15 सर्वोत्तम प्रेरणादायी मराठी पुस्तके । 15 best motivational books to read in Marathi

 Reading is essential for those who seek to rise above the normal. 

                       – Jim Rohn 

 

मंडळी मानवी जीवनात वाचनाचे महत्व काय आहे हे तर सर्वश्रुत आहे. वाचन माणसाला बसल्या जागी जगभर पळवते.  मानवी भाव-भावना आपल्याला कळवते.आणि या पळवण्या-कळवण्याच्या प्रवासातच कळत-नकळत आपल्याला घडवते. 

आपल्या जीवनाचा हा प्रवास वाचनासोबत समृद्ध होण्यासाठी योग्य अशी पुस्तकेही आपल्या हाती लागणे गरजेचं असते. आपण कोणतेही नवे पुस्तक वाचायला केव्हा घेतो? तर कुठेतरी आपण त्याबद्दल वाचलेलं किंवा ऐकलेलं असतं  म्हणून. 

मंडळी आज आम्ही तुमच्यासाठी मराठीतील काही खास पुस्तकांबद्दल माहिती घेऊन आलो आहोत.आजच्या 15 सर्वोत्तम  प्रेरणादायी मराठी पुस्तके । (15 best motivational books to read in marathi) या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला मराठीतील प्रेरणादायी पुस्तकांची  (motivational books in marathi) माहिती देणार आहोत. 

ही 15 सर्वोत्तम प्रेरणादायी मराठी पुस्तके । (15 best motivational books to read in marathi) तुम्हाला जीवन जगण्यासाठी एक नवा दृष्टीकोन,नवी आशा आणि दिशा देतील.

 

 

 

15 सर्वोत्तम प्रेरणादायी मराठी पुस्तके । 15 best motivational books to read in Marathi 

 

 

 

कोल्हाट्याचं पोर 

 

मित्रांनो 15 सर्वोत्तम  प्रेरणादायी मराठी पुस्तके । 15 best motivational books to read in marathi या पोस्ट मध्ये सर्वात आधी आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत डॉ. किशोर शांता काळे लिखित कोल्हाट्याचं पोर या पुस्तकाविषयी. 

कोल्हाट्याचं पोर हे डॉ. किशोर शांता काळे यांचं आत्मचरित्र. किशोरचा जन्म १९७० च्या काळातला. स्वातंत्र्य मिळून वीस वर्षे उलटून गेली तरी अजूनही काही समाजांची परिस्थिती बिकटच होती. संविधानाने दिलेल्या समानतेच्या अधिकारांची गंगोत्री अजूनही समाजातील बऱ्याच घटकांपर्यंत पोचलेली नव्हती. 

या अश्या वंचित घटकांपैकीच एक म्हणजे कोल्हाटी समाज. इतरांच्या मनोरंजनासाठी यांच्या लेकरांनी वेगवेगळ्या कसरती करून दाखवाव्या, यांच्या स्त्रियांनी तमाशात नाचगाणी करावी आणि तेव्हा कुठे यांची गुजराण व्हावी अशी परिस्थिती त्यावेळी कोल्हाटी समाजाची होती. 

आज कला आणि कलावंताला मिळणारा मान -सन्मान त्या काळात नव्हता.अश्या परिस्थितीत जन्माला येणे येथेच काही किशोरचे दुर्भाग्य संपणारे नव्हते. खुद्द कोल्हाटी समाजाच्या चाली -रीती इत्यादी सुद्धा त्याच्या प्रगतीच्या वाटेवर ठाणं मांडून बसलेल्या. 

लावायला बापाचं नाव नाही म्हणून आईच नाव लावणारा किशोर पावलोपावली अपमानाच्या विखारी दातांनी डसणाऱ्या या समाजसर्पाला कसा सामोरे गेला? कशी त्याने सगळ्या संकटांवर मात केली आणि कोल्हाटी समाजातील पहिला डॉक्टर बनला ?

किशोरच्या संघर्षाची ही प्रेरणादायी कथा आपल्याला जीवनातील संकटांना समोर जाण्याची उर्मी प्रदान करते. परिस्थितीचे भांडवल करून सहानुभूती गोळा न करता,जवळ आहे त्यात, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर स्वतःच साम्राज्य निर्माण करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक आहे. 

 

 

 

मी एक स्वप्न पाहिलं!

 

काही स्वप्ने झोपेतून माणसाला झोपेतून दचकवुन उठवतात तर काही स्वप्ने माणसाची झोपच उडवतात. झोप उडवणारी स्वप्ने उघड्या डोळ्यांनी पहिली जातात. मेहनतीने- चिकाटीने साकार केली जातात. 

उघड्या डोळ्यांनी सजगतेत स्वप्न पाहणाऱ्या आणि साकार करणाऱ्या मंडळींमध्ये एक नाव आवर्जून घ्यावेसे वाटते.  ते नाव म्हणजे राजेंद्र भारूड. मी एक स्वप्न पाहिलं! हे पुस्तक म्हणजे राजेंद्र भारूड यांचे आत्मचरित्र होय. 

राजेंद्र भारूड यांचा जन्म साक्री तालुक्यातील सामोडे गावात एका भिल्ल-आदिवासी कुटुंबात झाला. राजेंद्र आईच्या गर्भातच असतांना त्याचे वडील मरण पावले.   वडिलांचे प्रेम तर दूरच राहिले ज्याला आपल्या वडिलांचा चेहराही पाहण्याचे नशीब लाभले नाही अश्या दुर्भागी लेकरांपैकी एक राजेंद्र होता. 

घरात कमवायला माणूस नाही, खेडेगावात पाहिजे तसा  रोजगार नाही अश्यावेळी एकट्या स्त्रीने मुलाचा सांभाळ कसा करावा? तिने कमरेला पदर खोचला आणि मिळेल ते काम करतांना घरगुती दारू चा व्यवसाय सुरु केला. 

मी एक स्वप्न पाहिलं ! ही  कथा आहे एका आईच्या दारिद्र्याविरुद्धच्या संघर्षाची. ही कथा आहे अश्या युवकाची ज्याने आपल्या आईच्या कष्टाला प्रामाणिक प्रतिसाद देत, परिस्थितीशी झुंज देत यश त्या माऊलीच्या पायांवर वाहिलं . 

राजेंद्र नावाच्या या स्वप्नाळू माणसाने आपल्या स्वप्नांना परिश्रमाची जोड देऊन अशी काही भरारी घेतली की तीच भरारी आता कित्येक महाराष्ट्रीयन तरुणानांना परिस्थितीला समोर जाण्याची उभारी देत आहे. 

उसाच्या पानांपासून बनलेल्या झोपडीतून सुरु होणारा हा प्रवास मुंबईच्या मेडिकल कॉलेज ला वळसा घेऊन आधी IPS होऊन नंतर IAS या पदावर येऊन थांबतो.सातत्य, चिकाटी यांच्या जोरावर आपल्या स्वप्नांना सत्यात प्रवर्तित करणाऱ्या या स्वप्नाळू माणसाची ही कथा तुम्हाला नक्कीच प्रेरणादायी ठरेल. 

 

 

 

एक होता कार्व्हर 

 

मंडळी 15 सर्वोत्तम  प्रेरणादायी मराठी पुस्तके । (15 best motivational books to read in marathi) पाहत असतांना  लेखिका विना गवाणकर यांनी लिहिलेलं एक होता कार्व्हर या पुस्तकाला या प्रेरणादायी पुस्तकांच्या यादीत मानाचे स्थान आहे. 

एक होता कार्व्हर हे अमेरिकेच्या पहिल्या कृष्णवर्णीय शास्त्रज्ञाची जीवनगाथा आहे. आपल्या सर्वांना ठाऊक असेलच की  अमेरिकेत पूर्वी गुलाम प्रथा अस्तित्वात होती. तिथे कृष्णवर्णीयांना गुलाम बनवून वागवले जाई . त्यांचा व्यापार केला जाई. 

एका कःश्चित वस्तूच्या पलीकडे माणूस म्हणून या गुलामांची काही किंमत नव्हती. अश्याच गुलामांच्या पोटी जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचा जन्म झाला. मुळात त्यांच्या आईवडिलांचा तर त्यांना सहवास लाभला नाही. मात्र ईशकृपेने मालक फार चांगला लाभला. 

त्या काळात नुकतेच गुलामगिरीविरुद्ध वारे वाहायला लागले होते.नुकतेच सरकारने कृष्णवर्णीयांसाठी विद्येची दारे उघडली होती. गुलाम प्रथा संपुष्टात आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील होते. मात्र जनतेत अजूनही वंशभेदाचे विष बाकीच होते. 

सरकारने कागदोपत्री जरी गुलामगिरी बंद केली असली तरी लोकांच्या भावना लगेच बदलणाऱ्या नव्हत्या. अश्या परिस्थितीत कार्व्हर यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. आलेल्या प्रत्येक प्रसंगाला धीराने तोंड दिले. शिक्षणासाठी कामही केले. 

त्यांच्या परिश्रमाच्या वेलीला जेव्हा यशाची फुले आली तेव्हा ते आरामात जीवन व्यतीत करू शकले असते .मात्र त्यांनी आपले जीवन आपल्या समाजबांधवांच्या आणि देशाच्या प्रगतीसाठी वाहून दिले.

शास्त्रज्ञ म्हणजे प्रयोगशाळेत रमणारा माणूस. त्याची यंत्र तंत्र महागडी.आणि सामान्यांना समजणार नाही अश्या भलत्याच जगाबद्दल त्याने विचार करत असावं अशीच काहीशी धारणा आपल्या समाजाची आहे. मात्र जॉर्ज वाशिंग्टन कार्व्हर या साऱ्याला अपवाद होते. 

त्यांच्या काळातील सगळ्यात महान शास्त्रज्ञांपैकी एक असूनही त्याचं जीवनमान नेहमी साधारण राहिले. वनस्पतींना अगदी जिवाभावाचे सोबती मानणारा हा शास्त्रज्ञ मनाने मात्र शेतकरी होता. त्याने आपल्या बांधवांशी आणि मातीशी असणारे नाते कधी तुटू दिले नाही.

एक होता कार्व्हर ही  शिक्षण क्षेत्रातील अश्या योद्ध्याची कथा आहे ज्याने समोर आलेल्या प्रत्येक संकटाला जिद्दीने चारी मुंड्या चित  केले. प्रतिकूल परिस्थितीशी सामना करीत शिक्षणाने आपले भवितव्य घडवू पाहणाऱ्या प्रत्येक युवकासाठी एक होता कार्व्हर हे आत्मचरित्र प्रेरणेचा न आटणारा झराच आहे.

 

 

 

वाट तुडवताना

 

मंडळी 15 सर्वोत्तम  प्रेरणादायी मराठी पुस्तके । (15 best motivational books to read in marathi) या पोस्ट मध्ये आता आपण वाट तुडवताना या पुस्तकाबद्दल माहिती पाहूया. 

वाट तुडवताना हे उत्तम कांबळे यांचे आत्मचरित्र आहे. उत्तम कांबळे हे दैनिक सकाळचे संपादक म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. उत्तम कांबळे यांनी या पुस्तकात त्यांचा बालपणापासून ते सकाळ चे संपादक म्हणून सूत्रे हाती घेण्यापर्यंतचा प्रवास वर्णन केला आहे.

या पुस्तकाचे निवेदन जरी आत्मकथनपर असले तरी मुळात याची रचना काहीशी पुस्तकांबद्दल पुस्तक अशीच वाटते. वाट तुडवतांना मध्ये आपल्याला लेखकाची वाचनाची भूक पाहायला मिळते.

जीवनप्रवासात स्वतःची वेगळी वाट निर्माण करीत असतांना लेखकाला पुस्तकांनी कसे बाळ दिले? त्यांच्या स्वप्नांना त्यांच्या अवान्तरीच्या वाचनाने कसे पंख दिले? या वाचनातून मिळालेल्या बळाच्या जोरावर लेखकाने कशी भरारी घेतली ? याचीच ही मंत्रमुग्ध करणारी कथा आहे.

एका वेळेच्या जेवणाची सोय नसतांना मनातील वाचनाच्या भुकेसाठी पोटाच्या भुकेला प्रसंगी बाजूला ठेवणाऱ्या एका अवलियाची ही  कथा आहे. ज्याच्या सात पिढ्यापर्यंत कुणी कधी शिक्षण आणि वाचन याचा अनुभव घेतला नाही त्या कुटुंबातील आपल्या विकासासाठी  धडपडणाऱ्या युवकाची हि कथा.

वाचक वर्गासाठी तर नवीन पुस्तकांबद्दल जाणून घेण्यासाठी हे पुस्तक म्हणजे मेजवानीच आहे. वाचनाची आवड असणारे आणि ज्यांना वाचनाची आवड निर्माण करायची आहे त्या सर्वांना उपयुक्त असे हे पुस्तक.

 

 

 

मुसाफिर

 

मुसाफिर हे अच्युत गोडबोले यांचं आत्मचरित्र आहे. आज संपूर्ण महाराष्ट्राला अच्युत गोडबोले यांची ओळख आहे. विविध क्षेत्रांची जाण असणारा प्रतिथयश लेखक म्हणून आपण त्यांना ओळखतो. पण कधी या अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या जीवनात डोकावून पाहिल्यास आपल्याला कळेल की  दिसतं तसं सगळं आलबेल नाही.

मुसाफिर हा अच्युत गोडबोले यांचा जीवनप्रवास. सोबतच त्यांच्या काळातील आपल्या देशाचा आणि समाजाचाही प्रवास. अच्युत गोडबोले यांच्या जीवनातील प्रसंगामध्ये देशाची आणि समाजाची तात्कालिक परिस्थिती ओघानेच डोकावून जाते.

एका साधारण शिक्षकाचा मुलगा आपल्या मेहनतीच्या जोरावर आय आय टी  सारख्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतो. पुढे तेथून रसायनशास्त्रात पदवी घेतो. मात्र करिअर साठी क्षेत्र म्हणून आय टी  क्षेत्र निवडतो. ज्या क्षेत्राची तसूभरही माहिती नाही त्या क्षेत्रात आपले करिअर घडवतो.

कॉम्प्युटर ची साधी माहिती नसणाऱ्या माणसापासून ते त्या क्षेत्राचा तज्ज्ञ म्हणून त्यांचा जो प्रवास आहे तो थक्क करणारा आहे. एक साधारण कामगार म्हणून एखाद्या संस्थेत सहभागी होण्यापासून ते इन्फोसिस सारख्या आय टी  क्षेत्रातील कंपनीचे सीईओ बनणे अशी अचाट कामगिरी त्यांनी साध्य केली.

मुसाफिर मध्ये तुम्हाला जीवनाच्या अश्या एका मुसाफीराची ओळख होईल जो भारताच्या अव्वल शिक्षण संस्थेत रसायनशात्र शिकला आहे. विज्ञानाच्या सोबतच त्याला संगीत, साहित्य, अर्थशास्त्र, चित्रकला आणि इतरही विषयांची माहिती आहे. ती माहिती पण अशी कि कुणालाही हा व्यक्ती त्या क्षेत्रातील दिग्गजच वाटावा.

हा मुसाफिर मोठं मोठ्या कंपन्यांचा सीईओ म्हणून विमानाने जग घुमतो. तर सोबतच आदिवासींमध्ये जाऊन त्यांच्या चळवळीत मदतही करतो. हा मुसाफिर महिन्याला ५ कोटी पर्यंतची कमाई करणाराही आहे तर त्याचवेळी एके ठिकाणी पिऊन बेधुंद पडून राहणाराही आहे.

अच्युत गोडबोले यांचं जीवन बरेच अप्स अँड डाउन्स पचवलेलं जीवन आहे. मुसाफिर हे पुस्तक त्यांच्या त्या थक्क करणाऱ्या प्रवासाची कथा आहे. इथे तुम्हाला मॅनॅजमेन्ट पासून ते अर्थशास्त्राच्या सिद्धान्ताबद्दल सगळंच पाहायला मिळेल.

पुस्तक एकदा हाती घेतलं की  संपेपर्यंत सुटणार नाही आणि वाचून संपल्यानंतर हे का संपलं? याची हूर हूर वाटल्याशिवाय राहणार नाही. ही  गॅरंटी.

 

 

 

आमचा बाप अन आम्ही

 

15 सर्वोत्तम  प्रेरणादायी मराठी पुस्तके । 15 best motivational books to read in marathi या  15 प्रेरणादायी पुस्तकांच्या यादीमध्ये आता आपण डॉ. नरेंद्र जाधव लिखित आमचा बाप अन आम्ही या पुस्तकाबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

मुळात आत्मचरित्र जरी असले तरी या पुस्तकाची रचना आत्मचरित्रासारखी नक्कीच नाही. आत्मचरित्राचा लेखकाच्या आजू बाजू घुमत राहण्याचा जो श्राप आहे त्यापासून हे पुस्तक पूर्णपणे मुक्त आहे. हे पुस्तक एका व्यक्तीची नसून एका कुटुंबातील तीन पिढ्यांची थोडक्यात सांगितलेली कथा आहे,

दलित साहित्याला वेगळी दिशा आणि वळण देणाऱ्या काही पुस्तकांमध्ये आमचा बाप अन आम्ही या पुस्तकाचा समावेश होतो. पुस्तक मुख्यत्वे तीन भागात विभागून आहे. लेखकाच्या अगोदरची पिढी पहिल्या भागात. लेखकाची पिढी दुसऱ्या भागात. आणि लेखकाच्या नंतरची पिढी तिसऱ्या भागात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दर्शविलेल्या मार्गावरून चालतांना एका दलित कुटुंबाच्या पिढ्या कश्या उद्धरून गेल्या त्याची हि कथा आहे.  बाबासाहेबांच्या शिकवणुकीला धरून या कुटुंबातील एका साधारण शिक्षित माणसाची मुले कलेक्टर -अधिकारी होतात, पुढे सचिव ,प्रधानसचीव यांसारख्या महत्वाच्या पदांपर्यंत पोचतात.

आणि ते सगळं मिळवत असतांना आपल्या पायांना घट्टपणे मातीत रोवून ठेवतात. कुठलाही अहंभाव मनात शिरू देत नाही. आणि हे सारे घडते ते फक्त एका माणसामुळे.  म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे. शिक्षणाने मानवी जीवनात काय क्रांती होऊ शकते याचे या पुस्तकातील पात्रे मूर्तिमंत उदाहरण आहेत.

परकीय भाषेत भाषांतरित होऊन खपाचे आधीचे सगळे विक्रम मोडीत काढणाऱ्या साहित्यांमध्ये आमचा बाप अन आम्ही चा समावेश होतो. परिस्थितीच भांडवल सहानुभूती गोळा करण्यासाठी वापरायचं कि आपल्या यशाच्या पायवाटेसाठी तिची गुंतवणूक करायची ? हा ज्याचा त्याचा प्रश्न. हा प्रश्न सोडवायला हे पुस्तक तुम्हाला नक्कीच मदत करेल.

 

 

 

सत्याचे प्रयोग

 

सत्याचे प्रयोग हे महात्मा गांधी यांचे आत्मचरित्र आहे. महात्मा गांधी म्हणजे  भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील शेवटचे पर्व.  त्यांनी कुठलही शस्त्र न उचलता इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. पण मंडळी काय कधी तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला की गांधीजींना हे कसे जमले असेल ?

गांधीजींकडे ना धडधाकट शरीरयष्टी होती, ना प्रभावशाली आवाज होता, आणि लोकांवर उधळण्यासाठी पैसाही नव्हता. तरी लोक त्यांच्या भोवती का गोळा झाले ? असे काय होते त्यांच्यापाशी की लोकांना त्यांच्यावर एवढा विश्वास, एवढी निष्ठा होती की लोक प्रसंगी जीवही द्यायला तयार होत असत?

मित्रांनो गांधीजींकडे असणारी शक्ती म्हणजे त्यांचे चारित्र्य. त्यांच्या मनावर झालेले संस्कार. बालपणापासूनच त्यांच्यावर चारित्र्यवर्धक संस्कार झाले. पुढे याच संस्कारांचा फायदा भारतीय चळवळीत झाला.सत्याचे प्रयोग या आत्मचरित्रात महात्मा गांधी यांनी स्वतःच्या सत्य आणि अहिंसेकडे असलेल्या ओढीचा पाठपुरावा घेतला आहे.

कोणताही व्यक्ती महान बनून जन्मत नाही,तर महानता कमवावी लागते. देवपण येण्यासाठी दगडालाही टाकीचे घाव सोसावे लागतात. आणि कधीच चूक न करणारा कधी महान बनू शकत नाही. तर जो स्वतःच्या चुकांमधून शिकतो तोच महानतेच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकतो.

सत्याचे प्रयोग मध्ये महात्मा गांधींच्या चुका, त्यांपासून त्यांनी घेतलेले धडे, आणि त्यांच्या विचारांना आकार देणाऱ्या घटनांचे वर्णन आले आहे. ध्येयाने भारून गेलेल्या आणि स्वतःचे तत्वांसाठी वेळप्रसंगी संपूर्ण जगाशी पंगा घेणाऱ्या धेय्यवेड्यांसाठी  हे पुस्तक खूप प्रेरणादायी ठरेल.

 

 

 

मन में है विश्वास

 

मंडळी ( 15 best motivational books to read in marathi ) या 15 प्रेरणादायी पुस्तकांच्या यादीमध्ये आपले पुढचे पुस्तक आहे- मन मे है विश्वास. महाराष्ट्र केडर चे आय.पी.एस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांचे आत्मचरित्र आहे. 

स्पर्धा परीक्षा म्हटलं की  ग्रामीण भागातील मुलांच्या मनात एक प्रकारचा न्यूनगंड आढळतो. आपल्याला हे जमेल कि नाही हा संभ्रम ग्रामीण भागातील बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये पाहायला मिळतो.

विश्वास नांगरे पाटील या भ्रमाला दूर करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न या पुस्तकाद्वारे करतांना दिसतात. विश्वास सर स्वतः एका ग्रामीण कुटुंबातून वर आलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणही जिल्हापरिषदेच्या शाळेतून झाले. ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थी जगतात तसेच जीवन तेही जगले.

मात्र त्यांच्या जीवनात असे काय घडले, असा कोणता बदल झाला, की  ग्रामीण भागातील एक साधारण विद्यार्थी पुढे स्पर्धा परीक्षा जगतात एखाद्या हिऱ्याप्रमाणे चकाकला. एकाच वर्षी आय पी एस, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर आणि डेप्युटी कलेक्टर अशी तीन पदे मिळवणाऱ्या या अष्टपैलू व्यक्तिमत्वाची ही  कथा.

मन मे है विश्वास मध्ये आपल्याला विश्वासची  वेगवेगळी रूपे पाहायला मिळतील. गावातील राजकारणात गुंड प्रवृत्तीच्या लोकांत रमणारा विश्वास ते २६/११ च्या हल्ल्याच्या वेळी कुठलही संरक्षण नसतांना आतंकवाद्यांशी सामना करायला  निडरपणे आत शिरणारा विश्वास. प्रत्येक रूपातच तो आपल्याला जगण्याचा अर्थ शिकवून जातो.

स्पर्धा परीक्षेच्या जगात विश्वास नांगरे पाटील यांची भाषणे ऐकली नसतील असा एकही मराठी विद्यार्थी मिळणार नाही. आपल्या भाषणातून, लेखनातून विश्वास नांगरे पाटील यांनी नेहमीच नव्या पिढीला प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या भाषणांप्रमाणेच हे पुस्तकही अतिशय प्रेरणादायी आहे.

 

 

 

अग्निपंख

 

मित्रांनो मराठीतील प्रेरणादायी पुस्तकांची यादी ( list of best motivational books in marathi ) बनवावी आणि त्यात अग्निपंख ला स्थान नसावे हे तर होणे शक्य नाही. अग्निपंख हे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे चरित्र आहे.

तामिळ्नाडुलतील एका लहानश्या खेड्यात एका नावाड्याच्या कुटुंबात जन्माला आलेले कलाम पुढे भारताचे मिसाईल मॅन  बनतात. भारताच्या क्षेपणास्त्र विकास क्षेत्राची प्रगती घडवून आणतात. आणि पुढे भारताच्या राष्ट्रपती पदावर विराजमान होतात. तामिळनाडूच्या रामेश्वरम पासून दिल्लीतील राजभवनापर्यंतचा त्यांचा प्रवास खरंच प्रेरक आहे.

अगीपंख या पुस्तकात आपल्याला त्यांचा जीवनप्रवास टप्प्याटप्प्याने वर्णन केला आहे. खर पाहता त्यांचा जीवन प्रवास आणि भारताच्या अवकाश संशोधन क्षेत्राचा प्रवास हा एकमेकांना समांतरच. एक प्रकारे हे पुस्तक भारताने क्षेपणास्त्ररुपी अग्निपंख परिधान करण्याची कथा आहे.

अग्निपंख पुस्तकाचा सारांश वाचण्यासाठी येथे क्लीक करा

 

 

 

कृष्णाकाठ

 

कृष्णाकाठ हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री श्री यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र आहे. आजच्या महाराष्ट्राच्या विकासात यशवंतराव चव्हाण यांचा सिंहाचा वाटा आहे. कृष्णाकाठ हा त्यांच्या तीन खंडांत लिहिलेल्या आत्मचरित्राचा पहिला खंड. या खंडामध्ये त्यांचा मुख्यमंत्री होण्यापर्यंतचा प्रवास आलेला आहे.

यशवंतराव चव्हाण यांचा जन्म एका साधारण शेतकरी कुटुंबातला. त्यांना वडिलांचे सुख काही फार काळ मिळाले नाही. अगदी लहान वयात पित्याचे छत्र हरवल्याने त्यांचा सांभाळ त्यांच्या आईनेच केला.

असं म्हणतात कि समजूतदारपणा येण्यासाठी वय नव्हे तर परिस्थिती तशी लागते. यशवंतरावांच्या बाबतीतही तसेच घडले. अगदी कमी वयात त्यांना बरीच समज आली. एकट्या आईच्या भरवशावर आपले शिक्षण होणार नाही याची त्यांना जाणीव होती.

म्हणूनच त्यांनी लहानपणापासूनच मिळेल ते काम केले. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही याची जाणीव ठेवत त्यांनी वकिली पर्यंत शिक्षण पूर्ण केले. सोबतच स्वातंत्र्य लढ्यातही सहभाग घेतला. त्यासाठी त्यांना शिक्षाही झाली.

महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याचा मुलगा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनतो. शेतकऱ्यांना मदतीसाठी योजना आखतो. त्याच कर्तृत्व एवढ्यावरच संपत नाही तर तो देशाचा संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री आणि उप-पंतप्रधानही बनतो. त्याचा हा मंत्रमुग्ध करणारा प्रवास प्रत्येक मराठी माणसाला प्रेरणादायी आहे.

 

 

 

तराळ – अंतराळ

 

तराळ- अंतराळ हे शंकरराव खरात यांचं आत्मचरित्र आहे. शंकरराव खरात महाराष्ट्र विधिमंडळाचे सदस्य राहिले आहेत. सोबतच ते मराठवाडा विद्यापीठाचे उप-कुलगुरू या पदावरही कार्यरत होते.

बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा जपत एका दलित कुटुंबात जन्मलेला व्यक्ती विद्येचे मंदिर समजल्या जाणाऱ्या विद्यापीठाचा उप-कुलगुरू बनतो. पण त्याचा काळ आहे १९२१-२००१. आज अजूनही खेडोपाडी बऱ्याच अंशी आपल्याला जातीभेद पाहायला मिळतो.

तर त्या काळाचा विचार करता उप-कुलगुरू बनेपर्यंतचा शंकरराव यांचा प्रवास किती खडतर असेल ? याची आपण कल्पना न केलेली बरी.  त्यांच्या लिखाणाचा केंद्रबिंदू दलित आणि दलित जीवन हा आहे. विशेष म्हणजे मी हे एवढं दुःख भोगलं! माझ्यासोबत असा अन्याय झाला! या प्रकारचं रडगाणं यात नाही.

पुस्तकात आपल्याला तत्कालीन दलित जीवनातील विविध प्रसंग पाहायला मिळतात. जे पाहिलं, जे जगलो तेच लिहिलं या प्रकारातलं हे लिखाण आहे.

 

 

 

चरैवती -चरैवती

 

चरैवती-चरैवती हे राम नाईक यांचे आत्मचरित्र आहे. महाराष्ट्राच्या दुष्काळग्रस्त भागातील एका साधारण शिक्षकाच्या कुटुंबात राम नाईक यांचा जन्म झाला.शिक्षण पूर्ण झाल्याबरोबर त्यांना कुटुंबाला सहकार्य करण्यासाठी मुंबई गाठावी लागली. मुंबईत त्यांनी एक साधारण अशी नोकरी स्वीकारली.

मात्र त्यांच्या या नोकरीतील चाकोरीबद्ध जीवनाला एक दिवस कलाटणी मिळाली. त्यांना त्यांच्या संघटन कौशल्याची जाणीव झाली. आपल्या संघटन कौशल्याच्या जोरावर त्यांनी मुंबईच्या राजकारणात मोलाचे स्थान मिळवले. आणि अवाढव्य अश्या मुंबई शहराचे नेतृत्व केले.

त्यांनी सलग आठ निवडणूक जिंकल्या. एवढेच काय तर केंद्रीय मंत्रिपदापर्यंतही झेप घेतली. आपली मेहनत, संघटन आणि लोकांसाठी काहीतरी करण्याची तळमळ यांच्या जोरावर त्यांनी यश संपादन केले.प्रसंग कसाही असो तुम्ही फक्त चालत राहा. थांबू नका. हाच येथे त्यांचा मुख्य संदेश आहे.

 

Also Read

गाजलेल्या मराठी कादंबरी 

भगतसिंग यांची माहिती 

 

 

प्रकाशवाटा

 

प्रकाशवाटा हे डॉ. प्रकाश बाबा आमटे यांचे आत्मचरित्र आहे. डॉक्टर झाल्यानंतर त्यांना छानपैकी जीवन जगता आले असते. मात्र त्यांनी वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत समाजकार्यात उडी घेतली. हेमलकसाच्या आदिवासी भागात आदिवासींसाठी वैद्यकीय सुविधा निर्माण करण्याच्या त्यांच्या धडपडीची ही कथा आहे.

 

 

 

स्टीव्ह जॉब्स -एक झपाटलेला तंत्रज्ञ 

 

आजची पिढी Apple चे वेगवेगळे प्रोडूक्टस आणि तंत्रज्ञानासाठी वेडी आहे. iPhone  च्या नादात धुंद असणारे कित्येक  आपल्या आजूबाजूला पाहत असतो. आज Apple या कंपनीचे कुठलेही प्रॉडक्ट वापरने हे एक प्रतिष्ठेचे  लक्षण बनले आहे. 

 मंडळी या Apple नावाच्या ब्रॅण्डच्या मागे खूप मोठी गाथा लपली आहे. ही  कथा आहे अविरत परिश्रमाची, जिद्दीची आणि स्वतःच्या मनावरील विश्वासाची.  ही  कथा आहे एक वेळी चांगले खायला मिळावे या उद्देशाने मैलो-मैल पायी घुमणारा ते जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीमध्ये जाऊन बसणाऱ्या एका महत्वाकांक्षी युवकाची. 

सदर पुस्तक हे अच्युत गोडबोले आणि अतुल कहाते यांनी एकत्रितपणे लिहिले आहे. उद्योग असो की  जीवनातील कुठलेही क्षेत्र, आपण निर्णय मात्र आपलं मन म्हणेल तोच घ्यायचा. शेवटी कुठं ना कुठं सगळं एकमेकांशी जुळून येत . आपण मात्र आपल्या मनाच्या निर्णयावर ठाम राहायचं. हे आपल्याला या पुस्तकातून शिकायला मिळेल. 

 

 

 

गरुडझेप 

 

गरुडझेप हे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी श्री. भरत आंधळे यांचे आत्मचरित्र आहे. ग्रामीण भागातील एक साधारण मुलगा. अभ्यासातही अगदी साधारण असणारा. फार मोठी मोठी स्वप्न पाहतो. त्यासाठी प्रयत्नही करतो. जीव झोकून मेहनत करूनही त्याला यश मात्र मिळत नाही. 

स्पर्धा परीक्षेचं जग म्हणजे जवघेणी स्पर्धा आहे. इथे यशाचा जर रेट काढायला गेलं तर तो १० टक्के पण भरणार नाही. या विश्वात टिकायचं तर अपयश पाचवं शिकावं लागत. एके ठिकाणी भरतनेच म्हटल्याप्रमाणे अपयशाचा पूर्ण जिनाच चढवा लागतो. 

मग असे अपयश येत असतांना त्यांना समोर कसे जायचे? अपयशाला समोर जावे म्हणून सारेच शिकवतात. मात्र कसे समोर जायचे हे कुणीच सांगत नाही. ते आपल्याला अनुभवातूनच शिकावं लागत. मग हा अनुभव स्वतः घ्या किंवा दुसऱ्याच्या अनुभवातून शिका. सगळं सारखंच आहे. 

गरुडझेप तुम्हाला अगदी मजेदार पद्धतीने या अपयशाला, टीकेला सामोरे कसं जायचं हे आणि अपयशाचे अपयशाची वाळू रगडून यशाचं तेल कसं मिळवायच याचे पूर्ण मार्गदर्शन करेल. 

 

Also Read

IAS होण्यासाठी काय करावे?

चंद्रशेखर आझाद यांची माहिती 

 

 

समारोप 

 

मित्रांनो आज आपण 15 सर्वोत्तम  प्रेरणादायी मराठी पुस्तके । 15 best motivational books to read in marathi या पोस्ट मध्ये मराठी मधील  काही प्रेरणादायी पुस्तके  ( motivational books to read in marathi ) पाहिलीत.

या पोस्ट मध्ये जीवनाच्या वाटेवर आपल्याला मार्गदर्शन करतील आणि अनुभव संपन्न बनवतील अश्या काही पुस्तकांबद्दल आम्ही माहिती दिली. तुम्हाला ही  पोस्ट कशी वाटली? त्याबद्दल तुमचा अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. 

15 सर्वोत्तम  प्रेरणादायी मराठी पुस्तके । 15 best motivational books to read in marathi या पोस्ट मध्ये आम्ही दिलेली सदर प्रेरणादायी पुस्तकांची यादी ही  निव्वळ वैयक्तिक निवडीवर आधारित आहे. त्यामुळे कदाचित तुम्हाला आवडलेली पुस्तके या यादीत नसतीलही. 

असे असल्यास 15 सर्वोत्तम  प्रेरणादायी मराठी पुस्तके । 15 best motivational books to read in marathi या पोस्ट मध्ये कोणत्या पुस्तकाबद्दल आम्ही माहिती द्यावी ते कृपया कळवा. सदर पोस्ट अधिक वाचनीय आणि उपयुक्त बनवण्यासाठी तुमचे सहकार्य गरजेचे आहे. 

धन्यवाद !

 

2 thoughts on “15 सर्वोत्तम प्रेरणादायी मराठी पुस्तके । 15 best motivational books to read in Marathi”

  1. सर या पुस्तकात एक पुस्तक समाविष्ट करा जे पुस्तक खूप छान आहे पुस्तकाचे नाव आहे रानजुई लेखन आहेत बी.जी. शेखर साहेब (I G nashik)

    Reply

Leave a Comment