अग्निपंख मराठी सारांश। Agnipankh Book Summary In Marathi

नमस्कार मंडळी! मराठी motivation या ब्लॉग वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अग्निपंख मराठी सारांश।Agnipankh Book Summary In Marathi  या पोस्टच्या माध्यमातून डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम लिखित अग्निपंख या पुस्तकाबद्दल माहिती पाहणार आहोत.

 

सोबतच अग्निपंख मराठी सारांश।Agnipankh Book Summary  In Marathi  या पोस्टमध्ये अग्निपंख पुस्तक pdf free download करण्यासाठीची लिंक सुद्धा आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. चला तर बघूया अग्निपंख मराठी सारांश।Agnipankh Book Summary  In Marathi. 

 

Also Read 

 

अग्निपंख मराठी सारांश। Agnipankh Book Summary In Marathi

 

 

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्याविषयी थोडक्यात माहिती 

 

अग्निपंख मराठी सारांश।Agnipankh Book Summary  In Marathi बघत असतांना डॉ. कलाम यांच्याविषयी थोडक्यात माहिती घेणे अगत्याचे ठरते. डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम हे भारताचे एक शास्त्रज्ञ होते.ते भारताचे राष्ट्रपती या सर्वोच्च पदावर विराजमान होणारे पहिले भारतीय शास्त्रज्ञ आहेत. 

भारताच्या अवकाश संशोधन क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले. मुख्यत्वे क्षेपणास्त्रांच्या विकासात त्यांनी जी कामगिरी बजावली ती लक्षात घेता त्यांना “मिसाईल मॅन ऑफ इंडिया(missile man of india )” या नावाने ओळखले जाते. 

आपल्या आयुष्याची चाळीस वर्षे संशोधन क्षेत्रात वाहतांना त्यांनी त्यांचे कविमन आणि आतला लेखकही जपला. त्यांनी भारताच्या भवितव्यासाठी आणि इतर लोकांना प्रेरणा मिळावी म्हणून बऱ्यापैकी लिखाण केले.त्यांचे एकंदर  जीवनकार्य लक्षात घेऊन भारत सरकारने त्यांना तीनही सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. 

डॉ. ए.पी. जे.अब्दुल कलाम यांची जीवनकथा खरेच फार प्रेरणादायी आहे.एका नावाड्याच्या कुटुंबातून निघून भारताच्या सर्वोच्च पदावर जाऊन पोहचण्याचा त्यांचा जो प्रवास आहे तो सर्वच धडपडणाऱ्या भारतीय तरुणांसाठी अखंड प्रेरणेचा स्रोत बनून राहिला आहे. अग्निपंख हे त्यांचे आत्मचरित्र त्यांच्या जीवनातील सुरुवातीच्या संघर्षमय पर्वाची कहाणी आहे. 

 

 

पुस्तकाची रचना 

 

मित्रांनो अग्निपंख हे पुस्तक डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम लिखित wings of fire या मुळात इंग्रजीमधील पुस्तकाचा अनुवाद आहे. हा अनुवाद माधुरी शानभाग यांनी केला आहे. मित्रांनो अग्निपंख मराठी सारांश।Agnipankh Book Summary  In Marathi या पोस्टच्या माध्यमातूनन आम्ही अग्निपंख पुस्तक pdf  तुम्हाला मराठी आणि इंग्रजी अश्या दोन्ही स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू.

पण त्यापूर्वी आपण अग्निपंख मराठी सारांश।Agnipankh Book Summary  In Marathi या पोस्टमध्ये अग्निपंख या पुस्तकात आपल्याला नेमकं काय बघायला मिळेल आणि काय शिकायला मिळेल ते पाहुयात. 

अग्निपंख हे पुस्तक मुख्यत्वे चार विभागांत विभाजित केले गेले आहे. त्या प्रत्येक विभागाला विशेष नावही देण्यात आले आहे. प्रत्येक विभाग हा डॉ. कलाम यांच्या जीवनातील विशिष्ट कालखंडाशी जोडलेला आहे.

पहिला भाग ‘orientation’ म्हणून संबोधल्या गेला आहे. या विभागात कलाम यांच्या जीवनातील त्यांच्या जन्मापासून ते भारताच्या वतीने USA च्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी जाण्यापर्यंतचा प्रवास वर्णन केला आहे. हा विभाग १९३१ ते १९६३ पर्यंतच्या त्यांच्या जीवनातील घडामोडी, त्यांचे शैक्षणिक जीवन आणि त्यांच्या अवकाश विज्ञानाकडे निर्माण झालेला कल  या सर्वांबद्दल सखोल भाष्य करतो. 

दुसऱ्या विभागाला ‘creation ‘ म्हटल्या गेले आहे. या विभागात डॉ. अब्दुल कलाम यांच्या जीवनातील १९६३ ते १९८० या कालखंडाचे सविस्तर वर्णन येते. एक शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी काय काय काम केले.? कुठले प्रकल्प हाताळले? ते करत असताना त्यांच्या समोर कुठली संकटे उभी होती? या साऱ्यांची सविस्तर चर्चा या विभागात येते. 

तिसरा विभाग हा त्यांच्या जीवनातील १९८१ ते १९९० या काळाला निर्देशित करतो. या विभागात त्यांनी DRDO मध्ये जे कार्य केले,भारताच्या अवकाश संशोधनात आणि क्षेपणास्त्र विकासात जी महत्वाची भूमिका बजावली त्याविषयी माहिती येते. मुळात हा विभाग थोडा तांत्रिक माहितीने भरलेला वाटतो. आणि त्याचमुळे अवकाश संशोधन क्षेत्राशी कुठलही नातं नसणाऱ्यांना हा भाग कंटाळवाणासुद्धा वाटू शकतो. 

शेवटचा भाग आहे contemplation. या भागात डॉ. अब्दुल कलाम यांच्या १९९० नंतरच्या जीवनाबद्दल माहिती भेटते. आणि सर्वात शेवटी डॉ. अब्दुल कलाम यांचा उपदेश आपल्याला वाचायला मिळतो. 

 

 

अग्निपंख काय आहे? या पुस्तकात मला काय सापडलं ?

 

मित्रांनो अग्निपंख मराठी सारांश।Agnipankh Book Summary  In Marathi या पोस्टमध्ये मी तुम्हाला अग्निपंख या पुस्तकाचा सरळ सरळ सारांश न देता हे पुस्तक वाचत असतांना मला ज्या गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या त्यांबद्दलच माहिती देणार आहे. आणि सारांश वाचून पुस्तक समजणार नसत; कारण कुणीही लिहिलेला सारांश हा त्याच्या वैयक्तिक दृष्टीकोनाचा परिपाक असतो. म्हणून तुम्ही स्वतःही हे पुस्तक वाचावे हेच सांगणं. 

पुस्तक वाचण्यासाठी अग्निपंख पुस्तक pdf free download ची लिंक आम्ही उपलब्ध करून देणार आहोतच. पण तत्पूर्वी हे पुस्तक वाचतांना मला काय जाणवलं ते मी तुम्हाला सांगतो. 

 

 

भारताच्या अवकाश संशोधनातील प्रगतीची कथा 

 

अग्निपंख पुस्तक वाचत असतांना आपल्याला सर्वात आधी लक्षात येणारी गोष्ट म्हणजे हे पुस्तक कोना एका व्यक्तीचे चरित्र जरी वाटत असले तरी ते तसे नाही. डॉ. अब्दुल कलाम यांच्या अवतीभोवती जरी हि संपूर्ण कहाणी फिरत असली तरी तिची सांगड भारताच्या कथेशी अलगद जुडून येते.ही कथा डॉ. अब्दुल कलाम यांच्या खुलत जाणाऱ्या जीवनप्रवासाबरोबरच भारताचा अवकाश संशोधनातील प्रवासही दर्शवून जाते. 

१९३१ च्या काळात या कथेला सुरुवात होते. हा काळ आहे डॉ.अब्दुल कलाम यांच्या जीवनातील बालपणीचा काळ. १९३१ ते १९४७ हा काळ जर भारताच्या दृष्टीने पाहतो म्हटलं तर भारताच्या अवकाश क्षेत्राचाही हा बालपणाचाच काळ म्हणावा लागेल. कारण या काळात डॉ. कलाम आणि भारतीय अवकाश संशोधन क्षेत्र या दोघांच्याही भवितव्याची दिशा ठरायची होती. 

डॉ. अब्दुल कलाम एका गरीब कुटुंबात जन्माला आले. तसा भारतही या वेळी गरिबीत पिचलेला, ब्रिटिशांच्या शोषणाने कमकुवत झालेला होता. वडील अगदी नावाडी असतांना आपले अवकाशभरारीचे स्वप्न जपण्यासाठी डॉ. कलाम यांनी जसा परिस्थितीसोबत संघर्ष केला तसाच संघर्ष भारतानेही स्वतःला या अवकाश संशोधन क्षेत्रात प्रगत करण्यासाठी संघर्ष केला.दारिद्र्य, बेरोजगारी, आणि आरोग्याच्या समस्या आ वासून पुढे उभ्या असतांना आपण सगळ्यांशी तोंड देत अवक्ष संशोधनात यश मिळवले. 

या पुस्तकाचा सुरुवातीचा भाग जरी डॉ. कलाम यांच्या जीवनावर असला तरी उर्वरित भाग मात्र भारताच्या अवकाश संशोधन क्षेत्रातील प्रगतीबद्दलच जास्त बोलतो.हे पुस्तक डॉ.कलाम यांचं जीवन आणि भारताची तंत्रज्ञानातील प्रगती या दोघांनाही समांतर घेऊन चालतं . 

 

 

हिंदू- मुस्लिम ऐक्य  

 

अग्निपंख या पुस्तकातून प्रत्येक ठिकाणी जाणवणारी गोष्ट म्हणजे हिंदू- मुस्लिम ऐक्य होय. या पुस्तकात हि ऐक्याची भावना प्रदर्शित करणारे आणि धर्मनिरपेक्षतेला प्रोत्साहन देणारे अनेक प्रसंग आपल्याला पाहायला मिळतात. त्यातलाच एक प्रसंग म्हणजे धनुष्कोडीतील प्रभू रामचंद्रांशी निगडित उत्सव होय. 

या उत्सवात राम मंदिरातील रामाची मूर्ती रामेश्वरम वरून धनुष्कोडीला घेऊन जात. रामेश्वर आणि धनुष्कोडी यांच्या दरम्यान नदी वाहते. ही  नदी पार करून मूर्ती पलीकडच्या काठाला घेऊन जाण्यासाठी कलामांच्या वडिलांची नाव वापरली जात असे. ते स्वतः मनोभावे त्या कार्यात मदत करीत.सोबतच ते आपल्या नावेतून तीर्थांसाठी आलेल्या लोकांना अपेसखींत ठिकाणांपर्यंत पोचवून देत असत.आपण सहजच म्हणू शकतो कि डॉ.कलाम यांनी धर्म सहिष्णुता हा गन त्यांच्या वडिलांककडून घेतला.  

हिंदू -मुस्लिम ऐक्याबद्दल बोलायचे झाल्यास त्यांच्या बालपणातील एक प्रसंग खूप काही सांगून जातो. शाळेत कलाम आणि त्यांचा एक जिवलग मित्र, दोघेही सोबत एकाच बाकावर बसायचे. हा जिवलग मित्र म्हणजे रामेश्वरमच्या राम मंदिरातील पुजारी पक्षी लक्ष्मणशास्त्री यांचा मुलगा होता. 

एकदा शाळेत एक नवे शुष्कक आले होते. ते स्वभावाने खूप कर्मठ आणि सनातनी होते. त्यांना एका पुजाऱ्याच्या मुलाने एका मुस्लिमांच्या लेकरासोबत एका बाकावर बसलेले आवडले नाही. त्यांनी कलाम यांना मागच्या बाकावर जाऊन बसायला सांगितले. ते तसे का म्हणाले हे कलाम आणि त्यांचा मित्र या दोघांनाही लक्षात आले. 

कलामांनी मात्र या अपमानास्पद वागणुकीकडे कानाडोळा केला. मात्र त्यांच्या मित्राने ही  गोष्ट त्याच्या वडिलांच्या कानावर घातली. पक्षी लक्ष्मणशास्त्री आणि कलामांचे वडील चांगले मित्र होते. पक्षी लक्ष्मणशास्त्री यांनी त्या शिक्षकाला घरी भेटायला बोलावले आणि कडक शब्दांत त्याची समजूत काढली. त्यानंतर मात्र त्या शिक्षकाने कुठल्याही विद्यार्थ्याला जाती धर्मावरून वेगळी वागणूक दिली नाही. 

आपल्याला बऱ्याच ठिकाणी जाणवते कि कलाम अतिशय अध्यात्मिक स्वरूपाचे होते. ते स्वत अल्लाहला मानत असतांनाच शिवशंकर शम्भूपुढेही नतमस्तक होत असत. त्यांच्या मार्गदर्शनात तयार झालेल्या क्षेपणास्त्रांची नवे नंदी, त्रिशूल, नाग, यांसारखी आहेत. जी शंकराशी निगडित आहेत. त्यातून त्यांचा शिवभक्तीकडे असणारा कलही दिसून येतो. 

 

 

आध्यात्मिकतेचा सुवर्णस्पर्श 

 

आधुनिकी जग हे विज्ञान आणि अध्यात्मिक गोष्टी यांना एकमेकांच्या विरुद्व असणाऱ्या गोष्टी म्हणून बघतं. त्यातही एखादा वैज्ञानिक असेल किंवा विज्ञानवादी असेल तर सहसा त्याने देवाच्या अस्तित्वावर, त्याच्या महानतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे ही  तर आजची फॅशन होऊन बसली आहे. विज्ञानाची दोन तीन पुस्तके वाहून बरीच मंडळी आपण कसे जगावेगळे आहोत हे ठसवण्यासाठी या धार्मिकतेला, अध्यात्माला विरोध करतांना आढळतात. 

मात्र कलाम यांची कहाणी थोडी निराळीच आहे. त्यांच्या या जीवनकथेत अध्यात्मच अध्यात्म भरलेले आहे. एका वैज्ञानिकांचा असल्या गुढ गोष्टींवर विश्वास होता हे पाहताना आपल्याला थोडे वेगळे वाटेल पण तेच सत्य आहे. मात्र त्यांची देवावर असणारी श्रद्धा ही  अंधश्रद्धा नव्हती. ती अगदी सजग आणि डोळस अशी श्रद्धा आहे. 

त्यांच्या देवावर असणाऱ्या या श्रद्धेमुळेच त्यांना जीवनभर अगदी साधेपणाने जगात आले. कुठलाही गर्व, ईर्ष्या त्यांच्या मनात कधीच निर्माण झाली नाही. “जे काही माझ्या हाताने घडले. माझ्या हाताने देशाची जी काही सेवा झाली. ते सगळं त्या वरच्या करूणाकाराच्या योजनेचा भाग होय. त्यात माझं अस स्वतःच काहीच नाही.” या प्रकारचा नम्रभाव हा त्यांच्या अध्यात्मिकतेचाच परिणाम होय. 

पुस्तकाची सुरुवातच अथर्ववेदातील ओळींनी होते. बऱ्याच ठिकाणी पवित्र कुराण मधील बरीच उद्धरणे आली आहेत.सोबतच डॉ. अब्दुल कलाम यांचे त्यांच्या वडिलांशी, स्वामी सिवानंदांशी, जलालुद्दीनसोबत होणारे संभाषण हे सारे या आध्यात्मिक वूत्तीबद्दलच निर्देश करतात.  

  

Also  Read

 

जीवनोपयोगी धड्यांनी भरलेली कथा 

 

अग्निपंख या पुस्तकातील प्रत्येक पाठात तुम्हाला जीवनोपयोगी शिकवन मिळेल. हे पुस्तक तुम्हाला मुख्यत्वे नेतृत्वाची कला शिकवेल. डॉ. कलाम यांनी खरे नेतृत्व काय असते हे विक्रम साराभाई, सतीश धवन, ब्रह्मा प्रकाश इत्यादींच्या उदाहरणांतून दाखवून दिले आहे. 

डॉ. कलाम स्वतःमध्येच खऱ्या नेतृत्वाचे उदाहरण आहेत. कुठलाही नेतृत्व म्हटलं की  सहसा आपल्या डोक्यांत एक भारदस्त व्यक्ती येते. जबरदस्त देहयष्टी, चांगला रोकठोक आवाज आणि कोणाही व्यक्तीपासून काम काढून घेण्याची लबाडी असे अनेक गुण असायला हवेत. मात्र डॉ. कलाम यांच्याकडे खरं  पाहता यांपैकी काहीही नव्हतं. 

डॉ. कलाम यांच्याकडे एक सगळ्यात महत्वाचा गुण होता. तो म्हणजे नवीन शिकण्यासाठी ते नेहमी तयार असत. परिणामी त्यांना आपल्या कनिष्ठांवर कधी बॉसिंग करायची गरजच पडली नाही. यश असेल तर श्रेय सर्वांना देणे आणि अपयशात सर्व जबाबदारी स्वतःवर स्वीकारणे या त्यांच्या वृत्तीमुळे आणि नम्र स्वभावामुळे त्यांनी नेतृत्वाची निराळीच पद्धत शोधली. 

मुळात आपण लोकांचं नेतृत्व करण्याची इच्छा ठेवण्यापेक्षा आपल्या कार्यात इतकं निपुण व्हावं की लोकं  आपसूकच आपलं अनुकरण करू लागतील. हेच आपल्याला डॉ. कलाम यांच्या अग्निपंख या पुस्तकातून शिकायला मिळत. 

 

 

अग्निपंख पुस्तक pdf free download 

 

मित्रांनो तुम्ही जर पोस्ट पूर्ण असेल तर अभिनंदन. मात्र जर तुम्ही सरळ  अग्निपंख पुस्तक pdf free download ची लिंक शोधात सरळ येथपर्यंत आला असाल तर तुम्हाला ही  पोस्ट थोडं लक्ष देऊन वाचण्याची विनंती करतो. कारण तुम्ही पोस्ट वाचल्यास मलाही तुमची मते कळू शकतील.

 

अन्यथा अग्निपंख मराठी सारांश।Agnipankh Book Summary In Marathi  या पोस्ट च्या माध्यमातून अग्निपंख या पुस्तकाबद्दल केलेली ही चर्चा एकतर्फी आणि एखाद्या उपदेशात्मक प्रवचनाप्रमाणे होईल. जो या लिखाणामागचा माझा उद्देश नाही आहे. तेव्हा नक्की वाचा आणि आपली मते मलाही कळवा. अग्निपंख पुस्तक pdf free download  करण्यासाठी पुढील लिंक वर क्लीक करा. 

 

अग्निपंख पुस्तक pdf (free download)

 

 

 

समारोप 

 

मित्रांनो आज आपण अग्निपंख मराठी सारांश।Agnipankh Book Summary In Marathi  या पोस्ट मध्ये डॉ.अब्दुल कलाम यांच्या अग्निपंख या आत्मचरित्राची माहिती घेतली. अग्निपंख मध्ये आपल्याला काय शिकायला मिळेल?पुस्तकाचे स्वरूप कसे आहे? काय वेगळेपण आहे इत्यादी बाबी आज आपण बघितल्या. 

सोबतच अग्निपंख पुस्तक pdf free download करण्यासाठी लिंकही आम्ही उपलब्ध करून दिली. मित्रांनो अग्निपंख मराठी सारांश।Agnipankh Book Summary In Marathi  या पोस्ट मधील माहिती आपल्याला आवडली का? या पोस्टमध्ये मी माझी जी मते मंडळी आहेत त्यांच्याशी तुम्ही सहमत आहात एक? सहमत असाल तर का? आणि नसाल तर का नाही? हे मला कंमेंट करून नक्की कळवा. आणि हो ही  पोस्ट आणखी सुंदर आणि माहितीपूर्ण बनवण्यासाठी काही सूचना असतील तर त्या सुद्धा नक्की कळवा. 

धन्यवाद !

3 thoughts on “अग्निपंख मराठी सारांश। Agnipankh Book Summary In Marathi”

  1. Tumhi khup sundar “agnipankh” pustakachi mahiti sangitali aahet. mahiti vachun pustak vaachanaachi prerana milali. Dr. kalam sir yanchya leadership baddal vachun man bharavun gele. khup khup dhanyawad sir.

    Reply

Leave a Comment