“अशक्य स्वप्न ” । The Poem Of La Mancha in Marathi

जय महाराष्ट्र मंडळी! Marathi Motivation या ब्लॉग वर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. नेहमीप्रमाणेच आजही आम्ही तुमच्यासाठी एक खास पोस्ट घेऊन आलो आहोत. ही पोस्ट तुम्हाला नक्कीच आवडेल अशी अपेक्षा आहे. 

मंडळी काही स्वप्नं असतात जी आपल्याला झोपेत असतांना दिसतात. तर काही स्वप्न अशी असतात जी आपल्या डोळ्यावरची झोप उडवून टाकतात.खरं पाहता ही डोळ्यावरची झोप उडवणारी स्वप्नेच मानवी विकासाला कारणीभूत आहेत असे मला वाटते.

आजच्या “अशक्य स्वप्न ” । The Poem Of La Mancha in Marathi या पोस्टमध्ये आपण मुळात आपली ध्येये कशी ठरवायला हवीत? आपली स्वप्ने कशी उदात्त असायला हवीत ते पाहणार आहोत.

 

 

“अशक्य स्वप्न ” । The Poem Of La Mancha in Marathi

“The Impossible Dream” आणि “the Poem of  la Mancha ” अश्या दोन्ही नावांनी प्रसिद्ध असणाऱ्या या कवितेचा आस्वाद घेण्याअगोदर आपण थोडी या कवितेबाबत इतर माहिती पाहुयात.

 

 

 

The Poem Of La Mancha विषयी थोडक्यात माहिती 

 

The Poem Of La Mancha म्हणा किंवा The Impossible Dream म्हणा या दोन्ही नावाने प्रसिद्ध असणारी ही कविता बऱ्याच ठिकाणी वापरण्यात आली आहे. वेगवेगळ्या कंपन्यांनी त्यांच्या जाहिरातीमध्ये तर जॉन वीक सारख्या प्रसिद्ध मालिकापटातही तिचा उपयोग करण्यात आला. 

महाराष्ट्रातील विद्यापीठीय अभ्यासक्रमातही काही विद्यापीठांनी या कवितेचा समावेश केलेला होता. तरी आमच्या आजच्या पिढीला The  Poem Of  La  Mancha ची ओळख झाली असेल तर ती म्हणजे  विश्वास नांगरे पाटील यांच्या गाजलेल्या भाषणातून. त्यांच्या भाषणामध्ये जीवनाचं उद्दिष्ट कसे असायला हवे? याबद्दल बोलतांना त्यांनी उत्स्फूर्तपणे या कवितेचा वापर केला आहे. 

मुळात The  Poem Of  La  Mancha  हि कविता ला मंचा यांची आहे. त्यांना जपानचे कानफुशियस असे म्हटले जाते. आजची The  Poem Of  La  Mancha ही आधीच्या कवितेचे विस्तारित रूप आहे.

आज आपण ऐकत असलेले The  Poem Of  La  Mancha हे गीत जो दारियन यांनी रचलेले आणि मिश ले यांनी संगीतबद्ध केले आहे. ही कविता १९६५ च्या बोर्डवे मुजिकल्स च्या मॅन ऑफ ला मंचा या अल्बम मध्ये प्रसिद्धीस आली. 

 

 

 

“अशक्य स्वप्न ” । The Poem Of La Mancha in Marathi

 

चला तर मंडळी जास्त वेळ न दवडता पाहूया आपली आवडती The  Poem Of  La  Mancha ही कविता.

 

 

 

To  dream the impossible dream

to fight the unbeatable foe

to bear with unbearable sorrow

To run where the brave dare not go.

 

 

 

The  Poem Of  La  Mancha या कवितेच्या पहिल्या चार ओळींतच कवी आपल्याला त्याच्या ध्येयाबाबत सांगतो. त्याच्या जीवनाचं उद्दिष्ट कसं वेगळं आहे हे तो येथे स्पष्ट करीत आहे. माणूस जगावेगळा ठरतो तो त्याच्या ध्येयांमुळे, स्वप्नांमुळे.

इथे कवी त्याच्या जीवनाचं उद्दिष्ट्य काय आहे ? या प्रश्नाला उत्तर देताना म्हणतो की जे अशक्य आहे असे सारे जण मानतात ते साध्य करण्यासाठी झटणे, अविरत संघर्ष करणे हेच त्याच स्वप्न आहे.

मग लोकांसाठी अशक्य असणाऱ्या साऱ्याच गोष्टी कवीच्या या स्वप्नांचा भाग बनतात. या गोष्टी कोणकोणत्या हे स्पष्ट करतांना कवी पुढे म्हणतो कि ज्या शत्रूचा कुणी पराभव करू शकत नाही त्याला हरवायचा आहे.

जे दुःख सहन करण्याची शक्ती कुणातच नाही, ज्या दुःखासमोर सगळे नतमस्तक होतील ते दुःख मला पचवायचं आहे. म्हणजे अश्या दुःखाच्या परिस्थितीतही मला माझा धिर खचू द्यायचा नाही. चेहऱ्यावरील हास्य हरवू द्यायचं नाही.

पुढे कवी म्हणतो कि ज्या ठिकाणी जाण्याचे धाडसी लोकही धाडस करत नाहीत, त्या भयावह ठिकाणी मला जाऊन धावायचं आहे. म्हणजे असे क्षेत्र ज्या क्षेत्रात जोखीम पाहून धाडसी लोकही आपल्या भीतीला शरण जातात त्याच ठिकाणी कवी त्या भीतीवर विजय मिळवून त्या क्षेत्रात कर्तबगारी सिद्ध करण्याचा संकल्प करतो आहे.

 

 

 

To right the unrightable wrong

To love pure and chaste from afar

To try when your arms are too weary

To reach The unreachable star

 

 

 

The  Poem Of  La  Mancha या कवितेत पुढे कवी म्हणतात की ज्यावेळी अन्याय करणारा खूप सामर्थ्यवान असतो आणि न्यायासाठी उभं राहण्याची कुणाची हिम्मत नसते अश्या प्रसंगी मला योग्य तो न्याय मिळवून द्यायचा आहे.

मला नितांत निर्मल असं प्रेम करायचं आहे. ज्या प्रेमात कुठलाही स्वार्थ नसेल. कुठलाही किंतु परंतु नसेल.वासनेचा लवलेशही नसेल असं पवित्र प्रेम मला करायचं आहे. जे सगळ्यांनाच शक्य नाही.

ज्यावेळी माझे पाय थकलेले असतील, माझे हात थकलेले असतील. माझ्या शरीरात कुठलाही त्राण नसेल. आता सगळं संपलं असे इतरांना वाटायला लागेल अश्यावेळीसुद्धा मला माझ्या ध्येयाच्या दिशेने पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा आहे.

ज्या ताऱ्यापर्यंत कुणी अजून पोहचू शकले नाही त्या ताऱ्याला मला गाठायचं आहे. येथे कवीने त्याच्या अनन्यसाधारण ध्येयाला ताऱ्याची उपमा दिली आहे. जे ध्येय गाठायचा कुणी विचारही करीत नाही ते मला गाठायचं आहे असे कवी म्हणतात.

 

 

 

oh! this is my quest,

to follow that star.

no matter how hopeless,

no matter how far.

To fight for the right,

without question or pause.

To be willing to march into hell,

for a heavenly cause.

 

 

 

हा माझा संकल्प आहे की मला एखाद्या ताऱ्याप्रमाने असणारे माझे ध्येय गाठायचेच आहे. मग ते कितीही दूर असले तरी चालेल. माझ्या ध्येयाला गाठण्याचा प्रवास कितीही खडतर असला, कितीही निराशाजनक असला तरी मला तो पूर्ण करून तिथपर्यंत पोचायचंच आहे.

मला सत्यासाठी, न्यायासाठी संघर्ष करायचा आहे. झगडयाचं आहे. आणि ते करीत असतांना कुठलाही प्रश्न मला विचारायचा नाही. म्हणजे सत्यासाठी लढत असतांना कुठलीही शंका मला माझ्या मनात येऊ द्यायची नाही. आणि न्यायाचा विजय होईपर्यंत मला कुठलाही थांबा घ्यायचा नाही.

पुढे कवी म्हणतात कि माझी नरकात जायची सुद्धा तयारी आहे पण त्यासाठी कारण मात्र स्वर्गीय असले पाहिजे. मुळात कवी येथे आपल्याला सांगू इच्छितात की सत्य आणि न्यायाच्या बाजूने लढत असतांना अंतिम परिणामांची त्यांना काहीही चिंता नाही. या लढाईत शेवटी येणारी सगळी दुःखे भोगायला ते आधीच तयार आहेत.

 

 

 

And I know if i’ll only be true

to this glorious quest

then my heart will lay peaceful and calm

When I’m laid to my rest

 

 

 

या कवितेत पुढे कवी म्हणतात की ही जी माझी आकांक्षा आहे जी आतापर्यंत मी विशद केली आहे, या आकांक्षेवर जर मी खरा उतरलो तरच माझ्या शेवटच्या क्षणांमध्ये माझ्या मनाला शांती मिळेल. त्याच वेळी माझे मन अगदी शांतपणे जगाचा निरोप घेऊ शकेल.

 

 

 

And the world will be better for this

that one man scorned and covered with scars

Still strove with his last ounce of courage

To fight the unbeatable foe

To reach the unreachable star

 

 

 

या शेवटच्या ओळींमध्ये कवी त्यांची जगाबाबत त्यांची अपेक्षा व्यक्त करतात. ते म्हणतात की या जगासाठी हे अतिशय योग्य राहील की एखादा माणूस असाही आहे जो शेवटपर्यंत हार मानत नाही. या माणसाच्या शरीरावर ठिकठिकाणी जखमा आहेत. या जखमा त्याच्या संघर्षाची गाथा सांगत आहेत.

चहूबाजूंनी हा संकटांनी, काट्यांनी घेरला गेला आहे. याच्या अंगात शक्ती नाही. अश्यावेळी हा आपल्या अंगातील रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आपल्या ध्येयापर्यंत पोचण्यासाठी प्रयत्न करीत आहे. अशी उदात्त ध्येये आणि प्रखर ध्येयनिष्ठा असणारा माणूस आपल्यात असणे ही बाब संपूर्ण मानवजातीसाठी महत्वाची आहे.

 

 

Also Read

 

समारोप 

 

मंडळी आज आपण “अशक्य स्वप्न ” । The Poem Of La Mancha in Marathi या पोस्ट मध्ये The  Poem Of  La  Mancha या कवितेचा थोडक्यात सारांश पाहिला. “अशक्य स्वप्न ” । The Poem Of La Mancha in Marathi  या पोस्ट मध्ये ही  कविता मला जशी कळली त्याच भाषेत मी ती तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

तर मंडळी तुम्हाला आजची “अशक्य स्वप्न ” । The Poem Of La Mancha in Marathi ही पोस्ट कशी वाटली? त्याबद्दलचा तुमचा अभिप्राय कमेंट करून नक्की कळवा.

प्रस्तुत कवितेच्या स्पष्टीकरणात माझ्या समजेनुसार काही चुका होऊ शकतात. तर जर तुमच्या लक्षात अशी काही चूक आली तर तीसुद्धा कळवा. “अशक्य स्वप्न ” । The Poem Of La Mancha in Marathi  ही पोस्ट अधिक सुंदर आणि महत्वपूर्ण बनवण्यासाठी तुमचे सहकार्य गरजेचे आहे.

धन्यवाद !

1 thought on ““अशक्य स्वप्न ” । The Poem Of La Mancha in Marathi”

  1. Majhe prerna sthan mhanje IPS OFFICER श्री विश्वास नांगरे पाटील sir tyanchi hi kavita aavdati mhanun manaat aal ki aapan pan baghav kay aahe hya kavitemadhye mhanun baghitli tar majhi pan aavadti jhali majhi olakh samriddhi kiran satput me satta 7th la aahe

    Reply

Leave a Comment