शिवाजी सावंत यांची पुस्तके 

शिवाजी सावंत यांची पुस्तके 

 

नमस्कार मित्रांनो मराठी motivation या ब्लॉग वर आपले स्वागत आहे.या ब्लॉगच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत विविध विषयांतील प्रेरणादायी, ज्ञानवर्धन करणारी माहिती पोचवत असतो. आजही आम्ही अश्याच प्रकारची माहिती घेऊन आलो आहोत . खास तुमच्यासाठी! 

मित्रांनो शिवाजी सावंत यांची पुस्तके या पोस्टच्या माध्यमातून आज आपण मराठी साहित्य विश्वातील अग्रगण्य साहित्यिकांपैकी एक असणारे श्री शिवाजी सावंत यांच्या साहित्यकृतींविषयी माहिती घेणार आहोत. 

मित्रांनो शिवाजी सावंत यांची पुस्तके या पोस्ट मध्ये पुढे जाण्या अगोदर आपण थोडक्यात शिवाजी सावंत यांचा परिचय करून घेऊयात.

 

 

 

शिवाजी सावंत यांच्याविषयी थोडक्यात माहिती 

 

शिवाजी सावंत यांच्याविषयी माहिती नाही असा या महाराष्ट्रात एखादा निराळाच भेटेल. मुळात शिवाजी सावंत यांच्याविषयी जीवनात काही ऐकलं नाही असा महाराष्ट्रीय वाचक शोधूनही सापडणार नाही. 

ज्या प्रकारे आपण एकदातरी हज यात्रा करावी असे मुस्लिम समाजात मानले जाते. त्याचप्रकारे वाचनाची आवड असो कि नसो एकदा सावंतांची पुस्तके वाचावीत हा तर सध्या महाराष्ट्रातील अलिखित नियमच झाला आहे. 

गेली पाच सहा दशके शिवाजी सावंत यांनी मराठी मना-मनावर राज्य केलं आहे. आणि अजूनही हे मराठी मन त्यांच्या साहित्यकृतींचे दास आहे. अश्या या  जादूगाराविषयी आज आपण शिवाजी सावंत यांची पुस्तके या पोस्टच्या माध्यमातून माहिती घेत आहोत. 

शिवाजी सावंत यांचे पूर्ण नाव शिवाजी गोविंदराव सावंत. त्यांचा जन्म ३१ ऑगस्ट १९४० ला कोल्हापुरातील आजरा या गावी झाला. आजरा हे निसरहरामय वातावरणाने बहरलेलं छोटंसं गाव आहे. शिवाजी सावंत यांचे वडील गोविंदराव सावंत हे एक साधारण शेतकरी होते. 

घराची परिस्थिती अगदी बेताची असल्याने शिवाजी सावंत यांचे प्राथमिक आणि माध्यमीक शिक्षण आजऱ्यातच झाले. त्यानंतर शिवाजी सावंत यांनी पुढील शिक्षणासाठी कोल्हापूर गाठले. 

कोल्हापुरात बी.ए .चे प्रथम वर्षाचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले मात्र सर्वसामान्य कुटुंबांच्या अपेक्षेनुसार त्यांना लवकरात लवकर उत्पन्नाचे साधन मिळवून देणारे शिक्षण हवे होते. म्हणून त्यांनी बी.ए. चे शिक्षण तसेच ठेवून पुढे वाणिज्य शाखेतून पदविका घेतली.

पदविका घेतल्यानंतर शिवाजी सावंत यांनी आपल्या आपल्या कुटुंबाला आधार देण्यासाठी टायपिंग आणि शॉर्टहँड चा कोर्स करून कोर्टात कारकुनाची नोकरी केली.  

नंतरच्या काळात  शिवाजी सावंत यांनी कोल्हापूरच्या राजाराम प्रशाले मध्ये काही काळ अध्यापन केले. १९६२-१९७४ या काळात त्यांनी राजाराम प्रशाले ला अद्यापनात दिलेला वेळ आज एक प्रकारे या प्रशालेचे ओळख बनला आहे.

कोल्हापुराच्या राजाराम प्रशालेत अध्यापन करणे थांबवून पुढे ते पुण्याला स्थायिक झाले. पुण्यात स्थायिक झाल्यानंतर १९७४ते १९८० अशी सहा वर्षे त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत काम केले. या काळात शिवाजी सावंत हे महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाच्या ‘लोकशिक्षण’ या मासिकाचे सहसंपादक होते. 

पुढील काळात ते याच मासिकाचे सांपादक म्हणून नियुक्त झाले. मासिकाचे संपादक म्ह्णून काम पाहत असतांना त्यांची लेखनाची ओढ त्यांना स्वस्थ बसू देईना. म्हणून त्यांनी १९८३ साली संपादक पदावरून स्वेच्छानिवृत्ती घेतली . आणि पुढील आयुष्यात फक्त लहानवरच पूर्ण लक्ष केंद्रित केले. 

साहित्य क्षेत्रातील शिवाजी सावंत यांचे योगदान लक्षात घेऊन त्यांना १९८३ च्या मराठी साहित्य संमेलनाचे सम्मेलनाध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. १९८३ चे हे मराठी साहित्य संमेलन बडोदा येथे भरले होते. १९९५ पासून पुढे काही  शिवाजी सावंत यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून पदभार सांभाळला. 

२००२ मध्ये ७६ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कऱ्हाड येथे भरणार होते. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे ते उमेदवार होते. १८ सप्टेंबर रोजी आपल्या उमेदवारीच्या प्रचारासाठी गोव्याला गेले असतांना मडगाव येथे शिवाजी सावंत यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया यशस्वी झाली. मात्र पुढे त्यातच पुढे त्यांचे निधन झाले.  

 

Read  Also 

 

 

शिवाजी सावंत यांची पुस्तके 

 

मित्रांनो शिवाजी सावंत यांची पुस्तके या पोस्ट मध्ये आपण शिवाजी सावंत यांचा थोडक्यात जीवनपरिचय करून घेतलाच आहे. आता वळूया त्यांच्या साहित्य परिचयाकडे. कलाकाराची खरी ओळख त्याच्या कलेने असते. शिवाजी सावंत त्यांचीसुद्धा खरी ओळख, खरा परिचय हा त्यांच्या साहित्याच्या स्वरूपातच होऊ शकतो. 

शिवाजी सावंत यांनी त्यांच्या जबाबदाऱ्या पेलत अगदी थोड्याच साहित्याची निर्मिती केली आहे. संख्येने पाहता बोटावर मोजता येतील इतकीच त्यांची लेखांसंपदा;पण त्यांचे प्रत्येकाचं पुस्तकाने मराठी मनावर आजपर्यंत राज्य केलं आहे. चला तर शिवाजी सावंत यांची पुस्तके या पोस्टमध्ये आपण त्यांच्या या मराठी मनावर हुकूमत गाजवणाऱ्या साहित्य कृतींची माहिती घेऊयात. 

 

शिवाजी सावंत यांची पुस्तके-छावा -युगंधर-मृत्युंजय
मृत्युंजय-छावा-युगंधर

मृत्युंजय 

 

१९६२ ते १९७४ या काळात शिवाजी सावंत कल्हापुराच्या राजाराम प्रशालेत शिक्षक म्हणून काम करीत होते. एकीकडे अध्यापन आणि दुसरीकडे लेखन अशी तारेवरची कसरत करीत शिवाजी सावंत यांनी मृत्युंजय ही  कादंबरी लिहून पूर्ण केली. १९६७ ला मृत्युंजय प्रकाशित झाली. 

मृत्युंजय हि एक पौराणिक कादंबरी आहे. या कादंबरीच्या प्रस्तावनेत शिवाजी सावंत यांनी हिंदीतील केदारनाथ मिश्र यांच्या कर्ण आणि रामधारी सिंह ‘दिनकर’ यांच्या रश्मिरथी ह्या दोन खंडकाव्यांचा कृतज्ञता पूर्वक उल्लेख केलेला आहे. 

मृत्युंजय कादंबरीच्या लेखनासाठी शिवाजी सावंत यांनी थेट कुरुक्षेत्रावर मुक्काम ठोकला होता. प्रदीर्घ मनन, चिंतन, आणि संशोधन यांतून रससंपन्न अशी मृत्युंजय कादंबरी निर्माण झाली आणि शिवाजी सावंत हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत पोहोचले. 

मृत्युंजय कादंबरीचा मुख्य विषय आहे कर्णाचा जीवनप्रवास. महाभारताच्या युद्धात एक दांडगा खलनायक म्हणून समोर आलेला कर्ण मुळात खलनायक आहे का? कि त्याच्या आयुष्याला आणखी पैलू आहेत? याचा घेतलेला शोध म्हणजे मृत्युंजय. 

मृत्युंजय कादंबरी सुरु होते ती कर्णाच्या निवेदनाने. पुढे कर्णाच्या व्यक्तिमत्वाचा परिचय आपल्याला त्याच्या आजूबाजूच्या व्यक्तींच्या निवेदनात कळून येतो. एक भाऊ म्हणून, एक सेनापती म्हणून आपल्याला कर्णाची महती  आपल्याला शोण सांगतो.

एक मित्र म्हणून कर्ण कसा आहे याचा परिचय आपल्याला दुर्योधन देतो. एक पती म्हणून कर्णाच्या व्यक्तिमत्वाची बाजू आपल्यासमोर वृषाली मांडते तर एक महान योद्धा म्हणून श्रीकृष्ण आपल्यासमोर कर्णाला उपस्थित करतो. 

कर्णाच्या कथेच्या ओघाने आपल्याला महाभारताचे युद्धही या कादंबरीत पाहायला मिळते.कुरुक्षेत्रावर झालेल्या युद्धातील रोमांचकारी प्रसंग आपल्या डोळ्यांसमोर जिवंत होतात. 

सर्व प्रकारची योग्यता असतांनाही,पराक्रमाच्या बाबतीत सगळ्यांचा बाप असतांनाही जीवनात फक्त अपमानाचे ताट वाढून ठेवले असल्यानंतर अगतिक होणाऱ्या प्रत्येक माणसासाठी अतिशय प्रेरणादायी ठरावी अशी हि कादंबरी आहे. 

नशीब वेळावेळी घात  करायला उठले असतांना त्याला हरवण्यासाठी आपले भगीरथ प्रयत्न सुरु ठेवणाऱ्या असंख्य धडपड्या तरुणांना योग्य दिशा देण्याचे कामही हि कादंबरी करते.

सर्वश्रेष्ठ धनुर्धर असूनही ज्यावेळी फक्त खालच्या जातीत जन्म घेतल्यामुळे पदोपदी होनाऱ्या अपमानाला आपल्या कार्यदवरे,पराक्रमाद्वारे उत्तर देणारा कर्ण पुढे आपल्या समाजातील दलित चळवळीचा एक प्रकारे नायकच बनला आहे.

मृत्युंजय या कादंबरीच्या माध्यमातून शिवाजी सावंत यांनी कित्येक काळापासून एक खलनायक म्हणून आपल्याला दाखवण्यात आलेल्या कर्णाला जनमानसाच्या मनात एका पुरुषश्रेष्ठ नायकाचे स्थान मिळवून देण्यात यश मिळवले आहे. 

 

 

 

छावा 

 

मित्रांनो शिवाजी सावंत यांची पुस्तके या पोस्ट मध्ये आता आपण शिवाजी सावंत यांच्या छावा या कादंबरी विषयी माहिती घेऊयात. स्वराज्याचे धाकले धनी, रयतेच्या राज्याचे दुसरे छत्रपती यांच्या जीवनावर आधारित छावा  हि एक ऐतिहासिक कादंबरी आहे. हि कादंबरी १९८० ला प्रकाशीत झाली. 

या कादंबरीकडे बघता एक विचार नक्कीच मनात डोकावून जातो कि समाजाने, इतिहासाने ज्यांना ज्यांना बदनाम केले, ज्यांच्या पराक्रमाचा अनुल्लेखाने खून केला अश्या महान व्यक्तींना न्याय देण्याच्या हिशेबानेच कि काय शिवाजी सावंत यांनी आपली लेखणी उचलली आहे. 

जन्मताच काही दिवसन्त होणारे आईचे निधन. त्यातच छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य निर्मितीचा कार्यात व्यग्र असल्याने वडिलांच्या प्रेमाला मुकलेल्या  झालेले संभाजी महाराज्यांच्या बालमनावर काय परिणाम झाला असावा याचा अचूक ठाव शिवाजी सावंतांनी घेतला आहे. 

आग्राच्या भेटीत औरंगजेबाने शिवाजी महाराजांना  नजरकैद केलेले असतांना कुठलीही भीती न बाळगता त्या प्रसंगाला समोर जाणारे आणि स्वतःच्या प्रसंगावधानाने आणि संभाषण कौशल्याने महाराजांच्या सुटकेच्या योजनेचे मुख्य सूत्रधार असलेले संभाजी महाराज त्यावेळी जेमतेम नऊ वर्षाचे होते!

केवळ पराक्रम नव्हे तर विद्येच्याही क्षेत्रात आपली हुकूमत गाजवणारे, नखशिखा ,नायिकाभेद, बुधभुषणम यांसारख्या ग्रंथांची रचना अगदी लहान वयातच करणारे संभाजी महाराज खरेच शिवाजी महाराजांचा छावा शोभतात. 

छत्रपती शिवाजी महाराज हे  निर्विवाद सिंहपुरुष होते . परंतु शिवपुत्र संभाजी हाही एक छावाच होता. महाराष्ट्राला हे नव्यानं पण पुरेपूर उमजलं आहे. छावा च्या जोरदार स्वागतानं ते सिद्ध झालं आहे.एक दोनच नव्हे तर एकाचवेळी पाच आघ्याड्यांवर निकराची पंजेफाड करणारा हा सेना-धुरंधर ! मराठ्यांच्या इतिहासात असा सेनापती एकमेव संभाजीच होऊन गेला 

जंजिरेकर सिद्दी, गोव्याचे फिरंगी, मुंबईचे टोपीकर आणि तीस लाखांची फौज व चौदा कोटींचा खजिना घेऊन मराठ्यांचे पारिपत्य करण्यासाठी दक्षिणेत उतरलेला अवाढव्य औरंगजेब या त्या चार आघाड्या.पाचवी आघाडी होती स्वार्थांध स्वजनांची, अगदी घरचीच ! विखारी विश्वास घातक्यांची !

रणांगणाचा वाघ सतत नऊ वर्षे पाठीशी घेत मुलुखभर दौडणारा हा झुंजार राजा जन्माला येताना कविमनाचे संचित बरोबर घेऊन यावा आणि ‘बुध्दभूषणम् काव्याची रचना करुन तो कविराज म्हणून मान्यता पावावा हे पाहिले की प्रतिभा देवदत्त असली तरी एक अजब आणि विस्मयकारी देणगी आहे असे म्हणावे लागते. 

तसाच अटीतटीचा प्रसंग आला तर मराठी कविमन एकदा का निर्धाराने राजवस्त्र ल्यालें की मृत्यूलाही कसे धडक सामोरे जाऊ शकते. हे या छाव्याने तुळापुरी सिद्ध केले. ही शोकांतिका खरीच पण उत्कट आणि भव्य समर्पणाचा वेध घेणारी!

 

 

 

युगंधर 

 

मित्रांनो शिवाजी सावंत यांची पुस्तके या पोस्ट मध्ये आता आपण शिवाजी सावंत यांच्या युगंधर या कादंबरीविषयी थोडक्यात माहिती घेऊयात. मृत्युंजय प्रमाणेच युगंधर सुद्धा एक पौराणिक कादंबरी आहे. युगंधरचा नायक आहे महाभारतासारखं युद्ध घडवून आणणारा मुरलीधर श्री कृष्ण. 

श्रीकृष्णाच्या जीवनाने सामान्यांच्या जीवनाला एक प्रकारे वेड लावले आहे. बालकांचे संगोपन करणारे आईवडील असो, तारुण्याच्या भरातील प्रेम करणारे असोत, कुटील राजकारणी असोत, की तत्वज्ञानाची चर्चा करणारे तत्वज्ञानी असोत सगळ्यांच्या आदर्शस्थानी योग्यरीत्या नांदतो तो हरिणी श्रीकृष्ण. 

श्रीकृष्ण म्हणजे गेली पाच हजार वर्षे भारतीय स्त्री-पुरुषांच्या व्यक्त-अव्यक्त मनांचा तळठाव व्यापून दशांगुळे शेष उरलेली एक सशक्त विभूतिरेखा – एक युगपुरुष होय. श्रीकृष्णचरित्राचे अधिकृत संदर्भ सापडतात ते मुख्यतः श्रीमद्भागवत, महाभारत, हरिवंश व काही पुराणांत,या प्रत्येकात गेल्या हजारो वर्षात सापेक्ष विचारांची, मनगढंत पुटंच पुटं चढली. त्याचं तांबूस -नीलवर्णी, सावळं,गर्भातच दुर्लभ रंगसूत्रांचे संस्कार घेतलेलं, श्रीयुक्त म्हणजे सुंदर रुपडं घनदाट झालंय. 

श्रीकृष्णाच्या जीवनात चमत्कारांचे स्रोतच स्रोत – नकळत्या भाबडेपणी टाकल्या गेले आहेत. त्यामुळे आज तर श्रीकृष्ण क्रमश वास्तवापासून शेकडो योजनं दूर दूर जाऊन बसलाय. आजच्या भारतीय म्हणून

असलेल्या जीवनप्रणालीचा श्रीकृष्ण हा पहिला उद्गार आहे! जसा आभाळातील सूर्य कधी शिळा व बासा होत नाही तसाच हा महाभारताचा कथाकणा असलेला तत्त्वज्ञ वीर, आज तर नाहीच उद्याही शिळा होणार नाही.

जन्मतच दुर्मिळ रंगसूत्रं लाभल्यामुळं त्याच्या चक्रवर्ती जीवनचरित्रात भारताला नित्यनूतन व उन्मेषशाली बनविण्याचा ऐवज ठासून भरला आहे.श्रीकृष्णाच्या मूळ जीवनसंदर्भाची मोडतोड न करता त्याचं युगंधरी रुप बघता येईल का? त्याच्या स्वच्छ नीलवर्णी जीवनसरोवराचं दर्शन घेता येईल का ?गीतेत त्यानं विविध जीवनयोग नुसतेच सांगितले का कीहातच्या दिव्य, गतिमान सुदर्शनासारखे प्रत्येक्ष जगूनही दाखविले. 

त्याच्या जीवनसरोवरातील हजारो वर्षदाटलेलें शेवाळ तर्कशुद्ध सावधपणे अलगद दूर सारलं तर त्याचं युगंधरी दर्शन शक्य आहे.मृत्युंजय च्या यशशील रचनाकाराची प्रदीर्घ चिंतन, सावध संदर्भशोधन, डोळस पर्यटन व जाणत्यांशी संभाषण, यातून साकारलेली साहित्यकृती – युगंधर !!

 

शिवाजी सावंत यांची पुस्तके -लढत-संघर्ष
लढत आणि संघर्ष

 

 

  लढत

 

मित्रांनो शिवाजी सावंत यांची पुस्तके या पोस्ट मध्ये आता लढत या पुस्तकाच्या माध्यमातून आपण शिवाजी सावंत यांच्या थोड्या वेगळ्या लेखनशैलीचा परिचय करून घेणार आहोत. १९८६ च्या दरम्यान  प्रकाशित झालेली लढत हि एक द्विखंडात्मक चरित्रात्मक कथा  आहे. 

लढत हि चरितकहाणी  पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जीवनावर आधारित आहे. महाराष्ट्रात सहकारी तत्वाची पायाभरणी करून कृषी उद्योग क्षेत्रात भरभराट घडवून आणण्याचं मोलाचं काम करणारे श्री विठ्ठलराव विखे पाटील त्यांच्या संघर्षमय जीवांची कथा म्हणजे लढत होय. 

ज्याला कुणाला महराष्ट्राच्या सहकार चळवळीविषयी अगदी खोलात शिरून माहिती घ्यायची असेल त्यांच्यासाठी हि चरितकहाणी नक्कीच एखाद्या खजान्याच काम करेल. 

 

 

 

संघर्ष 

 

भारतीय स्वतंत्र चळवळीतील धडाडीचे नेते असणारे भाई मनोहर कोतवाल त्यांच्या संघर्षमय जीवनावर आधरीत संघर्ष हि एक चरित्रात्मक कथा आहे. भाई मनोहर कोतवाल हे कामगार चळवळीतील एक मनाचे स्थान मानल्या जातात. 

माथाडी व गोडी कामगार यांच्यासाठी कार्य करणारे भाई मनोहर कोतवाल यांनी त्यांच्या वयक्तिक आयुष्यात कामगार चळवळ आणि कामगारांसाठी कश्या तडजोडी केल्या? सत्तेच्या राजकारणात न रमता कामगारांच्या प्रश्नांना निकाली लावण्यासाठी त्यांनी केलेल्यातागाची हि एक लक्षवेधक कथा आहे. 

 

 

 

इतर 

 

शिवाजी सावंत यांची पुस्तके -इतर

 

वरील पुस्तकांसोबतच पुढे  काही शिवाजी सावंत यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. यात कवडसे, कांचनकन, शेलका साज  हे ललित निबंध आहेत. कादंबऱ्यांसोबतच छावा आणि मृत्युंजय हि दोन नाटके आहेत. या दोन्ही नाटकांचे बरेच प्रयोग झालेत आणि आजही महाराष्ट्रभर या दोन्ही नाटकांचे प्रयोग सुरूच असतात. छावा वर आधारित तर स्वराज्य रक्षक संभाजी महाराज हि मालिका महाराष्ट्रभर गाजली आहे. 

युगंधर या कादंबरी बरोबरच या कादंबरीच्या प्रस्तावनेचे विस्तारित स्वरूप म्ह्णून एक छोटेखानी पुस्तक शिवाजी सावंतांनी लिहिले आहे. त्याचे नाव आहे युगंधर श्रीकृष्ण:एक चिंतन. कथा कादंबऱ्यांबरोबरच व्यक्तिचित्रण या प्रकारालाही  शिवाजी सावंतांनी हात घातलेला आहे. त्यांनी मोरावळा हि व्यक्तिचित्रे १९९८ ला प्रकाशित केली आहेत. 

 

 

शिवाजी सावंत यांना मिळालेले सन्मान 

 

शिवाजी सावंत यांना  मिळालेले वेगवेगळे सन्मान पुढीलप्रमाणे. 

मृत्युंजयसाठी  – 

महाराष्ट्र राज्य पुरस्कार (१९६७), न.ची.केळकर पुरस्कार (१९७२), ललित मासिकाचा पुरस्कार (१९७३), भारतीय ज्ञानपीठाचा मुर्तीदेवी पुरस्कार (१९९४), फाय फाउंडेशन पुरस्कार(१९९६), आचार्य अत्रे विनोद विद्यापीठ पुरस्कार (१९९८), मृत्युंजय च्या गुजराती अनुवादाला गुआजरात सरकारचा साहित्य अकादमी(१९९०), गुजराती भाषेतीलच अनुवादाला केंद्रीय साहित्य अकादमी(१९९३) 

छावासाठी  महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार (१९८०)

पुणे विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार (२०००)

कोल्हापूरभूषण पुरस्कार(२०००) 

महाराष्ट्र सरकारचा जीवनगौरव हा साहित्यिक सन्मान (२०००)

ज्ञानपीठाचा मुर्तीदेवी पुरास्कार (१९९६)

 

 

 

समारोप 

 

मित्रांनो शिवाजी सावंत यांची पुस्तके या पोस्ट मध्ये आज अगोदर शिवाजी सावंत यांच्याबद्दल माहिती घेतली.त्यानंतर आपण शिवाजी सावंत यांच्या काही पुस्तकांबद्दल थोडी चर्चा केली.  आपण शिवाजी सावंत यांची जवळ जवळ सगळी साहित्यसंपदा पाहिली . 

तर मग मित्रांनो तुम्हाला आजची शिवाजी सावंत यांची पुस्तके ही  पोस्ट कसुरी वाटली?  या पोस्टमधून तुम्हाला काही नवी माहिती मिळाली का? मिळाल्यास तुमच्यासाठी कुठली माहिती नवी होती? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आम्हाला कळवा. 

मित्रांनो जर शिवाजी सावंत यांची पुस्तके या पोस्टमध्ये काही त्रुटी राहिल्या असतील, तुम्हाला काही सुधारणा सुचवायच्या  असतील तर तुम्ही contact us हे पेज वापरून आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. शिवाजी सावंत यांची पुस्तके या पोस्ट ला अधिकाधिक वाचनीय बनवण्यासाठी आपल्या सूचनांचे नेहमी स्वागत असेल. तर मित्रांनो शिवाजी सावंत यांची पुस्तके या पोस्ट विषयी तुमचा अभिप्राय नक्कीच कळवा आणि पोस्ट आवडल्यास तुमच्या वाचक मित्रांना शेअर करायला विसरू नका. 

 

धन्यवाद. !   

Leave a Comment