या आहेत मराठीतील प्रसिद्ध कादंबऱ्या । गाजलेल्या मराठी कादंबरी pdf

नमस्कार मित्रांनो !

मराठी motivation  या ब्लॉग वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे.मित्रांनो वाचकवर्गासाठी आज या पोस्ट च्या माध्यमातून आम्ही एक प्रकारे मेंदूला मेजवानीच घेऊन आलो आहोत.

 

आज गाजलेल्या मराठी कादंबरी pdf (Best marathi novels to read)या पोस्ट च्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत मराठीतील आजपर्यंतच्या दुर्मिळ आणि गाजलेल्या मराठी कादंबरी pdf  स्वरूपात पोचवणार आहोत.

 

चला तर मग वेळ न दवडता तुम्हाला हव्या असणाऱ्या कादंबरी लगेच डाउनलोड करा आणि वाचनाचा आनंद घ्या. 

 

 

गाजलेल्या मराठी कादंबरी pdf 

 

 

ययाती 

 

गाजलेल्या मराठी कादंबरी(Best marathi novels to read) पाहत असताना ययाती चा समावेश तर व्हायलाच हवा. माय मराठीला ज्ञानपीठ मिळवून देणारी ही  कादंबरी. वि.स. खांडेकर  लिखित ‘ययाती’ ही  एक पौराणिक कथावस्तूवर आधारित कादंबरी आहे. या कादंबरीमध्ये वि.स. खांडेकर यांनी कुरु वंशाचा पूर्वज असणाऱ्या ययाती या राजाची कहाणी सांगितली आहे. 

मृत्यूची भीती, खऱ्या प्रेमपासून वाट्याला आलेला वियोग, मनाची अतृप्तता आणि अश्या वेळी मिळालेली कुसंगत .त्यात जडलेलं दारूचं व्यसन. आणि मग त्यातून निर्माण झालेली अनियंत्रित वासना. हे सगळं ययाती या कथेच्या नायकाला आपल्यासमोर एकप्रकारे खलनायक म्हणूनच उभं करतो. 

त्याचवेळी दुसरीकडे आपल्या पहिल्या प्रेमाच्या भंगामुळे संतप्त देवयानी आपल्या सांसारिक जीवनाचं कस वाटोळं करते. निस्वार्थ पेम म्हणजे काय? त्याला कास समर्पित व्हावं याच मूर्तिमंत उदाहरण कास असावं ? हे आपल्याला शर्मिष्ठा दर्शवून देते 

कच आपल्याला एक परिपूर्ण मानव कसा असावा? ध्येयासक्ती कशाला म्हणतात? इत्यादीं त्याच्या जीवनातून जगून दाखवतो. थोडक्यात मानवी जीवनातील महत्वाच्या प्रत्येक पैलूला आपल्या डोळ्यासमोर मांडणारी हि एक अद्भुत कादंबरी आहे.  

 

ययाती कादंबरी pdf 

 

 

 

मृत्युंजय 

 

गाजलेल्या मराठी कादंबरी pdf (Best marathi novels to read) या पोस्ट मध्ये आता आपण मृत्युंजय या कादंबरी विषयी थोडक्यात माहिती घेऊया. मृत्युंजय हि शिवाजी सावंत लिखित कादंबरी आहे. हीसुद्धा एक पौराणिक कादंबरी आहे. महाभारतातील कर्णाची ही  एक प्रकारे शोकांतिका आहे. 

ही  कादंबरी आपल्याला एकीकडे कर्णाचे जीवन स्पष्ट करीत असतांनाच दुसरीकडे महाभारताचे युद्ध, त्याची कारणे  आणि त्याचे झालेले परिणाम, त्या युद्धातील बारीकसारीक अनेक घडामोडींकडे लक्षपूर्वक बघायला हि कादंबरी भाग पाडते. 

कर्णाच्या स्वभावातील ज्या चुकांवर गेली हजारो वर्षे लोक बोट ठेवत आले त्या चुकांचा कर्णाच्या मानसिकतेतून शिवाजी सावंत यांनी केलेले स्पष्टीकरण खरंच मार्मिक आहे. ही  कादंबरी आपल्याला कर्णाच्या व्यक्तिमत्वातील अनेक दुर्लक्षित पैलूंविषयी माहिती देते. 

एक मित्र, एक शिष्य, एक भाऊ, एक पुत्र, एक प्रियकर, एक पिता, अश्या अनेक भूमिका अगदी योग्यरीत्या पेलणारा कर्ण या कादंबरीमध्ये श्रीकृष्णाच्या बरोबरीच्या पदाला पोहचलेला आढळतो. 

 

मृत्युंजय कादंबरी pdf 

 

Also Read 

 

 

 

छावा 

 

गाजलेल्या मराठी कादंबरी (Best marathi novels to read)च्या यादीमध्ये पुढचा क्रमांक आहे तो म्हणजे ‘छावा’ या कादंबरीचा. छावा ही  सुद्धा शिवाजी सावंत यांचीच साहित्यकृती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी यांच्या जीवनावर आधारित ही  कादंबरी आहे. 

मराठ्यांनी इतिहास घडविला पण तो लिहून ठेवला नाही. त्यामुळे  ज्यांनी पुढे इतिहासलेखन केले त्यांनी आपल्या हितानुसार त्या इतिहासाला कलाटणी दिली. काळाच्या ओघात काही खरे पुरावे नष्ट जखले तर काही मुद्दाम नष्ट केले गेले.परिणामी इतिहासाचे एककल्ली दूषितीकरण झाले. 

याच दूषितीकरणाचा एक परिणाम म्हणजे छत्रपती संभाजी महाराजा यांच्या चारित्र्यावर चढवण्यात आलेले डाग होत.मात्र आपल्या ‘छावा’ मधून शिवाजी सावंत यांनी हे डाग पुसून टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. आणि त्यात पूर्णपणे यशस्वीपण झालेले आहेत. 

ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज सह्याद्रीच्या सिंहाप्रमाणे जगले, लढले. त्याच प्रमाणे शिवपुत्र संभाजीचे जीवनही एखाद्या सिंहाच्या छाव्यासारखेच होते. कटारीच्या धारदार पात्यावरली ती पायवाट होती. शिवरायांनी हाती दिलेले स्वसराज्याचे शिवधनुष्य त्यांनी लीलया पेलले. एकाचवेळी पाच पाच आघाड्या सांभाळण्याची कर्तब करून दाखवली. 

चहूबाजूंनी संघर्ष सुरु असतांना आतल्या कवीमनाला कधी मारू दिले नाही . त्या कवीमनालाही   सांभाळले. बुधभुषणं, नायिकाभेद सारख्या काव्यांची निर्मिती केली. छत्रपती संभाजी राजांच्या व्यक्तिमत्वाचे आपल्याला कधी न दाखवण्यात आलेले पैलू या कादंबरीत आपल्याला वाचायला मिळतील. 

 

छावा कादंबरी pdf  

 

 

 

श्रीमान योगी 

 

रणजित देसाई लिखित ‘श्रीमान योगी’ ही  कादंबरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे.शिवाजी महाराजांच्या  मृत्यूपर्यंत इतिहासकारांचे दृष्टिकोन  वेगवेगळे आहेत. शिवचरित्राबाबत इतिहासकारांत जेवढे दुमत आढळते तेवढे दुमत असलेले दुसरे चरित्र नाही. 

अश्या अडचणी असतांना सोबतच शिवाजी महाराजांची अष्टपैलू व्यक्तिरेखा सुद्धा सहज लेखणीत सापडणारी नाही. कितीही आणि कसेही लिहिले तरी लिखाण थिटेच पडावे असा हा विषय. मात्र हे कठीण कार्य रणजित देसाई यांनी हाती घेतले आणि ते “श्रीमान योगी” च्या स्वरूपात पुर्णत्वालाही नेले. 

इतिहास आणि कल्पना यांचा मनोरम संगम साधत उच्च कोटीची कलाकृती रणजित देसाई यांनी घडवून आणली आहे. स्वराज्य निर्माता म्हणून जगत असतांना शिवाजी महाराजांना एक माणूस म्हणून जगण्याचे जे अधिकार सोडून द्यावे लागले, एक पिता, एक पती म्हणून त्यांच्या मनाची काय तळमळ होत असावी ते सारे आपल्याला या कादंबरी मध्ये पाहायला मिळते. 

 

श्रीमान योगी pdf 

 

 

Also Read

 

 

 

महानायक 

 

महानायक या कादंबरीचे लेखक विश्वास पाटील आहेत. विश्वास पाटील एक सनदी अधिकारी राहिलेले आहेत. त्यांना असणारी इतिहासाची आवड आणि त्यातल्या त्यात भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास हा तर सर्वात आवडता विषय. जेव्हा केव्हाही भारताच्या स्वातंत्र्याचा विषय येतो तेव्हा एक नाव आवर्जून घ्यावं लागतं. आणि ते म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस. 

‘महानायक’ ही कादंबरी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारित आहे. मुळात एकप्रकारे ही  कादंबरी म्हणजे ललित कलाकृतीच्या साहाय्याने आपल्यासमोर इतिहासाचं पुन्हा एकदा उभा करण्याचा प्रयत्न आहे. 

कादंबरी सुरु होते ती INA च्या अधिकाऱ्यांवरील खटल्यांपासून.या खटल्यांतून हि कादंबरी वळण घेते ते डायरेक्ट सुभाषचंद्रांच्या बालपणात. नेताजींच्या वाढीबरोबरच भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा विकास समांतर पाहायला मिळतो. इथे आपल्याला गांधीजी आणि नेताजी यांच्यातील वैचारिक मतभेद समजून घ्यायला मिळतात. 

सर्वात महत्वाचं म्हणजे एकटा माणूस भारतातून निघून बाहेर देशात जातो. तिथे गुलाम बनलेल्यांपासून तो स्वातंत्र्य भारताची आर्मी आणि सरकार स्थापन करतो.या नव्याने संघटित केलेल्या आर्मीच्या जोरावर आपल्या मायभूमीला सोडवण्याचा प्रयत्न करतो. याची ही एक थरारक कथा आहे. पूर्ण कादंबरी या थ्रिल ने भरलेली आहे. आणि म्हणूनच एकदा हातात घेतली की  पूर्ण वाचून झाल्याशिवाय ती सुटतच नाही. 

मंडळी महानायक ची pdf  अजून उपलब्ध झालेली नाही. मिळाल्यावर लगेच ही  पोस्ट अपडेट केल्या जाईल. 

 

 

 

युगंधर   

 

मित्रांनो आता गाजलेल्या मराठी कादंबरी pdf(Best marathi novels to read)  या पोस्टमध्ये आपण शिवाजी सावंत यांच्या युगंधर या कादंबरी बद्दल थोडक्यात पाहणार आहोत. शिवाजी सावंत यांच्या पौराणिक कादंबऱ्यांमधील ही  एक प्रसिद्ध अशी कादंबरी. 

युगंधर ही  भगवान श्रीकृष्ण यांच्या जीवनाला धरून रचलेली हि कादंबरी आहे. या कादंबरीचे विशेषत्व म्हणजे शिवाजी सावन्त यांनी कृष्ण चरित्रामध्ये कुठल्याही प्रकारच्या चमत्कारांना स्थान दिलेले नाही. सगळे चमत्कार बाजूला सारत, त्यात साध्या, सरळ आणि सहज घटना ओळखून श्रीकृष्णाच्या मानवी पैलूंचे दर्शन आपल्याला या कादंबरीत घडते. 

एक साधारण मनुष्य आपल्या कर्तृत्वाने, हुशारीने कृष्ण पदाला पाहचतो कसा त्याचे वर्णन कादंबरी मध्ये येते. सोबतच महाभारतासारखं युद्ध घडवून आणून कृष्णाने तेवढा मोठा नरसंहार का घडवून आणला असावा याचीही योग्य कारणमीमांसा वाचायला मिळते. 

 

युगंधर कादंबरी pdf 

 

 

 

समारोप 

मित्रांनो आज गाजलेल्या मराठी कादंबरी pdf  (Best marathi novels to read)या पोस्ट च्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत काही गाजलेल्या मराठी कादंबरी pdf स्वरूपात पोचवण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला आजची ही  पोस्ट कशी वाटली?  गाजलेल्या मराठी कादंबरी pdf (Best marathi novels to read)या पोस्ट मध्ये आणखी कोणत्या कादंबरी तुम्हाला वाचायला आवडतील? ते आम्हाला कंमेंट करून कळवा. आम्ही नक्की त्या कादंबरी pdf  स्वरूपात तुम्हाला मिळवून देण्याचा प्रयत्न करू. 

धन्यवाद!

11 thoughts on “या आहेत मराठीतील प्रसिद्ध कादंबऱ्या । गाजलेल्या मराठी कादंबरी pdf”

 1. विश्वास पाटील, रणजीत देसाई आणी बाबा कदम यांची पुस्तके PDF मध्ये मिळतील का?

  Reply
 2. मी उमेश बाहेकर पेशाने शिक्षक आहे मला मराठ्यांच्या स्वातंत्र्य संग्रामाचा समग्र इतिहास किंवा त्यावरील लिहिलेली एखादी कादंबरी हवी आहे माझा मोबाईल नंबर 9326279298 असा आहे कृपया मला नाव सुचवा कोणत्याही लेखकाचे पुस्तक अथवा कादंबरी चालेल मी त्याची किंमत सुद्धा देऊ शकतो धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  Reply
  • कडबा आणि कनस
   रा.र.बोराडे
   यांची कादंबरी

   Reply
 3. खुपच छान कादंबरी आहे
  त्यात ययाति मृत्युन्जय मला खूप आवडलेली आहे.

  Reply
 4. कालिकामुर्ती – गो ना दातार,
  मर्मभेद – शशी भागवत,
  वीरधवल – नाथमाधव
  शौर्यशृंग – अभिषेक साळुंखे
  ह्या चार मध्ययुगीन काळातल्या रहस्यमय कादंबऱ्या वाचा, आपला कादंबरींकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलून जाईल.

  Reply
 5. अभिषेक साळुंखे यांची शौर्यशृंग ही कादंबरी मला खूप आवडली. कालच वाचून पूर्ण झाली. पुण्यात भावार्थ मध्ये मला मिळाली. आगळ्यवेगळ्या रहस्यांनी पूरेपूर भरलेली आहे. शेवटपर्यंत उत्कंठा टिकवून ठेवते. वाचताना खरच अद्भुत वाटतय. जरा लिखाणात संस्कृत शब्द जास्त आहेत, पण कठीण वाटत नाही.

  Reply

Leave a Comment