नियमित वाचन करण्याचे हे लाभ तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या वाचनाचे महत्व | Importance of Reading 

मित्रांनो असं म्हटलं  जातं की  “ The Person who dont read, has no advantage over the person who can’t read.” म्हणजेच जो व्यक्ती वाचन करीत नाही तो वाचता न येणाऱ्या अशिक्षित माणसासारखाच आयुष्यात येणाऱ्या वेगवेगळ्या संधी गमावत असतो. 

आजपर्यंत या ना त्या मार्गाने आपण बुद्धिवादी, तत्वज्ञ आणि इतर महान व्यक्तिमत्वे यांच्यामार्फत वाचनाचे महत्व ऐकतच आलो आहोत. आज मी या पोस्ट च्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्या जीवनात वाचनाचे महत्व काय आहे ? वाचनाचे फायदे काय आहेत? या साऱ्यांचा पुनरुच्चार करणार आहे. कारण मानवी मनाचा स्वभाव आहे ते वाईटाकडे लवकर वळतं मात्र चांगल्या गोष्टी त्याला पुन्हा पुन्हा सांगाव्या लागतात. 

मानवी जीवनात वाचनाचे महत्व जाणून घेताना आपण अगदी वस्तुनिष्ठपद्धतीने आपल्याला वाचनातून काय काय फायदे मिळतात ते आधी पाहुयात.  

 

वाचनाचे महत्व | Importance of Reading  

 

ज्ञान संपादनासाठी  

 

दैनंदिन जीवनात वाचनाचा होणारा सर्वात मोठा फायदा म्हणजे ज्ञान संपादन होय. आज इंटरनेटच्या युगात आपल्या विविध सोशल मीडियाद्वारे लोक ज्ञान पाजळताना दिसत असली तरी अजूनही ज्ञान मिळवण्यासाठी ग्रंथांना आणि वाचनाला पर्याय झालेला नाही. आणि तो होणारही नाही. 

आज कुठलाही विषय असूद्यात त्याबद्दल पुस्तके उपलब्ध आहेत. अगदी भाजी बनवण्यापासून ते विमान बनवण्यापर्यंतच्या जवळ जवळ सगळ्याच विषयांवर आपल्याला पुस्तक पाहायला मिळते. कुठल्याही विषयाची अगदी मुळातून माहिती घेण्यासाठी पुस्तकासारखा दुसरा पर्याय नाही. हा! त्यांचे वाचन करण्यासाठी वेळ देणेही महत्त्वाचे आहे. 

आता आपल्या मनात येईल की  जे पुस्तकात आहे ते तर आम्ही युट्युब आणि इतर सोशल मीडिया वरून शिकू शकतो. मात्र खरी गम्मत म्हणजे सोशल मीडियावर ज्ञानदान करण्याच्या नावाखाली लोक फक्त फॉलोवर गोळा करण्यासाठी बसलेले असतात. त्यांना प्रसिद्धी हवी असते तेव्हा त्यासाठी ते जे लोकांना एकाच आहे त्याबद्दल वरवरची थोडी माहिती गोळा करून बोलत असतात. 

मात्र पुस्तकाचं तसं  नसतं. एक पुस्तक लिहिण्यागोदर बऱ्याच लेखकांनी त्यांच्या क्षेत्रात आयुष्याची कितीतरी वर्षे घालवलेली असतात.अथवा निदान त्यांच्या क्षेत्रात ते अव्वल तरी असतात. फक्त लोकांना माहिती हवी म्हणून कुठूनही गोळा करून ते माहिती समोर देत नाहीत तर त्यांच्या अनुभवच एक प्रकारे ते पुस्तक रूपाने आपल्याला देत असतात. म्हणून ज्ञान मिळवण्यासाठी पुस्तकाला आणि ओघानेच वाचनाला तेवढाच उपयुक्त ठरणार दुसरा पर्याय नाहीच. 

एलोन मस्क यांना एका पत्रकाराने “तुम्ही रॉकेट बनवणे कुठे शिकलात?” असा प्रश्न केला असता त्याने उत्तर दिले की  “ मी बरीच पुस्तके वाचलीत.”म्हणजे तुम्ही अगदी अनभिज्ञ असणाऱ्या क्षेत्रावरही  हुकूमत गाजवू शकता जर तुमचे वाचन दांडगे असेल तर. 

 

Also, Read

 

 

मेंदूला व्यायाम 

 

Reading is to the mind what exercise is to the body

                                                     – Joseph Addison  

 

सतराव्या शतकातील इंग्रजी लेखक जोसेफ एडिसन यांनी म्हटल्याप्रमाणे ज्याप्रकारे व्यायाम शरीराला सुदृढ ठेवण्यासाठी उपयुक्त असतो, त्याचप्रमाणे वाचनाने मेंदू सुदृढ राहतो. वाचन हा एक प्रकारे मेंदूचा व्यायामच आहे. बर वाचनाने मेंदूमध्ये असे काय बदल होतात मग? हा प्रश्न आपल्याला पडेलच. 

वाचनाचा आपल्या मेंदूवर काय परिणाम होतो याबद्दल मानवी मनाला सुरुवातीपासूनच कुतुहूल राहिलेले आहे. हा परिणाम पाहण्यासाठी बऱ्याच  वेगवेगळे प्रयोग करून पाहिलेत. संशोधनांनी हे सिद्ध केलं आहे कि वाचन मेंदूतील जाळ्यांना उद्दीपित करते  त्यांना बळकट बनवते. 

एका प्रयोगामध्ये संशोधकांनी काही लोकांना एक कादंबरी वाचायला दिली. आणि ती वाचत असतांना त्यांच्या मेंदूच्या प्रतिक्रियांचे निरीक्षण केले. कादंबरी मध्ये जेव्हा एका विशिष्ट क्षणाला ताण निर्माण होत होता त्यावेळी मेंदूची त्याला प्रतिक्रियाही तेवढीच बळकट मिळत होती. थोडक्यात बोलायचे झाल्यास वाचनाने मेंदू असे काही विकर स्रवत होता जे त्याने खऱ्या परिस्थितीत स्रवले असते. 

आपला मेंदू use it or lose it तत्वावर कार्य करतो. आठवणी, अभ्यास काही असो त्यांचा पुनर्वापर झाला नाही, त्यांना उजाळा दिल्या गेला नाही की  ते सार आपल्या स्मृतीतून नष्ट होत. म्हणून मण्डूला नियमित व्यायाम देणं गरजेचं आहे. 

 

 

एकाग्रतेत वाढ होते. 

 

नियमित वाचनाचा आणखी एक महत्वाचा फायदा म्हणजे वाचनाने एकाग्रता वाढते. आज सोशल मिडीआयने बरबटलेल्या या जगात आपल्या एकाग्रतेचा कालावधी कमी कमी होत चालला आहे. १५-३० सेकंदांचे विडिओ पाहून पाहून एखाद्या गोष्टीवर आपले मन केंद्रित करण्याची शक्तीही १५- ३० सेकंदाचीच उरात आहे आता. 

एकावेळी अनेक काम करीत जगण्याची आपल्याला लागत असलेली सवयसुद्धा आपली केंद्रित होऊन काम करण्याची शक्ती नष्ट करीत आहे.हे असे असतांना आपल्याला फक्त वाचनच वाचवू शकते. नियमित वाचन करणे आणि ध्यान करणे या एकमेकींना पूरकच गोष्टी आहेत. 

ज्यावेळी आपण एखादे पुस्तक वाचत असतो त्यावेळी आपण त्यातील मुख्य विषय नेहमी डोक्यात दहरुन समोर जात असतो. वाचन चालू असतांना पुस्तकाच्या मुख्य विषयाशी निगडित गोष्टींसाठी आपली शोधयात्रा सुरु असते. आपण पूर्णतः सजग असतो. हि सजगता एक प्रकारे ध्यानधारणाचं आहे. 

एखादी कादंबरी वाचतांनासुद्धा तेच घडते. एरवी काही क्षण एका ठिकाणी थांबणारे आपले मन एखाद्या कादंबरीच्या कथानकात ते काही गुंतून जाते की  वेळ कसा निघून गेला हे आपल्याला काळात नाही.

आणि वाचलेलं बरच काही लक्षातही असतं. मृत्युंजय बाबत तर हि बाब मला वैयक्तिकरित्या जाणवलेली आहे. मला अजूनही आठवते की  सहसा १० -१५ मिनिटे एका ठिकाणी न बसणारा मी जवळ जवळ सलग ४-५ तास खुर्चीला चिकटून बसलो होतो. 

 

 

संवाद कौशल्यात वृद्धी 

 

ज्यावेळी आपण वाचन करतो त्यावेळी नवे शब्द , नव्या संकल्पना आपल्या डोक्यात रुजू होतात. हे नव्याने आपल्या डोक्यात निर्माण झालेले विचार आपल्याला कुठल्याही परिस्थितीत स्वतःला योग्यरीत्या प्रदर्शित करण्यास मदत करतात. 

आपले संवाद कौशल्य सुधारण्यास वाचन कसे मदत करते याचा आपण एखाद्या व्यक्तीच्या उदाहरणावरून अभ्यास करू. कल्पना करा की  तुम्ही एखाद्या कार्यक्रमाला गेलात आणि तेथे सगळे अनोळखी आहेत. मात्र संवाद हि मानवी मनाची भूक आहे. ती भागवण्यासाठी लोक एकत्र येतीलच. मग लाख असो कि नसो. 

आता साधारणतः लोकांच्या बोलण्याचा विषय असतो सध्याची परिस्थिती. देशात काय चाललंय, जगात काय चाललंय? यावरच सहसा चर्चा रंगतात. मग अश्या ठिकाणी जर तुमचे वाचन भरपूर नसेल, तुमच्याकडे माहिती नसेल तर आपण आपोआपच समूहामध्ये फक्त एखाद्या मूकपत्राची भूमिका घेऊन ऐकत राहतो. 

त्याच ठिकाणी जर आपण वृत्तपत्रे, पुस्तके, मासिके अश्या वेगवेगळ्या गोष्टींतून जगाची, आजूबाजूची माहिती ठेवली तर आपल्या मनाला ना पटणाऱ्या मुद्द्यांचा प्रतिवाद आपण करू शकतो.सोबतच आपली मते मांडून काही मित्रही कमावू शकतो. कारण अश्या ठिकाणी first  impression  is  last  impression  असते.  

मानवाच्या सांसारिक जीवनातही वाचनाचे खूप महत्व आहे. एक चांगला वाचक मानसिकरीत्या आधीच प्रत्येक संकातून पार झालेला असतो. कुठल्या बाबीला कसे हाताळावे याची त्याला पुसत का असेना पण कल्पना आलेली असते. 

संशयातून संसार उद्ध्वस्त होता होता वाचवणाऱ्या नायकाविषयी एखादी कथा कादंबरी आधीच वाचली असणारा व्यक्ती स्वतःच्या जीवनातही त्या कथेतील सूत्रे आजमावून पाहतोच.निदान त्याला असल्या समस्येपासून दूर कसे राहायचे हे तरी कळलेलं असते.

किंवा अश्यावेळी स्वतःच्या मनाला कसे सांभाळायचे, जोडीदारावर काय परिणाम होऊ शकतो याची जाणीव त्याला असते. त्यामुळे त्याचा संसार थोडाबहुत तरी सुरक्षित असतो. 

स्त्रीवादी साहित्याची ओळख असणारा माणूस आपल्या पत्नीला कमी लेखनार नाही.त्याला सध्याच्या परिस्थितीची जाणीव आणि जगात चालू असणाऱ्या चळवळीची माहिती असतांना तसे करण्यासाठी त्याचे मानाचं ग्वाही देणार नाही.  

 

Also Read

 

 

 

मनोरंजन 

 

मनोरंजनाच्या क्षेत्रात वाचनाचे महत्व तर अनन्यसाधारण आहे. आज मनोरंजनासाठी अगणित साधने उपलब्ध असली तरी वाचनासारखा दुसरा उपयुक्त प्रकार नाही. कितीतरी चित्रपट मुळात अगोदर कादंबरी स्वरूपात प्रकाशित झालेले आहेत.

त्यामध्ये जगप्रसिद्ध असणारी हॅरी पॉटर ची पुस्तके तर फार गाजलीत. मारवेल द्वारे निर्मित विज्ञानकथा या मुळात आधी कॉमिक्स च्या स्वरूपात प्रकाशित झाल्या. 

कथा, कादंबरी, काव्य आपल्याला एका वेगळ्याच दुनियेचा फटका मारून आणते. प्रवासवर्णने आपल्याला घरबसल्या जगाची सैर घडवून देतात. प्र के अत्रेंसारखे लेखक त्यांच्या विनोदातून सोज्वळ निरागस आणि निखळ असा आनंद मिळवून देतात. मनोरंजनाच्या नावाखाली जाहिराती विकल्या जात असतांना वाचनच आपल्ले निखळ मनोरंजन करू शकते. 

 

 

समारोप 

 

मित्रांनो आज आपण वाचनाचे महत्व | Importance of Reading  या पोस्ट च्या माध्यमातून मानवी जीवनात वाचनाचे महत्व काय आहे? नियमित वाचनाचे फायदे काय आहेत? वाचन केल्याने आपल्या जीवनात काय आमूलाग्र बदल होऊ शकतात याबद्दल थोडक्यात माहिती घेतली. 

पाहतो म्हटले तर वाचनाचे महत्व | Importance of Reading हि पोस्ट आपल्याला आणखी माहितीपूर्ण बनावट आली असती. मात्र वाचनाने ज्यांच्या जीवनाची दिशा आणि दशा बदलली त्यातल्या काही महान व्यक्तिमत्वांविषयीआपण एक वेगळी पोस्ट नंतर पाहणारा आहोच तर याक्षणी वाचनाचे महत्व आणि त्यातून मिळणारे फायदे एवढ्यावरच थांबावे लागेल. 

मंडळी वाचनाचे महत्व | Importance of Reading  हि पोस्ट तुम्हाला कशी वाटली? या पोस्ट मध्ये दिलेल्या मतांशी तुम्ही सहमत आहेत का?  तुमच्या जीवनात पुस्तकांनी, वाचनाने काही बदल घडवला का? असल्यास तुमचा संतांचा अनुभव आम्हाला नक्की कळवा. आम्ही येणाऱ्या पोस्ट मध्ये त्याचा समावेश करू जेणेकरून इतर वाचक वर्गासाठी तो उपयुक्त ठरेल. 

आणि हो वाचनाचे महत्व | Importance of Reading    या पोस्ट मध्ये तुम्हाला काही सुधारणा सुचवायचे असतील तर नक्की सुचवा. हि पोस्ट अधिक  उपयुक्त बनवण्यासाठी तुमची मदत आवश्यक आहेच. 

धन्यवाद.  

2 thoughts on “नियमित वाचन करण्याचे हे लाभ तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या वाचनाचे महत्व | Importance of Reading ”

Leave a Comment