101 Swami Vivekanand Quotes in Marathi

 नमस्कार मित्रांनो आज आपण स्वामी विवेकानंद यांचे १०१ प्रेरक विचार |101 Swami Vivekanand Quotes in Marathi या पोस्ट च्या माध्यमातून स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणादायी विचार जाणून घेणार आहोत. आजच्या या पोस्ट मध्ये आपण फक्त स्वामी विवेकानंद यांचे प्रेरक विचार याच विषयावर माहिती घेणार आहोत.

स्वामी विवेकानंद यांचे चरित्र, त्यांचा भारताच्या स्वतंत्रचळवळीतील प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभाग, त्यांच्या विचारांमुळे झालेले परिवर्तन तसेच त्यांच्या जीवनातील लहान- मोठे प्रेरणादायी प्रसंग याविषयी आपण एक वेगळी पोस्ट नंतर बघणार आहोतच.

तर चला मित्रांनो बघूया कि स्वामी विवेकानंद यांचे १०१ प्रेरक विचार | 101 Swami Vivekanand Quotes in Marathi या पोस्टमधील कुठले विचार आपल्या मनाला जास्त भिडतात.

 

 

 

१०१ स्वामी विवेकानंद यांचे प्रेरक विचार

 

स्वामी विवेकानंद यांचे प्रेरक विचार
स्वामी विवेकानंद यांचे प्रेरक विचार

 

1)प्रत्येक व्यक्तीला निर्भय होण्याचा संदेश वेदांत देतो. सामर्थ्य हे पुण्य आहे. दुर्बलता हे पाप आहे. एखाद्या बॉंब गोळ्याप्रमाणे अज्ञान राशीवर आदळणारा उपनिषदांतील शब्द आहे ‘अभी:’  म्हणजे निर्भयता. म्हणजेच अध्यात्मिक सामर्थ्य.  कशाचेही भय बाळगू नका तरच तुमच्या हातून पूर्ण कार्य होऊ शकते.  ज्या क्षणी तुम्ही भयभीत व्हाल त्याच क्षणी तुमची शक्ती नष्ट होऊन दुर्गति सुरू होईल. म्हणून “ उठा जागे व्हा व ध्येय प्राप्त केल्याविना थांबू नका.”

 

२) जो धर्म किंवा ईश्वर विधवांचे अश्रू पुसत नाही किंवा पोरक्या बालकांच्या मुखात अन्नाचा घास घालत नाही त्या धर्मावर वा त्या ईश्वरावर माझा विश्वास नाही.

 

३)केवळ पैसा हीच जगातील शक्ती नव्हे. चांगुलपणा, पावित्र्य हीच खरी शक्ती हो होय.

 

४)  ज्याचे हृदय गरिबांसाठी द्रवते  त्यालाच मी महात्मा म्हणेंन.  नाहीतर तो दुरात्माच  होय. 

 

५) शिक्षण म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी जे पूर्णत्व आधीचेच विद्यमान आहे, त्याचे प्रकटीकरण होय. 

 

६)  एकमेकांवर टीका करण्याची वृत्तीच सर्व तंट्याबखेड्यांच्या मुळाशी असते आणि या वृत्तीमुळेच सर्व संघटना ढासळून पडते. 

 

७)शरीराबाहेर निघून एखाद्या जीर्ण वस्त्राप्रमाणे त्याचा त्याग करणे मला कदाचित चांगले वाटेल. परंतु,  तसे झाले तरी मी कार्य करायचा थांबणार नाही. जोपर्यंत जगाला आपण ईश्वराशी एकरूप आहोत असे ज्ञान होणार नाही तोपर्यंत मी सर्वत्र लोकांना स्फूर्ती देत राहील. 

 

 ८)व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही; कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक असतो . 

 

९) स्वतःचा विकास करा.  ध्यानात ठेवा गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत . 

 

१०)  देखणेपणावर जाऊ नका.सौंदर्याला कोमेजण्याचा शाप असतो. 

 

११) तारुण्याचा जोम अंगी आहे तोवरच कोणतीही गोष्ट शक्य होईल कार्याला लागण्याची अत्यंत उचित अशी हीच वेळ आहे. 

 

१२)द्वेष ,कपटवृत्तीचा त्याग करा व संघटित होऊन इतरांची सेवा करायला शिका. 

 

१३)  मन समुद्रातल्या भोवऱ्यासारखे आहे. ते माणसाला दूर नेऊन बुडवते.  एक वेळ समुद्राला बांध  घालणे  सोपे असेल. पर्वत उपटने  सोपे असेल.  पण मनाला आवर घालणे  महाकठीण कर्म आहे. 

 

१४)आपले मन आपल्या लाडक्या मुला प्रमाणे असते. ज्याप्रमाणे लाडकी मुले नेहमी असंतुष्ट असतात त्याप्रमाणे आपले मन  नेहमी अतृप्त असते.  म्हणूनच मनाचे लाड कमी करा व त्याला सतत लगाम घाला. 

 

१५) संपूर्ण जग हातात तलवारी घेऊन तुमच्या विरुद्ध उभे असले तरी ध्येयपूर्तीसाठी पुढे जाण्याची धमक  तुमच्यात असली पाहिजे.  

 

१६)  अगदी सरळमार्गी असणे हेही एक प्रकारचे पापच आहे आहे हे पाप कालांतराने मनुष्याच्या दुर्बल तेचे कारण बनते.

swami-vivekanand-quotes-marathi

 

 

१७)सत्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करावा परंतु कोणत्याही कारणास्तव  सत्याचा त्याग करू नये. 

 

१८) फसवणूक करून कोणतेही मोठे कार्य होत नसते. प्रेम, सत्यनिष्ठा व प्रचंड उत्साह यांच्या द्वारेच महान कार्य होत असतात.  म्हणून आपले  पौरूष प्रकट करा. 

 

१९) दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातापेक्षा अधिक उपयुक्त आहे. 

 

२०) माझ्या तरुण मित्रांनो ‘सामर्थ्यसंपन्न’ व्हा ,  हा माझा तुम्हाला उपदेश आहे.  गीतेच्या अध्ययनापेक्षा फुटबॉल खेळून तुम्ही स्वर्गाच्या अधिक निकट जाऊ शकतात.  तुमचे शरीर चांगले सुदृढ झाल्यावर गीता तुम्हाला अधिक चांगली कळेल.  तुमचे शरीर मजबूत होऊन आपण मनुष्य आहोत अशी तुम्हाला जाणीव झाली म्हणजे तुम्हाला उपनिषदांचे मर्म व आत्म्याचा महिमा अधिक चांगल्या रीतीने कळेल. 

 

२१) धर्म ही अशी वस्तू आहे हे जिच्यामुळे पशुचे माणसात आणि माणसाचे देवात रूपांतर होते. 

 

२२) ईश्वराला आणखी कुठे शोधाल ? हे जे सर्व गरीब, दुःखी व दुर्बल आहेत तेच ईश्वर नव्हेत काय? आधी त्यांची पूजा का करीत नाही? गंगेच्या काठी विहीर खणावयास का म्हणून जातात?

 

२३) माझ्या मते आपले राष्ट्रीय महापातक जर कोणते असेल तर ते हेच की आपण सर्वसाधारण जनतेची उपेक्षा केली. आपल्या अधःपतनाचे हे एक प्रमुख कारण होय.  भारतातील सामान्य जनतेला जोवर चांगले शिक्षण देण्यात येत नाही,   जोवर तिला पोटभर अन्न मिळत नाही, जोवर तिची योग्य प्रकारे यथायोग्य काळजी घेण्यात येत नाही तोवर कितीही राजकारण केले तरी त्याचा काडीचाही उपयोग होणार नाही नाही. 

 

२४) हातातील कार्य अत्यंत आवडते असल्यास  एखादा महामूर्ख देखील ते पार पाडू  शकतो: परंतु खरा बुद्धिमान तोच की जो कोणत्याही कार्याला असे रूप देऊ शकतो, कि ते  त्याच्या आवडीचे होऊन जाते . कोणतेही कार्य शूद्र नाही हे ध्यानात  ठेवा. 

 

२५)फक्त एकट्या आपल्यावरच साऱ्या कार्याची मदार आहे अशा भावनेने काम करा.  भावी पन्नास शतके तुमच्या कार्याकडे डोळे लावून बसली आहे. भारताचे भवितव्य तुमच्यावर अवलंबून आहे.  कंबर कसून कामाला लागा. 

 

२६)जोपर्यंत स्त्रियांची स्थिती सुधारत नाही नाही तोपर्यंत जगाचे कल्याण होणे शक्य नाही. पक्षी कधी एकाच पंखाने उडू शकत नाही. 

 

२७) धर्म हा केवळ सिद्धान्तामध्ये , मतमतांतरामध्ये वा बौद्धिक वादविवादात नाही. आपण ब्रम्हस्वरूप आहोत हे जाणून तद्रूप होणे म्हणजे धर्म होय. धर्म म्हणजे प्रत्यक्षानुभूती होय. 

 

२८) जीवन हे अल्पकाळ टिकणारे आहे. संसारातील असा सुखभोग क्षणभंगुर आहेत. दुसऱ्यासाठी जे जगतात तेच खऱ्या अर्थाने जिवंत असतात, बाकीचे सारे जिवंत असूनही मेल्यासारखे होत. 

 

२९) कुठल्याही स्वरूपात परावलंबी झालेला मनुष्य सत्यस्वरूप भगवंताची उपासना करूच शकत नाही. 

 

३०) आपले मज्जातंतू शक्तीसंपन्न करा. आपल्याला लोखंडी स्नायूंची व पोलादी मज्जातंतूंची आवश्यकता आहे . आपण पुष्कळ दिवस रडलो. आता रडणे पुरे, आता आपल्या पायावर उभे राहा व मनुष्य बना . 

 

३१) ‘माणसे’- खरी मनसे हवी आहेत; त्यानंतर सर्वकाही आपोआपच प्राप्त होईल. आपल्याला पाहिजे आहेत सामर्थ्यशाली , तेजस्वी, आत्मविश्वासी तरुण. असले शंभर युवक जरी मिळाले तरी जगात खरोखर क्रांती होऊन जाईल. 

 

३२) उपनिषदांतील सत्ये तुमच्यासमोर आहेत.  ती ग्रहण करा, ती प्रत्यक्ष कार्यात उतरवा आणि मग भारताचा उद्धार अवश्य होईल. 

 

३३) हे एक मोठे सत्य आहे; बळ हेच जीवन होय. दुर्बलता म्हणजे मृत्यू. बळ हाच परम आनंद होय. शाश्वत व अमर जीवन होय. दुर्बलता म्हणजे सतत भार, सतत चिंता, सतत दुःख होय. दुर्बलता म्हणजेच मृत्यू होय. 

 

३४) अनुभव हाच जगात सर्वश्रेष्ठ शिक्षक आहे. 

 

३५) चारित्र्यसंवर्धन हा राष्ट्राचा खरोखर आधार आहे , पाया  आहे. राष्ट्राची उभारणी काही वाळूच्या भुसभुशीत जमिनीवर करता येत नाही. त्याच्यासाठी मजबूत कातळाची एक पायाभूमी असावी लागते आणि ती फक्त चारित्र्याद्वारेच निर्मिता येणे शक्य आहे. 

 

३६) स्त्री पूजनाने सारे समाज थोर पदवीला पोहोचले आहेत. ज्या देशात, ज्या समाजात हे स्त्री पूजन नाही. तो देश , तो समाज कधीही मोठा होऊ शकला नाही व पुढे कधी काली होणेही शक्य नाही. तुमच्या साऱ्याच्या साऱ्या समाजाचा जो हा अधःपात झाला आहे त्याचे मुख्य कारण म्हणजे या शक्तिरूपिणी स्त्रियांची अवहेलना होय. 

 

३७)वेदान्त पापाचे अस्तित्व मानत नाही.  तो फक्त भ्रांतीचेच अस्तित्व मानतो आणि ‘मी कमकुवत आहे, मी पापी आहे,  मी दुःखी आहे,  माझ्या ठिकाणी बळ मुळीच नाही,  मी कोणतेही कार्य करण्यास समर्थ नाही’  असे म्हणणे हाच सर्वात मोठा भ्रम होय.  वेदांत आपल्याला हेच सांगतो. 

 

३८) ‘ज्याचा ईश्वरावर विश्वास नाही तो नास्तिक होय’ असे  प्राचीन धर्मांनी  म्हटले आहे. नवा धर्म म्हणतो की ‘ज्यांचा स्वतःवर विश्वास नाही ते नास्तिक होत.’  

swami-vivekanand-yanche-prerak-vichar

 

३९) या जगातील समस्त दुःखाचे कारण म्हणजे दुर्बलता.  आपण शक्तीहीन आहोत म्हणूनच आपल्याला दुःख भोगावे लागते.  दुर्बलतेमुळेच आपण खोटे बोलतो,  चोरी करतो,   हत्या करतो,  व इतर गुन्हे करतो.  दुर्बलतेमुळेच आपण दुःखाच्या खाईत  पडतो. आपण दुर्बल आहोत म्हणूनच आपण मृत्युमुखी पडतो जिथे दुर्बल बनविणारी गोष्टच नाही तिथे मृत्यू कुठचा? दुःख कुठचे? 

 

४०) उठा, धीट  बना,  शक्तिसंपन्न बना. तुम्ही सगळी जबाबदारी स्वतःच्या शिरावर घ्या आणि जाणून असा की तुम्हीच तुमच्या भाग्याचे निर्माते आहात. तुम्हाला हवे असलेले सर्व सहाय्य व सर्व बळ तुमच्यामध्येच आहे.  म्हणून तुम्हीच तुमच्या स्वतःचे भवितव्य घडवा.  

 

४१)सर्वदा स्वतःला रोगी समजत राहणे हा काही रोग मुक्त होण्याचा उपाय नाही.  रोग दूर करण्यासाठी औषधाची आवश्यकता असते. दुर्बलतेची स्मरण करून दिल्याने काहीच लाभ होत नाही.  बळ द्या,  शक्ती प्रदान करा.  सर्वथा दुर्बलतेचा विचार केल्याने बळ प्राप्त होत नाही.  दुर्बलतेच सतत चिंतन करीत बसणे हा काही दुर्बलता दूर करण्याचा उपाय नाही.  बळाचा नेहमी विचार करणे हाच उपाय आहे. 

 

४२)  सर्व प्राण्यांपेक्षा, सर्व देवदेवतांपेक्षा मनुष्य हाच अधिक श्रेष्ठ आहे.  त्याच्या हून उच्च कोणीही नाही.  देवांना देखील पृथ्वीवर पुन्हा जन्म घ्यावा लागतो आणि मानव देहांच्या द्वारे मुक्ती प्राप्त करून घ्यावी लागते. केवळ मनुष्यालाच पूर्णत्वाचा लाभ करून घेता येतो देवदेवतांनादेखील नाही. 

 

४३) स्वतः समोर ज्याने  एखादे ध्येय ठेवले आहे असा माणूस जर हजार चुका करीत असेल तर काहीच ध्येयं नसलेला  माणूस पन्नास हजार  चुका करीत असणार याची मला खात्री आहे.  आहे म्हणून स्वतः समोर कोणते ना कोणते ध्येय ठेवूणे  केव्हाही अधिक चांगले. 

 

४४)  जोपर्यंत लाखो लोक भुकेने तडफडत आहेत व अज्ञानात पिचत पडलेले आहेत तोपर्यंत मी त्या प्रत्येक माणसाला कृतघ्न समजतो कि जो ह्या लोकांच्या बळावर सुशिक्षित बनला आणि तरी आता त्यांच्याकडे मुळीच लक्ष देत नाही. 

 

४५) जो आज्ञेचे पालन करणे जाणतो तोच आज्ञा देणेही जाणतो. प्रथम आज्ञेचे पालन करावयास शिका. आपल्याला संघटनेची आवश्यकता आहे. संघटना हीच शक्ती आहे. आणि आज्ञाधारकपणा हेच तिचे रहस्य आहे,

 

४६) ज्यांना मानवजातीला सहाय्य करावेसे वाटते त्यांनी आधी आपल्या सुख-दुःखाचे, नावलौकिकाचे आणि सर्व प्रकारच्या स्वार्थी भावनांचे गाठोडे बांधून ते समुद्रात फेकून दिले पाहिजे. आणि मगच भगवंताकडे गेले पाहिजे. जगातील साऱ्या महापुरुषांनी हेच सांगितले आणि  हेच केले. 

 

४७) जर काही भले व्हावे अशी आपली इच्छा असेल तर आपल्या या बाह्य अनुष्ठानांना तिलांजली द्या आणि जिवंत ईश्वराची, मानव-देवाची – ज्याने मानवरूप धारण केले आहे, अशा प्रत्येक जीवाची – भगवंताच्या समष्टी तसेच व्यष्टी रूपाची पूजा करा.  

swami-vivekanand-yanche-prerak-vicharस्वामी विवेकानंद यांचे प्रेरक विचार
स्वामी विवेकानंद यांचे प्रेरक विचार

 

 

४८) दयेने प्रेरित होऊन  दुसऱ्यांचे भले करणे हे तर ठीकच आहे. पण ईश्वरबुद्धीने प्राणिमात्रांची केलेली सेवा हि त्याहून चांगली होय.  

 

४९) तुम्हाला असे वाटते काय कि तुमची मदत मिळाली नाही तर एखादी मुंगी देखील मरेल? तसे वाटणे तर ईश्वराविषयी घोर अनादरच होय. वास्तविक पाहता जगाला तुमची मुळीच गरज नाही.

ईश्वराला मदत करण्याचे नव्हे तर ईश्वराचे कार्य करण्याचे सद्भाग्य तुम्हाला लाभले याबद्दल तुम्ही स्वतःला धान्य मानले पाहिजे. ‘मदत ‘ हा शब्दच आपल्या मनातून अगदी साफ काढून टाका. तुम्ही मदत करू शकत नाही. ‘

मी मदत करिन’ असे म्हणणेच मुळी ईश्वराविषयी अनादर दर्शविणे होय. खरे पाहता तुम्ही आपल्या सत्कर्मांच्याद्वारे ईश्वराचीच पुणे करीत असता. समग्र विश्वाविषयी असा भक्तियुक्त, आदरयुक्त भाव बाळगा, तरच तुम्ही पूर्ण अनासक्त होऊ शकता. 

 

५०) जेव्हा स्वतःविषयीचा, स्वार्थाविषयीचा कोणताही विचार आपल्या मनाला शिवत नाही तेव्हाच आपल्या हातून सर्वोत्कृष्ट कर्म घडते, तेव्हाच आपला सर्वात जास्त प्रभाव पडतो. पूर्णपणे निरपेक्ष व्हा. फळाविषयी पूर्णपणे उदासीन राहा तेव्हाच तुम्ही यतार्थ कर्म करू शकाल. 

 

 मित्रांनो स्वामी विवेकानंद यांचे विचार केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील युवकांना सदैव प्रेरणादायक ठरले आहेत. म्हणूनच त्यांचा जन्मदिवस १२ जानेवारी हा दिन आपण युवक दिन म्हणून साजरा करतो.

युवकांना स्फूर्ती देणाऱ्या या महान संन्यास्याचे प्रेरणादायी विचार स्वामी विवेकानंद यांचे १०१ प्रेरक विचार | Swami Vivekanand Quotes  in  Marathi या पोस्ट मध्ये आपण पाहत आहोत. 

 

५१)  अशुद्ध विचार व अशुद्ध कल्पना हि अशुदध कर्माइतकीच वाईट आहे. आपल्या इच्छेवर जर आपले प्रभुत्व असेल तर त्यापासून नेहमी सर्वोच्च फळाचीच प्राप्ती होईल. 

 

५२) दानातून अधिक श्रेष्ठ असा गुण नाही. जो आपले हात दुसऱ्याकडून काहीतरी घेण्यासाठी पसरतो तो सर्वात खालच्या प्रतीचा माणूस होय. आणि ज्याचे हात देण्यासाठी पुढे होतात तो माणूस सर्वश्रेष्ठ कोटींचा होय. 

 

५३)   कोणत्याही धर्म संप्रदायाचे पतन  त्याच दिवशी सुरु होते कि ज्या दिवशी त्यात धनिकांची पूजा  करणे प्रविष्ट होते.

 

५४)   मत-मतांतरे, संप्रदाय, देवळे, वा  प्रार्थनामंदिरेयांना महत्व देऊ नका. मनुष्याच्या ठायी वास करणाऱ्या त्या अंतस्थ सत्तेच्या तुलनेने हि सारी गौण आहेत.  

 

५५)जर एखाद्या व्यक्तीच्या ठिकाणी सत्य, पावित्र्य, आणि निस्वार्थपरता या तीन गोष्टी असतील तर या समस्त ब्रह्माण्डात अशी एकही शक्ती नाही जी त्या व्यक्तीला चिरडू शकेल. 

 

५६) विश्वास ! विश्वास! स्वतःवर विश्वास आणि इतरांवर विश्वास. महानतेचे रहस्य हेच. पुराणात वर्णिलेल्या तेहतीस कोटी देवांवर व परकीयांनी वेळोवेळी तुमच्यामध्ये रूढ केलेल्या समस्त देवतांवर तुमचा विश्वास असला, पण स्वतःवर मात्र नसला तर तुम्हाला मुक्ती प्राप्त होणार नाही. स्वतःवर विश्वास ठेवा. तो अढळ राहू द्या आणि शक्तिशाली बना . 

 

५७) चारित्र्य घडविणारे, मानसिक बल वाढविणारे, बुद्धी विशाल करणारे आणि स्वावलंबी बनविणारे असे शिक्षण आम्हास हवे. 

 

५८) आम्हाला आज वेदांत आणि पाश्चिमात्य विज्ञान यांचा समन्वय हवा आहे. 

 

५९) मनुष्य प्रकृतीवर मात करण्यासाठी जन्माला आलेला आहे . प्रकृतीचा गुलाम होऊन राहण्यासाठी नव्हे. 

 

६०) मन म्हणजेच सर्वकाही, विचार म्हणजेच सर्वकाही असा विश्वास बाळगणे हा केवळ उच्चं  स्वरूपाचा जडवाद होय. 

 

६१) हे जग म्हणजे विशाल व्यायामशाळा असून येथे आपण स्वतःचे सामर्थ्य वाढवण्यासाठी येत असतो. 

 

६२) सत्याचे प्रतिपादन हजारो निरनिराळ्या प्रकारांनी करता येते, आणि तरीही त्यांपैकी प्रत्येक प्रकार सत्य असू शकतो. 

 

६३) तुमचा विकास आतून झाला पाहिजे. तुम्हाला कोणीही शिकवू शकत नाही . तुम्हाला कोणीही आध्यात्मिक  बनवू शकत नाही. तुमच्या स्वतःच्या आत्म्याव्यतिरिक्त तुमचा दुसरा कोणीही शिक्षक नाही. 

 

६४) सत्याचा शोध हा सामर्थ्याचा आविष्कार आहे. ते काही दुबळ्या, आंधळ्या मनुष्याचे चाचपडणे नव्हे. 

 

६५) ज्याचा ह्रदयग्रंथ  उजाडला आहे त्याला इतर कोणत्याही ग्रंथाची आवश्यकता नाही. इतर ग्रंथ आपल्या ठायी ज्ञानाची इच्छा निर्माण करतात हेच त्यांचे मोल आहे. हे ग्रंथ म्हणजे केवळ दुसऱ्यांचे अनुभव असतात. 

swami-vivekanand-yanche-prerak-vichar
स्वामी विवेकानंद यांचे प्रेरक विचार

 

६६) वेदांचा जेवढा भाग बुद्धीशी जुळता आहे तेवढाच व्यक्तिशः मी ग्राह्य मानतो. 

 

६७) खऱ्याखुऱ्या धर्माच्या राज्यात पुस्तकी पांडित्याला प्रवेश करण्याचा काहीही अधिकार नाही. धर्म हि कल्पनेची बाब नसून प्रत्यक्षानुभूतीची बाब आहे. एखादे भूत जर एखाद्या व्यक्तीने प्रत्यक्ष पहिले असेल तर त्याविषयी पुष्कळ ग्रंथ वाचलेल्या पंडितांपेक्षाही ती व्यक्ती श्रेष्ठ ठरते. 

 

६८) जगात पापही नाही आणि पुण्यही नाही जगात केवळ अज्ञान आहे.  अध्यात्माच्या  अनुभवाने या ज्ञानाचा निरास होतो. 

 

६९) कोणताही खरा ख्रिस्ती हा खरा हिंदू असतो तर कोणताही खरा हिंदू हा खरा ख्रिस्ती असतो. 

 

७०) आपल्या पोटच्या अपत्यासाठी प्राण देणे हा उच्च कोटीचा त्याग नव्हे. असला त्याग पशूही करतात आणि तोही एखादी मानवी माता जितक्या सहजपणे करील तितक्याच सहजपणे करतात . तसला त्याग करणे हे काही खऱ्या  प्रेमाचे चिन्ह नव्हे ती म्हणजे निव्वळ आंधळी भावनाविवशता होय. 

 

७१) आपले दौर्बल्य ते सामर्थ्य कसे भासेल, आपली भावनाविवशता  ही प्रेम रूप कशी भासेल , आपला भेकडपणा हा धैर्या सारखा कसा भासेल इत्यादी खटपटीतच आपण नेहमी निमग्न असतो. 

 

७२) नास्तिक मनुष्य उदार  असू शकतो पण धार्मिक असू शकत नाही.  परंतु धार्मिक मनुष्य मात्र उदार असलाच पाहिजे. 

 

७३)माणूस हा पशुत्व मनुष्यत्व व देवत्व यांचे मिश्रण आहे. 

 

७४) डोक्यावर जणू दुःखाचा मुकूट चढवून सुख  मनुष्यापुढे उभे राहते. जो सुखाचे स्वागत करतो त्याने दुःखाचेही स्वागत केले पाहिजे. 

 

७५) तुम्ही जितके कमी वाचाल तितके चांगले.  गीता व वेदांत यावरील इतर चांगले ग्रंथ वाचा.  तेवढेच तुम्हाला पुरेसे आहे.  प्रचलित शिक्षण पद्धती पूर्णपणे सदोष आहे. विचार कसा करावा हे मनाला  कळायला लागण्यापूर्वीच त्यात अनेक गोष्टी ठासून भरल्या जातात.  सुरवातीला मनोनिग्रहाचे  शिक्षण दिले पाहिजे.

जर  मला माझ्या शिक्षणाला जर आता पुन्हा सुरुवात करावयाची असती  आणि त्या बाबतीत बोलण्याची मला काही मुभा असती  तर मनावर ताबा कसा मिळवावा हे मी प्रथम शिकलो असतो.आणि नंतरच वाटल्यास इतर माहिती मी गोळा केली असती.  निरनिराळ्या गोष्टी शिकण्यास लोकांना फार वेळ जातो त्याचे कारण असे आहे की स्वेच्छेनुसार त्यांना मन एकाग्र करता येत नाही. 

 

 ७६) जरी वाईट दिवस आले तरी त्यात काय आहे? लंबक मागे परतून दुसऱ्या बाजूस जाईलच पण तेही चांगले नव्हे खरे म्हणजे तो थांबविणे हेच आपले कार्य आहे. 

 

७७) चांगल्या पुस्तकाविना घर म्हणजे दुसरे स्मशानच  होय. 

 

 ७८)  देशातील दारिद्र्य व अज्ञान घालविणे म्हणजेच ईश्वराची सेवा होय. 

 

७९) दैव नावाची कोणतीही गोष्ट नाही.  आपल्याला जबरदस्तीने काही करावयास भाग पाडेल अशी कोणतीही गोष्ट या जगात नाही. 

 

 ८०)आस्तिकांपेक्षा  एक वेळ नास्तिक परवडले;  कारण नास्तिकाकडे स्वतःचा आणि स्वतंत्र असा तर्क तरी असतो पण आस्तिकाला आपण आस्तिक का  आहोत याचे एकही समाधानकारक उत्तर देता येत नाही. 

 

८१) परमेश्वर नेहमी कृपाळू असतो.  जो अत्यंत शुद्ध अंतकरणाने त्याची मदत मागतो त्याला ते निश्चितपणे मिळत असते. 

 

८२)  पैसा असणाऱ्या श्रीमंत आणि प्रतिष्ठित माणसाकडे आदराने पाहू नका.  जगातली सर्वात महत्त्वाची कामे गरिबांनीच  केली आहेत.  चांगल्या कामाची सुरुवात गरिबांकडूनच होते. 

 

८३) जी व्यक्ती तुमच्या चेहऱ्यावर हास्य फुलवू शकते तीच  तुमच्या आयुष्याला अर्थ देऊ शकते. 

 

८४)तुम्ही जोखीम उचलण्याचं भय बाळगू नका. जर तुम्ही जिंकलात तर नेत्तृत्व कराल आणि जर तुम्ही हरलात  तर दुसऱ्यांना मार्गदर्शन करू शकता.    

 

८५) खरा पुढारी एका जन्मात तयार होत नसतो असे माझे मत आहे . पुढारी हा जन्मावा लागतो कारण लोकांची संघटना करणे, कार्याची योजना आखणे , ह्या गोष्टीत काही कठीण नसतात.  भिन्नभिन्न स्वभावांच्या लोकांना त्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा कार्याच्या निमित्ताने एका सूत्रात ओवून  ठेवणे यातच  पुढाऱ्याच्या कर्तृत्वाची खरीखुरी कसोटी असते आणि ही गोष्ट नकळत साध्य होत असते.  प्रयत्नांनी ती कधीच साध्य होत नाही. 

swami-vivekanand-yanche-prerak-vichar
स्वामी विवेकानंद यांचे प्रेरक विचार

 

 

८६)  जर तुम्हाला या जन्मात मोक्ष  मिळवता येत नसेल तरी पुढील जन्मात तो मिळवणे शक्य होईल याला काय आधार आहे?

 

८७) आपल्या हक्कांसाठी,आपल्या अधिकारांसाठी सदैव कितीही चळवळ करीत रहा परंतु हे पक्के लक्षात ठेवा, संबंध देशात स्वाभिमानाची भावना प्रकटपणे जागून जोपर्यंत आपण स्वतःला उन्नत करीत नाही तोपर्यंत फक्त अधिकाऱ्रांच्या प्राप्तीची आशा बाळगीत राहणे हे निव्वळ अलनास्काराचा दिवा स्वप्नासारखे होय. 

 

८८)ज्ञानी माणसासोबत केलेली काही वेळची चर्चा हि हजारो पुस्तके वाचण्यापेक्षा श्रेष्ठ असते. 

 

८९) जीवनात कोणतीही गोष्ट जास्त प्रमाणात मिळाली कि ती विष बनते. मग तो पैसा असो कि ताकद. 

 

९०) शक्यतेची सीमा जाणून घेण्यासाठी अशक्यतेच्या  पुढे जायला हवे. 

 

९१) स्वतःला परिस्थितीचे गुलाम समजू नका. तुम्ही स्वतःचे भाग्यविधाते आहात. 

 

९२) उठा, जागे व्हा! आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुमचे ध्येय तुम्हाला प्राप्त होत नाही. 

 

९३)आपल्याकडे आधीपासूनच विश्वाच्या समस्त शक्ती आहेत, तरी लोक डोळ्यावर हाथ ठेवतात आणि मग आयुष्यात किती गडद अंधार आहे याबद्दल ओरड करतात. 

 

९४) तुमच्या विचारांप्रमाणे तुम्ही घडता. तुम्ही जर स्वतःला दुर्बल समजाल तर दुर्बल बनाल. आणि सामर्थ्यवान समजाल तर सामर्थ्यशाली. 

 

९५) हजार वेळा ठेच लागल्यानंतरच एक चांगलं चरित्र निर्माण होतं . 

 

९६) एका वेळी एकाच गोष्ट करा. असे करीत असतांना आपला पूर्ण आत्मा त्या कामात लावा. आणि बाकी सर्व विसरा. 

 

९७) स्वतःचा हेतू प्रबळ ठेवा. लोकांना जे बोलायचं ते बोलू द्या. एक दिवस हेच लोक तुमचे गुणगान करतील. 

 

९८) चुका  सुधारण्यासाठी ज्याची स्वतःशीच लढाई असते त्याला कोणीच हरवू शकत नाही. 

 

९९) स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळ मिळणार नाही. 

 

१००) कोणाचीही निंदा करू नका. जर तुम्ही कोणाच्या मदतीसाठी हात पुढे करू शकत असाल तर नक्की करा. जर ते शक्य नसेल तर हात जोडा , त्यांना आशीर्वाद द्या आणि त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. 

 

१०१)  जी लोक नशिबावर विश्वास ठेवतात ती लोक भित्री असतात. जे स्वतःच भविष्य स्वतः घडवतात तेच खरे कणखर असतात. 

 

 तर मग मित्रांनो स्वामी विवेकानंद यांचे १०१ प्रेरक विचार (Swami  Vivekanand  १०१ Quotes  in  Marathi) हि पोस्ट तुम्हाला कशी वाटली?  या विषयीचा अभिप्राय आम्हाला कंमेंट मध्ये नक्की कळवा.

शिवाय स्वामी विवेकानंद यांचे विचार  या पोस्टमध्ये कुठला सुविचार तुम्हाला अतिशय आवडला ? कुठल्या सुविचाराने तुमच्या मनाला स्फूर्ती दिली? असा कुठला सुविचार आहे जो तुम्हाला वाटते कि सर्वांनी मनात कोरून ठेवायला हवा? हे सुद्धा आम्हाला कळवा.

आणि हो जर  स्वामी विवेकानंद यांचे १०१ प्रेरक विचार या पोस्टमध्ये आमच्या हाताने काही चुका झाल्या असतील, काही उणीव राहिल्या असतील तर त्या बिनघोरपणे  आमच्या लक्षात आणून द्या. आम्ही त्या दूर करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. 

2 thoughts on “स्वामी विवेकानंद यांचे १०१ प्रेरक विचार । 101 Swami Vivekanand Quotes in Marathi”

Leave a Comment