व पु काळे प्रेरणादायी वाक्ये

नमस्कार मंडळी! मराठी motivation  या ब्लॉग वर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. नेहमीप्रमाणे आजही आम्ही तुमच्यासाठी प्रेरणादायी विचारांचा साठा घेऊन आलो आहोत. मित्रांनो जुन्या काळातील लोक जेव्हा दूरच्या प्रवासाला निघत तेव्हा ते स्वतःसोबत नेहमी शिदोरी ठेवायचे.  

आपले जीवन हा सुद्धा एक खडतर प्रवासचं आहे. या प्रवासात प्रेरणादायी विचारांची शिदोरी आपल्या सोबत असावी याच उद्देशाने आम्ही वेगवेगळ्या पोस्ट च्या माध्यमातून प्रेरणादायी विचार, कथा, कविता तुमच्यापर्यंत असतो. 

मित्रांनो आज आपण व पु काळे प्रेरणादायी वाक्ये  या पोस्ट मध्ये व पु काळे यांच्या विविध पुस्तकांतील विविध प्रेरणादायी वाक्ये बघणार आहोत. आपल्या शाब्दिक चमत्काराने वाचनाला अफू सारखे धुंद करणारे बनवणाऱ्या व पु काळे या किमयागाराविषयी आणि त्यांच्या साहित्याविषयी  आपण नंतर लवकरच परिचय करून घेऊ. पण तत्पूर्वी आपण व पु काळे प्रेरणादायी वाक्ये  या पोस्ट मध्ये त्यांची ही  शब्दांची जादू अनुभवूया.

 

 

 व पु काळे प्रेरणादायी वाक्ये – वपुर्झा 

 

स्वरांच्या निकट राहणारा कलावंत एरवीही स्वराइतका कोमल असावा. त्याने मैफिलीत बेसूर आणि मैफिलीबाहेर असुर नसावं. 

 

‘अंत’ आणि ‘एकांत’ यांपैकी माणूस एकांतालाच जास्त घाबरतो. 

 

खरंतर दासबोधानंतर मराठी साहित्यात एकही ओळ कुणी लिहिली नसती तरी चाललं असतं . तरी इतकी पुस्तकं  निघतात. कारण, अहंकार, मलाही जग समजलंय हे सांगायचा अट्टाहास. 

 

प्रत्येक माणूस समोरच्या माणसाला स्वत:सारखं करण्याची धडपड करतो. जितक्या प्रमाणात समोरचा माणूस आपल्या मनाप्रमाणे वागेल तेवढ्याच प्रमाणात तो समोरच्या माणसावर प्रेम करतो. ह्या स्वरूपाचं प्रेम करणं  हे प्रेमच नाही.ही  स्वतःचीच पूजा झाली. 

 

प्रत्येक माणसाच्या मनात त्याचं  एक जग असतं. ते उद्ध्वस्त होऊ नये ही त्याची धडपड. जे बाहेरचं  जग मानतात ते आतून फुटतात. जे बाहेरचं  जग उद्ध्वस्त झालं तरी चालेल म्हणतात ते सुखी. 

 

अस्थिर माणसे जशी बारमध्ये सापडतात तशी सिद्धिविनायकाच्या रांगेतही. अर्थहीन श्रद्धाही व्यसनासारखीच. जित्याजागत्या माणसांशी संवाद संपला की हे तकलादू आधार शोधावे लागतात. 

 

गप्पा म्हणजे संवाद नव्हे. संवादाचं नातं विचारांशी. 

ग्रंथांशी  मैत्री म्हणजे विचारांची आराधना. 

निर्भेळ विचार म्हणजे आत्मविश्वास. 

बुद्धीची उपासना हीच भक्ती. भक्तीने कृती हीच संस्कृती. 

 

स्वाभाविक गोष्टींवर चिडण्यात अर्थच नसतो. भुंगे जमावेत म्हणून कमळ  फुलत नाही,आणि एखादं  कमळ पकडायचं असं ठरवून भुंगे भ्रमण करीत नाहीत. फुलणं  हा कमळाचा धर्म, भुलणं हा भुंग्याचा धर्म. जाणकारांनी, रसिकांनी कमळाकडे पाहावं, भुंग्याकडे पाहावं आणि फुलावं कसं आणि भुलावं कसं  हे शिकावं. 

 

चालणारा माणूसच फक्त पायाखाली कीड-मुंगीची हत्या होत नाही ना हे बघतो. धावणारा माणूस फक्त तुडवण्याचं काम करीत असतो. 

 

ज्या कार्यात, चळवळीत प्रत्येकाला निश्चित स्वरूपाचं काम करावं लागतं ती चळवळ सगळ्यांना नकोशी असते. 

 

स्वतःच्या समस्येपेक्षा समाज श्रेष्ठ आहे, असं मानलं की जगणं हीच समस्या होते. त्याचप्रमाणे स्वतःच्या अस्तित्वापेक्षा समस्या मोठी आहे असं मानलं तर समस्या कधीच सुटत नाही. 

 

कर्तृत्व अनेक प्रकारचं असतं . द्रव्यार्जनाची शक्ती म्हणजेच पुरुषार्थ नाही. जोडीदारावर अमाप माया करणं, बायकोची शक्ती ओळखणं, तिला सुरेख साथ देणं, तिला आपली साथ सोडावीशी न वाटेल इतकी तिच्या कर्तृत्वाची शान सांभाळणं, हा सगळा पुरुषार्थच. क्षमाभाव, वात्सल्य ही  गुणवत्ता केवळ बायकांची मक्तेदारी नाही. 

 

मला कोणतीही खुर्ची मान्य नाही. अध्यक्षपदाची तर नाहीच. इतरांपेक्षा ही खुर्ची तुम्हाला वेगळ्या भूमिकेत नेते. इतरांपासून वेगळं काढते. ही खुर्ची हितगुज करणारी नाही. ही उपदेश करणारी, आदेश-संदेश देणारी खुर्ची आहे. 

 

मला खुर्चीपेक्षा भारतीय बैठक आवडते. जी डळमळीत होते ती खुर्ची. जी भक्कम असते ती बैठक. आपलेपणाचं  नातं निर्माण करण्याचं सामर्थ्य फक्त बैठकीतच असतं. 

 

राजकारण म्हटलं की  खेळ खलास. दोन मिनिटं शान्त उभं राहायचा तो विषय. 

 

स्पर्श न करताही आधार देता येतो हे ज्याला कळलं त्यालाच ‘पालक’ शब्द समजला. 

 

बेदम पैसा मिळवन ह्याच्याइतकं मिडिऑकर ध्येय दुसरं असू शकत नाही. माणसं जोडायला त्यापेक्षा जास्त बळ  लागतं. 

 

 

संवादाची भूक ही  जिवंतपणाची साक्ष आहे. माणूस आणि जनावर ह्यात हाच फरक आहे. शब्दांचा शोध हा तेवढ्यासाठीच ‘अणु ’च्या  शोधापेक्षा महान आहे. 

 

सौख्याचा कोणता क्षण चिरंजीव झालाय? फक्त आठवणींच्या राज्यातच तो अमर. आणि आठवणी कधीच सुखद नसतात. त्या दुःखाच्या असोत वा आनंदाच्या. दुःखाच्या असतील तर त्यापायी वाया गेलेल्या भूतकाळ आठवतो, आणि त्या आठवणी सुखाच्या असतील तर ते क्षण निसटले, म्हणून त्रास. 

 

सदिच्छा ही नेहमी एकाच माणसाची असते. ती कृतीत आणायची म्हणजे कुणाचं ना कुणाचं सहकार्य लागतं. सहकार्य म्हटलं म्हणजे दुसरी माणसे आली. म्हणजे फिसकटलं. सदिच्छेची योजना झालीच. जी नेहमी फसण्यासाठीच असते.

 

ज्या माणसाला भूकच नाही,अन्नावर वासनाच नाही, त्याला पंगतीमधलं कुठलंही पान चालतं. 

 

दुःख आणि डोंगर ह्यांच्यात साम्य असतं. लांब अंतरावरून दोन्ही गोजिरी दिसतात. एका डोंगराला पार करावं तर त्याच्या मागे दुसरा डोंगर असतोच. तसंच दुःखाचं .  

 वपुर्झा -व पु काळे प्रेरणादायी वाक्ये

 

 

आपलं कुणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं कि समजावं,आपला उत्कर्ष होतोय. 

 

जो लहान मोह टाळू शकतो तोच मोठ्या मोहाकडे पाठ फिरवू शकतो. 

 

नभांगणातल्या चांदण्या मोजायच्या नसतात.आपल्यावर त्यांचं छत आहे, ह्या आनंदात विहार करायचा असतो. 

 

दुबळ्या माणसाला सदिच्छा व्यक्त करण्याचा अधिकारच नसतो. 

 

सवय किरकोळ की गंभीर? ह्या चर्चेत काही तथ्य नाही. तुम्ही जिचे गुलाम होता ती सवय वाईट.   

 

वयानुसार सवयी बदलतात आणि मग ‘वय’ झालं तरी सवय राहते. 

 

खिसेकापूच गर्दीत ओरडतो, ‘खिसापाकीट सम्हालो. लोक अभावितपणे आपली पाकिटं बघतात आणि खिसा कापणाऱ्यांना लोकांचा पाकीट ठेवण्याचा खिसा समजतो. 

va pu kale quotes marathi

 

 

सुरक्षितता आणि स्थैर्य शोधणाऱ्या माणसांना प्रारंभी करार हे वरदान वाटतं आणि करार संपेपर्यंत स्वास्थ्याची चटक लागून आपण गुलाम कधी झालो हे कळत पण नाही. 

 

जेव्हा अभिरुची म्हणजे काय हे समजायला लागतं  तेव्हा माणसाचा जन्म होतो. 

 

रात्र म्हणजे कालचा फळा  पुसून लख्ख करणारं डस्टर. त्या स्वच्छ फळ्यावर आपण कालचेच धडे का लिहायचे? – जो नव्या दिवसाला कोऱ्या मनाने सामोरे जातो, नवा मजकूर लिहितो, तो लेखक नसेल,पण प्रतिभावंत असतो. 

 

जो स्वतः कशातच हरवत नाही, तो माणूस कसला? 

 

सर्वात जीवघेणा क्षण कोणता?  खूप सद्भावनेने एखादी शुभ गोष्ट करायला जावं आणि स्वतःचा काही अपराध नसतांना पदरी फक्त वाईटपणाच यावा, सद्हेतूंचीही शंका घेतली जावी, हा!   

 

प्रश्नाला ‘हेतू’ चिकटल्याचा भास निर्माण झाला की उत्तराला ‘ सेतू’ आलाच.  

 

माणसाने आजूबाजूच्या रोषनाईकडे पाहू नये किंवा विझवलेले  नयेत. ज्याला चालायचं आहे त्याने आपल्या हातातला दिवा जपायचा असतो. 

va pu kale marathi quotes
व पु काळे प्रेरणादायी वाक्ये

 

‘निसर्ग आणि माणसाचं मन यात संवाद असता तर कृत्रिम गर्भधारणा नावाचा प्रकारच संभवला नसता, किंवा बलात्कारातून वंश वाढला नसता.’

 

पुरुषाचं लग्न झालं म्हणजे त्याला आई दुरावते आणि त्याला मूल झालं म्हणजे बायको दुरावते. 

 

माणसं  माणसांना भेटतच नाहीत. वेगवेगळे हेतू एकमेकांसमोर येतात.सावल्या सावल्यांना भेटतात. म्हणूनच हेतुपूर्तता झाली की माणसे एकटी पडतात. 

 

प्रतिक्षेशिवाय उत्कटतेला धार येत नाही. 

 

आपत्ती पण अशी यावी की त्याचा पण इतरांना हेवा वाटावा, व्यक्तीचा कस लागावा. पडून पडायचं तर ठेच लागून पडू नये. चांगलं दोन हजार फुटांवरून पडावं. माणूस किती उंचावर पोचला होता हे तरी जगाला समजेल. 

 

सगळे वार परतवता येतात. अहंकारावर झालेला वार परतवता येत नाही आणि पचवताही येत नाही. 

 

ध्येय्यासाठी वेडे होणारे पुरुषच. प्रेम करतानाही बायका हातचं राखून प्रेम करतात आणि त्यांनी जेवढं दिलंय त्याला आपण ‘सर्वस्व बहाल केलंय रे’ असं म्हणत पागल होतो. 

 

वपुर्झा -व पु काळे यांचे विचार
व पु काळे प्रेरणादायी वाक्ये

 

 

पोरकेपणा  म्हणजे काय? आपली व्यथा इतरांना न समजणं हाच पोरकेपणा. 

प्रामाणिकपणा शिकवण्याची बाब नव्हे. तो रक्तात असावा लागतो. त्यात टक्केवारी नसते. तो असतो किंवा नसतो.  

खर्च झाल्याचं दुःख नसतं . हिशेब लागला नाही की त्रास होतो. 

 

बायको कशी हवी राव? आपण बिथरलो तर आपल्याला सावरणारी हवी, स्वतःच बिथरणारी नको. थोडक्यात म्हणजे पेपर वेट सारखी हवी. खालचे कागद फडफडतील, पण ती स्वतः गडगडणार नाही, चळणार नाही आणि खालचे कागदही उडू देणार नाही. 

 

एखादी वस्तू, मनात कोणताही संभ्रम निर्माण न करता आवडते, तेव्हाच ती स्वीकार करण्यायोग्य मानावी . ती वस्तू म्हणजे एखादा विचारही असेल. 

 

तुम्ही नुसतं गुणी असून चालत नाही. ते गुण खळबळ न करता मान्य करणारा समाज तुमच्याभोवती जमणं  याला महत्व आहे.  

 

माणूस केव्हा फसतो सांगू? आपल्याला काय मिळवायचं होतं  हे जेव्हा माणसाला समजत नाही तेव्हा तो फसलेला  असतो. 

 

स्वतःचे अनुभव उगीचच इतरांना सांगू नयेत. इतरांना एक तर ते अनुभव खोटे वाटतात किंवा आपण खोटे आहोत, असं वाटायला लागतं. 

व पु काळे प्रेरणादायी वाक्ये marathi

 

 

गैरसमज हा कॅन्सरसारखा असतो. तिसऱ्या अवस्थेत पोचल्यावर तो आपलं स्वरूप प्रकट करतो. 

‘मरणाची भीती का वाटते सांगू का ?’ एकट्याने जायचं म्हणून वाटते. बरोबर जिवाभावाचे दोन चार मित्र असते तर मरणाचं काही वाटलं नसतं . 

 

 

मित्रांनो आतापर्यंत आपण व पु काळे प्रेरणादायी वाक्ये  या पोस्ट मध्ये व पु काळे यांची प्रेरणादायी वाक्ये पाहत आहोत.मोजक्या शब्दांत बराच विचार करायला भाग पाडणारी शैली वापरून आपले लेखन फुलवत नेताना व पु काळे यांनी सहजच मानवी मनाचा जो अभ्यास  आपल्यासमोर मांडला  आहे तो आपल्याला दैनंदिन जीवनात खर्च फार उपयुक्त ठरणार आहे. 

व पु काळे यांनी केलेलं मानापमानाचं विश्लेषण असुद्या किंवा प्रेमाची, संसाराची केलेली व्याख्या असुद्या या साऱ्यांतून ठळकपणे समोर येणारी त्यांची निरीक्षण शक्ती आपल्याला अचंबित करून सोडते. व पु काळे प्रेरणादायी वाक्ये  या पोस्ट मध्ये आपण त्यांच्या या विचारांच्या जगात फेरफटका मारत आहोत. आजच्या या पोस्ट मध्ये आपण व पु काळे यांच्या ‘वपुर्झा’ या पुस्तकातील काही आवडलेली वाक्ये पाहत आहोत.चला तर  व पु काळे प्रेरणादायी वाक्ये  या पोस्ट मध्ये पुढे जावूयात ….. 

 

 

  

 

भीतीमधून फिलॉसॉफी निर्माण होते असं  मी समजत होते. पण तस नाही. स्वार्थी आणि निष्क्रिय माणूस जास्त चांगलं तत्वज्ञान सांगू शकतो.

 

नियंत्रणाचा मार्ग पोटाकडून मेंदूकडे जातो. महाराज,पोट गहाण पडलं कि, मेंदू आपोआप गुलाम होतो. 

 

आपण रामायण काळातील ‘राम’ होऊ शकणार नाही, पण याचा अर्थ आपण धोबी व्हायलाच हवं का?

 

घराला आणि माणसांना सौन्दर्याचा स्पर्श आणि जाणीव कायम हवी. 

 

दुसऱ्या माणसाला मदत करणं म्हणजे स्वतःच बळ  आजमावनं. शारीरिक,मानसिक,सामाजिक आणि ऐपतीनुसार आर्थिक. परोपकार म्हणजे आत्मबळ वाढवण्याचा राजमार्ग. 

 

मनस्ताप ही अवस्था अटळ. पण आपणच संघर्ष टाळू शकलो तर… तडा गेलेल्या काचेच्या भांड्याचे दोन्ही तुकडे जागच्या जागी राहतात. त्यातून पाणी पिता नाही आलं तरी त्यात फुलं ठेवता येतात. 

व पु काळे -वपुर्झा -प्रेरणादायी वाक्ये
व पु काळे प्रेरणादायी वाक्ये

 

 

धोब्याच्या पातळीवरच्या माणसाचं समाधान करण्याच्या नादात रामचंद्रांना पण सिंहासनाची पातळी सोडून घाटावरच्या धुण्याच्या दगडाची पातळी गाठावी लागली.कुणाच्या समाधानासाठी कुणाचा अंत पाहायचा हे माणसाने ठरवायला पाह्यजे. 

 

माणसानं जसा कायदा हातात घेऊ नये त्याप्रमाणे मेडिसिनसुद्धा. 

 

दुःखात होरपळलेल्या माणसाला शब्दांचा चेहरा दिसत नाही आणि त्याचा वासही ओळखता येत नाही. 

 

बेदम कष्ट करून पै पै मिळवावी, असं मला अनेकदा वाटतं . सिंहगढ पाहायचा असेल, तर तो पायी चढत चढतच बघायला हवा. मोटारीचा रस्ता वरपर्यंत केला किंवा हेलिकॉप्टरमधून उतरलात की  विज्ञानाचा चमत्कार समजतो, इतिहास समजत नाही.

 

रंगांनी ओथंबलेली छायाचित्रे थोड्याच वेळात जुनी का वाटतात? आणि स्वप्न कायम टवटवीत का वाटतात? तर स्वप्नात एक जास्तीचा रंग असतो. त्याच नाव अंतरंग. 

 

भूतकाळात झालेल्या अपमानांचे अश्रूच भविष्यातल्या पायवाटेवर शिंपडायचे असतात. म्हणजे अनोळखी पायवाट त्या सड्यामुळे परिचयाची होते. नव्याने होणाऱ्या अपमानांची शल्य बोथट होतात. 

 

सगळ्या स्त्रियांच्या मागे हात धुवून लागायला नियतीला वेळ पुरात नसावा. म्हणूनच तिने नवरा नावाचा प्राणी निर्माण केला. तिच्याइतकाच लहरी. ‘असं का? ‘ -ह्या प्रश्नाच समाधानकारक उत्तर न देणारा. 

 

जिथं उमटलेला ठसा जतन केला जाईल, तिथंच शिक्का उमटवावा. नाहीतर ते निवडणुकीचे शिक्के होतात. 

 

नेमून दिलेल्या कामांना मी स्वीकारलेल्या कामांचे गणवेश चढवले. काम आणि कर्तव्य ह्यांत मग फरक राह्यला नाही.. 

 

आयुष्यात नुसती गुणवत्ता उपयोगी पडत नाही. वेळेचं भान ठेवणं महत्वाचं. वेळेशी आणि काळाशी फटकून वागणाऱ्या गुणवान माणसांचा आक्रोश, म्हणजे इतिहास. 

 

नाविन्याइतकी चट्कन शिळी होणारी दुसरी कोणतीही वस्तू नसेल. 

 

कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं. कारण, आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही. 

 

ज्या मनाला आपण हळवं समजतो, ते तुफान बलदंड आणि मस्तवाल असतं. त्याला पर्याय चालत नाही. त्याला हरवलेली वस्तूच हवी असते. आणि दुरावलेली व्यक्ती. 

 

कुणी कुणासाठी किती त्याग केला ह्याचा हिशोब आला की आंब्याच्या झाडाने आपला मोहर येण्याचा काळ संपला हे जाणावं. 

 

ज्या माणसाला सतत वाटतं की, आपल्याला गर्व नाही, तेव्हा ते तसं वाटणं हाही गर्वचाच  एक भाग असतो. 

 

ज्या गोष्टीवर प्रेम करण्यात रिस्क नाही अशा गोष्टींवर प्रेम करणारी माणसं खूप असतात. खरं  ते प्रेमचं नाही.त्याला मालकी म्हणतात. कारण ते प्रेम सुरक्षित असतं . तिथं समर्पणाचा प्रश्न उद्भवत नाही. 

 

कोंब आणि माणूस सारखाच. बी जमिनीत सुरक्षित असतं . अंकुर उघड्यावर पडतो. कुणीतरी ओरबाडले, कुणाचातरी पाय पडेल, अशा दहशतीत त्याचा प्रवास सुरु होतो. माणसाचंही तसंच. आईच्या गर्भात मूळ सुरक्षित असतं. श्वासही घेण्याचे कष्ट नाहीत. पोटापाण्याचा प्रश्न नाही. जन्म झाला की सगळं सुरु. 

 

आपण डावीकडून उजवीकडे लिहितो आणि वाचतो. दिवसेंदिवस दोन्ही गोष्टी उजवीकडे झुकाव्यात म्हणून.. मी मात्र एकाच पान,म्हणजे कागद उजवीकडून डावीकडे वाचतो. तो कागद म्हणजे पंचतारांकित हॉटेलातलं  ‘मेनूकार्ड’. त्यातला डावीकडे छापलेला पदार्थ आपण खातो तर उजवीकडचा आकडा आपल्याला खातो. 

 

साहित्य हे निव्वळ चुन्यासारखं असतं . त्यात आपल्या विचारांचा कात टाकल्याशिवाय आपल्या आयुष्याचं पान  रंगत नाही. 

 

संसारातला नवरा बायकोचा चार्म का जातो? तर तिथं प्रतीक्षा हि अवस्थाच नसते. एकमेकांना गृहीत धरलं जातं . सुख हाताशी असतं  म्हणूनच हातातून निसटतं. संसारातील उदासीनता हि निव्वळ अभिरुचीवर अवलंबून नाही, प्रतिक्षेची अनुपस्थिती हेही एक कारण.    

 

आपलं सर्वात मोठं दुर्दैव कोणतं  माहित आहे? स्वतःला कोणतीही संधी न मिळालेली माणसं चारित्र्याच्या व्याख्या ठरवतात, हे!

 

संसारात अधूनमधून बाईला ‘गांधारी’ व्हावं लागतंच. समजूतदार वृत्ती आणि पत्नीला पुरुषानेच सांभाळायची असते -ह्या रास्त जाणिवेच्या बाबतीत नवरा जर ‘धृतराष्ट्र’ असेल तर तो आपल्या पत्नीला जबरदस्तीने ‘गांधारी’ बनवणाराच. 

 

आयुष्य हे समूहगीतासारखं आहे. समूहगीत गायचं म्हणजे सर्वांना लावता येतील ते सूर आणि झेपेल ती पट्टी निवडावी लागते. एकट्याने गायचं तेव्हा आपल्याला हवा तो सूर आपला आहेच. 

 

दुसऱ्या माणसाशी  युद्ध करायला फार बळ लागत नाही. स्वतःशीच सामना  करणं भयानक, कठीण आणि स्वतःच्या माणसांजवळ पराभव मान्य करणं त्याच्यापेक्षा कठीण. 

 

ह्या दुर्दैवी देशात शेतकरी सवलती पिकवतात, सरकार आश्वासनं  पिकवतं आणि सो कॉल्ड नेते घोषणांचे मळे लावतात. 

 

सुविचारांची वही ही  नंतर शोभेची वस्तू होते. 

 

व पु काळे प्रेरणादायी वाक्ये

 

 

वाचलेल्या पुस्तकाबद्दल आपण कुणाशीतरी बोलतो तेव्हाच त्या पुस्तकाचं खरं  वाचन सुरु होतं . नाहीतर बाईने केसात गजरा माळावा तसं  त्या पुस्तकाचं होतं. तिला स्वतःला तो गजरा कधीच दिसत नाहीत. गजरा आहे, इतकाच समाधान. त्याच गजऱ्याबद्दल कुणीतरी बोललं की तिला तो गजरा दिसतो. 

 

संसार क्रिकेटसारखा असतो. विकेटसमोर उभं राह्यलं की  प्रत्येक बॉलचं  काहीतरी करावं लागतं . ‘भूत, भविष्य, वर्तमान म्हणजे तीन स्टम्प्स’ असं एक क्रिकेटीअर म्हणतो. बॉलर  म्हणजे काळ. टाकलेला प्रत्येक चेंडू काळावर सोपवायचा नाही. तो तुम्हाला अडवावा  लागतो. सोडून देणं, थांबवणं, तोलावं यांपैकी काहीतरी एक करावंच लागतं. तुम्ही जर बॉलर एन्ड ला असाल तर साथीदाराबरोबर पळापळ करावी लागते.टेनिस बॅडमिंटन किंवा हुतूतूच्या खेळाप्रमाणे इथं पुनर्जन्म नाही. साथीदार आउट होऊ नये, म्हणून जपायचं असतं 

 

प्रेमात पडलेली व्यक्ती फक्त प्रियकर असते. ती ‘प्रिय’ असेल तेच बोलते. प्रिय असेल तेवढच बघते,ऐकते, स्पर्शून घेते. ‘प्रियकर’ म्हणजे आदर्शवाद. ‘माणूस’ म्हणजे वास्तववाद.  

 

‘काय सेवा करू?’ अशी भाषा वापरणारी माणसं  स्वतःची सेवा करून घेणारी असतात. 

 

आजचा खरा धर्म ‘पद , पैसा  आणि प्रतिष्ठा’ ह्या तीन शब्दांतच टिकलाय. 

 

‘माणूस बिघडला’ याचा थोडक्यात अर्थ ‘तो मी म्हणतो तसा वागत नाही’ हाच आहे. 

 

पत्नीला स्पर्श करताक्षणी तिला ‘कात’ टाकायला लावण्याचं सामर्थ्य नवऱ्याजवळ नसेल तर ती ‘जकात’च. 

 

भ्याड माणसांचा कळप आपोआप तयार होतो. 

 

पत्नीचा साथीदार होण्याऐवजी तिचा वापर करणारा पुरुष म्हणजे पत नसलेला पती. 

 

Who  is wrong  ऐवजी what  is wrong  ह्याचाच शोध घ्यायचं दोघांनी ठरवलंत तर संसार बहरलाच पाहिजे. 

 

पशु माणसापेक्षा श्रेष्ठ आहेत, कारण ते इन्स्टिंक्टवर जगतात. बेदम वजन वाढलाय म्हणून एखाद्या घारीला उडता येत नाही किंवा एखादा मासा बुडाला असं कधी ऐकलस का?

 

संशयाने एकदा समजूतदारपणाची वाट अडवली की  माणूस सत्य जाणून घेण्याचा खटाटोप करीत नाही.

 

 आकाशात जेव्हा एखादा कृत्रिम ग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर त्याला पिटाळून लावेपर्यंतच सगळा संघर्ष असतो….. त्याने एकदा स्वतःची गती घेतली की उरलेला प्रवास आपोआप होतो…..असंच माणसाचं आहे. समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो….. पण एकदा अपेक्षित उंचीवर पोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते…..’

 

 

समारोप 

 

मित्रांनो आज व पु काळे प्रेरणादायी वाक्ये  या पोस्ट मध्ये आपण ‘ वपुर्झा’ या पुस्तकातील व पु काळे यांचे प्रेरणादायी विचार पाहिलेत. व पु काळे प्रेरणादायी वाक्ये  ही  पोस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्हाला व पु काळे यांच्या आणखी कुठल्या पुस्तकातील सुंदर वाक्ये वाचायला आवडतील? हे आम्हाला नक्की कळवा. 

सोबतच व पु काळे प्रेरणादायी वाक्ये  या पोस्ट मध्ये काही सुधारणा सुचवायचे असतील, काही वाक्ये आणखी जोडायची असतील जी आमच्या ध्यानात राहिली नाहीत ती सुद्धा कळवा.व पु काळे प्रेरणादायी वाक्ये  ही पोस्ट अधिक चांगली बनवण्यासाठी तुमचे सहकार्य आवश्यक आहे.

धन्यवाद. 

Leave a Comment