भारतीय वैज्ञानिक मराठी माहिती । Indian Scientist Information in Marathi

नमस्कार मंडळी मराठी motivation या ब्लॉग वर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. नेहमी प्रमाणेच आम्ही आजही तुमच्यासाठी मनोरन्जक आणि प्रेरणादायी अशी माहिती घेऊन आलो आहोत.

 

मित्रांनो आज आपण भारतीय वैज्ञानिक मराठी माहिती या पोस्ट मध्ये भारतातील वैज्ञानिक आणि विज्ञानाच्या क्षेत्रात जागतिक पातळीवर भारताचे योगदान याविषयी माहिती घेणार आहोत. 

 

 

 

भारतीय वैज्ञानिक मराठी माहिती 

 

सुमारे ४५०कोटी वर्षांपूर्वी पृथ्वी तयार झाली. आणि ३८५ कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर पहिला जीव निर्माण झाला. या जीवापासून हळू हळू उत्क्रांत होत सुमारे ४ लाख वर्षांपूर्वी माणसाचे पूर्वज पृथ्वीवर उतरले. आणि सर्वात शेवटी एक लाख वर्षांपूर्वी माणूस अवतरला

निसर्गाने सर्व प्राण्यांना काही ना काही वैशिष्ट्ये दिलीत. माणसाला मिळालेलं  बुद्धीचं  वैशिष्ट्य हेही निसर्गाचीच देणगी. या देणगीच्याच जोरावर मग माणसाने निसर्गाच्या नियमांचा शोध सुरु केला. कधी भयातून, कधी कुतूहलातून तर कधी गरजेपोटी माणसाने निसर्गातील घडामोडींच्या मागची करणे शोधणे सुरु केले. आणि त्यातूनच विज्ञान विकसित झाले. 

विज्ञानाच्या क्षेत्रातही भारताचे योगदान महत्वाचे राहिले आहे. आज आपण भारतीय वैज्ञानिक मराठी माहिती या पोस्ट मध्ये आपल्या भारतातील वैज्ञानिकांविषयी माहिती घेणार आहोत आपण आधी प्राचीन भारतातील वैज्ञानिक यांच्याविषयी माहिती घेऊयात. 

 

 

 

प्राचीन भारतीय वैज्ञानिक मराठी माहिती

 

सर्वांना माहीतच आहे कि प्राचीन भारताने जवळ जवळ सगळ्याच क्षेत्रांत जगाचे नेतृत्व केले. मग ते क्षेत्र तत्वज्ञानाचे असो, गणिताचे,खगोलशास्त्राचे, किंवा धर्माचे. आज भारतीय वैज्ञानिक मराठी माहिती या पोस्ट मध्ये आपण आधी प्राचीन भारताला ते सर्वोच्च शिखर मिळवून देणाऱ्या काही महतवाच्या वैज्ञानिकांविषयी माहिती घेऊया. 

 

 

 

भारतीय वैज्ञानिक मराठी माहिती -

महर्षी कणाद

 

महर्षी कणाद यांच्या जीवनकाळाविषयी अचूक माहिती उपलब्ध नाही. तज्ज्ञांच्या मते इसवी सन पूर्व सहावे ते इसवी सन पूर्व दुसरे शतक यांच्या दरम्यान त्यांचा  कार्यकाळ मानला जातो.कणाद  यांचे आई वडील,त्यांचे जन्मठिकाण इत्यादी बाबतीत माहिती उपलब्ध नसली तरी त्यांच्या विषयी धार्मिक पुराव्यांतून माहिती मिळते. 

महर्षी कणाद यांचं मूळ नाव होतं  ‘उलूक’. मात्र ते दिवसभर ग्रंथ लेखन करीत आणि रात्री शेतातील कां वेचून उदरनिर्वाह करीत त्यामुळे लोक त्यांना कणाद म्हणूनच ओळखत. प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानाच्या सहा शाखांपैकी एक असणाऱ्या वैशेषिक शाखेची स्थापना महर्षी कणाद यांनी केली.सोबतच त्यांनी अनुसंरचनेबाबत मांडलेल्या सिद्धांतामुळे त्यांना आण्विक भौतिकशास्त्रात त्यांना महत्वाचे स्थान आहे. 

महर्षी कणाद यांनी आपले विचार, तत्वज्ञान ‘वैशेषिक सूत्र ‘ या संस्कृत ग्रंथामध्ये संकलित करून ठेवले. या ग्रंथातील त्यांच्या विचारांवरच वैशेषिक शाखेचा पाया उभारला गेला . महर्षी कणाद  यांच्या मतानुसार या जगातील सर्वच वस्तू विभाजित केल्या जाऊ शकतात. मात्र या वस्तूंना विभाजित करत जात असतांना सर्वात शेवटी एक असा कां असेल ज्याला आपण विभाजित करू शकणार नाही. त्यालाच ‘परमाणू’ म्हणतात. ‘परमाणू’ ही  संज्ञा प्रथमतः कणादांनीच वापरली.   

 

   

 

भारतीय वैज्ञानिक मराठी माहिती -

आर्यभट्ट 

 

भारतातील वैज्ञानिक यांची माहिती बघत असतांना एक नाव आवर्जून घ्यावे लागेल ते म्हणजे आर्यभट्ट. आर्यभट्ट यांचा जन्म इसवी सन ४७६ मध्ये  कुसुमपुरा येथे झाला. कुसुमपुरा हे ठिकाण तत्कालीन गुप्त साम्राज्याच्या राजधानीतील, पाटलीपुत्र मधील एक गाव होते. आज हे ठिकाण बिहार मधील पाटणा मध्ये येते.मात्र भास्कर १ यांच्यामते आर्यभट्ट अश्मक राज्यात जन्मलेले म्हणजेच आजच्या आपल्या महाराष्ट्रात जन्मलेले आहे. 

जन्म कुठेही झाला असला तरी त्यांचे शिक्षण कुसुमपुरा येथे झालं याबाद्द्दल निश्चितपणे सांगता येते. नंतर त्यांनी तेथेच आणि जवळच असणाऱ्या नालंदा विद्यापीठात अध्यापन केले असण्याची शक्यता वर्तवल्या जाते.  

आर्यभट्ट यांनी गणित आणि खगोलशास्त्राबाबत बरंच  लिखाण केलं. त्यांच्या ग्रंथांपैकी बरेच ग्रंथ काळाच्या ओघात नष्ट झालेत आणि जे काही सध्या आपल्या हाती लागलेत तेही वेगवेगळ्या पुस्तकांत आलेल्या संदर्भांतून आणि इतर माहितीतून संकलित करण्यात आलेले आहेत.

आर्यभट्ट यांनी त्या काळात बरीच गणितीय सूत्रे देऊन ठेवली होती. भूमितीत नित्याचा असणारा ‘साइन फंक्शन’ विषयी त्यांनी त्याकाळीच विचार केला होता आणि त्याचा वापरही केला होता. पृथ्वी गोल आहे आणि ती स्वतःच्या अक्षाभोवती फिरते याची आर्यभट्टाला कल्पना होती. 

खगोलशास्त्रावरचा त्याचा ‘आर्यभटीय’ हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. या ग्रंथात एका ठिकाणी तो म्हणतो की  “आकाशातील सूर्य, तारे पृथ्वीभोवती फिरल्यासारखे वाटले तरी खरतर तेच स्थिर आहेत आणि पृथ्वीच त्यांच्याभोवती फिरतेय.” आज आपण जरी ‘पृथ्वी सूर्याभोवती फिरते’ या शोधच श्रेय कोपर्निकसला देत असलो तरी त्याच्या जवळपास एक हजार वर्षागोदरच आर्यभट्ट यांनी ते सांगितलं होतं याबाबत जगात कुठेच दुमत नाही. 

कुठलही साधन उपलब्ध नसतांना आर्यभट्ट यांनी पृथ्वीचा परीघ ३९७३६किमी इतका काढला होता. आज उपलब्ध माहितीनुसार पृथ्वीचा परीघ ३९८४३किमी इतका आहे. त्याकाळी जवळपास इतकं अचूक उत्तर मिळवणं म्हणजे भन्नाटच म्हणव लागेल. 

ग्रहणाबद्दल भाष्य करतांना ‘चंद्राला स्वतःचा प्रकाश नाही. त्याला प्रकाश सूर्यापासून मिळालेला असतो.’ असं  आर्यभट्ट म्हणत असे. त्याने एका वर्षात ३६५ दिवस ६ तास १३ मिनिटे आणि ३० सेकंड असतात हेही अचूक काढलं होतं. खगोलशास्त्र आणि गणित दोन्ही बाबतीत आर्यभट्ट हे एक जिनिअसच होते. म्हणूनच त्यांच्या सन्मानार्थ भारताने आपल्या पहिल्या कृत्रिम उपग्रहास ‘आर्यभट्ट’ हे नाव दिले. 

 

 

भारतीय वैज्ञानिक मराठी माहिती-Bramhagupt

ब्रम्हगुप्त 

 

ब्रम्हगुप्त  सातव्या शतकातील एक भारतीय गणिततज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ होते. आज आपण “ जब जिरो दिया मेरे भारत ने , दुनिया को तब गिनती आई’ असं म्हणत गर्वानं फुलून जातो. त्या झिरो चा , शून्याचा शोध ब्रम्हगुप्त यांनीच लावला. 

सध्याच्या राजस्थान राज्यातील भिल्लमल गावात त्यांचा जन्म झाला.त्यांचा उल्लेख त्यांचे शिष्य बरेचदा भिल्लमालाचार्य  असा करतात. ते त्याच कारणाने.पुढील आयुष्यात ते उज्जैन येथे असणाऱ्या तत्कालीन वेधशाळेचे प्रमुख बनले.  

ब्रम्हगुप्त यांनी विपुल लिखाण केलं. त्यांचे दोन ग्रंथ प्रसिद्ध आहे. ‘ब्रह्मफुटसिद्धांत’ आणि ‘ खंडखाद्यक’. ब्रह्मफुटसिद्धांतामध्ये शून्याविषयी चर्चा आढळते. त्यात त्यांनी शून्याची व्याख्या आणि त्याच्या वापरासंबंधी नियम सांगितले आहेत. फक्त शून्याने एखाद्या संख्येला भागले असता उत्तर काय येईल याबाबत त्यांची चूक झाली असली तरी तो एक नियम सोडला असता आपण गणितात शून्याचा जो वापर करतो, त्याचे जे नियम आहेत ते सारेच ब्रम्हगुप्तांनी दिलेले. 

ब्रम्हगुप्त यांनी संख्येचा वर्ग आणि वर्गमूळ, घाण आणि घनमूळ काढण्यासंबंधात नियम सांगितले होते.पाच प्रकारच्या अपूर्णांक कसे हाताळावे यासंबंधीची त्यांनी नियम दिलेले. सुरुवातीच्या n नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज आणि घनांची बेरीज काढण्यासाठी त्यांनी अचूक सूत्र दिले होते. 

ब्रह्मगुप्त यांनी वर्गसमीकरणाच्या क्षेत्रातही उल्लेखनीय काम केलं आहे. वर्गसमीकरणांना दोन उत्तर असतात या गोष्टीकडे प्रथमतः त्यांनीच लक्ष वेधले. सोबतच एकसामायिक समीकरणे आणि दोन चल असणारी वर्गसमीकरने यांबद्दलही त्यांचे संशोधन काळाच्या बरेच पुढे होते. 

भूमितीमध्ये ब्रम्हगुप्ताचें चक्रीय चौकोनाशी निगडित संशोधन फार महत्वाचे मानले जाते. चक्रीय चकोनाचे क्षेत्रफळ काढण्यासाठीचे त्यांचे सूत्र, आणि चक्रीय चौकोनाचे कर्ण यांच्याविषयी त्यांनी दिलेले प्रमेय खूप प्रसिद्ध आहे.  

 

 

 

वराहमिहिर 

 

ज्योतिष्याशास्त्राच्या अनेक शाखांवर ग्रंथलेखन करणारे ज्योतिषी आणि गणिती वराहमिहिर यांची माहिती आपण आता भारतीय वैज्ञानिक मराठी माहिती या पोस्ट मध्ये घेणार आहोत. इसवी सन ४९० ते ५८७ असा वराहमिहिर यांचा कार्यकाळ ठरवला जातो. ते दीर्घकाळ उज्जैन येथे वास्तव्यास होते. 

वडील आदित्यदास यांच्याकडून वराहमिहिर यांना ज्योतिषशास्त्राचे प्राथमिक ज्ञान मिळाले. पाश्चिमात्य ज्योतिषशास्त्राचा त्यांनी अभ्यास केला होता. त्यांचा फळ ज्योतिष्यावर आणि शकुनावर फार विश्वास होता. त्यावेळी फलज्योतिष्य आणि खगोलशास्त्राविषयी यासंबंधी जेवढे ज्ञान होते ते सारे त्यांच्या ग्रंथांतू आले आहे. 

वराहमिहिर यांचा पंचसिद्धांतिका हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. या ग्रंथात पौलिश, रोमक वसिष्ठ, सौर व पैंतमह अशा पाच प्राचीन सिद्धांतांचा सारांश दिला आहे. यातील कोणताही सिद्धांत त्यांचा स्वतःचा नाही. पण त्यावर त्यांनी केलेले विश्लेषण खूप महत्वाचे मानले जाते.

पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून अंतरिक्षात अधांतरी फिरत आहे हे वराहमिहिर  यांना माहित होते. पंचसिद्धांतिकच्या तेराव्या अध्यायात विश्वाची रचना आणि अन्य गोष्टींचे विश्लेषण आढळते. भास्कराचार्य यांनी तर वराहमिहिराची स्तुती केली आहे आणि आपल्या अनेक ग्रंथांत त्यांची वचने आधारास घेतली आहेत. 

बृहत्संहिता हा वराहमिहिर यांचा दुसरा प्रसिद्ध ग्रंथ. या ग्रंथाची भाषा काव्यमय आहे. यात सूर्य, चंद्र आणि ग्रह यांच्या गती आणि त्यांची फळे त्याचप्रमाणे अगस्ती, सप्तर्षी यांच्या उदयकाळाची फळे व ग्रहणे इत्यादी माहिती विस्ताराने दिली आहे. 

 

 

 

भारतीय वैज्ञानिक मराठी माहिती-भास्कराचार्य

भास्कराचार्य 

 

आर्यभट्ट नंतरचा खूप मोठा असा कुणी शास्त्रज्ञ त्या काळात झाला असेल तर तो म्हणजे भास्कराचार्य. बाराव्या शतकात गणित आणि खगोलशास्स्त्रात भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे कार्य भास्कराचार्यानी केले. 

गणितामधला एक प्रश्न ‘पीअरे दि फार्मा’ यांनी ‘बेसी’ या गणिततज्ञाला विचारला होता. X आणि y  हे जर पूर्णांक असतील तर ६१( x  चा वर्ग )+ १ = y चा वर्ग  हे समीकरण कसे सोडवायचे? असा तो प्रश्न होता. १६५८ ला विचारलेला हा प्रश्न सोडवायला गणिततज्ञांना १७३२ साल उजाडावे लागले. 

मात्र भास्कराचार्यांनी तो प्रश्न ११५० मध्येच सोडवून ठेवलेला होता. हा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी चक्रावला ही  पद्धत वापरली होती. हि पद्द्धती भास्कराचार्यांच्या सिद्धांत शिरोमणी मध्ये दिली पण होती. 

भास्कराचार्यांनी त्यांची अल्पवयात विधवा झालेली मुलगी लीलावती हिच्यासाठी ‘लीलावती’ नावाचा गणितावरील ग्रंथ लिहिला. हे पुस्तक त्याकाळी इतकं लोकप्रिय झालं होत की  ‘ते वाचल्यानंतर कुठल्याही झाडावर पाने किती? हे कुणालाही अचूकपणे सांगता येईल.’ असे लोक म्हणत. 

भास्कराचार्यांनी खगोलशास्त्रातही गणिताचा वापर केला. ‘गणिताध्याय’ आणि गोलाध्याय’ हे त्यांचे खगोलशास्त्रावरचे ग्रंथ खूप प्रसिद्ध आहेत. भास्कराचार्य  कॅल्क्युलस ही  गणितातील शाखा मांडण्याच्या खूप जवळ पोहचले होते. 

 

 

Also Read

 

 

 

आधुनिक काळातील भारतीय वैज्ञानिक मराठी माहिती

 

मित्रांनो भारतीय वैज्ञानिक मराठी माहिती या पोस्ट मध्ये आपण आतापर्यंत प्राचीन भारतीय वैज्ञानिक यांच्याविषयी माहिती पाहिलीत. आता आपण आधुनिक काळातील भारतीय वैज्ञानिक यांची माहिती पाहुयात.  

 

 

सर शांतीस्वरूप भटनागर 

 

शांतिस्वरूप भटनागर यांचा जन्म २१ फेब्रुवारी १८९४ ला ब्रिटिश भारतातील पंजाब राज्यातील भेरा  या गावी झाला. हे ठिकाण सध्या पाकिस्तानात आहे. ते आठ महिन्याचे असतांनाच त्यांचे वडील मरण पावले आणि त्यामुळे त्यांचे पालन पोषण त्यांच्या आजोळी झाले. 

त्यांचे आजोबा एक अभियंता होते. त्यामुळे त्यांच्या सानिध्यात शांतीस्वरूप यांच्या अंगी विज्ञानाविषयी आवड निर्माण झाली. त्यांना लहानपणी यांत्रिक खेळणी बनवायला खूप आवडायचे. 

शांतीस्वरूप यांनी आपले प्राथमिक शिक्षण सिकंदराबादच्या  दयानंद आंग्लो वेदिक हायस्कुलमधून पूर्ण केले. १९११ ला त्यांनी नव्याने स्थापित झालेल्या लाहोरच्या दयाळ सिंग महाविद्यालयात प्रवेश घेतला. या महाविद्यालयात असतांनाच त्यांनी एक नट म्हणून प्रसिद्धी मिळविली. त्यांनी त्या वेळी एक उर्दू एकांकिका लिहिली होती. ‘करामती’ या नावाची. या एकांकिकेच्या इंग्रजी भाषांतराने शांतीस्वरूप यांना सरस्वती प्रतिष्ठानाचे पारितोषिक मिळवून दिले.

भटनागर यांनी पंजाब विद्यापीठाची इंटरमीडिअट ची परीक्षा उत्तीर्ण केली आणि १९१३ ला फोरमन ख्रिस्ती महाविद्यालयात प्रवेश घेतला. १९१६ ला भौतिकशास्त्रात बी.एस सी ची पदवी मिळवली आणि १९१९ ला रसायनशास्त्रात एम. एस सी  ची पदवी मिळवली. 

पुढे त्यांनी दयाळ महाविद्यालयाच्या ट्रस्ट द्वारे दिल्या जाणाऱ्या स्कॉलरशिपच्या मदतीने लंडन विद्यापीठातून १९२१ ला रसायनशास्त्रात डॉक्टरेट  मिळवली. १९२१ ला भारतात परत आले आणि त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठात अध्यापन सुरु केले. हे करत असतांनाच त्यांनी आपले संशोधन सुरु ठेवले. सोबतच त्यांच्या कविमनालाही जपले. त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठाचे ‘कुलगीत’ रचले. 

इमल्शन आणि कॉलॉइड मिश्रणे हा त्यांच्या अभ्यासाचा प्रमुख विषय.त्यांनी उसाच्या उरलेल्या लगद्यापासून पशूंसाठी ढेप बनवण्याची पद्धत शोधून काढली होती. सोबतच कच्चे तेल उत्खननाच्या पद्धतीतील विकास यातही त्यांचे मोलाचे योगदान आहे. भारताच्या विज्ञान आणि औद्योगिक संशोधन मंडळाचे (CSIR ) चे ते पहिले डायरेक्टर जनरल होते. भारताच्या वैज्ञानिक प्रगतीमध्ये CSIR चा सिंहाचा वाटा आहे. 

शांतीस्वरूप भटनागर यांना ‘भारतीय संशोधन प्रयोगशाळांचे जनक ‘ असे म्हटले जाते. त्यांचे १ जानेवारी १९५५ ला दिल्ली येथे निधन झाले. 

 

 

प्रफुल्लचन्द्र रे 

 

प्रफुल्लचंद्र रे यांचा जन्म २ ऑगस्ट १८६१ ला ब्रिटिश भारतातील खुलना  या ठिकाणी झाला. हे ठिकाण सध्या बांगलादेश मध्ये येते. ते भारतातील रसायन शास्त्रातील तज्ज्ञ होते. त्यांना ‘भारतीय रसायन विज्ञानाचे जनक’ म्हटले जाते. 

१८७६ ला त्यांनी ब्राम्हो समाजाद्वारे स्थापित अल्बर्ट स्कुल मध्ये प्रवेश घेतला. पुढे त्यांनी विद्यासागर महाविद्यालयातून बी. ए. ची पदवी मिळविली. त्यांनी बहिःशाल विद्यारही म्हणून प्रेसिडेंसि महाविद्यालयातील भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचे धडे घेतले. इथेच त्यांची रसायनशास्त्रात आवड निर्माण झाली. 

अखिल भारतीय स्तरावर त्यावेळी एडीनबर्ग विद्यापीठात प्रवेशासाठी स्कॉलरशिप परीक्षा घेतली जायची. या परीक्षेत अव्वल येऊन त्यांनी स्कॉलरशिप मिळवली. आणि एडीनबर्ग विद्यापीठातून बी.एस.सी आणि  एम.एस्सी च्या पदव्या प्राप्त केल्या. इंग्लंडला जात असतांना त्यांचे वय मात्र २१ वर्षे होते. 

 त्यांनी डबल सुल्फेट्स च्या क्षेत्रात बरेच संशोधन केले. मर्क्युरस नायट्राइटाचा शोध हे त्यांचे एक यश समजले जाते. मर्क्यूरस  नायट्राइटावरील त्यांच्या शोध निबंधाने त्या क्षेत्रात संशोधनाला अनेक दरवाजे उघडले.त्यांचे अमोनिअम नायट्राईट  संबंधीचे संशोधनासाठी तर त्यांचे नोबेल पुरस्कार विजेता रामसे याने कौतुक केले होते.त्यांच्या या क्षेत्रातील कार्यामुळेच त्यांना ब्रिटिश वैज्ञानिक “मास्टर ऑफ नायट्राइट्स “ म्हणत . 

त्यांनी ऑरगॅनिक केमिस्ट्री, इनऑरगॅनिक केमिस्ट्री आणि रसायनशास्त्राचा इतिहास या तिनही क्षेत्रांत कार्य केले.१९०२ साली त्यांनी ‘ या हिस्टरी ऑफ हिंदू केमिस्ट्री ‘ नावाचे पुस्तक प्रकाशित केले. सत्येंद्रनाथ बोस, मेघनाद सहा, ज्ञानचंद्र घोष यांसारखे प्रसिद्ध वैज्ञानिक त्यांचे विद्यार्थी होते.१६ जून १९४४ ला त्यांनी जगाचा निरोप घेतला. 

मित्रांनो  भारतीय वैज्ञानिक मराठी माहिती या पोस्ट मध्ये आपण आधुनिक भारतीय वैज्ञानिक यांची माहिती पाहत आहोत. आतापर्यंत आपण भारतीय विज्ञानाच्या क्षेत्रातील महत्वाचे वैज्ञानिक सर शांतीस्वरूप भटनागर आणि सर प्रफुल्लचंद्र रे यांची माहिती घेतलीत. आता  भारतीय वैज्ञानिक मराठी माहिती या पोस्ट मध्ये आपण बिरबल सहानी यांच्याविषयी थोडक्यात माहिती घेऊया. 

 

 

बिरबल रुचिराम सहानी 

 

बिरबल सहानी यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८९१ ला सध्या पाकिस्तानात असलेल्या भेडा  या गावी झाला. त्यांचे वडील रुचिराम सहानी हे रसायनशास्त्राचे प्रेध्यापक असल्याने त्यांना योग्य ती शैक्षणिक पार्श्वभूमी आधीच मिळाली होती. त्यांना लहानपणीच वनस्पती, खडक, जीवाष्म यांचा संग्रह करण्याचा छंद जडला होता.तोच छंद त्यांनी जोपासला आणि पुढील आयुष्यात एक पुरवनस्पतीतज्ञ म्हणून कार्य केले.  

 लाहोर येथे प्राथमिक आणिमाद्यामिक शिक्षण घेतल्यानंतर पंजाब विद्यापीठाची बी. एस्सी . ची पदवी त्यांनी १९११ ला संपादन केली आणि पुढेंहील वाटचालीसाठी केम्ब्रिज विद्यापीठात ट्रायपास मिळवून प्रवेश घेतला. त्यांच्या वनस्पती जीवाश्मावरील संशोधनासाठी लंडन विद्यापीठाने डी. एस्सी . हि पदवी देऊन १९१९ ला त्यांना सन्मानित केले. 

नंतर भारतात परतल्यावर त्यांनी पंजाब विद्यापीठात प्राध्यापक व बनारस विद्यापीठात वनस्पती विभागप्रमुख म्हणून काम पहिले. १९३६ ला त्यांना लंडन रॉयल सोसायटीचे फेलो म्हणूनही सन्मान मिळाला. १९५० साली होणाऱ्या आंतरराष्ट्रीय वनस्पतिविज्ञान परिषदेकरिता त्यांची सन्माननीय अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. परंतु ती परिषद होण्याअगोदरच १० एप्रिल १९४९ ला त्यांचे निधन झाले. 

बलराम सहानी यांचे पुरावनस्पतीविज्ञानातील योगदान मोलाचे ठरले. त्यांनी पुरातत्वशास्त्रातही आपली चमक दाखवली. विद्यार्थ्यांसाठी त्यांचे लेक्चर म्हणजे एक प्रकारची मेजवानीच असायची.भारतात पुरावनस्पतिविज्ञानासाठी  संस्था काढण्याचा मान त्यांचाच आहे. 

    

 

समारोप 

 

मित्रांनो भारतीय वैज्ञानिक मराठी माहिती या पोस्टच्या माध्यमातून आज आपण काही भारतीय वैज्ञानिकांविषयी  माहिती घेतली. सुरुवातीला प्राचीन भारतातील वैज्ञानिकांपासून सुरुवात करून आपण आधुनिक भारतीय वैज्ञानिक यांच्याविषयी माहिती पाहिलीत. 

मित्रांनो आम्हाला माहित आहे की भारतीय वैज्ञानिक मराठी माहिती या पोस्टमध्ये दिलेली यादी सध्यातरी अपुरी आहे. ही  यादी पुढे वाढवण्याची आणि जवळ जवळ महत्वाचे सारेच भारतीय वैज्ञानिक त्या यादीत समाविष्ठ असतील असा आमचा प्रयत्न राहणार आहेच. 

अपूर्ण असली तरी भारतीय वैज्ञानिक मराठी माहिती हि पोस्ट तुम्हाला कशी वाटली? या पोस्ट मधील कुठली व्यक्ती भन्नाट वाटली? ते आम्हाला नक्की कळवा. सोबतच भारतीय वैज्ञानिक मराठी माहिती या पोस्टला अधिक माहितीपूर्ण बनवण्यासाठी काही सुचवायचे असेल तर ते सुद्धा नक्की सुचवा. भारतीय वैज्ञानिक मराठी माहिती हि पोस्ट अधिक मनोरंजक आणि वाचनीय होण्यासाठी तुमचे सहकार्य आवश्यक आहे. 

धन्यवाद.  

 

Also Read

 

1 thought on “भारतीय वैज्ञानिक मराठी माहिती । Indian Scientist Information in Marathi”

Leave a Comment